Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मालमत्ता खरेदी-विक्रीलाही फटका

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, भोर
पाचशे व हजाराच्या नोटाबंदीचा फटका येथील सर्वप्रकारच्या मालमत्ता खरेदी-विक्री तसेच स्टॅम्प विक्रीवर झाला आहे. तसेच, जनावरांच्या बाजारालाही मोठा फटका बसला आहे. शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट; तर राष्ट्रीय व इतर बँकेसमोर नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा हे दृश्य सर्वत्रच दिसत आहे.
येथील नोंदणी व मुद्रांकशुल्क कार्यालयात दरमहा सरासरी विविध प्रकारच्या चारशेपर्यंत दस्तांची नोंदणी होत असते. त्यातून सरासरी दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत मुद्रांक शुल्क सरकारकडे जमा होते. या दस्तनोंदणीमध्ये घरांची नोंदणी शंभरच्या आसपास असते. मात्र, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांत विविध ६९ दस्त नोंदवले गेले. ३८ लाख २० हजार मुद्रांक शुल्क जमा झाले. मात्र, त्यात फक्त १३ घरांच्या दस्तांची नोंद झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक रुपयांच्या स्टॅम्पची विक्रीही उपकोषागार कार्यालयातून झाली नसल्याची माहिती समजली.
तालुक्यातील किकवी येथे दर शनिवारी जनावरांचा फार मोठा बाजार भरतो. पावसाळ्यापूर्वी या बाजारात कोटीभर; तर इतर वेळी साठ ते सत्तर लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. या बाजारात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांबरोबरच नगर, सातारा, सोलापूर, चाकणमधील व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी येतात. सरासरी दर आठवड्याला पाचशेच्या आसपास जनावरे बाजारात येतात. परंतु, नोटाबंदीमुळे शनिवारी जेमतेम दोनशेच्या आसपास जनावरे विक्रीसाठी बाजारात आल्याचे दिसून आले. या बाजारात जनावरांची किंमत ठरवून रोखीत व्यवहार केले जातात. व्यवहार ठरल्यानंतर काही रक्कम दिली जाते. नंतर आठ ते पंधरा दिवसांचा वायदेबाजार केला जातो. राहिलेली रक्कम रोखीने अदा करून जनावरांची देवाण-घेवाण केली जाते. परंतु नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांची मोठी अडचण झाल्याने त्यांनी बाजारात येण्याचेच टाळले. परिणामी, येथील व्यवहार निम्म्याने घटले आहेत.

