Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्याचा दीडशे वर्षांचा पट उलगडणार

$
0
0

साहित्य संस्कृती मंडळाचा अभिनव उपक्रम; दोन वर्षांत साकारणार

Aditya.Tanwade@timesgroup.com

पुणे : गेल्या दीडशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या वाङ्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक तसेच शैक्षणिक घटनांचा आढावा घेणारा प्रकल्प राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळातर्फे हाती घेण्यात आला आहे. १५० वर्षांच्या कालखंडात राज्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा एकत्रित लेखाजोखा 'आधुनिक महाराष्ट्राचा अन्वेषणात्मक कालपट ' या प्रकल्पाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे.
मराठी संशोधन मंडळाचे संचालक प्रदीप कर्णिक या प्रकल्पावर काम करीत आहेत. १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक, सामाजिक चळवळींनी वेग धरला होता. याच चळवळींनी राज्याला अनेक विचारवंत दिले. याच कालखंडात घडलेल्या घटनांनी राज्याची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती देखील बदलली. या सर्व घटनांचा एकत्रिकपणे वेध घेता यावा, यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.

'साधारणतः इसवी सन १८००च्या सुरुवातीला मराठ्यांचे साम्राज्य लयाला जाऊन इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांकडून नवे कायदे अंमलात आणले जाऊ लागले. त्यांनी अनेक रूढी-परंपरा बंद केल्या. १८५७मध्ये इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड उभे राहिले. याच दरम्यान मद्रास आणि मुंबई विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. विधवा विवाहासंदर्भात बाबा पद्मजी यांनी पुस्तक लिहून समाजाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येक घटनेने महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली आणि तिचा विकास होत गेला. महात्मा फुले, महादेव गोविंद रानडे यांच्या सारखे विचारवंत तयार झाले. त्यांनी देखील चळवळींच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत बदल घडवून आणला. त्यानंतर इंग्रजांनी आणलेल्या रेल्वे आणि अन्य दळणवळणाच्या साधनांनी सामाजिक देवाणघेवाणीला सुरुवात झाली. या सर्व घटना विचारवंतांच्या आत्मचरित्रात आणि इतिहासाच्या पुस्तकात अडकून पडल्या आहेत. त्या घटनांचा एकत्रित आढावा घेण्यात आलेला नाही, त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राच्या अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरणारा असणार आहे, अशी माहिती कर्णिक यांनी दिली.

याच कालखंडात साहित्य आणि वाङ्मयीन संस्कृतीमध्ये झालेल्या बदलांचा देखील आढावा प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रिंटिंग प्रेसचा झालेला विकास त्याच्या फाँटमध्ये होणारे बदल काळाप्रमाणे बदलत जाणारे साहित्य आणि त्याच्या पद्धती याचा कालपट सामान्यांसमोर येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास संशोधकांनी सुरू केला आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
..
पेशवाईचा अस्त झाल्यापासून ते भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा १५० वर्षांचा काळ आणि त्यातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय घटनांचा वेध एकत्रित करून त्यातील विकासाचे टप्पे उलगडून सांगणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. इंग्रज राजवटीत झालेला विकास, त्यापूर्वीचा महाराष्ट्र आणि देशाला मिळालेले स्वातंत्र्य, मुंबईचा उदय, अन्य भागाचे शहरीकरण असे अनेक पैलू या प्रकल्पाच्या माध्यमातून एकत्रितपणे उलगडणार आहेत- प्रदीप कर्णिक, संचालक, मराठी संशोधन मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आंबेडकर भवनासाठी सरकारी मदत नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील आंबेडकर भवन पुन्हा उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याची तयारी दर्शवली, याचे स्वागत आहे. मात्र, या निधीऐवजी श्रमदान आणि लोकवर्गणीतून हे भवन उभारले जाईल', असे जाहीर करून भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारी मदत नाकारली.

