Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नर्सिंग प्रवेशाची अट रद्द करण्याची मागणी

$
0
0
बीएससी नर्सिंगला प्रवेश घेताना घालण्यात आलेली ९०:१० ची अट रद्द करावी, अशी मागणी ‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड नर्सिंग कॉलेज’ (महाराष्ट्र) या संघटनेच्या वतीने करण्यात आली.

शिक्षण हक्क मंचाचे उपोषण मागे

$
0
0
शालेय शुल्क नियंत्रण विधेयकाचे कायद्यात रुपांतर व्हावे, या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचातर्फे सुरू करण्यात आलेले उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंचाचे मतिन मुजावर, अशोक धुमाळ, हमेश परदेशी यांनी या कायद्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.

सोशल मीडियात होणार सिनेमाचे ‘लाइव्ह’ प्रमोशन

$
0
0
सिनेमाच्या प्रमोशनचा कार्यक्रम सुरू असताना त्याच वेळी ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून त्याचे सोशल मीडियातही ‘लाइव्ह’ प्रमोशन करण्याचा अनोखा फंडा तयार केला आहे, गणेशखिंडच्या मॉडर्न कॉलेजमधील बीएस्सी कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी. पुण्यात नुकत्याच झालेल्या एका मराठी चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी त्यांनी हा प्रयोग केला आणि त्यांचे काम १० हजार ‘फॉलोअर्स’नी वाखाणले.

बंटी चोर गजाआड

$
0
0
दिल्ली, कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन केरळमध्येही धुमाकूळ घालणारा देवेंद्रसिंह उर्फ कृपालसिंह उर्फ बंटी चोर (वय ४१, रा. नवी दिल्ली) मंगळवार पेठेतील एका जागरूक हॉटेलचालकामुळे शनिवारी पहाटे पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. घरफोडी आणि वाहनातील वस्तूंची चोरण्यात पटाईत असलेल्या बंटीवर देशभरात ५०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

‘आयुष’च्या आदेशाला हायकोर्टात आव्हान

$
0
0
देशातील आयुर्वेद कॉलेजमधील शिक्षकांची संख्या कमी करून हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधांच्या अटी शिथिल केल्याने आयुर्वेद शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या ‘आयुष’च्या आदेशाला नागपूर हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

‘कोंडी’त सापडलेल्या एसटीची पंतप्रधानांकडे दाद

$
0
0
डिझेल खरेदीच्या प्रति लिटरच्या दरात प्रत्येकी १२ रुपयांची वाढ झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने या प्रश्नासंदर्भात दाद मागण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पत्र धाडले आहे.

ढमढेरे यांच्या खुनामागील रहस्य काय?

$
0
0
मित्रमंडळ चौकातील आराधना बंगल्यात एका ८४ वर्षांच्या वृद्धाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून घरातील तीन लाखांची रोकड लुटण्याचा प्रकार दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यांत घडला होता. दत्तवाडी पोलिस आणि गुन्हे शाखेने या खुनाचा छडा लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असली तरी पदरी निराशाच पडल्याचे चित्र आहे.

कार्तेवा पुरस्कारासाठी ‘नॅनो गणेश’चे नामांकन

$
0
0
शाश्वत तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या संशोधनासाठी दिल्या जाणा-या ‘कार्तेवा पुरस्कारा’साठी पुण्याच्या ‘ओसियन अॅग्रो ऑटोमेशनच्या ‘नॅनो गणेश’चे नामांकन झाले आहे. शेतक-यांना मोबाइलवरून पंप नियंत्रित करण्याची सुविधा देणा-या या उत्पादनाला अंतिम विजेत्याच्या यादीत स्थान देण्यासाठी येत्या मंगळवारपर्यंत (२९ जानेवारी) तुम्हाला ऑनलाइन व्होटिंग करता येणार आहे.

पाषाण-बाणेर ठरतेय अपघातास निमंत्रण

$
0
0
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलेल्या रस्त्याची कामे अजूनही प्रलंबित अवस्थेत असल्याने पाषाण-बाणेर परिसरात अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ‘एक्स्प्रेस वे’प्रमाणेच या रस्त्यांवरील अपघाती मृत्यूला जबाबदार ठरणा-या अधिकारी-कंत्राटदारांवरही गुन्हा नोंदविण्याची मागणी पुढे येत आहे.

अॅग्रीमेट देणार पीक-पाण्याचा सल्ला

$
0
0
देशातील शेतक-यांना हवामानाविषयी, पीक-पाण्याबद्दल माहिती देणारे हवामान विभागाचे कृषी हवामान केंद्र (अॅग्रीमेट) आता आशियासह पूर्व आफ्रिकेतील देशांना कृषी हवामान क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाले आहे. या खंडातील तज्ज्ञांसाठीचा पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून (२८ जानेवारी) पुण्यात सुरू होत आहे.

