Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बाफनांवर गुन्हा दाखल

$
0
0
बिबवेवाडी येथील स्मशानभूमी रस्त्यावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील पोर्चचा स्लॅब कोसळून ‌सात मजूर जखमी झाल्याप्रकरणी ललित मोतीलाल बाफना (वय ४५, रा. बिबवेवाडी ) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ कोटींचे सोने लुटणारे गजाआड

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तिघा सराफांना फसवून त्यांच्याकडील दोन कोटी रुपयांचे सोने नेणा-या मुंबईतील चौघांच्या टोळीला पुणे पोलिसांतच्या गुन्हे शाखेच्या ‘युनिट तीन’ने अटक केली. या आरोपींकडून सोने वितळवण्याच्या सामुग्रीसह अनेक यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. बनावट पासपोर्ट बनविण्यातही ही टोळी सराईत असून, पोलिसांनी काही पासपोर्टही जप्त केले आहेत.

'एअर इंडिया'ची पुणे-चेन्नई सेवा

$
0
0
‘एअर इंडिया’ने पुणे-चेन्नई अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सात नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे ‘एअर इंडिया’कडून कळवण्यात आले आहे.

जनआंदोलन म्हणजे 'नॅनोपॉलिटिक्स'

$
0
0
‘राजकीय सत्ताधीशांना आव्हान देऊ शकतो, ही जनआंदोलनातून उभी राहिलेली सर्वसामान्यांमधील जागृती म्हणजे नागरिकांचे ‘नॅनोपॉलिटिक्स’च आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी नागरिकत्वाची नवी व्याख्या केली.

गॅस ग्राहकांनी घेतला 'KYC'चा धसका

$
0
0
गॅस ग्राहकांनी केवायसी (नो युवर कस्टमर) फॉर्म भरून संबधित गॅस एजन्सीकडे देण्याचे ऑइल कपंन्यांनी बंधनकारक केले आहे. यामुळे शहरातील गॅस एजन्सीबाहेर केवायसी फॉर्म भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. नव्याने गॅस सिलिंडर कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांबरोबरच ज्यांच्याकडे दोन कनेक्शन असतील, अशा ग्राहकांनीच हे फॉर्म भरणे गरजेचे आहे.

डेंगीसाठी पुणे संवेदनशील नाही

$
0
0
पुण्याच्या विविध भागात डेंगीची लागण वाढत असली तरी ‘हाउस इंडेक्स’ (एचआय) हा दहा टक्क्यांपेक्षा कमी; तर ब्रॅट्यू इंडेक्सचे (बीआय) प्रमाण पन्नास टक्क्यांच्या आत आढळल्याने शहरातील कोणताही भाग डेंगीच्या दृष्टीने धोकादायक अथवा संवेदनशील नसल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

२४ तास पाणी हवे कशाला?

$
0
0
पुण्याला २४ तास पाणी हवे कशाला..., निवडणुकीत सगळेच आश्वासने देतात पण ती कोणीच पाळत नाही..... ! सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने केलेल्या घोषणेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदारांनी रविवारी पंचनामा केला.

पोलिसांनी घेतले जनआंदोलकांना ताब्यात

$
0
0
जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय संघटनेतर्फे सोमवारी ​प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी विभागीय कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र., सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह ८१ जणांना अटक केली.

कोर्टातून दुचाकी चोरणा-याला शिक्षा

$
0
0
शिवाजीनगर कोर्टाच्या पार्किंगमधून वकिलाची दुचाकी चोरणा-याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी हा निकाल दिला.

सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

$
0
0
सणासुदीच्या पहिल्याच रविवारी पोलिस असल्याच्या बतावणीने तीन महिलांची फसवणूक झाली असतानाच तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत.

‘भुरट्या’ पोलिसांचा सुळसुळाट

$
0
0
सणासुदीच्या दिवसांत ‘भुरट्या’ पोलिसांचा पुण्यात सुळसुळाट झाला आहे. या ‘भुरट्या’ पोलिसांनी रविवारच्या सुटीची संधी साधत सोलापूर रोड, ‘एनआयबीएम’ रोड आणि एरंडवणा पसिरात धुमाकूळ घालत तीन महिलांचे सुमारे साडे तीनलाख रुपयांचे दागिने हातचलाखीने पळविले आहे.

काँग्रेसची मोर्चेबांधणी

$
0
0
पुणे आणि खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी चालविली असून, पुन्हा सत्ता खेचून आणण्यासाठी काँग्रेसने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश कलमाडी दोन्ही बोर्डाचे पदाधिकारी आणि सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

स्थलांतर थांबविण्यासाठी शिक्षण संस्थानी पुढे यावे

$
0
0
शहराची लोकसंख्या वाढली, की शेतीचे पाणी शहराकडे वळवायचे आणि गरज नसताना अधिकचे पाणी आणि वीज मिळाल्याने शहरातील नागरिकांकडून त्याचा गैरवापर होत आहे. रोजगार आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठीच गावातून शहराकडे स्थलांतरीत होणा-या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे.

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्टो) प्राध्यापकांच्या निरनिराळ्या मागण्यांसाठी सोमवारी उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, उच्चशिक्षण संचालकच जागेवर नसल्याने मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी त्यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.

वेतन, अनुदान, पेन्शनसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

$
0
0
दिवाळीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यंदा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. किमान वेतन, सानुग्रह अनुदान आणि पेन्शन लागू करावी, या मागण्या संघटनेने लावून धरल्या आहेत.

सफाई कर्मचा-यांची अवस्था दयनीय

$
0
0
सफाई कर्मचा-यांच्या समस्यांकडे आजही राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे.

दिवाळीच्या शुभेच्छांना ‘ग्रिटींग्ज’चे कोंदण

$
0
0
शुभेच्छा आणि संदेशाची माध्यम आता भलेही एसएमएस, ईमेल अशी असतील मात्र भावनांना स्पर्श करणा-या चार लिखित ओळींचे महत्त्व काही वेगळेच. याचीच प्रचिती आता शहरातील गिफ्ट शॉपीजमध्ये येऊ लागली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्या-या आकर्षक ग्रिटींग्जनी दुकाने सजली असून त्याच्या खरेदीची सुरुवातही झाली आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा

$
0
0
सणावाराच्या दिवशीही कामात व्यस्त असणा-या पेपर विक्रेत्यांनी कौटुंबिक स्नेहमेळाव्यात दिवाळीच्या सणाचा आनंद अनुभविला. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या कोथरूड शाखेतर्फे आशिष गार्डन मंगल कार्यालयात हा मेळावा आणि दिवाळी भेट वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

अंगडिया कुरिअरमध्ये गोळीबार करणारा जेरबंद

$
0
0
दोन वर्षांपूर्वी रविवार पेठेतील अंगडिया कुरिअरच्या ऑफीसमध्ये गोळीबार करत रक्कम लुटणा-या एका दरोडेखोराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली.

‘शहरीकरणाच्या आव्हानांकडे विशेष लक्ष हवे’

$
0
0
‘वाढत्या शहरीकरणामुळे येणा-या काळात नवीन आव्हाने निर्माण होणार असून पर्यावरण, कचरा तसेच सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या एकमेव क्षेत्रात दोन लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असलेल्या पुणे शहरात स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर (सेक्स रेशो) मात्र अत्यंत कमी आहे,’ असे निरीक्षण तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांनी नोंदवले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images