आंबेडकर भवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी आराखडा दिल्यास सरकार सगळा निधी देण्यास तयार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी ​विधान परिषदेत केली. या पार्श्वभूमीवर खासदार आंबेडकर यांनी ही मदत नाकारत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, 'आंबेडकर भवनासाठी लोकांच्या करातून जमा झालेला निधी वापरणे योग्य नाही. त्याऐवजी श्रमदान आणि लोक वर्गणीतून हे भवन उभारले जाईल. हे लोकांचे प्रेरणास्थान असल्याने सरकारने निधी द्यावा, अशी परिस्थिती येणार नाही. लोकांच्या सहभागातूनच हे भवन उभे राहील.' 'या प्रकरणात पोलिसांनी एफआरआय दाखल करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे संबंधितांची चौकशी​ झाली पाहिजे. हे भवन रात्री दोन वाजता पाडण्यात आले. त्यासाठी पोलिस बंदोबस्त न घेता बाउन्सर वापरले गेले. बुलडोजरने वास्तू पाडण्यात आली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात राज्य सरकारही धुतल्या तांदळासारखे नाही', असे आरोप आंबेडकर यांनी केले.

कोपर्डीला जाण्यास मनाई 'कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून प्रकरणानंतर संबंधित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार होतो. मात्र, नगरच्या पोलिस अधीक्षकांनी या ठिकाणी जाण्यास मनाई असल्याचे सांगितले. या गावातील एका स्थानिक नेत्याने १२ जणांची बैठक घेऊन मी त्या ठिकाणी गेल्यावर कांदे, बटाटे, अंडी आणि टॉमेटो मारण्याची तयारी केली असल्याचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर दंगल घडवून त्याचा लाभ घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. 'त्या' नेत्याकडून राजकारण करण्यात येत आहे. त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढारपण करण्यासाठी त्याने ही तयारी केली होती. त्यामुळे कोपर्डी येथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांनी संबंधित कुटुंबीयांना भेटणार आहे', असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 'त्या' नेत्याचे नाव उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 'साक्षीदार पुढे येऊ नयेत, यासाठी वातावरण तयार करण्यात येत आहे. भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे', असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

'शरद पवारांनी आवाहन करावे' 'राजकारण्यांवर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. अशी माणसे थोडीच आहेत', असे सांगत आंबेडकर म्हणाले, 'कोपर्डी येथील प्रकरणाचे राजकारण करण्यात येऊ नये. या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शांतता राखण्याचे आवाहन करावे.'

भाजपने अराजकता माजवू नये! अत्याचाराच्या घटना वाढत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती दिली आहे. यावर आंबेडकर म्हणाले, 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाच्या विचारधारेपासून दूर राहिले पाहिजे. गुजरात आणि उत्तर प्रदेशातील घटना पाहिल्यास भाजपकडून अराजकता माजवण्यात येत असल्याचे दिसते. भाजपने सत्ता करावी, अराजकता माजवू नये', असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड रोडवर घसरगुंडी

$
0
0

दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात अनेक वाहनचालक पडले

म. टा. प्रतिनिधी, पुणे सर्वाधिक वर्दळीच्या सिंहगड रोडवर वाहनचालकांच्या कसरतीत आणखी भर पडली आहे. दोन ठिकाणी पावसाळी घसरगुंड्यांची 'व्यवस्था' झाल्याने रोज रात्री नागरिक दुचाकीसह घसरून पडत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरणारी ही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नसल्याने अशा जागांना वाहनचालक 'घसरगुंडी स्पॉट' म्हणून ओळखत आहेत.

पहिली जागा आहे जनता वसाहत ओलांडून पुढे गेल्यावर पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी भरण्यासाठी थांबणाऱ्या ट्रकचा परिसर आणि दुसरी जागा आहे राजाराम पुलावर झालेली स्वयंघोषित भाजीमंडई. एकीकडे राडारोडा, तर दुसरीकडे भाज्यांच्या ओल्या कचऱ्याहून जाताना दुचाकीस्वारांची घसरगुंडी होते आहे.

पर्यायी व्यवस्था नसल्याने सिंहगड रोडवरील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. त्यातच आता अतिक्रमणे आणि इतर अडचणींचीही भर पडली आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून टँकर पाणी भरून बाहेर पडल्यावर त्यातून होणारी पाणीगळती, पाऊस यामुळे चिखल रस्त्याच्या कडेला जमतो. त्यावरून अनेकजण घसरत आहेत. दांडेकर पुलपासून पुढे जाताना जलशुद्धीकरण केंद्राची रस्त्याकडची बाजू थेट पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत चिखलाने माखलेली असल्याने वाहनचालकांची इथे तारांबळ होते. वाहनचालक घसरून पडण्याच्या घटना जवळपास रोजच या भागात घडत आहेत.

