Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

द्विभाषिक ऑनलाइन योजनेचाही बोजवारा

$
0
0

सातच दिवसांत राज्य सरकारकडून योजनेला पुन्हा स्थगिती

Aditya.Tanawade@timesgroup.com

Tweet : @AdityaMT

पुणे : द्विभाषिक पुस्तक योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ऑनलाइन खरेदी विक्री प्रक्रियेचाही बोजवारा वाजला आहे. ऑनलाइन प्रक्रिया सुरू केल्यापासून केवळ सातच दिवसांमध्ये द्विभाषिक योजनेला पुन्हा एकदा स्थगिती देण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.

द्विभाषिक योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची खरेदी विक्री सुरू करण्याला प्रतिसाद न मिळाल्याने सात दिवसांमध्ये शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी निवेदनाद्वारे पुढील सूचनेपर्यंत योजना स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. योजनेचे अपयश झाकण्यासाठी, प्रकाशकांची पुस्तके दर्जाहीन असल्याचे, तसेच प्रकाशकांकडून ज्यादा सवलत देऊन पुस्तकांची खरेदी विक्री सुरू असल्याचे सरकारने म्हटल्याची चर्चा आहे; मात्र त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा आरोप प्रकाशकांकडून करण्यात येत आहे.

‘योजनेतील काही पुस्तके दर्जाहीन असून ती योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र योजना सुरू करताना सरकारी समितीमार्फत पुस्तकांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनीच पुस्तक निवडसमितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुस्तके दर्जाहीन होती, तर ती निवडलीच का गेली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पूर्वी योजनेत आलेला तिढा सोडविण्यासाठी अखिल भारतीय प्रकाशक संघाने पुस्तकांची ऑनलाइन खरेदी विक्री करण्याचा पर्याय स्वीकारला. त्यासाठी योजनेत निवड झालेल्या ३२ प्रकाशकांनी एकत्र येऊन प्रकाशक संघाची वेबसाइट सुरू केली. राज्यातील ४०८ तालुक्यांमध्ये संघाकडून ऑनलाइन प्रक्रियेची यंत्रणा लावण्यात आली. तालुका स्तरावर पुस्तकांचा एक संच पाठवायलादेखील प्रकाशकांनी सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर, सातच दिवसांत या योजनेला पुन्हा एकदा स्थगिती द्यावी लागली. त्यामुळे ऑनलाइन पद्धती स्वीकारूनदेखील योजनेचा बोजवारा वाजल्याने प्रकाशकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
.........

राज्य सरकारकडून द्विभाषिक पुस्तक योजनेच्या ऑनलाइन प्रक्रियेलादेखील स्थगिती दिल्याचे निवेदन जाहीर करण्यात आले आहे. पुढील सूचना येईपर्यंत योजनेस स्थगिती असे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे प्रकाशकांपुढे पुन्हा एकदा योजनेच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. या योजनेत सहभागी झालेल्या अनेक प्रकाशकांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे.
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी बसच्या धडकेत दोन इंजिनीअरचा मृत्यू

$
0
0

म . टा. प्रतिनिधी, हडपसर

हडपसर येथील वैभव टॉकीजसमोर खासगी बसची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दोन आयटी इंजिनीअरचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहनीश तुकाराम गाकरे (वय २४ रा. ग्रँड बे सोसायटी, शेवाळवाडी), ऋषिकेश वसंत परदेशी (वय २४ रा. हनुमान मंदिराजवळ, सासवड रोड) अशी मृत्यू झालेल्या दोन इंजिनीअरची नावे आहेत. याबाबत सचिन मंजीभाई मकवाना यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकवाना व मयत ऋषिकेश व सचिन हे तिघेजण मगरपट्टा येथील एका कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता काम संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर रोडला वैभव टॉकीजसमोर आले असता कर्णे हॉस्पिटलसमोर एक प्रवासी वाहतूक करणारी बस थांबली होती. त्या बसच्या चालकाने अचानक बस सुरू करून मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने वळवली. त्या वेळी मकवाना यांनी स्वतःला वाचवून ते बसच्या पुढे निघालो. त्यांच्या मागून दुचाकीवरून मोहनीश व ऋषिकेश येत होते. त्यांना अपघात झाल्याचा मोठा आवाज आला. त्यांनी पाठीमागे जाऊन पहिले असता मोहनीश व ऋषिकेशच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागला होता.

दुचाकी उजव्या बाजूला पडली होती. खासगी बसने धडक दिल्यानेच मोहनीश व ऋषिकेश गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर ती बस निघून गेली. मकवाना यांनी दोघांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोहनीश हा मूळचा नागपूरचा आहे. तो घरात मोठा होता. त्याच्या पाठीमागे आई वडील व एक लहान भाऊ आहे. नोकरीच्या निमित्ताने दोघेही पुण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नोटामुळं उपचार नाकारले; बाळाचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

केंद्र व राज्य सरकारनं आदेश देऊनही जुन्या नोटा नाकारण्याचा रुग्णालयांचा आडमुठेपणा लोकांच्या जिवावर बेतू लागला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही असाच प्रकार घडला आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयानं जुन्या नोटा असल्याचं कारण देत उपचार नाकारल्यामुळं एका बाळाचा मृत्यू झाला आहे. बाळाच्या आई-वडिलांनीच तसा आरोप केला आहे.

पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र, बाळाला हृदयाचा त्रास असल्याने, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी खुंटे कुटुंबीय बाळाला घेऊन शनिवारी सकाळी दहा वाजता पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना साडेतीन लाख रुपये जमा करण्यास सांगितले.

खुंटे यांनी काही रक्कम रोखीनं व काही रक्कम करंट अकाउंटच्या स्वरूपात भरण्याची तयारी दाखवली. मात्र, रुग्णालय प्रशासनानं सर्व रक्कम रोख स्वरूपात देण्याचा आग्रह धरला. त्याशिवाय, उपचार होऊ शकणार नसल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ गेल्यानं बाळाचा त्रास वाढला. संध्याकाळपर्यंत बाळाचे अनेक अवयव काम करेनासे झाले. त्यामुळं आता शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नंतर बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण ते वाचू शकलं नाही. रोख रकमेसाठी रुग्णालय प्रशासनानं केलेल्या अडवणुकीमुळंच आमच्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप खुंटे दाम्पत्यानं केला आहे.

रुग्णालयानं फेटाळला आरोप

रुग्णालय प्रशासनानं मात्र खुंटे दाम्पत्याचा आरोप फेटाळला आहे. 'आम्ही लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करतो. त्यामुळं असा प्रकार घडणं शक्य नाही. तरीही या प्रकाराची माहिती घेऊ, असं रुबी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक शक्तीपासून देशाला धोका

$
0
0

जेएनयूमधील प्राध्यापक डॉ. चमणलाल यांची घणाघाती टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात विद्यार्थ्यांचा, लेखकांचा आवाज दाबला जात आहे. गोहत्येवरून मुस्लिम, दलितांचे हत्याकांड केले जात आहे. धार्मिक शक्तीपासून देशाला धोका निर्माण झाला आहे,' अशी घणाघाती टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापक व लेखक डॉ. चमणलाल यांनी रविवारी केली.

गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून वर्षानिमित्त सरहद संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनात ते बोलत होते. एस. एन. सेवक, जन्मेजा जोहल, गुरूभेज सिंह गुराया, शहीद राजगुरू यांचे वारस सत्यशील राजगुरू, शहीद भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ संत बलबीर सिंग सिचेवाल असे पंजाबमधील मान्यवर चर्चासत्रात सहभागी झाले होते. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत अध्यक्षस्थानी होते.

'देशातील घडूळ वातावरणात तरुणांपुढे भगतसिंग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच दोन आदर्श आहेत,' याकडे डॉ. चमणलाल यांनी लक्ष वेधले. 'आपण साहित्य साहित्य करतो पण भाषेच्या विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञानच्या सहाय्याने काही काम करत नाही. भाषेतून विज्ञान, वैद्यकीय शिक्षण मिळत नाही तोपर्यंत भाषेचा विकास होणार नाही,' यावर डॉ. चमणलाल यांनी बोट ठेवले.