स्वाइप मशिनचा आधार
भोर युवा असोसिएशनच्या पुढाकाराने व्यापारी मंडळींनी राष्ट्रीय बॅकेत चालू खाते उघडण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बॅँक आँफ बडोदाने ४० स्वाइप मशिन व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक, जनता सहकारी बँक यांनी मशिन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा उपयोग करून आपले व्यवहार करण्यास काही प्रमाणात सोयीचे झाले आहेत. या कामी अमर ओसवाल, महेंद्र ओसवाल, प्रवीण जगदाळे यांनी मदत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी चोराकडून सहा दुचाकी जप्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील विविध भागांत दुचाकी चोरणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे; तर त्याचा साथीदार अद्यापही फरार आहे. अटक आरोपीकडून दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अमोल ज्ञानेश्वर शिंदे (वय २५, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिंदे हा खासगी मोटारीवर चालक म्हणून नोकरी करतो. तो दुचाकी चोरून त्याची विक्री करत होता. त्याने एका दुचाकीची विक्री केली असून, इतर दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात होता. आरोपी अमोल शिंदे हा बनावट नंबरप्लेट लावलेली चोरीची दुचाकी घेऊन खडकी परिसरात येणार असल्याची माहिती संघटित गुन्हेगारी विरोधी पथकातील कर्मचारी अब्दुल सय्यद यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने जोशी भवन येथे सापळा रचून शिंदेला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार ज्ञानेश्वर तुकाराम कांबळे (३२, रा. कोन्हाळे ता. अक्कलकोट जि. सोलापूर) याच्यासोबत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यापैकी चोरलेली सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका नामांकित महिला विद्यापीठाच्या वसतीगृहातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वसतीगृहाच्या अधीक्षकानी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील नामांकित महिला विद्यापीठाच्या वसतीगृहाचे तक्रारदार काम पाहतात. अपहरण झालेली मुलगी ही मुळची मुंबईची आहे. ती शिक्षणासाठी पुण्यात असून, येथील वसतीगृहात राहते. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ती मुलगी वसतीगृहातून तिच्या मैत्रिणीला कॉलेजला जात असल्याचे सांगून गेली. ती रात्री परत आलीच नाही. तक्रारदार यांनी रात्री हजेरी घेताना हा प्रकार उडकीस आला. त्यांनी तत्काळ तिच्या मावस भावाकडे, तिच्या इतर मैत्रिणींकडे, मित्रांकडे चौकशी केली. मात्र, ती मिळून आली नाही. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘नोटा साठवू नका; व्यवहारात आणा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चलन तुटवड्यामुळे बँकांमधून अनेकांना अजून एकदाही पैसे काढता आलेले नाहीत. तर दुसरीकडे ज्यांना पैसे मिळाले आहेत, अशा व्यक्ती त्यातील निम्मी रक्कम घरातच ठेवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील नोटाटंचाई आणखी वाढत आहे, म्हणूनच ज्यांना नव्या नोटा मिळाल्या आहेत, त्यांनी या नोटांचा व्यवहारात वापर करावा, असे आवाहन बँकिंग तज्ज्ञांनी केले आहे.
देशात चलन तुटवडा असल्याने गेले काही दिवस रिझर्व्ह बँकेकडून बँकांना होणाऱ्या चलन पुरवठ्यातही घट झाली आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक पुरेसे पैसे चलनात आणल्याचा दावा करत असली, तरी अजूनही चलनात मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. बँकांना मोजकेच पैसे उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हा तुटवडा लक्षात घेऊनच रिझर्व्ह बँक आणि सरकारने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खात्यात कितीही रक्कम शिल्लक असली, तरी हातात मोजकीच रक्कम पडत आहे.
या निर्बंधांमुळे प्रत्येकाला विशिष्ट रक्कमच मिळत आहे. मात्र, काहींची एका पेक्षा अधिक खाती असल्याने ते दररोज बँकेत येऊन रक्कम काढत आहेत. अशा व्यक्तींनी पुरेसे पैसे काढले असले, तरी त्याप्रमाणात पैस बाजारपेठेत येताना दिसत नाहीत. काही नागरिकांनी चलन तुटवड्याचा धसका घेतला असून, त्यामुळे पुढे पैसे मिळाले नाहीत, तर आपल्याकडे असावेत, यासाठी मिळालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम घरातच ठेवण्यात येत आहे. परिणामी, ही रक्कम खेळती राहात नसून बाजारपेठेतील चलन तुटवडा कायम आहे.
दरम्यान, सिक्युरिटी प्रेसमध्ये नव्या किंवा चालू चलनातील नोटांची अहोरात्र छपाई सुरू आहे. लवकरच चलनपुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बँकेतून नागरिकांनी पैसे काढल्यानंतर ते व्यवहारात आणले नाहीत, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. म्हणूनच, नागरिकांनी असे पैसे घरात साठवून न ठेवता, व्यवहारात आणावेत, असे आवाहन बँकिंग तज्ज्ञांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पीएमपी कार्यालयाबाहेर शिवसेनेची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दररोजच्या उत्पन्नातील सुट्टे पैसे बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय पुढाऱ्यांना टक्केवारी घेऊन बदलून दिले जात असल्याचा आरोप करीत, शिवसेनेने पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयावर निदर्शने केली. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे यांना निवेदन देताना घेराव घालून शिवसैनिकांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली.
पीएमपीकडून पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे दररोजचे सरासरी एक कोटी रुपयाचे संपूर्ण उत्पन्न शंभर रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटांच्या स्वरूपात मिळते. हे पैसे बदलून पीएमपीकडून बँकेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या जातात, असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे टक्केवारी घेत पीएमपीचे पैसे बदलून देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दररोज मिळणाऱ्या सुट्या पैशांचा हिशेब द्यावा, आदी मागण्यांसाठी शिवसेनेने स्वारगेट येथील टिळक चौकातून पीएमपी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक मोरे शिवसैनिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले असता, शिवसैनिकांनी त्यांना सुट्टी नाणी भेट दिली. कार्यालयाच्या आवारात चिल्लर फेकून या गैरव्यवहाराचा निषेध केला. तसेच, शिवसैनिकांनी मोरे यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी मोरे यांना तेथून बाजूला नेले. त्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे बांगड्या फेकण्यात आल्या.
शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक सचिन तावरे, उपशहरप्रमुख विशाल धनकवडे, विभाग प्रमुख श्रीकांत पुजारी, युवा सेना विभाग अधिकारी सचिन निगडे, राम खोमणे, विनोद आरसे, सागर माळकर, गणेश कामठे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​दोन दिवसांत ‘पाचशे’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाचशे रुपयांची नवी नोट छापून येऊन आठवडा उलटला, तरी अजूनही या नोटांचे दर्शन पुणेकरांना झालेले नाही. पुण्यात फक्त शंभरच्या जुन्या आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध आहेत. या दोन्ही नोटांच्या मूल्यात प्रचंड मोठा फरक असल्याने बाजारपेठेत सुट्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, पुणेकरांना पाचशेच्या नोटेसाठी अजून एक किंवा दोन दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
शहरातील बहुतांश बँकांना अजूनही फक्त दोन हजार रुपयांच्या नोटांचाच पुरवठा होत आहे. मध्यंतरी शंभरच्या नोटाही पुरविण्यात न आल्याने खातेदारांना केवळ दोन हजारच्याच नोटा देण्यात येत होत्या. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे. दोन हजार रुपयांचे सुटे पैसे मिळणे अवघड असल्याने काही ठिकाणी नागरिक आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात खटके उडत आहेत. खातेदार सुट्ट्या पैशांसाठी अडून राहिल्यास शेवटी बँकांकडून नाण्यांचा पर्याय दिला जात आहे. मात्र, एवढी नाणी मोजून कधी घेणार आणि व्यवहारासाठी कशी वापरणार, असा सवाल खातेदार उपस्थित करत आहेत.
आता काही प्रमाणात शंभर रुपयांच्या नोटा पुरविण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये जुन्या किंवा चलनात आणण्यायोग्य परिस्थितीत नसलेल्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. खातेदारांनी आग्रह केल्यास त्यांना या खराब नोटा दिल्या जात आहेत. सुटे पैसे नसल्यापेक्षा थोड्या खराब नोटा चालतील, अशा मानसिकतेने खातेदारही या नोटा स्वीकारत आहेत.
दुसरीकडे सातत्याने शहरातील सर्व बँका रिझर्व्ह बँकेकडे पाचशे रुपयांच्या नव्या नोटेची मागणी नोंदवत आहेत. मात्र, या नोटांची टंचाई असल्याने या नोटांचा पुरवठा कमी आहे. राज्यात फक्त मुंबईत गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अन्य ठिकाणांना अजूनही पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षाच आहे.
रिझर्व्ह बँकेकडून गेल्या काही दिवसांत फक्त दोन हजार रुपयांच्याच नोटेचा पुरवठा झाला आहे. क्वचित शंभर रुपयांच्या जुन्या नोटांची काही बंडले आणि दहा, वीस रुपयांची काही कोरी बंडल पाठविण्यात येत आहेत. मात्र, पाचशे रुपयांची नोट अजूनही पाठविण्यात आलेली नाही. आम्ही वारंवार मागणी नोंदवूनही पाचशे रुपयांच्या नव्या नोटा अजून उपलब्ध झालेल्या नाहीत, असेच रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात येत आहे, असे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या ट्रेझरी व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