राजाराम पुलाच्या परिसरातही वाहनचालकांची कसरत ठरलेली आहे. इथल्या भाजीमंडईचा आणि इतर कचरा रस्त्यावरच पडतो. पावसाच्या पाण्याने या कचऱ्यावरून वाहनचालक घसरून पडण्याच्या घटना गेल्या दोन आठवडे घडत आहेत. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ दुचाकी घसरून पडलेले विक्रम गायकवाड याबाबत म्हणाले, 'हलका पाऊस पडत होता. देशपांडे उद्यानाजवळ असताना एक महिला दुचाकीस्वार आणि इतर दोघे पडलेले दिसले. माझ्या गाडीचा वेग कमी होता. त्यांना मदत करण्यासाठी मी जात असताना मीही घसरून पडलो. दोन्ही गुडघे फुटले, शर्ट फाटला. असाचा अनुभव अनेकांनी घेतला. या भागात नेहमीच रस्त्याच्या बाजूला राडारोडा पडलेला असल्याने असे प्रकार घडतात.'

सिंहगड रोडवर पडलेल्या व्यक्तींशी संकेत गुजर या युवकाने संवादही साधला, तसेच या भागातली छायाचित्रे काढून 'मटा'कडे पाठवली आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी या धोकादायक घसरगुंडीपासून जपावे, असा संदेश त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली आहे.

फायरब्रिगेड, पोलिसांचे कानावर हात वर

सिंहगड रोडवर नागरिक दररोज घसरून पडत असल्याचे कळल्यावर गुरुवार आणि शुक्रवारी फायरब्रिगेड आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, राडारोडा आणि कचऱ्यामुळे होणारी घाण साफ करणे हे आमचे काम नाही, असा पवित्रा घेत दोन्ही व्यवस्थांनी हात वर केले. त्यामुळे नागरिकांना असणारा धोका कायम आहे. नागरिक आणि पोलिस, तसेच फायरब्रिगेड यांच्यातल्या संवादाचे रेकॉर्डिंग स्थानिक युवकांनी केले असून त्यात फायरब्रिगेडनेही ही जबाबदारी नाकारल्याचे, तसेच पोलिसांनी आम्ही काही करू शकत नसल्याचे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेक्स रॅकेट प्रकरणी सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे चंदननगर परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आसामी एजंटला तीन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

मित्रा उर्फ पुडके भीमबहाद्दूर छत्री (वय २५ रा. रोहितमला सोसायटी, विमाननगर, मूळ रा. आसाम) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शीतल दयानंद भालेकर यांनी चंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या वेळी एका २५ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली होती. सरकारी वकील वामन कोळी यांनी या केसचे कामकाज पाहिले.

पीडित महिला मुळ पश्चिम बंगाल येथील राहणारी असून तिचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. लहानपणी आई-वडीलांचे निधन झाल्याने तिचा सांभाळ तिच्या चुलता-चुलतींनी केला. नंतर तिचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर पती बरोबर ठाणे येथे आली. तिला दोन मुले असून तिला त्याने सोडून दिले होते. त्यानंतर कपड्याच्या कंपनीत काही दिवस काम केल्यानंतर उपजीव‌िका भागत नसल्यामुळे ती स्वतःहून या व्यवसायात आली होती.

ठाणे येथे शरीरविक्रय करीत असताना एका दलालाने पुण्यात चांगले पैसे मिळतील यासाठी तिला आरोपी मित्रा छत्रीकडे दिले. चंदननगर परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची खबर सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यांनी बनावट ग्राहक पाठवून हे रॅकेट उद्‍‍ध्वस्त करून पीड‌ित महिलेची सुटका केली होती. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. सहा ऑक्टोबर २०१५ रोजी मुंढवा-चंदननगर खराडी बायपास येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी छत्रीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (पीटा) गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र दाखल करण्यात आले.