सेवक म्हणाले, 'गुरूगोविंदसिंग एका समाजाचे, धर्माचे किंवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नव्हते. गुरूगोविंदसिंग यांची शिकवण, विचार , प्रेम,यातून चांगला समाज व भविष्य घडू शकते.'

'आजची पिढी हुशार आहे. त्यांच्या भाषेत लिहायला हवे,' असे मत जोहल यांनी नोंदविले. 'आपल्या भाषेचा विकास कसा करायचा ? आजच्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे, असे प्रश्न आपल्यापुढे आहेत. पंजाबी भाषेमध्ये खूप लिहिले जात आहे पण तितके वाचले जात नाही,' अशी खंत गुराया यांनी व्यक्त केली. 'प्रदूषण ही मोठी समस्या देशापुढे आहे. जमीन, पाणी, वारा प्रदूषणाच्या अतिक्रमणापासून वाचवली पाहिजे,' असे आवाहन सिचेवाल यांनी व्यक्त केले.

'भाषेला विकसित करायचे असेल तर लोकांनी यात्रा करत राहिले पाहिजे. देशात फिरून लोकांशी संवाद टिकवला तर भाषा टिकेल. विद्वान फक्त बोलतात, त्यापेक्षा काम केले पाहिजे. फाळणीमुळे झाले नसेल तेवढे नुकसान भाषावार प्रांतरचनेमुळे झाले,' अशी टीका डॉ. कामत यांनी केली.



शहिदांचे विस्मरण

'भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ही नावे वेगळे नाहीत. त्यांना जिवंतपणी आणि मृत्यू नंतर वेगळे करता आले नाही. स्वातंत्र्यानंतर प्रगती केली पण आपला प्रवास चांगल्या समाजाकडे झालेला नाही,' असे मत किरणजीत सिंग यांनी व्यक्त केले. 'शहिदांचे विस्मरण झाले आहे. जो मान द्यायला हवा तो दिला जात नाही. यथोचित सन्मान द्यायला हवा,' अशा शब्दांत राजगुरू यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडे बाजार भरणार २८ ठिकाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर आठवडे बाजार भरविण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. यासाठी धोरण तयार करण्यात आले असून शहरातील विविध भागांत २९ ठिकाणी हे आठवडेबाजार भरविले जाणार आहेत. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर हे धोरण मंजुरीसाठी ठेवले आहे.
शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, तसेच विक्री व्यवस्थापनेतील मध्यस्थ कमी व्हावे, यासाठी आठवडेबाजार ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी शेतकरी आठवडेबाजार भरविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात आठवडे बाजार भरविण्यासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, असा अध्यादेश काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने काढले होते. आठवडे बाजार भरविण्यासाठी पालिकेने विनामूल्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्य कृषी पणन मंडळाकडून पालिकेकडे करण्यात आली होती.
या प्रस्तावावर महापालिकेच्या फेरीवाला धोरणानुसार शहरामध्ये आठवडेबाजार भरवण्यासंदर्भात मान्यता घेण्यात आलेली आहे. महापालिकेकडून आठवडेबाजारासाठी जागा मिळण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासन आणि पणन मंडळाचे अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली होती. पणन विभागाचे अपर सचिव यांनी शहरी भागात संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडेबाजार या शासनाच्या धोरणासंदर्भात पालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी याचे धोरण तयार केले असून हे धोरण स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले आहे. पालिका प्रशासनाने शेतकरी आठवडे बाजाराकरिता दहा बाय दहा जागेसाठी शंभर रुपये प्रतिदिन भुईभाडे आणि एक हजार रुपये अनामत रक्कम असे धोरण निश्चित केले आहे. याच्या समन्वयाची संपूर्ण जबाबदारी ही पणन मंडळाची असणार आहे, असे या धोरणात निश्चित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पोद्यानातील वीस सापांचा मृत्यू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहरातील सर्पमित्रांनी जीवदान दिलेले आणि चिंचवड संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानात आणून दिलेल्या २० सर्पांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२० नोव्हेंबर) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे उद्यानात दुर्गंधी पसरली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेची पुसटशीही माहिती अधिकाऱ्यांना नाही.
संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या जातीचे साप नागरिकांना पाहण्यासाठी ठेवले आहेत. ज्या ठिकाणी हे साप ठेवले आहेत त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सापांना एका बंद काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. काही सापांना प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आले आहे; तर लहान सापांना बंद बाटलीत ठेवण्यात आले आहे. या सापांचा श्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले. मेलेल्या सापांमुळे उद्यानात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, जीवंत साप उघड्यावर ठेवल्यामुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे.
मृत्यू झालेल्या सापांमध्ये घोणस, धूळ नागीण, तस्कर, कवड्या जातीच्या सापांचा समावेश आहे. तर अन्य जीवंत साप त्यांच्या आजुबाजूने फिरत असल्याने त्यांच्याही जीविताला धोका असल्याचे सर्प मित्रांचे म्हणणे आहे. दीड बाय दोन फुटाच्या कपाटात जवळपास पन्नास साप ठेवण्यात आले आहेत. काही विषारी जातीच्या सापांनी अन्य सापांचा चावा घेतल्यामुळे ते जखमी अवस्थेत पडून आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर त्यांचाही मृत्यू होऊ शकतो.
शहरातील अनेक भागांतून या ठिकाणी साप आणले जातात. त्यांची निगा राखण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे. ‘एकिकडे सापांना मारू नका, साप हे आपले मित्र असल्याचे सांगितले जाते. परंतु या ठिकाणी आणलेल्या सापांची योग्य निगा राखली जात नाही. त्यामुळे सापांचा मृत्यू होत आहेत,’ असे एका सर्प मित्राने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. या घटनेविषयी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना या प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हती. माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्त्रियांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्त्रीची जननक्षमता ही तिची गुणवत्ता शोधण्याचे साधन आहे, असा समज पुरूषप्रधान संस्कृतीत रुजलेला होता. स्त्रीला मुलगा झाला तर तिच्या गुणवत्तेत आणखी वाढ होते, असे समाजाला वाटायचे. आता मात्र या परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून स्त्रियांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न समाजामध्ये सुरू झाला आहे,’ अशा शब्दांमध्ये प्रसिद्ध कवयित्री मंगला गोडबोले यांनी स्त्रियांच्या भावनांचा वेध घेतला.
डॉ. कौमुदी गोडबोलेलिखित व राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘दत्तक मूल वाढताना, वाढवताना’ या पुस्तकाचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. डॉ ज्योत्स्ना पडळकर, महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे आयुक्त नागरगोजे, सदानंद बोरसे आदी या वेळी उपस्थित होते.
‘स्त्रियांना मूल होत नसेल, तर त्यांची अत्यंत कमी किंमत केली जाते. सध्याच्या काळात त्यामध्ये काही प्रमाणात बदल जाणवत आहे. स्त्रियांना मूल झाले नाही, तर त्या अत्यंत दुःखी होतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरदेखील होतो. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मूल दत्तक घेऊन त्याचे योग्य संगोपन करणे हाच एकमेव उत्तम पर्याय त्यांच्यासमोर आहे. केवळ त्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ते काम डॉ. गोडबोले यांनी त्यांच्या पुस्तकाद्वारे केले आहे. समाजाचा मानसही सध्या तुलनेने समाजशील झाला आहे. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेसाठी असणाऱ्या कायद्यांमध्ये देखील सकारात्मक बदल झाले आहेत. ही समाधानाची बाब आहे,’ याकडे गोडबोले यांनी लक्ष वेधले आहे’
नागरगोजे म्हणाले, ‘समाजसेवी संस्थांमार्फत मूल दत्तक घेण्याची जी प्रक्रिया आहे, ती सुरळीतपणे राबवण्याची जबाबदारी शासनाची आहे. या क्षेत्रामध्ये अनेक समस्या उद्‍भवतात. बऱ्याचदा दत्तक गेलेली मुले पुढे जाऊन आमच्या खात्याकडे त्यांच्या खऱ्या आई-वडिलांविषयी विचारणा करतात. अशा वेळी त्यांना नेमके कसे मार्गदर्शन करायचे, ही सरकारपुढील समस्या आहे. सध्याचा काळ पाहता मूल दत्तक घेण्याविषयी समाजामध्ये जनजागृती होत असून या प्रक्रियेमध्ये सुलभता यावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.’
डॉ. पडळकर म्हणाल्या, ‘मूल दत्तक घेणे आणि त्याचे योग्य संगोपन करणे हे एक मोठे आव्हान आहे, दत्तक मूल हवे असणाऱ्या पालकांचे वाचन, चिंतन, मनन, जाण, समज वाढली तर मूलाचे संगोपन चांगल्या पद्धतीने होते. लहान मुलांच्या प्रयत्नांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार होते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​वाघोलीला पीएमपीसाठी टर्मिनल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने नगर रोडवर सुरू केलेल्या जलद बस वाहतूक योजनेच्या (बीआरटी) वाघोली येथील टर्मिनलचे काम लवकरच सुरू होणार आहे. टर्मिनलच्या जागेवर राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
गेल्या वर्षी संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) रस्त्यावर बीआरटी कार्यान्वित केल्यावर यंदा मेपासून नगर रोडवरील बीआरटी मार्ग सुरू केला गेला. वाघोली येथील जागेवर तात्पुरत्या स्वरूपात टर्मिनलची उभारणी करण्यात आली. बीआरटीच्या यशस्वीतेसाठी टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे गरजेचे असल्याने पालिकेने आता वाघोली टर्मिनलचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. वाघोली येथे सध्या उपलब्ध असलेल्या अडीच एकर जागेवर बीआरटी टर्मिनल विकसित केले जाणार आहे. यामध्ये बीआरटीच्या बस उभ्या करण्यासाठी आवश्यक जागा, बीआरटीशिवाय इतर ठिकाणी जाणाऱ्या बससाठी स्वतंत्र जागा आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांसाठी वेगळा थांबा तयार केला जाणार आहे, अशी माहिती पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली. सुमारे अडीच एकर जागेवर बीआरटीच्या प्रवाशांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण केल्या जातील. त्यासाठी सुमारे सात ते आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटी सुरू करताना, स्वतंत्र टर्मिनलची व्यवस्था पूर्ण केली होती. पुणे महापालिकेला आळंदी आणि नगर रोडवरील दोन्ही मार्गांवर पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात टर्मिनलची उभारणी करावी लागली होती. वाघोली येथील टर्मिनलवर मात्र बस प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गांची व्यवस्था केली जाणार आहे.

