Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महत्त्वाच्या ठिकाणांसाठी नॅशनल हेरिटेजची स्थापना

$
0
0
जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद न झालेल्या परंतु देशातील महत्त्वाच्या ठिकाणांसाठी आता ‘नॅशनल हेरिटेजची’ स्थापना केली जाणार आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांसह नैसर्गिक ठिकाणे आणि भौगोलिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा यात समावेश केला जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

ग्राहक तक्रार निवारणासाठी स्व‌तंत्र व्यवस्था

$
0
0
ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी स्वतंत्र व्यवस्था राबवावी. तसेच, ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी शुक्रवारी दिल्या.

मनस्वी अभिनेता

$
0
0
मेकअप केल्यानंतर ‘परकाया प्रवेशा’ची संधी देणारं अभिनय हे एकमेव क्षेत्र आहे... हे प्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हेचं मत त्याच्यातल्या मनस्वी अभिनेत्याची ओळख करून देण्यास पुरेसं आहे. वाट्टेल ते करून नंबर वन पदावर पोचायचं अशी वृत्ती नसल्यामुळे तो मनाला आवडणारं, पटणारं काम करतोय... त्याच्या उदंड लोकप्रियतेमागचं रहस्य कदाचित हेच असावं.

धावडे खूनप्रकरणी तिघांना अटक

$
0
0
भोसरीतील सचिन उर्फ गोट्या धावडे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना शुक्रवारी (३० नोव्हेंबर) अटक केली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या मुलाचाही समावेश आहे. तिघा आरोपींना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य तेरा आरोपी फरारी आहेत.

‘HIV’ संसर्गामध्ये पुण्याची ‘प्रगती’

$
0
0
'एचआयव्ही' संसर्गाबाबत स्वयंसेवी संस्था-संघटनांकडून केल्या जाणा-या जनजागृतीला प्रतिसाद मिळाल्यामुळे लागण झालेल्यांची संख्या गेल्या सहा वर्षांत चांगलीच कमी झाली आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत केवळ २४७१ जणांना बाधा झाली असून त्याचे ३.४ टक्के एवढे प्रमाण आहे.

वारजे- खराडी रस्त्याला बाळासाहेंबांच्या नावाची मागणी

$
0
0
वारजे ते खराडी या मुठा नदीवरून होणा-या नियोजित रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे.

‘HIV’नंतर आता ‘TB’साठी हेल्पलाइन सुविधा

$
0
0
पुण्यासह राज्यात ‘एचआयव्ही’ पाठोपाठ आता टीबीसारख्या आजाराची सामान्यांपर्यंत माहिती पोहोचिवण्यासाठी येत्या एक डिसेंबरपासून मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संवाद हेल्पलाइनची सुविधा सुरू करण्यात येत आहे.

हॉटेल अतिक्रमणावर हातोडा

$
0
0
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने अनधिकृत निवासी बांधकामांनंतर आता हॉटेलचालकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरूद्ध मोहीम हाती घेतली असून, गुरुवारी शिवाजीनगर, घोलेरस्ता, डेक्कन या भागातील हॉटेल आणि खराडीमध्ये नदीकाठी केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा मारला.

पोलिसांना शिवीगाळ केल्यावरून गुन्हा

$
0
0
लोणावळ्याजवळील वरसोली गावात दोन घरांमधील मोकळ्या जागेवरून महिलांमध्ये झालेल्या भांडणाची चौकशी करण्याकरिता गेलेल्या लोणावळा ग्रामीण पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी तीन महिलांसह एका पुरुषावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी ( २९ नोव्हेंबर ) रात्री घडली.

भुशीडॅममध्ये मृतदेह आढळला

$
0
0
लोणावळ्यातील भूशीडॅममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला. रणजितसिंग र्इश्वरसिंग पहारी ( ५०, रा. दिल्ली, सध्या कोरेगाव, पुणे ) असे मयताचे नाव आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. भुशीडॅमवरील सुरक्षारक्षक रामदास मरगळे यांना धरणातील पाण्यात मृतदेह तरंगताना आढळल्याने त्याने याबाबत लोणावळा शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

वडिलांनीच केला मुलीचा खून

$
0
0
फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आपल्या मुलीच्या खुनाचा कट रचला आणि आपल्या दुसऱ्या मुलीच्या आणि जावयाच्या मदतीने खूनही केला. गेल्या दहा महिन्यांपासून गुन्हे शाखेने केलेल्या तपासात खुनाला वाचा फुटली आणि पोलिसांनी सासरा, जावई, जावयाचा भावाला अटक केली.

