Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एकाच वेळी मिळवा दोन पदव्या

$
0
0
एखाद्या विद्यापीठातून नियमित पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना त्या किंवा इतर विद्यापीठाचा अन्य एखादा पदवी अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने करणे शक्य व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पावले उचलली आहेत. असे झाले, तर बीए करता करता दूरस्थ पद्धतीने ‘बीकॉम’ करणेही शक्य होऊ शकेल.

...अन् वर शिरजोर

$
0
0
सिग्नल तोडून चाललेल्या दुचाकीवरील दोघींनी वाहतूक पोलिसाला न जुमानताच पळ काढण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र थोडे अंतर गेल्यावर दुचाकी स्लीप होवून त्या दोघीही रस्त्यावर पडल्या. मात्र, याला वाहतूक पोलिसच कारणीभूत असल्याचा दावा करीत त्या दोघींनीही भर चौकात पोलिसाच्याच शर्टची कॉलर धरली.

मुंबईच्या सराफाचे सोने लुटले

$
0
0
सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार करण्यासाठी मुंबईहून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या व्यापाऱ्यांकडील पावणेतीन किलोंचे दागिने असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. सांगवी फाटा येथील औंध हॉस्पिटलसमोर शुक्रवारी (४ जानेवारी) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपरी पालिकेत चोरीचा प्रयत्न

$
0
0
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मुख्य इमारतीमधील पाच कक्षांचे दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आले आहे.

संमेलन ‘परशू’ वादाच्या भोव-यात

$
0
0
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर परशुरामाची कुऱ्हाड आणि प्रतिमा वापरून संमेलन आयोजकांनी विद्रोही आणि बहुजनवादी विचारगटांचा रोष ओढवून घेतल्याने नवाच वाद उद्भवला असून या प्रतीकांचा वापर केल्याचा आरोप करत संमेलन उधळून लावण्याची धमकी ‘संभाजी ब्रिगेड’ने दिली आहे.

चिपळूण संमेलन उधळण्याची धमकी

$
0
0
चिपळूणमध्ये आयोजित ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाची कुऱ्हाड आणि परशुरामाची प्रतिमा वापरल्यामुळे हे संमेलन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संमेलनाच्या पत्रिकेवर स्त्री-दास्यत्वाच्या भूमिकेला खतपाणी घालणाऱ्या या प्रतीकांचा वापर केल्याचा आरोप करत हे संमेलन उधळून लावण्याची धमकी ‘संभाजी ब्रिगेड’ने दिली आहे. तर पुरोगामी विचारांच्या डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या प्रकाराचा धिक्कार करून संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळी’कडून करण्यात आली आहे.

एलबीटी लागू करण्यास मुहूर्त मिळेना

$
0
0
‘जकातीला पर्यायी व्यवस्था म्हणून सुरू करण्यात येत असलेल्या स्थानिक संस्था कर पद्धती (एलबीटी) लागू करण्याचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडने एलबीटीची पद्धत स्वीकारावी,’ असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.

'आपत्ती व्यवस्थापन सर्वांना शिकवावे'

$
0
0
‘विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे (डिझास्टर मॅनेजमेंट) प्रशिक्षण समाजातील प्रत्येक घटकाला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची वेळ आली असून माध्यमांनी त्यासाठी जनजागृती करा,’ असे आवाहन पाचव्या बटालियनचे कमांडंट अलोक अवस्थी यांनी शनिवारी केले.

आरोग्य तरतुदी: सरकारवर दबाव हवा

$
0
0
‘अमेरिकेत एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या १७ टक्के रक्कम आरोग्य सुविधांवर खर्च होते. भारतात त्याचे प्रमाण केवळ ०.९ टक्के इतके आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी भरघोस तरतूद करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे,’ असे मत अमेरिकेतील डॉ. जतीन शहा यांनी व्यक्त केले.

सामाजिक चळवळींकडे डोळसपणे पाहा

$
0
0
‘व्यक्तिगत प्रश्नांची उकल होणार नाही अशी हतबलता स्त्री पुरुषांमध्ये येऊ लागली आहे. त्यामुळे सर्व सामाजिक चळवळींकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे,’ असे मत पुरस्कारार्थी लेखक व कार्यकर्ते यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आले.