पथ विभागाकडून दोन कोटींचा निधी
याशिवाय, वाघोलीहून पुढे जाणारे अनेक मार्ग असल्याने बीआरटी व्यतिरिक्तच्या बससाठी स्वतंत्र थांबे असतील. तसेच, बाहेरगावातून येणाऱ्या प्रवांशाची गरज लक्षात घेऊन एसटीसाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. या सर्व कामांसाठी आवश्यक असलेला सुरुवातीचा दोन कोटी रुपयांचा निधी पथ विभागाने भवन रचना विभागाला उपलब्ध करून दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हाडाच्या सोडतीला आचारसंहितेचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) सासवड, मोरवाडी, म्हाळुंगे आणि वानवडीसह आठ ठिकाणी विकसित केलेल्या सदनिका आणि भूखंड वापटाच्या २४ नोव्हेंबरला होणाऱ्या नियोजित सोडतीला आचारसंहितेचा फटका बसला आहे. सासवड नगरपरिषदेची निवडणूक असल्याने ही सोडत निवडणुकीनंतर ‘म्हाडा’ला जाहीर करावी लागणार आहे.
या सदनिका आणि भूखंडांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. त्यासाठी चार नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत हजारो नागरिकांनी अर्ज भरले आहेत. २४ नोव्हेंबरला पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे सोडत होणार होती. ही प्रक्रियादेखील ऑनलाइन होणार होती. म्हाळुंगे, मोरवाडी, वानवडी, ​शिवाजीनगर (सोलापूर), जुळे-सोलापूर, दिवे आणि सासवड या ठिकाणी सदनिका, तर वाठार निंबाळकर येथे भूखंड आहेत. त्यापैकी सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ‘म्हाडा’ला सोडत जाहीर करता येणार नाही.
या सदनिका आणि भूखंडासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. चार उत्पन्न गटातील व्यक्तींनी अर्ज केले आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये अनामत रक्कम भरून नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे त्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोडतीमध्ये सदनिका न मिळालेल्यांना यापूर्वी अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज करावा लागत होता. आता अर्ज करण्याची गरज राहिलेली नाही. संबंधित अर्जदारांची अनामत रक्कम सात दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय ‘म्हाडा’ने घेतला आहे.

सोडत दाखवणार ‘लाइव्ह’
‘म्हाडा’कडून ही सोडत वेबसाइटवर लाइव्ह दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. www.mhada.gov.in या वेबसाइटवर सोडत दिसणार आहे; तसेच सोडतीत सदनिका मिळालेल्यांना त्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्याचीही सुविधा दिली जाणार आहे. मात्र, संबंधित नागरिकांना नगरपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडूशेठ मंदिराच्या दानपेटीतील लहान नोटा नागरिकांना देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दानपेटीतील रकमेची शनिवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकांसमोर मोजणी करण्यात आली. मंदिरातील सर्व पेट्यांमध्ये मिळून १८ लाख रुपयांची रोकड जमा झाली होती. त्यामध्ये, रद्द झालेल्या नोटांची किंमत सहा लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. रद्द झालेल्या नोटांव्यतिरिक्त इतर लहान नोटा बँकेमार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दानपेट्यांतील रक्कम दर शनिवारी मोजण्यात येते. गेल्या आठवड्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ही रक्कम मोजण्यात आली नव्हती. नागरिकांना लहान मूल्यांच्या नोटा उपलब्ध होत नसल्याने मंदिरांनी त्यांच्या पेट्यांमधील रक्कम बँकेत भरावी, अशा सूचना सरकारने केल्या होत्या. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधींच्या समोरच ही रक्कम मोजण्याचा आग्रह दगडूशेठ हलवाई ट्रस्टने धरला होता. त्यानुसार, शनिवारी निरीक्षक कैलास महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरातील सर्व दानपेट्या उघडण्यात आल्या. या सर्व दानपेट्यांमध्ये मिळून १८ लाख रुपये जमा झाल्याचे आढळून आले. यामध्ये, एक हजार आणि पाचशेच्या रद्द झालेल्या नोटांची रक्कम सुमारे सहा लाख रुपयांच्या घरात आहे. उर्वरित सर्व रक्कम शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपात आहे. ही सर्व रक्कम बँकेत भरून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. निरीक्षकांसमोर दानपेट्या उघडण्यात आल्या त्यावेळी उपाध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब परांजपे, सरचिटणीस माणिकराव चव्हाण, ज्येष्ठ विश्वस्त काकासाहेब गावडे, ज्येष्ठ विश्वस्त कुमार वांबुरे, आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उपस्थित होते.


कारभारातील पारदर्शकता दाखवून देण्यारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या पुढाकाराचे मोठ्या विश्वस्त संस्था आणि मंदिरांनी अनुकरण केले पाहिजे. यामुळे, नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल.
- कैलास महाले
निरीक्षक, सह-धर्मादाय आयुक्त कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ठेकेदाराच्या फायद्याचा निर्णय रद्दबातल ?

