Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मार्केटयार्ड परिसरात बॉम्बची अफवा

$
0
0
मार्केटयार्ड परिसरातील वर्दळीच्या गंगाधाम चौकातील गगन गॅलक्सी सोसायटीत एका टू व्हीरला अडकाविलेल्या पिशवीत बॉम्ब असल्याची चर्चा वा-यासारखी पसरली अन शनिवारी सायंकाळी या परिसरात खळबळ उडाली.

हिंजवडीत आढळली ३ दिवसांची चिमुरडी

$
0
0
हिंजवडीतील कचराकुंडीत शनिवारी सकाळी दुपारी नवजात बालिका आढळून आली. मात्र, नागरिकांच्या सर्तकतेमुळे तीन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचला. तिला उपचारासाठी ससून हॉ‌स्पिटलमध्ये दाखल केले आहे. गेल्या काही काळात राज्याच्या विविध भागांमध्ये स्त्री भ्रूणहत्या आणि बालिकांना टाकून देण्याच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

आदिवासींवर विज्ञानाची सक्ती नको

$
0
0
आदिवासींकडे जमीन संधारण, उत्पादन क्षमतेतील वाढ यासाठीचे उपजत ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्यावर विज्ञानाची सक्ती करण्याऎवजी त्यांच्या मार्ग आणि साधनांचा आदर करायला हवा, असे आग्रही मत जागतिक स्तरावर आदिवासी समुदायासाठी काम करणा-या फ्रँग रॉय यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणेही होणार पुलांचे शहर

$
0
0
मुंबई-नागपूरपाठोपाठ आगामी काळात पुणेही उड्डाणपुलांचे (फ्लायओव्हर) शहर होणार आहे. वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये विविध ठिकाणी तीस फ्लायओव्हर्स प्रस्तावित करण्यात आले आहेत.

लकडेच्या खुनाला लांडगे कारणीभूत

$
0
0
गोट्या धावडे खून प्रकरणात गोळीबारात हलगर्जीपणामुळे आपला साथीदार अंकुश लकडे याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अ‍ॅड. अंकुश लांडगे यांचा मुलगा राहुल लांडगे याच्या विरोधात भोसरी पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

सीडॅक शोधणार दुबार गॅसजोडण्या

$
0
0
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देशभरात दुबार गॅसजोडणी घेतलेल्या ग्राहकांचा शोध सुरू आहे. ही वेळखाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी पुण्याच्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग’ला (सिडॅक) यश मिळाले आहे. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’च्या (एनआयसी) सॉफ्टवेअरला सीडॅकमधील ‘हायपरफॉर्मन्स कम्प्युटिंग’ ची (एचपीसी) जोड मिळाल्याने हे साध्य झाले आहे.

उद्योगपती लोकसभेच्या रिंगणात

$
0
0
पुण्याच्या राजकारणामध्ये सध्या तयार झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पुण्यातील उद्योगपती पुढे सरसावले असून, डी.एस.कुलकर्णी, संजय काकडे आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी त्या दिशेने चाचपणी सुरू केली आहे. या नावांमध्ये आणखी भर पडू शकते. हे सगळेच जण विविध पक्षाच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महाराष्ट्रातही होणार आता चंदनाची वनशेती

$
0
0
हरित मित्र परिवार संस्थेतर्फे शतकोटी वृक्षारोपण योजनेंतर्गत ‘चंदनाच्या झाडांची वनशेती’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. त्यामध्ये ३५ जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातले एक गाव दत्तक घेऊन तेथे चंदनांच्या बिया आणि रोपांचे वाटप केले जाणार आहे.

धनकवडीत तरुणाचा खून

$
0
0
गणेशोत्सवातील वर्गणीच्या हिशोबावरून कोयत्याने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना धनकवडीतील शंकर महाराज मठ वसाहतीत शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ते फरार आहेत.

....तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही

$
0
0
श्वेतपत्रिकेच्या मुद्यावरून राज्य सरकार हे अजित पवार आणि सुनील तटकरे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी सरकारने गांभीर्याने न घेतल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष एकही दिवस अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी रविवारी (२ डिसेंबर) रावेत येथे केला.

ईशान्यवासियों... अधिकारांसाठी जागरूक राहा

$
0
0
‘स्वतंत्र भारतामध्ये परस्परांशी सौहार्दपूर्ण वर्तन करणे, हेच सुसंस्कृत नागरिकाचे कर्तव्य असले, तरी ईशान्य भारतीय नागरिकांना महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागांमध्ये सापत्नभावाची वागणूक दिली जाते. अर्थात, सगळा दोष अन्य राज्यांमधील नागरिकांवर टाकता येणार नाही. ईशान्य भारतीयही कुठे जागरूक होते नि त्यांनी तरी कुठे प्रभावीपणे आपली भूमिका मांडली, असा सवाल प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक जानू बरूआ यांनी रविवारी उपस्थित केला.

