Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाकला चोख प्रत्त्युत्तराची तयारी ठेवा!

$
0
0
ताबारेषेवर सध्या उद्‍भवलेल्या परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सबंध पुन्हा बिघण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली चर्चा, खेळ, मनोरंजन, व्यापार कायम ठेवला पाहिजे. मात्र, सीमेवर काही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचीही तयारी भारताने ठेवली पाहिजे, असे मत निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी व्यक्त केले.

दुष्काळी गावांसाठी बँकांचा 'सहकार'

$
0
0
दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील बारा हजार गावांच्या मदतीसाठी सहकारी साखर कारखाने व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे. या गावांसाठी पाणी, जनावरांना चारा देण्याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीला टनामागे काही रक्कम देण्याची तयारी साखर कारखान्यांनी तर आपल्या नफ्यातील एक टक्का रक्कम जिल्हा बँकांनी टंचाईसाठी देऊ केली आहे.

मनसेच्या रॅलीचा एसटीला फटका

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एसटी कर्मचा-यांच्या रॅलीत पुण्यातील एसटी कर्मचा-याने हजेरी लावल्याने एसटी प्रशासनाला दिवसभरात २२ बसेस रद्द कराव्या लागल्या. शिवाजीनगर बसस्थानकावरून २१ आणि स्वारगेटवरुन दोन बसेस रद्द करण्यात आल्याचे एसटीच्या अधिका-यांनी सांगितले.

जीआरई मुंबई केंद्रातील परीक्षेबाबत संभ्रम

$
0
0
अमेरिकेत शिकायला जाणा-या राज्यातील विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये एप्रिलपर्यंत ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन (जीआरई) देता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जीआरईच्या मुंबई सेंटरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जनगणना वादामुळे कँटोन्मेंट निवडणुका अनिश्चित

$
0
0
देशातील ६२ कँटोन्मेंट बोर्डांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी कधीची जनगणना ग्राह्य धरावी हे निश्चित होत नाही, तोवर निवडणुका कधी होणार हे सांगता येत नाही, असे रक्षा संपदा विभागाचे महासंचालक रविकांत चोपडा यांनी सांगितले.

बेकायदा गर्भलिंगनिदान करणा-यांवर कारवाई सुरू

$
0
0
‘बेकायदा गर्भलिंगनिदान करणा-या डॉक्टरांवर कारवाई करण्यास सरकारने सुरुवात केली असून, ४२ प्रकरणांतील दोषी व्यक्तींना कोर्टाने शिक्षा सुनावल्या आहेत,’ अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी कळविले असल्याचे आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

लेव्ही साखर न देणा-या कारखान्यांवर कारवाई

$
0
0
रेशनवर वितरित करण्यात येणारी लेव्ही साखर न देणा-या सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. या कारवाईसंबंधीचा अहवाल येत्या महिन्यात सादर करण्याचीही सूचना जिल्हाधिका-यांना करण्यात आली आहे. रेशनवर सवलतीच्या दरात म्हणजे तेरा रुपये प्रति किलो दराने साखर विक्री केली जाते.

‘स्टे’च्या कारवाईला मिळाले अभय

$
0
0
‘अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईला स्टे देण्याचा अधिकार दिवाणी कोर्टाला नाही,’ असा महत्त्वपूर्ण निकाल मनपा कोर्टाने नुकताच दिला आहे. त्यामुळे पाडापाडीच्या कारवाईला ऊठसूट स्टे मिळणे थांबणार असून शहरातील सुमारे पावणेचारशे प्रकरणे निकाली निघणार आहेत.

महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

$
0
0
पुणे पोलिस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षात महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलिस हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. २६०५०१९१ या हेल्पलाइन क्रमांकावर महिला अत्याचाराविरोधात तक्रार करू शकतील, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी शनिवारी दिली.

‘भामा आसखेड’मधून सोलापूरला पाणी द्यावे

$
0
0
उजनी धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळातून वाचविण्यासाठी भामा आसखेड धरणातून सोलापूरला आठ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे. पावसाअभावी उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही.