रिझर्व्ह बँकेकडून सोमवारी रोकड उपलब्ध झाली आहे. ही रोकड असलेले कंटेनर करन्सी चेस्टमध्ये पोहोचले आहेत. त्यात पाचशेच्या नोटाही असल्याचे सांगितले जात आहे. ही रोकड सॉर्टिंग झालेली असल्यास उद्या दुपारपासून शहरात पाचशेच्या नोटा उपलब्ध होतील. मात्र, सॉर्टिंग झालेले नसल्यास चेकिंग स्टॉक घ्यावा लागेल, त्यातील बंडल कशी आहेत, हे पाहावे लागेल, त्याची मोजणी व टॅली करण्यात एक दिवस जाईल. त्यामुळे बुधवारी किंवा त्यानंतरच पाचशेच्या नोटा उपलब्ध होतील, असे एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, ‘पाचशेच्या काही नव्या नोटा या एटीएममधील चाचणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. एटीएममध्ये चाचणी झाल्यानंतर या नोटा काढून घेऊन पुन्हा पाठवाव्या लागणार आहेत. सध्या खातेदारांसाठी या नोटांचा पुरवठा झालेला नसून तशा सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. एक दोन दिवसांत या नोटा उपलब्ध होऊन सध्या शंभर व दोन हजार रुपयांच्याच नोटांमुळे निर्माण झालेली परिस्थिती निवळेल,’ असे कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादाय आयुक्तांकडून रुबी हॉलची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटलचा अमानवी चेहरा समोर आलेला असताना त्याची आता धर्मादाय आयुक्तालयानेच गंभीर दखल घेतली आहे. बाळाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी उपायुक्त नितीन जाधव यांनी सोमवारी रुबी हॉस्पिटलकडे चौकशी केली. त्या चौकशीचा अहवाल उद्या (मंगळवारी) सादर केला जाण्याची शक्यता आहे.
मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याचा फटका सर्वसासामान्यांना बसू लागला आहे. त्याचाच अनुभव खुंटे दाम्पत्याने रविवारी घेतला. रुबी हॉस्पिटलने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार देत नव्या नोटाच्या ठेवलेल्या अटीने बाळाचा मृत्यूचा झाल्याचा आरोप पालकांनी केला. त्या पार्श्वभूमीवर शहरात वैद्यकविश्वात खळबळ उडाली. त्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांची भेट घेतली.
सजग नागरी मंचाचे विवेक वेलणकर, हमारे अपने संस्थेचे बाळासाहेब रुणवाल, लेक वाचवा अभियानाचे गणेश बोऱ्हाडे, आशिष माने, अॅड. शिवराज कदम, लोकहित फाउंडेशनचे अजहर खान, कॉँग्रेसचे सरचिटणीस ऋषी बालगुडे, नीलेश महाजन, राकेश जाधव आदींचा त्यात समावेश होता.
‘रुबी हॉस्पिटलने नोटांमुळे उपचार नाकारल्याने बाळाचा मृत्यू झाल्याच्या बातम्यांची दखल घेऊन उपायुक्त जाधव यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी रुबी हॉस्पिटलकडे चौकशी सुरू केली आहे. तसेच येत्या आठवडाभर निरीक्षक महाले यांची नियुक्ती हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. नोटा नसल्याने उपचार नाकारणे किंवा इतर प्रकार झाल्यास त्याबाबत पेशंटला माहिती दिली जाणार आहे,’ अशी माहिती कचरे यांनी दिली.
खासगी धर्मादाय हॉस्पिटलने धर्मार्थ सेवा देणे अपेक्षित आहे. त्यानुसार पेशंटला उपचार नाकारल्यास धर्मादाय कायद्याचे उल्लंघन होते. त्यामुळे त्या नियमांचे पालन होते की हे पाहणे आयुक्तालयाचे काम आहे. त्यानुसार खासगी हॉस्पिटलने चेक, डीडी, क्रेडिट, डेबिट कार्डने पैसे स्वीकारावेत, असे आदेशही आम्ही यापूर्वीच दिले आहेत, असेही कचरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलना चेक स्वीकारण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंटकडून चेकने पैसे स्वीकारून संबधित पेशंटवर तातडीने उपचार करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी दिले. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने खासगी हॉस्पिटलचालक उपचार करण्यास दुर्लक्ष करत असल्याच्या काही घटना समोर आल्याने पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा रद्द केल्याने शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंटवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पेशंटवर उपचार करायचे असतील तर उपचारांचे पैसे भरा, त्यानंतरच पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाईल, अशी भूमिका घेतली जात असल्याने पेशंट आणि नातेवाइकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. केंद्र सरकारने बँक खात्यातून आठवड्याला केवळ २४ हजार रुपये काढण्याची परवानगी दिल्याने पेशंट आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मनस्तापात भर पडत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलचालकांनी पेशंटच्या उपचारांचे पैसे चेकने स्वीकारावेत, अशा सूचना पालिका आयुक्त कुमार यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाच्या सहसंचालकांनी काढलेल्या पत्राचा दाखला आयुक्तांनी दिला आहे.
पेशंट तसेच त्यांच्या नातेवाइकाने दिलेला चेक बँकेत वटला नाही, तर संबधित हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास हॉस्पिटल प्रशासनाने १०४ किंवा १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरातील हॉस्पिटल तसेच नर्सिंग होम चालकांनी कोणत्याही परिस्थितीत पैशांअभावी पेशंटवर उपचार टाळू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेल्पलाइनवर संपर्क साधा
पैशांअभावी खासगी हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिल्यास त्याची तक्रार नोंदविण्यासाठी पालिकेने २४ तास हेल्पलाइन सुरू केली आहे. ०२०-२५५०८५०० क्रमांकावर नागरिकांना त्याची तक्रार नोंदविता येणार आहे. हॉस्पिटलबाबत काही लेखी तक्रार असल्यास नागरिकांनी आरोग्य अधिकारी यांच्या नावाने तक्रार करावी. तसेच महापालिकेचे उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे (९६८९९३१४४४), सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र ठाकूर (९६८९९३१२१३), वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडित सोनकांबळे (९६८९९३१२२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शकुंतला नगरकरांचा दांभिकतेवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘कवींच्या शब्दांवर आणि गाण्यांवर अदाकारीने सादर करण्यात आलेली लावणी गलिच्छ कशी असू शकते? टीव्हीवरील तोकड्या कपड्यातल्या तरुणीकडे कौतुकाने पाहिले जाते, मग नखशिखांत झाकल्या गेलेल्या लावणी कलाकारांकडे वाईट नजरेने का पाहिले जाते,’ असा सवाल करत ज्येष्ठ लावणी कलावंत शकुंतला नगरकर यांनी सोमवारी समाजाच्या दांभिकतेवर हल्ला चढवला.
पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळातर्फे नगरकर यांना ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या उद्विग्नपणे बोलत होत्या. ‘लोकसाहित्यिक डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार’ लावणी गायिका कीर्ती बने यांना, तर ‘तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ भारुडकार निरंजन भाकरे यांना प्रदान करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार, लेखिका डॉ. माधवी वैद्य, प्रतिभा शाहू मोडक, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, शहाजीराव पाटील, जयप्रकाश वाघमारे या वेळी उपस्थित होते.
‘इतर कलावंतही लोककलावंताकडे तुच्छतेने पाहतात. स्वतःच्या कलांचा अभिमान जरुर बाळगा; परंतु, महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला कमी लेखू नका,’ अशा शब्दांत नगरकर यांनी कलाकारांचा समाचार घेतला. ‘रंगभूमीने आणि रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. कोणी कितीही नावे ठेवली तरी मला माझ्या कलेचा सार्थ अभिमान आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘लोककलावंत कलेसाठी आयुष्य वाहून घेतात आणि आयुष्याच्या शेवटी कंगाल होतात. पोटाची खळगी भरताना त्यांचे हाल होतात; कारण, कलेचे क्षेत्र फाटके आहे. कलावंतांना शासनातर्फे ठराविक निधी मिळायला हवा. लोकजागृतीचे महान काम करणाऱ्या लोककलावंतांना मदत करण्याची जबाबदारी शासनाची आहे. आमचे सरकार यासाठी सतत प्रयत्नशील होते. प्रसंगी आमच्यावर टीकाही झाली,’ असे वक्तव्य शिंदे यांनी केले.
पवार म्हणाले, ‘आपल्याला कलेचा अभिजात वारसा लाभला आहे. या गाभ्याचे मूळ संस्कृतीत आहे. पवित्र कलेला दाद द्यायलाही रसिकता लागते. कला जाणून घेण्याचा सच्चेपणा लागतो. त्यामुळे लोककलावंतांना योग्य सन्मान मिळायला हवा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या दहा दिवसांमध्ये नऊ कोटींची करवसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील करदात्यांनी पुणे महापालिकेकडे कर भरण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे पुणे कँटोन्मेंट बोर्डातील रहिवाशांनी गेल्या दहा दिवसांत कर भरण्यास प्रतिसाद दिला. त्यामुळे आतापर्यंत सुमारे नऊ कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे.
पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांची कँटोन्मेंट बोर्डाकडे गर्दी झाली. कँटोन्मेंट बोर्डाने पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे जाहीर केले. त्यानुसार बोर्डातील रहिवाशांनी मालमत्ता तसेच अन्य कर भरण्यास बोर्डाच्या प्रशासनाकडे गर्दी करण्यास सुरुवात केली. नागरिकांचा प्रतिसाद पाहून कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने दोन खिडक्या खुल्या करून सेवा सुरु केली.
‘कँटोन्मेंट बोर्डाकडे पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याने नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली. पैसे स्वीकारण्याची व्यवस्थादेखील आम्ही वाढविली. त्यामुळे आमच्याकडे गेल्या दहा दिवसांत सुमारे नऊ कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. त्यामध्ये २ कोटी ८६ लाख रुपयांची रोख रक्कम, तर ६ कोटी १० लाख रुपयांचा मालमत्ता कर चेकद्वारे बोर्डाला रक्कम प्राप्त झाली आहे. त्यात लष्कराकडून देखील पाच कोटी रुपयांचा सेवाशुल्काची रक्कम वसूल करण्यात आली आहे,’ अशी माहिती बोर्डाचे रोखपाल पीटर बेंजामीन यांनी दिली.
मालमत्ता करासह बोर्डाला तीन कोटी रुपयांचा एलबीटीदेखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे कँटोन्मेंट बोर्डाकडे आतापर्यंत सुमारे १२ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीला ‘सीएनजी’चे इंधन