होस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे’च्या (सीओईपी) सिव्हील शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांने कॉलेजच्या ‘होस्टेल’मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आजाराला आणि उपचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे या विद्यार्थ्याने आपल्या ‘सुसाइड नोट’मध्ये म्हटले आहे.

आता मिळणार वीजबिलाचा SMS

$
0
0
वीजबिले तयार झाल्यानंतर त्यांची माहिती लगेचच ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांच्या वैयक्तिक मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील परिमंडळातील वीजग्राहकांना ही सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय ‘एसएमएस’च्या माध्यमातून वीजबिलेदेखील भरता येणार आहेत. याशिवाय ‘एसएमएस’च्या माध्यमातून वीजबिलेदेखील भरता येणार आहे.

महापालिकेत ‘अॅन्टी करप्शन’चा छापा

$
0
0
बांधकाम परवान्यास लागणा-या नकाशाच्या मंजुरीसाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणारे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता प्रताप तात्याबा धायगुडे (वय ४३, रा. दशभुजा गणपतीजवळ, पौड रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टी करप्शन) शुक्रवारी दुपारी अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धायगुडे यांना महापालिका भवनातील रुम नंबर २३ या कार्यालयात त्यांना अटक केली.

महाबँकेने केली ५० हजारांची मदत

$
0
0
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे सासवड येथील जीवन वर्धिनी निवासी मतिमंद विद्यालयास पन्नास हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. मदतीचा चेक बँकेचे झोनल मॅनेजर विनायक हातवळणे यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार पवार यांना प्रदान करण्यात आला.

न्याती इन्फोसिसच्या दोघांवर गुन्हा दाखल

$
0
0
यूजर आणि आयपी अड्रेस घेऊन महापालिकेच्या कम्प्युटरमधील नोंदणीमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून न्याती इन्फोसिसच्या दोघा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. २१ फेब्रुवारी २०१२ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी वैभव भानुदास कडलाख ( ४८, रा. धानोरी) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार संदीप जामकर आणि विजय पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मार्केट यार्डात रविवारी कडकडीत बंद

$
0
0
मार्केट यार्डातील व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदला पहिल्याच दिवशी (शनिवारी) वादाचे वळण लागले. बंदमध्ये सहभागी होऊन बाजारात गोंधळ घातलेल्या आठ व्यापा-यांविरोधात गुन्हा दाखल झाला. उद्या (रविवारी) बंदमध्ये सहभागी झाल्यास व्यापा-यांवर कारवाई करण्याचा इशारा समितीने दिला. तर, बाजार कडकडीत बंद राहील, असा दावा आडते असोसिएशनने केला.

पश्चिम घाट संवर्धनाचा रौप्य महोत्सव

$
0
0
पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी शंभर दिवस प्रवास केला आणि आता ते शंभर एकर जागेवर अरण्य विकसित करताहेत.. आजही पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी त्यांचा झगडा कायम आहे. त्यामुळे ‘पश्चिम घाट बचाओ’ मोहिमेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातही ते आपल्या कुटुंबासह आणि ८५ वर्षांच्या काकांसह जैवविविधतेचे जतन करण्यासाठी पुन्हा सहभागी झाले आहेत.

अपंगांच्या धोरणासाठी लवकरच बैठक घेणार

$
0
0
अपंगाच्या हिताच्या धोरणाचा कच्चा मसुदा राज्य सरकारला सादर केला असला तरी त्याच्या अंमबजावणीसाठी आपण स्वतः लक्ष घालू. स्वतः हा विषय समजावून घेऊन नंतर मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्यांची बैठक घेऊन विषय तडीस नेऊ, असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी दिले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचाच्या अपंग धोरण परिषदेच्या समारोपात ते बोलत होते.

अपंग नव्हे, ‘अनोखे समर्थ व्यक्ती’

$
0
0
अपंगांचा ‘अपंग असा नामोल्लेख न करता आता ‘अनोखे समर्थ व्यक्ती’ असा शब्द वापरण्यात यावा, असे राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री व पालकमंत्री सचिन अहिर यांनी शनिवारी येथे जाहीर केले. अपंग धोरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिषदेच्या निमंत्रक आणि खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, अरुण गुजराथी उपस्थित होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images