'अनैतिक मानवी वाहतूक हा समाजाला लागलेला कलंक आहे. हा गुन्हा मानवी अधिकाराचे स्पष्टपणे उल्लंघन करणारा आहे. आरोपीला सोडल्यास चुकीचा संदेश समाजामध्ये पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा द्यावी,' असा युक्त‌िवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी कोर्टात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीच्या परीक्षेत डमी विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस भरतीमध्ये उमेदवाराच्या जागेवर दुसऱ्याच विद्यार्थ्यांने परिक्षा दिल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून बिजुसिंग धरमसिंग गुसिंग (चेस्ट क्रमांक १८५४०) याच्यासह डमी उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात एप्रिल महिन्यात पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये बिजुसिंग याने लेखी परीक्षेसाठी त्याचा डमी विद्यार्थी बसविला होता. बिजुसिंग हा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याची पुन्हा एकदा तपासणी केली जात होती. त्यामध्ये दुसऱ्यानेच लेखी पेपर दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जी. एम. बनसोडे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट कार्डधारकांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे क्रेडिट, डेबिट कार्डधारकांना फोन करत वेगवेगळ्या बहाण्यांनी त्यांच्या अकाउंटवर डल्ला मारणाऱ्या दिल्लीतील ठकांची आणखी एक टोळी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने उद्ध्वस्त केली. या प्रकरणी तिघा ठकांना गजाआड करत दिल्लीतून पुण्यात आणण्यात आले आहे. पारस निरंजनलाल (वय १९, रा. नवी दिल्ली) आणि अमित सुभाष कुमार (वय २२, रा. नवी दिल्ली), मुधर सुशीलकुमार मनचंदा (वय ३०, जनकपुरी, नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी नवीन क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने कोथरूड येथील एका महिलेला फसवले होते. आरोपींनी महिलेच्या क्रेडिट कार्डवरून 'अॅपल ६-एस' हा फोन स्नॅपडिलवरून खरेदी केला होता. पोलिसांनी मोबाइल आणि खरेदीच्या पावत्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती सायबर शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. आरोपींनी तक्रारदार महिलेला फोन करत त्यांना बँकेतून बोलत असल्याचा बहाणा केला होता. नवीन क्रेडिट बदलून देण्यासाठी; तसेच क्रेडिट कार्डवर पॉइंट जमा करण्यासाठी त्यांनी कार्डची गोपनीय माहिती मागितली. तक्रारदार महिलेने आरोपींना कार्ड नंबर, व्हॅलिडिटीची मुदत, 'सीव्हीही' नंबरची माहिती दिली. आरोपींनी या माहितीच्या आधारे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा 'अॅपल ६-एस' हा फोन खरेदी केला. तसा मेसेज तक्रारदारांना मोबाइलवर आला. त्यांनी तत्काळ आपले कार्ड ब्लॉक केले आणि या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर सेलकडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत असताना त्यांनी स्नॅपडिलकडून तत्काळ माहिती मागवली आणि एक पथक दिल्ली येथे रवाना केले. या वेळी तपासात मोबाइल विक्रेता दुकानाचा मालक, एजंट आणि फसवणुकीचे कॉल सेंटर चालवणारे यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे समजले. त्यानुसार तिघांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना पुण्यात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. व​रिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, दीपक लगड, सहायक निरीक्षक संजय ठेंगे, फौजदार नितीन म्हस्के, कर्मचारी किरण अब्दागिरे, अजित कुऱ्हे, बाळासाहेब कराळे, अमित अवचरे, अस्लम आत्तार, मोहन साळवी, राजुकमार बाब आदींचा तपास पथकात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याची तक्रार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, खडकी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सफाई काम करणाऱ्या ठेकेदाराकडून त्याच्याकडे काम करणाऱ्या पन्नास कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार दिला नसल्याची तक्रार सफाई कर्मचाऱ्यांनी बोर्डाकडे केली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. खडकी कॅँटोन्मेंट बोर्डामध्ये ग्लोबल एंटरप्रायजेस या नावे असलेल्या ठेकेदारामार्फत पन्नास कामगार सफाईसाठी काम करत आहेत. मात्र, या ठेकेदाराने त्यांच्याकडे काम करत असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची तक्रार बोर्डाकडे केली आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीमध्ये ठेकेदाराने पगार न दिल्यामुळे वेळेवर पैसे भरता आले नसल्याने तिच्या मुलाला हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही. तर, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची फी न भरल्याने शाळेने नोटीस दिली असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. कँटोन्मेंटमध्ये ग्लोबल एंटरप्रायजेसचे पन्नास सफाई कर्मचारी दिवसासाठी, शुभम एंटरप्रायजेसचे २० सफाई कर्मचारी रात्रपाळीत, समर्थचे २० कर्मचारी हाॅस्पिटलमध्ये साफसफाईसाठी; तर मेहता एंटरप्रायजेसचे २० कर्मचारी शाळाच्या साफसफाईसाठी काम करतात. तसेच, रिलायन्स एंटप्रायजेसचे ५२ कर्मचारी साफसफाईच्या कामासाठी काम करतात. या घटनेमुळे बोर्डाच्या ठेकेदारांकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची पिळवणूक होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बोर्डात काम करणाऱ्या सर्वच ठेकेदारांच्या काम करण्याच्या पद्धतीची चौकशी करण्याची वेळ आली असल्याची चर्चा बोर्डात होती. या सर्व प्रकाराची तक्रार बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच, या ठेकेदाराला यापूर्वी योग्य प्रकारे काम न केल्याबद्दल दंड करण्यात आले असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी महिलेकडून सापडलेले पाकीट परत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, खडकी खडकी कँटोन्मेंट बोर्डामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या महिलेला काम करताना सापडलेले पाकीट पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्ष्मी पोपट बिवाल (वय ५५, रा. सुरती मोहल्ला, खडकी) असे या महिलेचे नाव असून, पाकिटामध्ये ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दहा हजार रुपये, क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड आदी वस्तू होत्या. हे पाकीट खडकीत राहणाऱ्या संदीप शिवाजी मॅकल (३२) यांचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाई कर्मचारी बिवाल या बुधवारी (२० जुलै) सकाळी सहा वाजता रस्ता सफाई काम करत असताना, धोबीगल्ली, मित्र मंडळ या ठिकाणी त्यांना एक पाकीट सापटले. या घटनेची माहिती बिवाल यांनी काही ओळखीच्या नागरिकांना दिली. तसेच, त्यांच्या मदतीने त्यांनी ते पाकीट खडकी पोलिस ठाण्यामध्ये जमा केले. पोलिसांनी पाकिटातील कागदपत्रांच्या साह्याने खडकीत राहणाऱ्या मॅकल यांना बोलावून घेतले. तसेच, सापडलेले पाकीट त्यांचेच आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतर त्यांना ते परत करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुहास भोसले, खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे, शिवसेनेचे शिवाजी पवार, शिवराम मदने, पोपट बिवाल, विजय बिवाल यांच्या उपस्थितीत बिवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मीडियावरही झळकली हेल्मेटसक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही' या परिवहन मंत्र्यांनी गुरुवारी विधिमंडळात केलेल्या घोषणेला सर्व स्तरातून तीव्र विरोध करण्यात येत आहे. त्याचाच परिणाम सोशल मीडिया, विशेषतः व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या मेसेजेसवर झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळपासूनच हेल्मेटसक्तीविरोधात मेसेज फिरत होते. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी करणाऱ्या सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीने अन्य उपाययोजनांकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधिमंडळात हेल्मेट नसेल तर पेट्रोल दिले जाणार नाही अशी घोषणा केली. त्याचे वृत्त राज्यभरात पोहोचल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर हेल्मेटसक्तीविरोधी मेसेज फिरण्यास सुरुवात झाली. शुक्रवारची सकाळही त्याच मेसेजने उजाडली. प्रत्येकास आपला जीव प्रिय असतो. प्रवासी हेल्मेट न घालून आपला जीव धोक्यात नक्कीच टाकणार नाहीत. त्यामुळे विनाकारण हेल्मेटसक्ती करून सरसकट त्रास देण्याचा मोह टाळा सरकारने टाळावा. दुचाकीचे बहुसंख्य अपघात खराब रस्ते, अचानक नजरेत न आलेले स्पीडब्रेकर आणि खड्डे यांमुळे होतात, हे सरकारने लक्षात घ्यावे. कायदा हा सामान्य नागरिकांसाठीच असतो का, कायद्याचा बडगा केव्हाही सामान्यांवरच का उगारला जातो, असे प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केले. प्रत्येक वेळी मऊ ते चेपवा, असे गृहीत धरून सामान्य नागरिकांवरच कायदे लादण्याच्या हव्यासाचा मोह टाळा, असे मेसेजही सोशल मीडियावर फिरत होते.
शहरात फिरताना दुचाकींचा वेग ताशी २० ते ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसतो, त्यामुळे हेल्मेटची गरजच काय असा सवालही उपस्थित करण्यात आला.
..
व्हॉट्सअॅपवरील मेसेज
हेल्मेटसक्ती करताय तर
ज्या रस्त्यांमुळे हे अपघात होतात..
त्यांच्या चांगल्या दर्जाचीसुद्धा
सक्ती करा...
..
हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही
मग रस्त्यावर खड्डा दिसला,
तर संबंधित अधिकाऱ्याला पगार पण नाही..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोगापेक्षा उपचार भयंकर