$
0
0

राज्यातील पहिलीच घटना; शुक्रवारी लोकार्पणानंतर सुरू होणार नवे पर्व

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुचाकींचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात दुचाकींबाबत एका नवीन पर्वाची सुरुवात होत आहे. पेट्रोलवर धावणाऱ्या दुचाकी आता ‘सीएनजी’वरही धावू लागणार आहेत. उद्या, बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील सीएनजी स्टेशनवर या दुचाकींना हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. सीएनजीवर दुचाकी धावण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असेल.

पुण्यातील दुचाकींची संख्या वीस लाखांच्या वर गेली आहे. त्या तुलनेत रस्ते अपुरे असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून, पर्यायाने प्रदूषण पातळीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. शहरातील चारचाकी वाहने व रिक्षांना पूर्वीपासूनच ‘सीएनजी किट’ बसवले जात आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’च्या माध्यमातून या वाहनांना गॅसचा पुरवठा केला जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत कमी किंमत आणि गाडीचे ‘अॅव्हरेज’ वाढत असल्याने नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, आता दुचाकीदेखील ‘सीएनजी’वर चालवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच दुचाकींना (मोपेड) हे किट बसवण्यात आले आहे. एक महिनाभर त्या दुचाकींची पाहणी केल्यानंतर ही किट्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या पाच दुचाकींना सीएनजी किट बसवल्यानंतर त्यांची ‘आरटीओ’मध्ये नोंदणी व पासिंग करण्याचे काम सुरू आहे. दुचाकीत इंधन म्हणून सीएनजी वापरण्याचा प्रयोग यापूर्वी दिल्लीत जुलै महिन्यात करण्यात आला होता. तीन महिने त्याची पाहणी करण्यात आली. दिल्लीनंतर पुण्यातच हा प्रयोग केला जात आहे. ‘सीएनजी’वरील दुचाकींबरोबरच ‘आरटीओ’समोरील पेट्रोल पंपावर उभारलेल्या सीएनजी स्टेशनचे उद्-घाटनही त्याच दिवशी केले जाणार आहे.