‘आरटीओ’ कर्मचारी भाजताहेत अजूनही निवडणुकीच्या ‘भाकरी’

$
0
0
पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुका होऊन आता पावणेपाच वर्षे होत आली तरी या कामासाठी नेमलेले कर्मचारी निवडणुकीतच अडकली आहे. ‘आरटीओ’तील चार कर्मचा-यांना दोन्हीकडची कामे करावी लागत असून, त्यांच्या विभागातील कामे रखडली जात आहेत. त्यामुळे एकाच कामाची जबाबदारी ठेवण्याची मागणी कर्मचा-यांनी केली आहे.

कर्मचा-यांची बदली न करू नये

$
0
0
पुणे परिमंडळात काम करणा-या कामगारांची बदली दुसरीकडे न करता त्यांना जलसंपदा खात्याच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात सामावून घ्यावे, अशी मागणी मागणी महाराष्ट्र राज्य जलसंपदा यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी जात नष्ट होण्याची गरज

$
0
0
‘सामाजिक समता ही संकल्पना बोलण्यापुरती मर्यादित राहिली आहे. राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी जातीसाठी खावी माती ही प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज आहे,’ असे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बुधवारी व्यक्त केले.

पत्नीचा खून केल्यावरून पतीला जन्मठेप

$
0
0
चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा निकाल दिला. नंदकुमार पांडुरंग रामापुरे (वय ४४, रा. आदर्श हौसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, निगडी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने पत्नी नलिनी (वय ३६) हिचा गळा दाबून खून केला होता. ही घटना ऑगस्ट २०११ मध्ये घडली.

ओपन अॅक्सेस... ब्रेक के बाद!

$
0
0
राज्यभरातील संपूर्ण वीज क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणा-या ‘ओपन अॅक्सेस’ धोरणाच्या अंमलबजावणीला किमान वर्षभराचा ब्रेक लागला आहे. या धोरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक बाबींची पूर्तता झाल्यावरच त्याची अंमलबजावणी करावी, असा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने नुकताच दिला आहे.

मेडिकल कॉलेजांत शिक्षक टंचाई?

$
0
0
राज्यात सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या पाचशे जागा रिक्त असताना वैद्यकीय शिक्षण खात्याने बारामती, सातारा, नंदुरबारसह आणखी सात मेडिकल कॉलेज काढण्यास परवानगी दिली आहे. परिणामी प्राध्यापकांअभावी प्रारंभापासूनच ही कॉलेज अशक्त राहण्याची भीती आहे. पुणे-मुंबईसह चौदा सरकारी मेडिकल कॉलेज कार्यरत आहेत.

२०११ वर्षाची नोंदणी 'निराधार'

$
0
0
‘आधार’ मोहीम सुरू झाल्यानंतर लगेचच नागरी हक्कासाठीचे कर्तव्य बजाविण्याच्या भावनेने दिवसभर रांगेत उभे राहून नोंदणी केलेल्यांच्या पदरी अजूनही मनस्तापच पडत आहे. दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही आधार कार्ड न आल्याने राज्य सरकारच्या विविध योजनांपासून ‘निराधार’ होण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.

येवलेवाडी सुविधांपासून दूर

$
0
0
येवलेवाडीचा समावेश महानगरपालिकेच्या हद्दीत करण्याचा आदेश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी देऊनही त्यावर महानगरपालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. पालिका प्रशासनाने तातडीने येवलेवाडीला पालिका हद्दीत समाविष्ट करून येथे सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

शेलारवाडीत अजूनही घबराट

$
0
0
देहूरोडजवळीत शेलारवाडीत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला खरा मात्र, तो सापळ्यात न अडकल्याने ग्रामस्थांमध्ये अजूनही घबराटीचे वातावरण आहे. कुंडमळ्यातील रस्ते, इंद्रायणीचे पात्र या परिसरात लोक एकट्याने जाणे टाळतात. तर रात्रीच्या वेळीही केवळ मोटारीचाच वापर होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लेकी जगविणारा 'मसिहा' डॉक्टर

$
0
0
राज्यभरात ‘कन्याकांड’ होण्याचे प्रकार सुरू असतानाच ‘मुलगी जन्माला येताच मोफत उपचार’ असा उपक्रम राबवित आतापर्यंत पुणे शहर जिल्ह्यातील १३६ लेकींना जगविण्याचे कार्य करणारे हडपसरचे डॉ. गणेश राख मुलींसाठी ‘मसिहा’ तर अन्य डॉक्टरांसाठी आता ‘आदर्श’ ठरत आहेत...!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images