$
0
0

रावतेंच्या निर्णयावर सर्वपक्षीय टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही', या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या निर्णयावर शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कडक शब्दात टीका केली आहे. रावते यांची घोषणा म्हणजे रोगापेक्षा उपचार भयंकर असून, हा निर्णय सर्वसामान्य जनता आणि पेट्रोल पंप चालक या दोघांना वेठीस धरणारा आहे. पेट्रोलपंपचालक हेल्मेट असणाऱ्या वाहन चालकाच पेट्रोल देत आहे का, हे कसे ठरवणार, तशी यंत्रणा कोण उभी करणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी हेल्मेट घातले पाहिजे, हे योग्य असले तरी हेल्मेटशिवाय पेट्रोल द्यायचे नाही, यामागील नेमका तर्क काय, हेल्मेटशिवाय पेट्रोल देऊ नये, असे बंधन पंपचालकांवर घालण्याचे कारण काय असा प्रश्न राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी उपस्थित केला. सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असले तरी अशा चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणे मूर्खपणाचे असल्याची टीका चव्हाण यांनी केली. मोटारवाहन कायद्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणे शक्य असताना परिवहनमंत्री वारंवार हेल्मेट मधेच का 'डोकं' घालत आहेत, अशी शंका निर्माण होत आहे. पेट्रोलपंपचालक हेल्मेट असणाऱ्या वाहन चालकाच पेट्रोल देत आहेत का हे कसे पाहिले जाणार आहे, यासाठीची यंत्रणा कोण उभी करणार, अशा शब्दात मनसेचे शहाराध्यक्ष हेमंत संभूस यांनी रावते यांच्या घोषणेवर टीका केली. शहरातील पेट्रोलपंपचालकांनी हा निर्णय झुगारून द्यावा. राज्य सरकारने अशाच पद्धतीने चुकीचे निर्णय नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले पक्षाच्या शिबिरात व्यग्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक छळाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