.....

इंधनांची तुलना

पेट्रोल - (एक लिटर) - सीएनजी (एक किलो)

किंमत - ७२.५० रुपये - ४३.५० रुपये

अॅव्हरेज - ४५ ते ५० किमी (मोपेड) - ७० ते ७५ (किमी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नोटांतून भरलेल्या मिळकतकरावरही नजर

$
0
0

प्राप्तिकर विभागाने मागितली महापालिकेकडे माहिती

Chaitanya.Machale@timesgroup.com

Tweet : @ChaitanyaMT

पुणे : जुन्या नोटांच्या माध्यमातून मिळकतकर (प्रॉपर्टी टॅक्स) भरणाऱ्यांची माहिती गोळा करण्यास प्राप्तिकर विभागाने सुरुवात केली आहे. जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर गेल्या तेरा दिवसांमध्ये महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ११८ कोटी रुपयांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने पालिकेकडे ही माहिती मागितली आहे.

एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतला; मात्र महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल भरण्यासाठी, तसेच पेट्रोल खरेदी, विमान, तसेच रेल्वेची तिकिटे यासाठी या नोटा चालतील, असे सरकारने जाहीर केले होते. या सवलतीचा फायदा घेऊन शहरातील हजारो थकबाकीदारांनी कोट्यवधी रुपयांचा कर त्या नोटांच्या रूपात जमा केला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीबरोबरच १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये त्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. थकबाकी असलेल्या मिळकतदारांकडून घेतल्या जाणाऱ्या दंडामध्ये ७५ टक्के सवलत देण्याची अभय योजना महापालिकेने गेल्या महिन्यापासून सुरू केली आहे. या योजनेला प्रारंभी अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला; मात्र पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर मात्र प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी भरण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जुन्या नोटा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी स्वीकारल्या जात असल्याने पहिल्या आठ दिवसांतच पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. काही जणांनी लाखो रुपये, तर काहींनी कोट्यवधींची थकबाकी पालिकेकडे भरली असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी काळ्या पैशाचा वापर झाल्याची शक्यता अधिक असल्याने पालिकेकडे पैसे भरलेल्या थकबाकीदारांची माहिती प्राप्तिकर विभागाने पालिकेकडे मागितली आहे. त्यामुळे मिळकतकराच्या रूपाने काळा पैसा सहज पांढरा झाला, असे समजून निर्धास्त झालेल्यांच्या पोटात कारवाईच्या भीतीने गोळा आला आहे.

...

यादी देण्यास नकार

गेल्या १३ दिवसांमध्ये पालिकेकडे सर्वांत अधिक थकबाकी भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे द्यावीत, अशी मागणी मिळकतकर विभागाकडे केली असता, अद्याप यादी तयार नसल्याचे कारण पुढे करून माहिती देण्यास नकार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोव्यात बसून ‘एनएफएआय’ची सैर

$
0
0

संस्थेच्या ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी शो’ला विशेष पसंती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गोव्यात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) चित्रपट रसिकांना एक आगळावेगळा ‘शो’ पाहता येणार आहे. पुण्यातील चित्रपट जतन करणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’ला (एनएफएआय) गोव्यात बसून भेट देता येत असून, संस्थेचे काम जवळून अनुभवण्याची संधीही मिळत आहे. देशविदेशातील अभिजात चित्रपटांच्या भाऊगर्दीत ‘एनएफएआय’चा तीन मिनिटांचा ‘शो’ सर्वांची दाद मिळवत आहे. ३६० अंशात फिरणाऱ्या कॅमेराच्या मदतीने करण्यात आलेल्या ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ प्रकारातील हे चित्रिकरण सर्वांच्या कुतूहलाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पणजी येथे उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवात गेल्यावर्षी प्रमाणे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे विशेष दालन असून, ते चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या दालनाचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यानंतर स्वत: नायडू यांनी ‘एनएफएआय’च्या तीन मिनिटांच्या फिल्मचा आस्वाद घेऊन गोव्यातील संस्थेला भेट दिली. कॅमेऱ्याच्या मदतीने तयार केलेली चित्रफित पाहून नायडू भारावून गेले. या वेळी विभागाचे सचिव सचिव अजय मित्तल, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि फिल्म हेरिटेज मिशनचे कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा उपस्थित होते.
या प्रदर्शनात ३६० अंशात फिरणारा कॅमेरा ठेवण्यात आला असून, त्यातून व्हर्च्युअल रिअॅलिटी या विशेष चित्रिकरणाचा आस्वाद घेता येणार आहे. एनएफएआयबद्दल माहिती देणारी तीन मिनिटांची विशेष फिल्म आम्ही तयार केली आहे. ती पाहताना आपण जणूकाही संस्थेत असून, सर्व माहिती जाणून घेत असल्याचा आभास होतो. रसिकांसाठीही ही पर्वणी ठरत असून, देश-विदेशातील चित्रपट रसिक आस्थेने संस्थेची माहिती जाणून घेत आहेत,’ असा अनुभव मगदूम यांनी ‘मटा’ला सांगितला.
दरम्यान, या प्रदर्शनाचा विषय ‘आझादी ७० साल-याद करो कुर्बानी’ हा असून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपटांनी कसे योगदान दिले, सामाजिक प्रश्नांना कशी वाचा फोडली, तसेच जवानांच्या आणि शहिदांच्या त्यागाचा कसा गौरव केला, हे या प्रदर्शनातून फलकांच्या मदतीने मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