भामा आसखेडचे २.६ टीएमसी पाणी पुण्याला

$
0
0
भामा आसखेड धरणातून पुणे शहराचा पाण्याचा वाढीव कोटा देण्यास मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. हा निर्णय झाल्यास शहरास येथून २.६ टीएमसी पाणी मिळणार आहे.

‘पीएमआरडीए’चे घोडे अखेर मुळा-मुठेत न्हाणार

$
0
0
पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमत झाल्याने या प्राधिकरणाची स्थापना मार्गी लागणार आहे. पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड प्राधिकरण, पीएमपीएमएल आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) या सर्वांसाठी मिळून एकच आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे.

एकाच बिल्डिंगमध्ये ४ गाळे फोडले

$
0
0
चिंचवड येथील कमला कॉर्नर या व्यावसायिक इमारतीचे शटर उचकटून चोरट्यांनी तेथील चार गाळे फोडले. त्यात सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. शनिवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

सहायक कुलसचिवांसह ७ अटकेत

$
0
0
नापास विद्यार्थ्यांना पास करण्याच्या पुणे विद्यापीठातील गैरप्रकारासंबधी सहायक कुलसचिव व पुनर्मूल्यांकन विभागाचे उपकुलसचिव यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी यापूर्वी तीन कर्मचा-यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत होती. ती शक्यता खरी ठरली आहे.

गुंठेवाल्यांची दौलतजादा

$
0
0
गुंठेवाल्यांमुळे मराठा समाजातील लग्नाचे स्वरूप बदलून गेले आहे. ज्यांच्याकडे अमाप पैसा आला आहे, ते तो खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण ज्यांच्याकडे तुटपुंजा पैसा आहे, त्यांनी असे लग्न पाहिले तर त्यांना धास्तीच भरते. हल्ली नव-या मुलांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. लग्न दिमाखात करण्याची त्यांची मागणी असते. त्यात वधूपिता मात्र कफल्लक होतो, याचे भान राहत नाही. लग्नाची ही पद्धत मराठा समाजाला नक्कीच मारक आहे.

रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार

$
0
0
डेक्कन येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाई तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आरक्षित केलेली बारा हजार रुपयांची तिकिटे आणि रोख चार हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

भ्रष्टाचारमुक्ती व्हावी स्वतःपासून

$
0
0
‘गांधी टोप्या घालून आणि मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करत देश भ्रष्टाचारापासून मुक्त करावा. त्यासाठी ‘मी भ्रष्टाचार करणार नाही’ अशी खूणगाठ मनाशी बांधा,’ असे आवाहन माजी न्यायाधीश आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती विश्वनाथ पळशीकर यांनी शनिवारी केले.

मार्केट, मंडईच्या अनेक जागा निवासी

$
0
0
पुण्याच्या विकास आराखड्यात (डीपी) मार्केट आणि भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या अनेक जागा निवासी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शहरातील वर्दळीचे रस्ते आणि फूटपाथचा ताबा भाजीविकेत्यांकडून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..म्हणून मोदी झटपट निर्णय घेतात!

$
0
0
‘देशाच्या विकासासाठी स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये स्थिर सरकार असल्याने नरेंद्र मोदी झटपट निर्णय घेऊ शकतात. मात्र, केंद्रात आघाडी सरकार असल्याने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना निर्णय घेणे अवघड जात आहे,’ असे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

गरिबीचा जन्म व्यवस्थेतूनः युनूस

$
0
0
‘गरिबी ही आपणच तयार केलेली व्यवस्था, धोरणे आणि संस्थांमधून जन्माला आली आहे. गरीब लोक गरिबी निर्माण करत नाहीत. तर, त्यांच्यावर गरिबी लादली जाते,’ असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांनी शनिवारी केले. माईर्स एमआयटीतर्फे आयोजित भारतीय विद्यार्थी संसदेत युनूस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images