$
0
0

माजी अधिसभा सदस्याचा विद्यापीठावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन लैंगिक छळाच्या तक्रारींविरोधात कठोर पावले उचलत नसल्याचा आरोप विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. अतुल बागुल यांनी केला आहे. माहिती अधिकारानुसार हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींना एकप्रकारे चालनाच मिळत असल्याचा आक्षेपही डॉ. बागुल यांनी घेतला आहे.
विद्यापीठाच्या मुख्य आवारात २०१३ ते २०१६ या दरम्यान घडलेल्या घटनांच्या संदर्भाने डॉ. बागुल यांनी विद्यापीठाकडे माहिती अधिकारात काही माहिती मागविली होती. त्यातून समोर आलेल्या तथ्थ्यांच्या आधारे ही बाब जाणवत असल्याचे डॉ. बागुल यांचे म्हणणे आहे. 'महिला आणि विद्यार्थिनींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलणे अपेक्षित आहे. अशा तक्रारी समोर आल्यास, त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करणेही अपेक्षित आहे. मात्र, या दोन्ही बाबतीत विद्यापीठ प्रशासन उदासीन दिसते. विद्यापीठाचे आवार मुली आ​णि महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती विद्यापीठाला देता आलेली नाही. महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने कॉलेज पातळीवर कार्यशाळा आयोजित करण्याविषयी सूचना केल्या असल्या, तरी विद्यापीठातील विभागांमध्ये अशा कार्यशाळा झाल्याच नसल्याचे माहिती अधिकारातील माहिती स्पष्ट झाले आहे,' अशी माहिती डॉ. बागुल यांनी दिली.
विद्यापीठाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या होस्टेल्सवर स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या असल्या, तरी महिला कर्मचाऱ्यांसाठी मात्र अशा कार्यशाळा झाल्या नसल्याचेही या माहितीतून समोर आल्याचे डॉ. बागुल म्हणाले.
..
'बैठकांत सातत्य नाही'
लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित तक्रारींवर कारवाई विद्यापीठामध्ये समिती स्थापन होणे गरजेचे आहे. मात्र, माहिती अधिकारातील माहितीनुसार या समितीच्या बैठकांमध्ये सातत्य नाही. या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्ती गेल्या काही काळात तीन वेळा बदलल्याचेही समोर येत आहे. अशा प्रकारांमधील तक्रारदार महिलांना पोलिसांकडे तक्रार द्यायची असल्यास, कायद्यानुसार विद्यापीठाने त्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी विद्यापीठाने नेमके काय केले, याची कोणतीही माहिती विद्यापीठाकडे नसल्याचेही माहिती अधिकारातून उघड झाल्याचे डॉ. बागुल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगाव मूळ येथे तरुणाचा निर्घृण खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून कोरेगाव मूळ येथील ३२ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश उर्फ दादा अशोक लोंढे (रा. कोरेगाव मूळ) असे खून झालेल्याचे नाव आहे.
नागेश पत्नी प्रियंका (वय ३०) हिने दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक केली आहे. मच्छिंद्र संजय मोरे, प्रीतम चंद्रकांत शितोळे, किरण उर्फ नंदू मुरकुटे, दीपक दत्तात्रय घटमाळे, सचिन भोरडे, महेश किसन मगदडे, बाळू घटमाळे, निखिल गजानन मदगडे (सर्व रा. कोरेगाव मूळ) अशी आरोपींची नावे आहेत. नागेश आणि प्रियंका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्याला प्रियंकाचे मामा संजय मोरे आणि त्यांच्या मुलाचा विरोध होता. त्यातून त्यांच्यात वाद झडत होते. आरोपींनी नागेश याला गुरुवारी जेवण करण्यासाठी घरी बोलावले. मात्र, जेवण करून तो घरी न परतल्याने प्रियंकाने भावाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी नागेश त्याच्या कारमध्ये चालकाच्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून करण्यात आला.
या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपींच्या वाहनांची, घराची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जय जाधव आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना गजांआड करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या जागेची घोषणा हवेतच विरली

$
0
0

'एएआय'च्या पथकाचीही पाठ म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची जागा एक महिन्यात निश्चित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली आहे. विमानतळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या (एएआय) पथकानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या 'टेक ऑफ'चा मुहूर्त आणखी लांबणीवर गेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अमेरिकन कंपन्यांचे प्रतिनिधी व राज्य शासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची राउंड टेबल मीटिंग चाकणमध्ये मागील महिन्यात (२२ जून) झाली. या बैठकीमध्ये पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा निश्चित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. इतकेच नव्हे, तर बैठकीनंतरच्या पुढील आठवड्यात एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाचे पथक विमानतळाच्या जागेची पाहणी करेल आणि त्यानंतरच्या तीन आठवड्यांत विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विमानतळाची जागा निश्चित होणार आणि विमानतळाच्या कामाला गती येणार अशी आशा पल्लवीत झाली होती. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या पथकाने जागा पाहणीसाठी वेळ निश्चित केली होती. परंतु खेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने या पथकाने पाहणी रद्द केली. त्यानंतर विमानतळाच्या जागेची पाहणी केव्हा करणार याबाबतचा कोणताही संपर्क एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाकडून करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी विमानतळाची जागा महिन्यात निश्चित करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी तीन-चार जागांचे पर्याय निवडण्यात आले आहेत. विमानतळासाठी सुरूवातीला चाकणची निवड करण्यात आली होती. परंतु या जागेला स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यामुळे विमानतळ येथून पाईटकडे नेण्यात आला. त्यानंतर खेडच्या 'सेझ'च्या जमिनीची पाहणी विमानतळ उभारणीसाठी झाली. सेझसह निमगाव, दावडी, केंदूर व कन्हेरसर या चार गावांची जागा त्यासाठी निश्चित केली गेली. मात्र, या जागेलाही विरोध झाला. या विरोधामुळे खेडमधीलच कोये-पाईट-केंदूर-पाबळ, रौंदळवाडी येथील जमिनीचा प्रस्ताव करण्यात आला. एअरपोर्ट अॅथोरिटीने विमानतळासाठी या जागेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा सन २००७ मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर आजतागायत जागानिश्चितीमध्येच विमानतळाचे घोडे अडले आहे. मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या उभारणीत वैयक्तिक लक्ष घालू असेही आश्वासन दिले होते. मात्र त्याचीही पूर्तता झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळप्रसंगी पेट्रोल पंप बंद करू

