Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे मेट्रोसासाठी बजेटमध्ये तरतूद

$
0
0
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रापाठोपाठ राज्याच्या येत्या बजेटमध्येही आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. मेट्रोशी संबंधित विषयांवरून चर्चा आणि वाद घालून राहण्यापेक्षा हा प्रकल्प पुढे नेण्याची भूमिका सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कॅनॉलमध्ये पोहताना युवकाचा मृत्यू

$
0
0
गुलटेकडी येथील डायस प्लॉट परिसरात‌कॅनॉलमध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बुडालेल्या दोन मुलांचा जीव वाचला.

पुण्यातील तज्ज्ञ देताहेत ‘बॅरिअॅट्रिक सर्जरी’चे धडे

$
0
0
लठ्ठपणासह मधुमेहाने ग्रासलेल्यांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या ‘बॅरिअॅट्रिक सर्जन’चा देशात मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. वीस लाख पेशंटला या सर्जरीची गरज असून, आजार नियंत्रित करण्यासाठी देशातील डॉक्टरांनाच पुण्यातील बॅरिअॅट्रिक सर्जन आता धडे देत आहेत.

आधारकार्डसाठी गॅस एजन्सीकडून ग्राहक वेठीला

$
0
0
आधारकार्ड नसले, तरी ‘केवायसी’ भरण्यास आणि बँक खाते उघडण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी देऊनही शहरातील काही गॅस एजन्सीचालक ग्राहकांकडे आधारकार्डची मागणी करुन त्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. जिल्हा प्रशासनाने यात पुढाकार घेऊन स्पष्ट धोरणाचे परिपत्रक काढावे, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी

$
0
0
नापास विद्यार्थ्यांना पास करण्याच्या पुणे विद्यापीठातील गैरप्रकारासंबंधी अटक करण्यात आलेल्या सहायक कुलसचिव व पुनर्मूल्यांकन विभागाचे उपकुलसचिव यांच्यासह दहाही आरोपींना कोर्टाने १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अपघात रोखण्यासाठी संयुक्त मोहीम

$
0
0
‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी गृह विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या वतीने संयुक्तपणे पावले टाकण्यात येत आहेत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली.

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गाला गती मिळणार

$
0
0
शहरातील दोन मेट्रो मार्गांपैकी स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाला राज्य सरकारची मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. तरीदेखील ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (डीएमआरसी) सादर केलेल्या तपशीलवार प्रकल्प अहवालावर (डीपीआर) केंद्र सरकारच्या पातळीवर एकत्रितच प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे वनाझ ते रामवाडी या मार्गाबरोबरच स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रोमार्गालाही गती मिळणार आहे.

‘पिफ’च्या पडद्यावर ‘व्यत्यया’मुळे रसभंग

$
0
0
सध्या ‘पिफ’मुळे अवघे पुणे चित्रपटमय वातावरणाचा अनुभव घेत आहे. एकीकडे चित्रपटांचे कौतुक होत असताना चित्रपट सुरू असताना आवाज येत नाही, चित्रपट वेळेवर सुरू होत नाही, चित्रपटांतील व्यक्तिरेखा कापल्या जातात, प्रोजेक्शन योग्य नाही अशा तक्रारी प्रेक्षकांकडून होत असल्यामुळे वेगळेच गोंधळनाट्य समोर येत आहे.

अब्रूवर हात टाकण्याचे अजूनही होतेय ‘धाडस’

$
0
0
दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृतीचे वणवे पेटले असताना मुलींच्या अब्रूवर हात टाकण्याचे ‘धाडस’ करणारी मानसिकता समाजात अजूनही शाबूत आहे. पुण्यात शनिवार-रविवारी त्याचाच संतापजनक प्रत्यय आला.

सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहितेचा विनयभंग

$
0
0
सेनापती रोडवरील एका सॉफ्टवेअर कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहितेचा विनयभंग झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. चतुःशृंगी पोलिसांनी या कंपनीतील ‘एचआर’ मॅनेजरला गजाआड केले असून, कोर्टाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

तलवारीच्या धाकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0
अप्पर इंदिरानगर येथे शनिवारी दुपारी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने तलवारीच्या धाकाने १४ वर्षांच्याच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बिबवेवाडी पोलिसांनी या मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे.