एनएफएआयच्या वेबसाइटमध्ये बदल करण्यात आला आहे. nfaipune.gov.in या ऐवजी nfai.gov.in हा नवीन पत्ता असेल. २०१७वर्षाचे डेस्कटॉप कॅलेंडर संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून, भारतीय चित्रपटातील नृत्य हा त्याचा विषय आहे. हंसा वाडकर, वैजयंतीमाला, हेलन यांची दुर्मिळ छायाचित्रे कॅलेंडरमध्ये पाहता येतील.
प्रकाश मगदूम, संचालक, एनएफएआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या ३९ व्या स्मृतीदिनानिमित्त येत्या १४ डिसेंबरला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. या वेळी श्रीधर माडगूळकर, प्रकाश भोंडे उपस्थित होते.
या समारंभात देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, चैत्रबन पुरस्कार गायक गीतकार नंदेश उमप यांना तसेच विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका आर्या आंबेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गदिमा पारितोषिकासाठी उद्गगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलच्या ऋतूजा कांकरे हिची निवड केली आहे. पुरस्कार समारंभानंतर डॉ. उल्हास आणि विनया बापट यांच्या संकल्पनेतून नऊ रसांवर आधारीत आणि गदिमांच्या गीताचा अविष्कार सादर करण्यात येणार आहे.
२०१८मध्ये गदिमा यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, तत्पूर्वी पुण्यात त्यांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा माडगूळकर यांनी या वेळी व्यक्त केली. महापालिकेला या स्मारकासाठी २००८मध्ये पाच कोटी रुपये मंजूर झाले होते. पुणे-मुंबई महामार्गावर जागाही निश्चित झाली होती. मात्र पुढे काही घडले नाही, असेही माडगूळकर यांनी सांगिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अल्पसंख्याक’ शाळांच्या विद्यार्थ्यांची होतेय फरपट

$
0
0

क्षमता नसूनही थेट पहिलीच्या वर्गात प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्याने अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांमधून, दर्जा नसताना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आरक्षित जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांची आता फरपट सुरू झाली आहे. यापूर्वी अल्पसंख्याक दर्जा नसल्याने या शाळांमधून आरक्षित जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया झाली होती. मात्र, आता अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र हाती पडल्याने, या शाळा विद्यार्थ्यांची क्षमता नसतानाही थेट पहिलीच्या वर्गात बसविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पुण्यात अनुभवायला मिळत आहे.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांना आरक्षित जागांवरील प्रवेशामधून सरकारने सूट दिली आहे. त्यानुसार राज्यात असा दर्जा असलेल्या शाळा वगळता इतर सर्व शाळांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश द्यावे लागतात. अनेक खासगी शिक्षण संस्थांमधून आरक्षित जागांवरील प्रवेश नाकारण्यासाठी विविध कारणे दिली जात असल्याचे प्रकार गेल्या काही काळात सातत्याने समोर येत आहेत. अल्पसंख्याक दर्जा मिळणे शक्य असलेल्या शाळांनी हा दर्जा मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्याचेही समोर आले होते. आता असा दर्जा मिळाल्याचे प्रमाणपत्र हाती पडल्यानंतर, या शाळा कायदेशीर तरतुदीवर बोट ठेवून आरक्षित जागांवरील प्रवेश नाकारत आहेत. मात्र, या धांदलीमध्ये यापूर्वी कायदेशीर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांकडेही शाळांकडून दुर्लक्ष होत आहे. पुण्यातील एका शाळेमध्येही असाच प्रकार घडल्याचे आता उघड झाले आहे. असे असले तरी संबंधित विद्यार्थ्यांबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न खात्यातील अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
संबंधित शाळेने हा दर्जा मिळाल्यानंतर पूर्वप्राथमिक वर्गांसाठीचे प्रवेश अचानक थांबविले आहेत. तसेच, यापूर्वी शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट पहिलीच्या वर्गामध्ये बसविण्यास सुरुवात केली आहे. बालकांची क्षमता नसतानाही त्यांना थेट पहिलीच्या वर्गात बसावे लागत असल्याने, अखेर या बालकांच्या पालकांनी या प्रकाराविषयी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जाबाबत सुनावणी घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रारदार आणि शालेय व्यवस्थापनाचे म्हणणेही ऐकून घेतले आहे. मात्र, त्यानंतर आत्तापर्यंत या तक्रारींविषयी कोणताही निर्णय न झाल्याने, या शाळेत शिक्षणहक्क कायद्यांतर्गत यापूर्वी प्रवेश मिळालेले विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाही ‘आधार’ नाही केरोसीन