COEPच्या विद्यार्थ्याचा ‘गॅस सेन्सर’ जगात सर्वोत्कृष्ट

$
0
0
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) विद्यार्थ्याने सादर केलेल्या ‘गॅस सेन्सर’ या प्रकल्पाला सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘बेस्ट स्टुडंट रिसर्च पेपर’ पुरस्कार मिळाला आहे. वातावरणातील कार्बन मोनोऑक्साइड आणि इथेनॉलचा शोध घेणारा हा सेन्सर आनंद वडोदेकर या विद्यार्थ्याने विकसित केला आहे.

फसवणूक केल्यावरून पतीविरोधात गुन्हा

$
0
0
डॉक्टर असलेल्या आपल्या पतीने पैशासाठी आपली फसवणूक केली. तसेच, मानसिक व शारिरिक छळ केला असल्याची तक्रार पत्नीने पिंपरी पोलिसांमध्ये केली आहे. डॉ. सचिन श्रीरंग कसबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीप्ती सचिन कसबे (वय २९, रा. सुखवानी कॅम्पस) यांनी तक्रार दिली आहे.

साडेसात लाख रुपयांची घरफोडी

$
0
0
रामबाग कॉलनीतील फ्लॅट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडे सात लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मार्केट यार्डातील वजनकाटे थांबले

$
0
0
बंदमध्ये सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा देऊनही मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी रविवारी कडकडीत बंद पाळला. पहाटे माल मिळेल, या आशेने बाजारात आलेले किरकोळ व्यापारी आणि ग्राहक रिकाम्या हाती परतले. परंतु, शेतकऱ्यांनी आणलेला माल विकण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी पुढे आले होते. फूल बाजार मात्र, सुरळीत सुरू होता.

सरकार-व्यापा-यांच्या वादात भाज्या झाल्या महाग

$
0
0
राज्य सरकार आणि व्यापारी यांच्यातील वादाची झळ आता सामान्य पुणेकरांना बसू लागली असून, किरकोळ बाजारात भाज्या महाग झाल्या आहेत. भाज्यांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून व्यापा-यांनी भाज्यांच्या दरात वाढ केली आहे. आणखी दोन दिवस बंद कायम राहिल्यास किरकोळ बाजारात भाजी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सहकारी संस्थांनी तूर्त निवडणूक घेऊ नये

$
0
0
केंद्र सरकारने ९७ वी घटना दुरुस्त करून सहकार कायद्यात बदल केल्याने राज्याने या घटनेनुसार कायदा तयार करणे गरजेचे आहे. यामुळे १५ फेब्रुवारी २०१३ पर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यात येऊ नये, अशा सूचना सहकार विभागाला दिल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले. यामुळे फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही सहकारी संस्थांची निवडणूक होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

खगोलप्रसारासाठी एकवटले आकाशनिरीक्षक

$
0
0
पुण्याच्या सर्व उपनगरांमध्ये खगोलशास्त्राचा सुनियोजित प्रसार करण्यासाठी पुण्यातील सर्व हौशी खगोल संस्था एकत्र आल्या आहेत. आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) पुढाकाराने शहरातील प्रमुख हौशी खगोल संस्थांची एकत्रित बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. खगोलशास्त्राच्या प्रसाराप्रमाणेच हौशी स्तरावर एकत्रितपणे संशोधन करण्यावर या संस्थांचे एकमत झाले.

‘शेतकरीच खरा कर्मयोगी’ गावगाडा पुस्तकाचे प्रकाशन

$
0
0
‘अनंत अडचणींचा सामना करणारा सामान्य शेतकरी हाच सध्याच्या काळातील खरा कर्मयोगी आहे. त्यांना समजून घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि स्वप्नरंजनाच्या पलीकडे जात समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ संतसाहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी केले.

मानवी साखळी, रॅलीद्वारे एड्स जनजागृती मोहीम

$
0
0
जागतिक एड्स दिनानिमित्त विविध शाळा, महाविद्यालयांसह स्वयंसेवी संस्थांनी मानवी साखळी, विद्यार्थ्यांच्या रॅली; तसेच विविध भागात माहिती पत्रके वाटप करून एड्सच्या विरोधी लढा पुकारण्याचे आवाहन केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images