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या तुकाराम शिंदे वाहनतळासाठी वार्षिक रक्कम आगाऊ घेण्याऐवजी हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची सर्वसाधारण सभेने मंजूर केलेली उपसूचना राज्य सरकारने निलंबित केली आहे. त्यामुळे, टेंडरमधील अटी-शर्ती बाजूला सारत, ठरावीक ठेकेदाराच्या फायद्यासाठी घेण्यात आलेला निर्णय रद्दबातल ठरणार आहे.
पुणे स्टेशन परिसरात महापालिकेचे शिंदे वाहनतळ आहे. हे वाहनतळ पाच वर्षे कालावधीसाठी चालविण्यास देण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वाधिक रक्कम देणाऱ्या ठेकेदाराची निवड केली गेली; पण टेंडरमधील एक वर्षाची रक्कम आगाऊ भरण्याच्या अटी-शर्तींऐवजी हप्त्याने भरण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. काँग्रेसच्या कमल व्यवहारे आणि लता राजगुरू यांनी ही उपसूचना मांडली होती. टेंडरमधील अटी-शर्ती एखाद्याच्या फायद्यासाठी बदलता येणे शक्य नसल्याने ही उपसूचना विसंगत असल्याचा अभिप्राय प्रशासनाने व्यक्त केला. त्यानुसार, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही उपसूचना रद्द करावी आणि ठराव अंशतः विखंडित केला जावा, असे पत्र सरकारला पाठवले होते.
राज्य सरकारने सर्व परिस्थितीचा आढावा घेत, महापालिकेच्या मागणीनुसार विसंगत ठरणारी उपसूचना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. ही उपसूचना निलंबित करताना, त्यावर काही खुलासा करायचा असल्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, सरकारतर्फे पुढील कार्यवाही केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, संबंधित ठेकेदाराला टेंडरमध्ये निश्चित करण्यात आलेली रक्कम एकरकमीच भरावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
फेब्रुवारीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला, त्याचवेळी ठेकेदाराच्या फायद्यासाठी हप्त्याने पैसे भरण्याच्या उपसूचनेला भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेत बहुमताने निर्णय घेतला. त्याविरोधात, राज्य सरकारकडे दाद मागण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार, राज्यातील भाजप सरकारने विसंगत उपसूचना असल्याने ठरावातील उपसूचना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी रुग्णालयाचा अमानवी चेहरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संपूर्ण देशभरात नोटाबंदीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असताना, पैशांविना अवघ्या एका दिवसाच्या नवजात बालकावर हे जग अल्पावधीत सोडण्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. उपचारांऐवजी पैशांना प्राधान्य देणाऱ्या शहरातील खासगी हॉस्पिटलचा अमानवी चेहराच यानिमित्ताने पुन्हा उघड झाला आहे.

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या पेशंटना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून, पुण्यातील अनेक खासगी हॉस्पिटलकडून पैशांवरून पेशंटची पिळवणूक सुरू आहे. पैशांअभावी मुंबईत एक पेशंट दगावल्याची घटना ताजी असताना, पुण्यात तर अवघ्या एका दिवसाच्या बाळाचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.

गौरव आणि आम्रपाली खुंटे या दाम्पत्याला केईएम हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली. परंतु, या बालिकेला हृदयाचा त्रास असल्याने तिच्यावर तातडीने पुढील उपचार करणे गरजेचे असल्याची कल्पना तेथील डॉक्टरांनी दिली. केईएममध्ये हे अद्ययावत उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे, रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला.

‘केईएमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार आम्ही रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. त्या वेळी साडेतीन लाख रुपयांची रक्कम जमा करा, अशा सूचना रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिल्या. साडेतीन लाख रुपयांपैकी १ लाख ३० हजारांची रक्कम काही रोख आणि काही करंट खात्यात जमा करण्याची तयारी केली होती. ‘रुबी’मधील डॉ. मुनोत आम्हाला दिवसभर पैसे जमा करण्यासंदर्भात सूचना देत राहिले. परंतु, बाळावर योग्य वेळी उपचार झाले नाहीत. त्यामुळे आमचे बाळ रविवारी पहाटे दगावले,’ असा आरोप बाळाचे वडील गौरव खुंटे यांनी केला.


एका दिवसाचे बाळ ‘रुबी’मध्ये अॅडमिट दाखल केलेच नाही. त्या बाळाची प्रकृती संदर्भात केईएम हॉस्पिटलने आमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. त्या वेळी आमच्या डॉक्टरांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळाची तपासणी केली. ऑपरेशन करण्यासाठी बाळाची प्रकृती योग्य नाही. त्यामुळे एका दिवसाच्या बाळावर ऑपरेशन करणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाच्या पालकांकडून जो आरोप होत आहे तो चुकीचा आहे.

- बोमी भोट, मुख्य कार्यकारी अधिकारी, रुबी हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा घसरला; गारवा वाढला

$
0
0

शहराचे किमान तापमान ९.९ अंश सेल्सियसवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात रविवारी गारठा पुन्हा वाढला असून, पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला आहे. रविवारी ९.९ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत थंडीचा कडाका कायम राहण्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. राज्यातील नीचांकी ९.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली.
गेल्या आठवड्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. रात्रीचा आणि पहाटेचा गारवा कमी झाला होता. आता, पुन्हा थंडीचा कडाका वाढायला लागला असून, एका दिवसात किमान तापमान दोन अंशांनी घसरले. रविवारची पुणेकरांची सकाळ हुडहुडी भरणाऱ्या थंडीनेच उगवली. हवेतील गारवा सकाळी १० पर्यंत कायम होता. सायंकाळी आणि रात्रीही बोचरे वारे वाहात होते. शहरातील सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत रविवारचे तापमान चार अंशांनी कमी होते.
शहरासह राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात घट झाली असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच भागांत थंडीची तीव्रता वाढली आहे. अमरावती, गोंदिया, उस्मानाबाद आणि यवतमाळ या शहरांमध्ये तर किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सहा अंशांनी कमी आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांत किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.
.................
प्रमुख शहरातील किमान तापमान
नाशिक ९.५
पुणे ९.९
उस्मानाबाद १०.१
जळगाव १०.२
गोंदिया १०.३
अकोला ११
यवतमाळ ११
अमरावती ११.४
सातारा ११.५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे, अण्णांची जुगलबंदी