अलूरकर यांच्या खुनाची फाईल ‘रेकॉर्ड’रूममध्येच

$
0
0
कर्वे रोडवरील अलूरकर म्युझिक हाऊसचे मालक, संगीताचे जाणकार आणि जुन्या संगीताचे संग्राहक सुरेश अलूरकर (वय ५९) यांच्या खुनाला गेल्या महिन्यात चार वर्ष पूर्ण झाली. मात्र, अजूनही पोलिसांना ना मारेक-यांना गजाआड करण्यात यश मिळाले ना त्यांची ठोस माहिती मिळवण्यात! अलूरकर यांचा खून एक रहस्यकथा बनली असून या खुनाला कधीतरी वाचा फुटेल एवढीच अपेक्षा करण्यात येत आहे.

‘घोटाळेबहाद्दर’ विद्यापीठात पुनर्मुल्यांकनातही त्रुटी?

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षेला तोतया विद्यार्थी बसवण्याचे प्रकरण गाजत असताना पुनर्मूल्यांकनात होणा-या त्रुटीही लवकरच समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका पाठोपाठ एक घोटाळे समोर येत असल्याने परीक्षा विभागाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कालचा ‌रविवार वाणाच्या खरेदीचा

$
0
0
भोगी आणि मकर संक्रांतीसाठी लागणा-या वाणाच्या खरेदीसाठी महात्मा फुले मंडईचा परिसरात रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हरभरा, बोर, गव्हाची ओंबी, जोंधळा, पावटा आणि ऊसाच्या खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती. तसेच हलवा, हलव्याचे दागिने आणि सुगड यालाही मागणी होती.

केमिस्ट्रीतील प्रयोग, इलेक्ट्रिक कार आणि म्युझिक बँड...

$
0
0
केमिस्ट्रीतील अनोखे प्रयोग प्रत्यक्ष हाताने करून पाहण्याची संधी... जर्मनीतील उच्च शिक्षणाचे नवे क्षितिज दाखवणारे दालन... जर्मन खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि सायंकाळच्या वेळी म्युझिक बँड आणत असलेली धमाल...

जलसाक्षरतेचा ‘रणदुल्लाबाद पॅटर्न ’

$
0
0
सलग दुस-या वर्षी कमी पाऊस झाल्याने सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांमधील टँकर सुरूच राहतील, हे जुलैमध्येच स्पष्ट झाले होते. मात्र, पंधरा वर्षांपूर्वीच केलेली बोअरबंदी, विहिरींचा सामाईक वापर आणि त्यानंतर भूजल संवर्धनातून कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद या गावाने जलसाक्षरतेचा नवा आदर्श उभा केला आहे.

चित्रपटाचे संगीत सर्वाधिक सर्जनशील

$
0
0
‘माझ्या आजवरच्या कारकिर्दीत चित्रपट संगीताचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. चित्रपटाचे संगीत करताना त्याचा अनेक बाजूंनी विचार करावा लागतो. हे खूप कौशल्याचे काम असल्याने ते सर्वाधिक सर्जनशील आहे,’ असे मत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी व्यक्त केले.

‘फॅमिली कोर्टात मोफत विधी सेवा सुरू करा’

$
0
0
कोर्टात येणा-या आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना कोर्टकचेरीसाठी लागणारा खर्च आणि वकील नेमणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा लोकांना विधी सेवा प्राधिकरणातफे मोफत वकील सेवा पुरविण्यात येते. भारती विद्यापीठ भवन येथील फॅमिली कोर्टात अशा प्रकारची विधी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पक्षकार आणि वकिलांतर्फे करण्यात येते आहे.

शिक्षण हक्क कायद्यातील काही तरतुदींमुळे संभ्रम

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यातील (राइट टू एज्युकेशन) काही तरतुदी या संभ्रम निर्माण करणा-या आहेत. या राखीव जागांवर अपंग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. शाळेपासूनचे अंतर तसेच पालकांच्या आर्थिक उत्पन्नाबाबतही पुरेशी स्पष्टता नसल्याचा फायदा खासगी शाळांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

बिबवेवाडीतील पालिका शाळेत अस्वच्छतेचे साम्राज्य

$
0
0
बिबवेवाडी परिसरातील सीताराम आबाजी बिबवे या पालिकेच्या शाळेतील वर्गांपासून स्वच्छतागृहांपर्यंत सर्वत्र अस्वच्छता, असुविधा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, त्वरेने कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images