$
0
0

क्रमांक न दिल्यास लाभार्थ्यांमधून नावे वगळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वस्त धान्य दुकानांतून अन्नधान्य आणि केरोसीन मिळणाऱ्या कुटुंबांना दुकानदारांकडे आधार क्रमांक देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आधार क्रमांक न दिलेल्या कुटुंबांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून कायमस्वरूपी वगळण्याचा आणि केरोसीनचा अनुदानित कोटा रद्द करण्याचा इशारा शहर अन्नधान्य वितरण विभागाने दिला आहे.
राज्य सरकारने अनुदानित अन्नधान्य आणि केरोसीन मिळण्यासाठी पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दुकानदारांकडे देण्याची सक्ती केली आहे. त्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत माहिती न देणाऱ्या कुटुंबांना अनुदानित केरोसीनचा कोटा देणे बंद करण्यात आले आहे. एक नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत संबंधितांचा केरोसीनचा साठा दुकानदारांकडे ठेवला जाणार आहे. मात्र, या कालावधीतही आधारक्रमांक न दिल्यास त्यांचा कोटा रद्द केला जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आधार क्रमांक देण्याचे आवाहन शहर अन्नधान्य वितरण विभागाकडून करण्यात आले आहे.
दुकानदारांकडून होणारा काळा बाजार रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांची माहिती संकलित करून ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. दुकानदारांना शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची नावे, सदस्यांचे आधार क्रमांक, कुटुंब प्रमुखाचा मोबाइल क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि दर महिन्याला वितरित केलेले केरोसीन आदी माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संकलित करून शहर अन्नधान्य वितरण विभागाकडे द्यावी लागणार आहे. संबंधित माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
याबाबत अन्नधान्य वितरण आधिकारी शहाजी पवार म्हणाले, ‘केरोसीनचा अनुदानित कोटा मिळणारी शहरात एक हजार १२० कुटुंबे आहेत. कुटुंबात एकच व्यक्ती असलेल्या शिधापत्रिकाधारकासाठी दोन लिटर, दोन व्यक्ती असलल्या कुटुंबाला तीन लिटर आणि तीन पेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबाला चार लिटर अनुदानित केरोसीन मिळते. ऑक्टोबर महिन्यासाठी ६१२ किलो लिटर केरोसीन कोटा मिळाला आहे. दुकानदारांनी या केरोसीनचे वितरण कसे केले, याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. दुकानदारांनी माहिती दिल्याशिवाय त्यांना पुढील महिन्याचा केरोसीनचा कोटा न देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे पुढील माहिन्यात धान्य आणि केरोसीनचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांनी दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाची माहिती द्यावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच पक्षांमध्ये जोरदार चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी कोंढवा बुद्रुक या प्रभाग क्रमांक ४१ मध्ये विजय मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार ताकद लावण्याची तयारी आरंभली आहे. शिवसेना आणि भारतीय जनपा पक्षाची ताकद असलेल्या या नवीन प्रभागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेला यश मिळविण्यासाठी कडवी लढत द्यावी लागणार आहे. या प्रभागातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात असून, निवडणुकीत सेना, भाजपची युती न झाल्यास या दोन्ही मित्र पक्षांना एकमेकांच्या विरोधात लढा द्यावा लागेल.

सध्या अस्तित्वात असलेला प्रभाग क्रमांक ६२, ७६ या दोन्ही प्रभागांचा मिळून नवीन प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी तयार झाला आहे. भाजपचे विद्यमान नगरसेवक आणि आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेच्या संगीता ठोसर यांचा प्रभाग ६२ तसेच, मनसेचे वसंत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती कदम यांचा प्रभाग क्रमांक ७६ चा भाग या नवीन प्रभागात येतो. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत टिळेकर यांना या भागातून मोठे मताधिक्य मिळाल्याने भाजपकडून अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोंढवा बुद्रुक परिसरासह येवलेवाडी गाव, कात्रज-कोंढवा रस्ता, माउलीनगर, गुजर वस्ती, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर, सुखसागरनगरचा भाग, विद्यानगर, आनंदनगरचा भाग या प्रभागात मोडतो.

या भागात गेली पंधरा वर्षे भाजप आणि शिवसेनेची मोठी ताकद आहे. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही ही ताकद दिसून आली होती. त्यातच विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. यापूर्वीच्या दोन टर्म शिवसेनेच्या उमेदवाराने या भागातून प्रतिनिधित्व केल्याने दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत याचे परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत. पालिकेसाठी भाजप आणि सेनेची युती न झाल्यास एकमेकांविरोधात लढण्याची तयारी या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी सुरू केली आहे. अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण या प्रभागात पडले आहे. माजी नगरसेविका आणि आमदार टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका भारती कदम या दोघी याच प्रभागातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

भाजपकडून नितीन शेलार, अनिल येवले, रोहित साळवे, सुनील कामठे, नितीन कामठे, सतीश गुंजाळ, किशोर कामठे, भीमराव साठे, मीना कामठे, शकुंतला येवले यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून दशरथ काळभोर, गंगाधर बधे, गणेश कामठे, मनीषा कामठे, सुरेखा मरळ, रूपाली गायकवाड, गणेश जगताप, सोमनाथ कामठे, छाया कामठे, रमेश गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून अमोल धर्मावत, सुशीला निंबाळकर, संदीप निंबाळकर, दादाश्री कामठे, मंगला नानगुडे, राकेश जगताप यांनी जोरदार फिल्डिंग लावली असून मनसेकडून उमेश धांडेकर, सीमा टिळेकर, राजाभाऊ कदम, हनुमंत कामठे, सुहासिनी कामठे, शकुंतला मोरे, विलास कामठे, अमित जगताप यांची नावे चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राकेश कामठे, संदीप बधे, प्रीती बधे, उदयसिंह मुळीक, सुनील मोहीते, चंद्रकांत हंडाळ, दीपक कामठे, स्वप्नील कामठे, बाळासाहेब म्हस्के यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या प्रभागात गेली अनेक वर्षापासून शिवसेना, भाजपचे वर्चस्व असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत अधिक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादीने केला आहे. याबरोबरच भाजप तसेच सेनेतील काही नाराज मंडळी आपल्याकडे कसे येतील, याची चाचपणी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेने करण्यास सुरुवात केली आहे.

..