$
0
0

विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अण्णा हजारे हे आधुनिक गांधी आहेत. ते एवढे मोठे आंदोलन उभे करतील असे वाटले नव्हते,’ या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ​खोचक टिप्पणीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही जोरदार टोलेबाजी करून विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या समारोपात ‘मन की बात’ केली. ‘आंदोलन माझे काम नसून, मी मंदिरात राहणारा फकीर आहे,’ या शब्दांत अण्णांनी संयमी परतफेड करूत शिंदे यांची फिरकी घेतली.
अण्णांनी रामलीला मैदानावर आंदोलन केले तेव्हा, ​शिंदे केंद्रीय मंत्री होते. या आंदोलनाचा फटका आघाडी सरकारला बसला होता. हा धागा पकडून शिंदे यांनी व्यासपीठावर टोलेबाजी केली. गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून सरहद संस्थेतर्फे आयोजित संमेलनाच्या समारोपात आंदोलनावरून रंगलेल्या मैफलीने उपस्थितांची करमणूक झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. सूरजितसिंग पातर, माजी आमदार उल्हास पवार, भारत देसडला, संजय नहार, संतसिंग मोखा, रवींद्रपालसिंग सेहगल, ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे या वेळी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ बलबीर सिंग सिचेवाल आणि डॉ. जसपाल सिंग यांना ‘विश्व पंजाबी गौरव पुरस्कार’ देण्यात आला. डॉ. पातर यांना फुटाणे फाउंडेशनच्या ‘नामदेव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
‘शब्द दुधारी तलवार आहेत. शब्दांच्या तलवारीची पूजा करून समृद्धी आणि संस्कृती जतन करायला हवी. समाजातील घाण दूर करून देशाला स्वच्छ करून पुढे नेण्याचे काम साहित्याचे आहे,’ असे शिंदे म्हणाले. ‘आंदोलन हे माझे काम नाही. मंदिरात राहणारा फकीर असे काम करू शकत नाही. माझे तर बँक खातेही नाही. आंदोलनाची ताकद साहित्यातून आली. पूर्वी आत्महत्या करण्याचे विचार मनात यायचे; पण साहित्य हातात आले आणि जीवनाला धागा मिळाला,’ असे अण्णांनी सांगितले.
-----------------------
मेरा भी मेरा और तेरा भी मेरा
‘मेरा भी मेरा और तेरा भी मेरा,’ ही प्रवृत्ती वाढत आहे. लोक घरात अर्धा तास रामनामाचा जप करतात आणि नंतर लोकांच्या जमिनी हडप करण्याच्या कामात गुंततात. मी ४५ वर्षे घरी गेलो नाही. कुटुंबातील लोकांची नावे मला माहीत नाहीत. माझ्याकडे झोपण्यासाठी पलंग व जेवणासाठा एक ताट असल्याने लखपती, करोडपती यांच्यापेक्षा मी सुखात आहे. आपण या जगात येताना रडत येतो, पण तेव्हा लोक आनंदाने हसत मिठाई वाटतात. आपण जाऊ तेव्हा हसत जाऊ आणि लोक रडतील, असे काम करून दाखवू,’ अशी मिश्किल टिप्पणी हजारे यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांनी साधली ‘एक्स्पो’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयुष्याची सेकंड इनिंग सुखकर करण्याच्या उद्देशाने ‘टाइम्स ग्रुप’तर्फे आणि ‘परांजपे स्कीम्स अँड कन्सट्रक्शन्स’च्या सहकार्याने आयोजित ‘टाइम्स सीनिअर्स लिव्हिंग एक्स्पो’ला ज्येष्ठ नागरिकांचा रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुट्टीचा दिवस असल्याने शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी एकाच गर्दी केली होती.
एक्स्पोच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना त्यांची सेकंड इनिंग आनंदात घालविण्याचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाले होते. सिद्धी लॉन्समध्ये आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. सुट्टी असल्याने रविवारी सकाळपासूनच नागरिकांनी प्रदर्शनात गर्दी केली होती. काही ज्येष्ठ नागरिक मित्रांच्या ग्रुपबरोबर, तर काही कुटुंबीयांसमवेत आले होते. एक्स्पोतील विविध स्टॉलवर जाऊन त्यांनी वैद्यकीय, पर्यटन, गुंतवणूक, म्युझिक थेरपी अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेतली.
गेल्या तीन दिवसांत झालेल्या कार्यक्रमांतून ज्येष्ठांना निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची योग्य आणि सुरक्षित गुंतवणूक कशी आणि कोठे करावी, जीवनशैली अधिक आरामदायी कशी करता येईल, देशविदेशात मस्त पर्यटन कसे करता येईल, तंत्रज्ञान कसे सहज आत्मसात करता येईल, आर्थिक व्यवहार कसे करता येतील, आदी विविध विषय़ांवर मार्गदर्शन करण्यात आले. रविवारी एक्स्पोच्या शेवटच्या सत्रात संध्याकाळी डॉ. सुचेता लिमये यांनी ‘ज्येष्ठांसाठी आवश्यक जीवनसत्त्वे’ या विषयावर मार्गदर्शन केले. नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटतर्फे उपस्थितांना संस्थेच्या विविध उपचारांबद्दल माहिती देण्यात आली. ‘वासन आय केअर’तर्फे ज्येष्ठांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन तसेच शंकांचे निरसन करण्यात आले.
उत्तरार्धात दीपक देशपांडे यांच्या हास्यसम्राट कार्यक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना विनोदी दुनियेची सफर घडविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोजक्या प्रभागांतच तुरळक बदल

$
0
0

निवडणुकीची प्रा-रूप रचना शुक्रवारी अंतिम होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रा-रूप प्रभागरचना येत्या शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) अंतिम होणार असून, काही ठरावीक प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. उर्वरित, प्रभागांची स्थिती ‘जैसे थे’ राहिली असून, आता याच हद्दींनुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी संभाव्य इच्छुकांना करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार गेल्या महिन्यात प्रा-रूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. आगामी वर्षात होणारी ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने (चार सदस्यांचा एक प्रभाग) होणार असल्याने प्रभागांच्या हद्दी आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. काही प्रभागांमध्ये नैसर्गिक हद्दींचे उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला गेला. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत प्रा-रूप प्रभागरचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती घेण्यात आल्या. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यावरील सुनावणीची प्रक्रियाही पूर्ण झाली होती.
या सुनावणीनंतर अनेक इच्छुकांना प्रभागात मोठे बदल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, काही किरकोळ स्वरूपाचे बदल वगळता महापालिकेने निश्चित केलेल्या प्रभागरचनेवरच निवडणूक आयोगाकडून अंतिम शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. हद्दीवरील एखादी वस्ती किंवा एखादा भाग कमी-जास्त केला जाऊ शकतो; पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रभागात बदल केले, तर त्याचा परिणाम इतर तीन-चार प्रभागांवरही होऊ शकतो, अशी शक्यता निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रभागात मोठे फेरबदल केले गेले, तर अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येतही बदल होऊ शकतात. तसे झाल्यास प्रभागातील संपूर्ण आरक्षणच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, आरक्षणाला धक्का पोहोचेल, अशा स्वरूपाचे मोठे बदल अपेक्षित नाहीत, असे स्पष्ट संकेत देण्यात आले. त्यामुळे, प्रा-रूप प्रभागरचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या असल्या, तरी काही तुरळक बदल वगळता प्रभागांच्या त्याच हद्दी अंतिम होतील, असे चित्र दिसून येत आहे.
................
नावेही तीच राहणार?
महापालिकेची प्रा-रूप प्रभागरचना निश्चित करताना, प्रभागांसाठी नावे ठरविण्यात आली होती. विद्यमान सदस्यांना ही नावेही अडचणीची वाटत असल्याने ती बदलण्याची मागणी करणाऱ्या हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, संपूर्ण प्रभागाची ओळख सांगणारी नावेच देण्यात आली असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. तसेच, धार्मिक, प्रेक्षणीय ठिकाणे यांची नावे देण्यावरून वाद उद्भवण्याची शक्यता असल्याने अशी नावे टाळण्यात आल्याचा दावा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटाबंदी चुकल्यास रामलीलावर आंदोलन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशहितासाठी केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्य आहे. मात्र, त्याचे परिणाम दिसण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागेल. नोटाबंदीचा निर्णय योग्य नसल्याचे लक्षात आले, तर त्याविरोधात मी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर आंदोलन करीन,’ अशी​ टिप्पणी करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.
हजारे रविवारी पुण्यात कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नोटाबंदीच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. ‘कोण काय बोलतंय याला मी फारसे महत्त्व देत नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. ‘ज्या रंगाचा चष्मा घातला असेल, त्याला तोच रंग दिसणार,’ या शब्दांत त्यांनी केजरीवाल यांचा नामोल्लेख न करता टोला हाणला.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांचे हाल होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता हजारे म्हणाले, की ‘अधिक मूल्य असलेल्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चांगला आहे. मीही त्याचे समर्थन केले आहे. एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे अपेक्षित आहे. काही लोकांना त्रास जरूर होईल; पण, दु:खाची दरी ओलांडल्याखेरीज सुखाची हिरवळ दिसत नाही. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम दिसायला किमान सहा महिने दिले पाहिजेत. हा निर्णय योग्य नसल्याचे ध्यानात आले तर, मी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर बसायला मी मोकळा आहे.’
‘खिशात पैसे आल्याखेरीज काही खरे नाही,’ अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नोंदवली. साहित्याच्या कार्यक्रमासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आलो आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी... ग्राउंड झिरो