महिलांच्या तक्रारींसाठी स्वागत कक्ष

$
0
0
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या महिलांना त्यांची तक्रार दाखल करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पुणे पोलिसांतर्फे शनिवारपासून प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र स्वागत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

आता अवकाशातच युद्धे होतील

$
0
0
‘भावी काळातील संरक्षण सिद्धतेसाठी माहिती तंत्रज्ञान, बायोलॉजी आणि नॅनोटेक्नोलॉजी यांचा एकत्रित वापर करणे महत्त्वाचे ठरेल. आतापर्यंत जमिनीवर आणि आकाशात युद्ध झाले. परंतु पुढील युद्ध अवकाशात लढले जाईल,’ असे मत संरक्षणमंत्र्यांचे संरक्षण सल्लागार व्ही. के. सारस्वत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

साहित्यात 'विज्ञानकथा' समृद्ध व्हाव्या

$
0
0
‘मराठी साहित्यात उत्कृष्टतेचा शिक्का असलेले वाड्.मय थोडेच आहे. पण विज्ञान आणि समाज यांच्या परस्पर संबंधांना कथा माध्यमातून व्यक्त करणे ही काळाची गरज आहे. मराठी साहित्याचे हे नवे दालन अधिक समृद्ध व्हावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

सात आरोपींना 'मोक्का'

$
0
0
जंगली महाराज रस्ता साखळी बॉबस्फोटप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या सात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका)त गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी या सात जणांना मुंबईतील कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

पर्यावरण अहवाल बैठकीकडे पाठ

$
0
0
महापालिकेचा पर्यावरण अहवालावर टीका अनेक मंडळी पुढे येत असली तरी प्रत्यक्षात हा अहवाल कसा असावा, याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अवघे चार लोक उपस्थित राहिले. वेगवेगळ्या संस्थांना निमंत्रण देऊनही एकाही पर्यावरणवादी संस्थेचा पदाधिकारी बैठकीकडे फिरकला नाही.

येरवडा जेलमध्ये कैद्याची 'वीरूगिरी'

$
0
0
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांमध्ये आंघोळीच्या कारणावरून झालेल्या भांडणातून शनिवारी एक कैदी गंभीर जखमी झाला; तर दुसरा कैदी त्याच्यावर कारवाई होईल या भीतीने जेलमधील बराकीच्या कौलांवर चढून बसला. शेवटी त्याला खाली उतरवून घेण्यासाठी जेलमध्ये फायर बिग्रेडला पाचारण करावे लागले.

नयना पुजारीप्रकरणी मोर्चा

$
0
0
‘पुन्हा नाही, पुन्हा नाही, नयना पुजारी पुन्हा नाही... ज्योती चौधरी पुन्हा नाही’ म्हणत पुजारी खटल्यातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शनिवारी पुण्यात एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ‘नयना मेमोरिअल ट्रस्ट’तर्फे आयोजित या मोर्चामध्ये नयना पुजारी यांच्या कुटुंबीयांसह पुणेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

उसासाठी पाणी जपूनच वापरा

$
0
0
‘महाराष्ट्राने अनेकदा दुष्काळाला तोंड दिले. परंतु पाणी नाही, अशी स्थिती पन्नास वर्षांत प्रथमच ओढवली आहे.यंदा राज्यात बहुतेक भागातील लोकांसमोर आताच पाण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे उसासाठी पाणी जपून वापरावे,’ असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.

उसाला मुक्त पाणी बंद करणार

$
0
0
‘राज्यभर पाण्याची स्थिती गंभीर आहे. उसासाठी आता पाण्याच्या मुक्त वापरावर बंदी आणून,फक्त ठिबक सिंचनालाच अनुदान द्यावे लागेल. येत्या तीन वर्षांत राज्यातील सगळे ऊस क्षेत्र ठिबक सिंचनावर आणण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिली.

गरज पडल्यास कर्नाटकातून पाणी

$
0
0
‘राज्यात पाण्याचा तुटवडा ही गंभीर समस्या निर्माण झाली असून गरज भासल्यास कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी तेथील सरकारशी चर्चा सुरू आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images