चौकट

प्रभाग क्रमांक ४१, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी

लोकसंख्या : ७३,७६०

आरक्षण

अ : अनुसूचित जाती

ब : इतर मागासवर्ग महिला

क : सर्वसाधारण महिला

ड : सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलची क्रेझ अजूनही कायम

$
0
0

फडके हौद चौकात देशी-विदेशी बनावटीच्या सायकली उपलब्ध

Aditya.Tanawade@timesgroup.com
................
Tweet : @AdityaMT

पुणे : पुण्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जरी भाऊगर्दी झाली असली तरी, पुणेकरांचे सायकलवरचे प्रेम अद्याप कमी झालेले नाही. शाळेत जाण्यासाठी मुलांकडून आणि तरुणांकडून व्यायामासाठी आजही सायकलचा वापर होत असल्याचे दिसून येते. अशा सायकलप्रेमींना दर्जेदार सायकल पुरवण्यात फडके हौद चौकातील अनेक दुकानांचा मोठा वाटा आहे.
पूर्वी वापरल्या जाणाऱ्या जुन्या सायकलींऐवजी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत आणि दिसायला देखण्या अशा सायकलींना पुणेकरांची पसंती लाभत आहे. त्यांची बदलती आवड लक्षात घेता या परिसरातील सायकलींच्या दुकानांनी देखील कात टाकली आहे. जागतिक स्तरावरील विविध ब्रँडच्या दर्जेदार सायकल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून हा परिसर ओळखला जात आहे.
शालेय विद्यार्थी, सायकलीची आवड असणारे नागरिक, व्यायामाची आवड असणार, खेळाडू, आणि सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभागी होणारे याच परिसरातून सायकली खरेदी करतात. एकाच ठिकाणी परदेशी आणि स्वदेशी कंपन्यांच्या सायकली उपलब्ध होत असल्याने त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सायकलचा लूक आणि आवड अशा सर्वच गोष्टी तपासून पाहता येतात.
सध्या या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये ब्रँडेड सायकल्सना सर्वाधिक मागणी आहे. त्यामध्ये लहान मुलांसाठी १४ इंची (टायरचा व्यास), १६ इंची सायकल्स उपलब्ध आहे. फँटम, फायरफॉक्स, ट्रेक, क्रॉस, रॅले, श्नेल अशा ब्रँडेड कंपन्यांच्या सायकलींना प्रचंड मागणी आहे. कामगार वर्ग वगळता लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण या सायकली वापरतात. याशिवाय या परिसरातील दुकानांमध्ये अॅटलस, हीरो, गोल्डी, बीएसए, लेडी बर्ड अशा कंपन्यांच्या भारतीय बनावटीच्या सायकल्स देखील उपलब्ध आहेत. परंतु, मेटल बॉडी असल्याने आणि साधे ब्रेक असल्याने या कंपन्यांच्या सायकलींना फारशी मागणी नाही. पुणेकरांकडून गीअरयुक्त सायकलला मागणी वाढत आहे.
विदेशी बनावटीच्या सायकली ७ हजारांपासून ते ३ लाख किमतीपर्यंतच्या सायकल्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतीय बनावटीच्या सायकल्स २ हजारांपासून ते १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

सायकलमध्येही आता नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. सायकल चालवताना तिचा आनंद घेता यावा, त्यांचा दर्जा वाढविण्यात येत आहे. या आधी केवळ २७ इंच व्यासाच्या सायकली बाजारात मिळत होत्या. मात्र, आता २९ इंची व्यासाच्याही सायकली उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी श्रमातही अधिक वेगाने विशिष्ट अंतर कापणे शक्य झाले आहे. दर काही महिन्यांनी सायकल्सचा ट्रेंड बदलत असून, ब्रँडेड सायकल्सना पुणेकरांची सर्वाधिक पसंती आहे.

प्रमोद भुता‍ळे, सायकल व्यावसायिक, फँटम सायकल्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेचा आज निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निकाल आज, मंगळवारी जाहीर होणार आहे. विजयासाठी ३३० मतांचा जादुई आकडा नेमका कोणता पक्ष गाठतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवाजीनगर गोडाउन येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ६९८ मतदारांपैकी ६५८ मतदारांनी मतदान केले असून, विजयी होण्यासाठी उमेदवाराला ३३० मते मिळणे आवश्यक आहे. मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे ​जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे आणि यशराज पारखी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. लांडे यांनी भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांची उमेदवारी ही तांत्रिक ठरली आहे. त्यामुळे भोसले, जगताप आणि येनपुरे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे पक्षाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी न झाल्यामुळे काँग्रेसने उमेदवार उभा केला. भाजप आणि शिवसेनेपैकी शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मतदार संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ २९८ तर काँग्रेसचे १२४ मतदार आहेत. भाजपची ७१ आणि शिवसेनेची ७६ मते आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्ही प्रेम करता म्हणून मी आहे

$
0
0

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘रसिकांनी आजवर दिलेल्या प्रेमामुळेच मला ऊर्जा मिळाली. ८३ वर्षांची झाले; पण आजही ३८ वर्षांची वाटते. तुम्ही प्रेम करता म्हणून मी उभी आहे. तुमचे प्रेम कमी झाले तर मी उभी राहू शकणार नाही,’ अशा भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.
पुणे भारत गायन समाजातर्फे भोसले यांना पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सन्मा‌नित करण्यात आले. त्या वेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधला. पं. हृदयनाथ मंगेशकर, पुणे भारत गायन समाजाच्या अध्यक्षा शैला दातार, प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके आदी या वेळी उपस्थित होते.
‘प्रत्येक कलाकार रसिकांच्या प्रेमावर उभा राहतो. प्रेम कमी झाले तर तो उभा राहणार नाही. मी १२०० मराठी गाणी गायली, आजही सलग तीन तास गाऊ शकते. लतादीदी आणि बाबांच्या कृपेमुळे हे शक्य आहे. पं. राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. कधी कधी आपण खरेच त्याच्या लायक आहोत का, असा प्रश्न पडतो. मी खरे बोलते. अनेकदा लोकांना ते आवडले नाही, पण आता मात्र ते लोकांना पटू लागले आहे. माझे प्रेम कुणाला कळले नाही, माझ्या मुलांना देखील कळले नाही; पण तुम्हा रसिकांना ते कळले असेल,’ असे सांगत भोसले यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ‘शूरा मी वंदिले...’ या गाण्याच्या ओळी गात त्यांनी रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली.
‘मंगेशकर आणि पुरंदरे ही आडनावे जरी वेगवेगळी असली, तरी कुटुंब एक आहे,’ असे सांगत बाबासाहेब पुरंदरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आशा जितकी खेळकर, थट्टेखोर आहे; तितकीच ती कडक देखील आहे. तिच्यावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे आणि ते मी लिहिणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या सहवासातून जो आनंद मिळाला, तो जन्मभर कमी होणार नाही,’ असे पुरंदरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शैला दातार आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images