$
0
0

टीम मटा
..............
संकलन : प्रसाद पानसे, हर्ष दुधे, श्रीकृष्ण कोल्हे, वंदना घोडेकर, योगेश बोराटे, मुस्तफा आतार, चैत्राली चांदोरकर, चिंतामणी पत्की, आदित्य तानवडे आणि कुलदीप जाधव.
..
सुटे पैसे उपलब्ध करा...
दहा, वीस रुपयाच्या तिकिटासाठी पाचशे रुपयाची नोट काढल्यावर आम्ही काय करणार? त्यात प्रवाशांना नकार दिल्यावर वादाची परिस्थिती निर्माण होते. त्यावर सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचा आदेश आहे, असा नियम आम्हाला सांगतात. आम्ही एवढे सुटे पैसे आम्ही कोठून देणार ?
सरकारने नोटा बंदीची घोषणा केली आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून नागरिक प्रवासासाठी त्या नोटांचा वापर करीत आहेत. ऐरवी देखील आम्ही सुट्या पैशांच्या अडचणींमुळे पाचशेच्या नोटा स्वीकारत नव्हतो. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांकडून पाचशेच्या नोटा देण्याचे प्रमाण वाढले. पहिल्या चार दिवसांमध्ये आम्ही नकार दिल्याने वादाची परिस्थिती निर्माण होत होती. परंतु, आता नागरिकांनी परिस्थितीचा स्वीकार केला आहे. तसेच, पहिल्या चार दिवसांच्या तुलनेत सुटे पैसे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तशी परिस्थिती आता उदभवत नाही. दरम्यान, काही प्रमाणात व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. प्रवासी संख्या सुरुवातीच्या दिवसात काही प्रमाणात कमी झाली होती. आता पासधारकांची संख्या वाढली आहे.
एक कंडक्टर
...............
पाचशेची नोट चलनात आणा
केंद्र सरकारने १००० आणि ५०० च्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी, बँकांच्या निष्क्रियतेमुळे नोटांची कमतरता भासत आहे. गेल्या महिन्यात नाटकांची कामे करून आलेले सर्व पैसे बँकेत जमा केले होते. नंतर हे पैसे गावाकडे पाठवले आणि मग नोटाबंदीचा निर्णय झाला. अशावेळी आता कुटूंबीयांना त्या पैशांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकारने २००० रुपयांची नोट बाजारात आणली आहे. मात्र, कोणीही दुकानदार दोन हजाराची नोट घ्यायला तयार नाही. अशावेळी सु्ट्टे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी दिवसभर उभे राहण्याची वेळ येत आहे. मग, आपण काम कधी करायचे, असा प्रश्न पडला आहे. दिवसाप्रमाणे पगार काढला जातो. एक दिवस जर काम नाही केले तर, त्या दिवशीचा पगार मिळत नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर ५०० च्या नोटा काढायला हव्यात, तरच दोन हजार रुपयांच्या नोटा चालतील, पण तसे झालेले नाही. ग्रामीण भागातील लोक यामुळेच त्रस्त आहेत. रोजच्या व्यवहारांसाठी पैसे कुठून आणायचे अशी समस्या त्यांना भेडसावत आहे.
राम धावारे, बॅकस्टेज कर्मचारी
----------------------------
चहा पिणार अन् दोन हजारांची नोट टेकवणार
नोटाबंदीमुळे व्यवसायावर २५ टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. काही लोकांकडे द्यायला पैसे नसल्याने त्यांनी हॉटेलमध्ये खाणे बंद केले आहे. अनेक जण हॉटेलमध्ये एक चहा घेतात आणि २ हजाराची नोट हातात टेकवतात, अशांना उरलेले सुट्टे पैसे कसे द्यायचे ही प्रमुख समस्या आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्डची सुविधा हॉटेलात उपलब्ध असल्याने फारशी अडचण येत नाही. तरीही जोपर्यंत सरकारकडून ५०० च्या नोटा उपलब्ध केल्या जात नाहीत तोपर्यंत व्यवसाय सुरळीत होणार नाही. हॉटेलमध्ये येणारे नेहमीच्या ग्राहकांकडे बऱ्याचदा जुन्या ५०० आणि १०००च्या नोटा असतात; त्यांच्याकडे रोख ऩसते. त्यांना रिकाम्या पोटी पाठवण्यापेक्षा आहेत त्या नोटा स्वीकारून व्यवसाय करावा लागतो. या नोटा बँकेमध्ये बदलून घेण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागतो. दिवसभर बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. हॉटेलचा व्यवसाय असल्याने दररोज भाजीपाला घेऊन यावा लागतो. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा रोख पैसे द्यावे लागतात. अशावेळी एवढी रोख रक्कम आणायची कुठून या बाबतीत शंका आहे.
दयानंद मूल्या, हॉटेल व्यावसायिक
काटकसरीची सवय लागली

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्या दिवशी पोलिस ठाण्याहून घरी निघालो होतो. घरी गेल्यानंतर हा निर्णय समजला. त्यावेळी माझ्याकडे शंभर रुपयांच्या तीन नोटा होत्या तर, पाचशेची एक नोट होती. घरी थोडे फार सुट्टे पैसे होते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून खूपच काळजीने खर्च करण्यास सुरुवात केली. दिवसभरात चार ते पाच वेळा होणार चहासुद्धा आपोआप कमी झाला. या निर्णयामुळे बचतीची सवय लागली. असलेल्या सुट्ट्या पैशातून घरातील आवश्यक असलेल्या किरकोळ वस्तू खरेदी केल्या. ऑनलाइन रिचार्ज केले. मोठी खरेदी करायची असेल तर कार्ड पेमेन्टचा वापर केला. या निर्णयामुळे काही अडचणी आल्या. पण, हा निर्णय चांगला आहे. कामाची वेळ सकाळ पासून रात्रीपर्यंत असल्यामुळे आणि एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे पैसे काढणे शक्य झालेले नाही. हजार व पाचशे काही नोटा होत्या. त्या पोलिस आयुक्तालयात सुरु असलेल्या पोस्टाच्या काऊंटरवरून बदलून घेतल्या. त्यामुळे काही प्रमाणात सुट्टे पैसे आले आहेत. सुरुवातीला त्रास वाटला. पण, काही दिवस गेल्यानंतर सर्व सुरळित झाले, असे पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.

एक पोलिस कर्मचारी
...
‘न भूतो न भविष्यति’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. जुन्या नोटांच्या बदल्यात पोस्ट आणि बँकेतून शंभरच्या नोटा देण्याचे जाहीर झाले. त्यानंतर पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियोजन केले. त्यानुसार मुख्य पोस्टमास्टर आर. एस. गायकवाड आणि उप पोस्टमास्टर एल. डी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली १० नोव्हेंबरपासून चार काउंटर सुरू केले. गुरुवारी सकाळी सात वाजतापासून नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आणि तेव्हापासूनच त्यांची चिडचिड सुरू झाली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता माझी ड्युटी असणारे काउंटर सुरू झाले. तेथे एक महिला आली आणि म्हणाली, ‘अहो, दुधाला आणि भाजीपाल्याला पैसे नाही. पोस्टातून पैसे बदलवून देणार असल्याचे समजल्यावर आले.’ मी त्या महिलेला नोटा बदलवून दिल्या आणि मग दिवसभर अशाच प्रकारची किरकोळ कारणे घेऊन येणारे नागरिक अनुभवायला मिळाले.

एकावेळी रांगेत तीनशे ते साडेतीनशे नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र दिसले. पहिल्या दोन दिवशी रांगेत महिलांची संख्या अधिक होती. घरी लग्न आहे, अशांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी एक काउंटर कार्यरत होते. ‘आमच्याकडे दोन दिनसांवर लग्न आहे, आता कसं होईल?’, ‘आमच्याकडे असणाऱ्या नोटा बदलून मिळतील का?, आमचे किती पैसे बदलून मिळतील ?’ अशा प्रश्नांचा भडिमार करीत होते. आम्ही नियमाप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा दिवसांत बहुतांश लोक हे निर्णयाच्या बाजूने असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून समजले. काही लोक ‘घ्या.. आले अच्छे दिन’,‘आता तर अजून अच्छे दिन येणार आहेत’ असे उपरोधिकपणे बोलत होते. ‘न भूतो न भविष्यति’ घडणारी ही घटना असल्याने मी ती कधीच विसरू शकणार नाही.

डी .ए. कोंढाळकर, पोस्टल असिस्टंट, जीपीओ
....
नोटाबंदी देशाच्या भल्यासाठीच

चलनातून पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा माझ्या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सुट्या पैशांची अडचणही जाणवत आहे. तसेच, व्यवसायही कमी झाला. मात्र, या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. देशाच्या हिताचा हा निर्णय असून, काही दिवस गैरसोय सहन करण्याची माझी तयारी आहे.

माझा व्यवसाय रोजंदारीचा असल्यासारखा आहे. वडापावची विक्री करायची आणि येईल ते पैसे दररोज बँकेत भरायचे. त्याच पैशातूनच घरही चालवायचे. त्यामुळे माझ्याजवळ रोख स्वरूपात जास्त रक्कम नव्हती. परिणामी, मला नोटा बदलण्याचा प्रश्न उदभवला नाही. संपूर्ण देशात सुट्या पैशांवरून व जुन्या नोटा बदलण्यासाठी सामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, हा त्रास सहन करण्याची आवश्यकता आहे. या निर्णयामुळे देशाच्या भले होणार आहे. देशात खोट्या नोटांचे प्रमाण वाढले होते. देशाचा तोटा मोठ्या प्रमाणावर होत होता. या नोटांना चलनातून बाहेर काढणे आता शक्य झाले आहे.

कूर्मदास कदम, वडापाव विक्रेता

आवक घटली; मालही पडून

नोटाबंदीमुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांच्या घाऊक तसेच किरकोळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. शेतमाल आणणारे शेतकरी आमच्याकडून पाचशे, हजारच्या नोटा घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे मार्केट यार्डात बहुतांश व्यापाऱ्यांकडे उधारी वाढली आहे. जे चेक स्वीकारण्यास तयार आहेत, त्यांना आम्ही पेमेंट दिले. परंतु, सर्वच शेतकऱ्यांनी चेक न स्वीकारल्याने त्यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आमच्याकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून सुरुवातीला काही दिवस पाचशे, एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याची तयारी दाखविली. परंतु, केंद्र सरकारच्या नोटा स्वीकारण्याच्या नियमांबद्दल शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये समज गैरसमज झाले. शेतकरी, ग्राहकांकडे सुट्टे पैसे नसल्याने अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांना देण्यासाठी आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. ग्राहकांकडे आमच्या उधाऱ्या वाढल्या आहेत. त्यांना उधार माल देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. वाहतूकदारही सुट्टे पैसे नसल्याने मार्केट यार्डात फळभाज्यांची कमी प्रमाणात आवक होत आहे. फळभाज्यांचा पडून राहात असून, आवक ३० ते ४० टटक्क्यांनी घटली आहे.

निखिल भुजबळ, फळभाज्यांचे व्यापारी

..................

असून अडचण नसून खोळंब

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना पैसे देता येत नाहीत. शेतकरी पाचशे- एक हजाराच्या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. ओळखीचे शेतकरी नोटा स्वीकारण्यास तयार होते. बाजारात पैसे नाही, मग रक्कम येणार कोठून येणार असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फळांची आवक कमी झाली आहे. मात्र, जे शेतकरी फळे आणतात, त्यांना चांगला दर मिळत नाही. ज्या फळांना किलोसाठी १०० रुपये मिळत होते; त्यांना नोटाबंदीमुळे २० ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने नुकसान होत आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते आहे. त्यामुळे पाचशे एक हजार रुपयांच्या नोटा त्यांना दिल्या, तर जिल्हा बँक स्वीकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सुरुवातीला आम्ही व्यापाऱ्यांकडून जुन्या नोटा स्वीकारत होतो. परंतु, त्या नोटा बँकेत भरल्यास पैसे काढता येत नव्हते. बँकेत पैसे असूनही आमची अडचण झाली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांत ४० टक्क्यांनी व्यापार घटला.

अरविंद मोरे, फळ व्यापारी
निर्णयाविरुद्ध एक चकार शब्दही नाही!

आठ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता ‘मेरे प्यारे देशवासियों’ या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला साद घातली आणि एका फटक्यात हजार/पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेने संपूर्ण देश खडबडून जागा झाला; किंबहुना रात्रभर झोपलाच नाही असे म्हटले तरी चालेल. नऊ तारखेला बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दहा तारखेला बँकेतला पहिला दिवस खूप गर्दीचा असणारा हे गृहितच धरले होते; पण प्रत्यक्षात ग्राहकांची त्सुनामी आल्याचा अनुभव आला.

बँक ऑफ बडोदा, पौड रोड, पुणे शाखेत कॅशियर म्हणून काम करताना सरासरी रोज दीडशे ग्राहक आणि ३० लाखांची उलाढाल होत असे. नोटाबंदीनंतर पहिले चार दिवस ग्राहकांचा अखंड ओघ वाहत होता. बँकांची व्यवहारासाठीची वेळ दोन तासांनी वाढवून संध्याकाळी सहापर्यंत करण्यात आली होती. परिणामी ग्राहकांची संख्या ९०० ते १००० पर्यंत वाढली (अर्थात, यात नोटा बदलून नेणारे २५० ते ३०० ग्राहक पहिले दोन दिवस होते) तर उलाढाल दीड ते दोन कोटीच्या आसपास पोहोचली.

बँकेची क्षेत्रीय प्रमुख महेंद्र कुमार गुप्ता यांनी शाखेला भेट देऊन प्रत्येकाचे अभिनंदन केले. शाखाधिकारी पाटील यांच्या टीमवर्क स्पिरिटलाही दाद दिली. उपस्थित ग्राहकांच्या संयम आणि शिस्तीचेही त्यांनी कौतुक केले. आज १० दिवसानंतर त्सुनामीची लाट ओसरल्याचा अनुभव येत आहे. ग्राहकांची अगतिकता, हतबलता व त्रासही लक्षणीयरित्या कमी झाल्याचे जाणवत आहे.

ग्राहकांचे हृदय पिळवटून टाकणारे असंख्य अनुभव आले. ‘सुशिला’ अशी सही करणाऱ्या महिलेचा अनुभव फारच विलक्षण होता. पैसे काढण्यासाठी ती रांगेत रोज उभी राहात होती. दुसऱ्या दिवशी तिचा नंबर आला, तेव्हा पैसे काढण्याची स्लिप न देता मुलीच्या लग्नाची पत्रिका तिने पुढे सरकवली आणि ‘साहेब, लग्नकार्य आहे.. कसे करू ?’ असा प्रश्न केला. मी उत्तरलो,‘ताई, मी तरी काय करू शकतो?’ दिलेले पैसे तिने घेतले अन् पदराने डोळे पुसत तिने काउंटर सोडले, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या पापण्याही नकळत ओलावल्या !

अशी किती घरे असतील आणि किती सुशिला असतील? असंख्य अडचणी, यातना सहन करूत रांगेत उभ्या राहणाऱ्या मंडळींमधे मोदी यांच्या निर्णयाला नावे ठेवणारा एकही ग्राहक आजवर आढळला नाही हे विशेष ! बँक कर्मचारी म्हणून माझे सेवेचे ४० वे वर्ष सुरू आहे. या वयात रोजच्या पाच ते सहापट काम करण्याची ऊर्जा, इच्छाशक्ती कोठून आली? माहिती नाही ! याचे उत्तर कदाचित् एक माणूस सलग अडीच वर्ष एकही सुट्टी न घेता रोज १६-१६ तास काम कसे काय करू शकतो ? या प्रश्नाच्या शब्दविरहित उत्तरात तर दडले नसेल ना?

बिंदुमाधव भुरे बँक ऑफ बडोदा, पौड रोड, पुणे

प्लास्टिकमनीमुळे थोडासा दिलासा

पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आम्ही कोकणात सहलीला जाण्यासाठी बाहेर पडलो. निघण्यापूर्वी बँकेतून गरजेपुरत्या शंभरच्या नोटा घेतल्या होत्या. पण त्यांचा वापर करण्याऐवजी आम्ही शक्यतो डेबिट- क्रेडिट कार्ड वापरण्यावरच भर दिला. सरकारने सध्या टोल बंद ठेवल्यामुळे प्रवासादरम्यान पैसे लागलेच नाहीत. पेट्रोल पंपावर कार्डने पैसे दिले. ऐन कोकणातील बहुतांश हॉटेलमध्येमध्ये आता कार्ड पेमेंट वापरले जाते. जेथे कार्ड नव्हते तिथे आम्ही संबंधितांच्या बँक खात्यांचा नंबर घेऊन ऑनलाइन पैसे जमा केले. मात्र, ऑनलाइन व्यवहाराबद्दल अनभिज्ज्ञ असलेल्या गावकऱ्यांची गैरसोय झाल्याचे बघायला मिळाले. पाचशे आणि एक हजारच्या नोटांबद्दल ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर त्यांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या. पर्यटकांना मात्र गावातील हॉटेल व्यावसायिकांनी सहकार्य केले. गैरसोय टाळण्यासाठी अनेक पर्यटकांकडून विक्रेत्यांनी पाचशेच्या नोटा स्वीकारल्या. किरकोळ खरेदीच्या बाजारात काही ठिकाणी सुट्या पैशांवरून पर्यटकांचे वाद झाले, पण प्रमाण अत्यल्प होते. या निमित्ताने मोजके पैसे खिशात असतानाही प्लास्टिक मनीमुळे सहल सुखकर होऊ शकते, याचा अनुभव मिळाला.

शिल्पा दुनाखे

..............................

नियोजन केल्याने त्रास नाहीच

नोकरी करणाऱ्यांना रोजचा प्रवासाचा खर्च असतो. पण, गृहिणींना दूध, भाजीपाला आणि किरकोळ वस्तूंची खरेदी सोडल्यास रोज जास्त पैसे खर्च करायची वेळ येत नाही. सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर आमच्या घराजवळील किराणा दुकानदार, भाजीवाल्यांनी नेहमीच्या ग्राहकांना सहकार्य केले. शंभरची नोट आल्यावर एकदम सगळे पैसे दिले तरी चालतील, असे त्यांनी सांगितले. बहुतांश मध्यमवर्गीय महिन्याचा एकत्रित किराणा भरतात आणि एकत्रच पैसे देतात. त्यामुळे दररोज किरकोळ वस्तू सोडल्यास खूप खरेदी करण्याची वेळ येत नाही. अनेकांकडे दूधाचे पैसे देखील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच देण्याची पद्धत असल्याने नोटांच्या तुटवड्यामुळे फारशी गैरसोय झाली नाही. अत्यावश्यक असलेल्या खरेदीसाठी बँकेतून मी तात्पुरते पैसे काढले आहेत आणि काही कामे पुढच्या महिन्यात करायचे ठरवले आहे. रोजंदारी वर्गातील महिलांची गैरसोय झाली असेल पण मध्यमवर्गात महिलांना फारसा त्रास झाला नसावा.

गीता परदेशी









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्‍चिम घाटावरही हवाय सर्जिकल स्ट्राइक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बारामती
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या पश्चिम घाटावर धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी जमिनी बळकावल्या आहेत. काळ्या पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटबंदीचे शस्त्र उगारले आहे. अशाच पद्धतीने पश्चिम घाटात नातेवाइक आणि नोकरचाकरांच्या नावावर जमिनी बळकावणाऱ्या लँडमाफियांवर एक सर्जिकल स्ट्राइक करावे, अशी मागणी पर्यावरणतज्ज्ञांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
केरळच्या निसर्गरम्य किनारपट्टीपासून पुढे तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात अशा सहा राज्यांमध्ये निसर्गसौंदर्याची उधळण करणारा, जैववैविध्याचा अनमोल साठा सांभाळणारा, भारतातल्या मान्सूनवर प्रभाव पाडणारा पश्‍चिम घाट पुन्हा चर्चेत आला आहे. पर्यावरणाचा विनाश होऊन निसर्गाचे प्रदीर्घ काळापासून चालत आलेले मॉन्सून चक्र बिघडले आहे. त्यामुळे या पाच-सहा राज्यांत आधीच बिकट असलेली पाणी परिस्थिती आणखीनच वेगळ्या वाटेने जाऊ शकेल. त्यामुळे केंद्र सरकारने तेथील नागरिकांच्या इच्छा ध्यानात घेऊन आता या भागात नव्या प्रकल्पांना तसेच खाणकामास मंजुरी देऊ नये, अशी आग्रही मागणी पर्यावरणतज्ज्ञांनी मोदींकडे केली आहे .
एक एकर ते तीन हजार एकर जमिनीचे व्यवहार करून यामध्ये प्रदूषणकारी रासायनिक प्रकल्प, खाणकामे, मोठे बेकायदा इमारती याच भागातील जंगलामध्ये फार्म हाउस यामुळे पश्चिम घाट धोक्यात आला आहे. त्यामुळे फक्त या भागाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देऊन भागणार नाही तर पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पर्यावरण कायद्यांचीही काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. या भागातील जमिनी सरकारने संरक्षित करून त्यांचा योग्य मोबदला देऊन या सर्व जमिनींनी वनखात्याच्या ताब्यात न देता भारतीय लष्कराच्या ताब्यात देऊन पश्चिम घाट वाचविला पाहिजे, असे पर्यावरणतज्ज्ञांनी आपले मत ‘मटा’कडे व्यक्त केले.


पश्चिम घाट भारतीय लष्कराच्या ताब्यात देऊन, येथे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये उभी करून हा पश्चिम घाट वाचवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे.
- महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नोटांवरून उपचार नाकारला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, येरवडा
सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकाराव्यात, असे राज्य सरकारचे आदेश असूनही विमाननगर येथील इंदिरा आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी क्लिनिकमध्ये या नोटा रुग्णांकडून घेतल्या जात नाहीत. एका महिलेला पाचशे आणि हजाराच्या नोटांवरून उपचार नाकारल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. संबंधित महिलेने चेक देण्याची तयारी दर्शवूनही परत पाठविण्यात आल्याने महिलेला रडू कोसळले.
केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या असल्या तरी पेट्रोलपंप, महापालिका, महावितरण, खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, तरीही खासगी रुग्णालये पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारत नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. उपचारासाठी रोख साडे तीन लाख रुपये वेळेवर न भरल्याने आम्रपाली खुंटे दाम्पत्याच्या एक दिवसाच्या बालकाला जीव गमाविण्याची घटना पुण्यात घडली. तरीही अनेक खासगी रुग्णालये पाचशे आणि हजाराच्या नोटा नाकारत असल्याचे दिसून येत आहे.
विमाननगर येथील इंदिरा आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी क्लिनिकमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार नसल्याचे फलक हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी लावले आहे. उपचारासाठी आलेल्या एका महिलेला हॉस्पिटलमधील कॅश काउंटरवर हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चालत नसल्याचे सांगण्यात आले. त्याऐवजी नवीन दोन हजारांच्या नोटा अथवा हॉस्पिटलच्या अकाउंटवर ऑनलाइन पैसे भरावे लागतील, असे महिलेला सांगण्यात आले. मात्र, संबंधित महिलेने चेक देण्याची तयारी दर्शवली; परंतु हॉस्पिटल प्रशासनाने चेकसाठी आणि उपचारासाठी नकार दर्शवित महिलेला परत पाठविले. ल्यानंतर महिलेला रडू कोसळले.
याबाबत ‘मटा’ने हॉस्पिटलकडे विचारणा केली असता प्रशासन आणि अकाउंट विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकून दिली.


पाचशे आणि हजाराच्या नोटा न स्वीकारण्याबाबत अकाउंट विभागाकडे विचारणा करावी लागेल. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार हॉस्पिटल रद्द नोटा स्वीकारत नाही. तसेच पाचशे आणि हजाराच्या नोटा खासगी हॉस्पिटलने स्वीकाराव्यात, असे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. जुन्या नोटांमुळे महिलेला उपचार न करताच परत पाठविले, याबाबत काहीही माहिती नाही.
- डॉ. अमित लुंकड, प्रमुख, इंदिरा आय व्हीएफ

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार हॉस्पिटल पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारत नाही. नवीन नोटा अथवा शंभराच्या नोटा हॉस्पिटलच्या अकाउंटला अथवा चेक जमा करता येतो. मात्र जुन्या नोटा स्वीकारत नाही.
- आशिष लोढा, फायनान्शियल डायरेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images