$
0
0

पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हेल्मेट नसल्यास पेट्रोल नाही, या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्यच नाही. वेळप्रसंगी सर्व पेट्रोलपंप बंद ठेवून आंदोलन करू असा इशारा पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे. असोसिएशनच्या सदस्यांशी चर्चा करून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रवक्ते अली दारूवाला यांनी शुक्रवारी सांगितले.
हेल्मेट नसेल तर दुचाकीचालकांना पेट्रोल न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. 'हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याचे काम पेट्रोल पंपचालकांवर टाकण्याऐवजी जनजागृती करण्याची अथवा अन्य पर्याय शोधण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोलपंप चालकांवर कारवाई केली जाणार असेल, तर ही आमच्यासाठी चिंताजनक बाब आहे. यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होईल,' असे दारूवाला यांनी सांगितले.
पुणेकरांनी यापूर्वी सातत्याने हेल्मेटसक्तीला विरोध केला आहे. त्यामुळे या निर्णयाचे ते किती पालन करतील हे माहीत नाही. बाटलीमध्ये पेट्रोल दिले जात नाही, म्हणून पेट्रोल पंपावर वाद घातले जातात. हेल्मेट न घालता, गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वाह चालकांना पेट्रोलसाठी नाही म्हटल्यास काय परिस्थिती निर्माहा होईल, याची कल्पनाच करवत नाही. त्याचे जे काही पडसाद उमटतील त्याची जबाबदारी सरकार घेणार का, असा प्रश्न पेट्रोल पंपचालकांनी उपस्थित केला आहे.
व्यावसायामुळे पंपचालकांना या नियमाची अंमलबजावणी करणे शक्य नाही. भविष्यात वाहन चालविण्याचा परवाना, पीयूसी नसलेल्या आणि मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या व्यक्तींची तपासणी केल्याशिवाय पेट्रोल द्यायचे नाही, असाही निर्णय घेतला जाऊ शकतो. पंपचालकांनी पेट्रोल विक्री सोडून नियमांची अंमलबजावणी करायची का असाही प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी अध्यक्षाबाबत निर्णय कधी होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहराच्या मेट्रोला महिन्याभरात मंजुरी देण्याचे आश्वासन पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच, आता पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पूर्ण वेळ अध्यक्ष देण्याबाबत तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची आजवर दिलेली सर्व आश्वासने निव्वळ 'फुसका बार' ठरली असल्याने पुणेकरांसाठी युती सरकारही अकार्यक्षम ठरत असल्याची भावना बळावत चालली आहे. पुण्याच्या मेट्रोला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी वेळोवेळी पुण्यात दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात १३ मे रोजी झालेल्या बैठकीत जूनमध्ये मेट्रोला मान्यता दिली जाईल, असे संकेत त्यांनी दिले होते. आता जुलै संपत आला, तरीही पुणे मेट्रो प्रकल्प अद्याप अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेमध्येच आहे. मेट्रोसह शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्‍यांनी दिली होती. दुर्दैवाने मुख्यमंत्र्‍यांनीच पीएमपीच्या अध्यक्षपदावरून अभिषेक कृष्णा यांची अवघ्या १३ महिन्यांत बदली केली. गेल्या १५ दिवसांपासून ही जागा रिक्तच असून, पूर्णवेळ अधिकारी केव्हा देणार, अशी विचारणा केली जात आहे. पीएमपीच्या मिळकतींना अडीच एफएसआय देण्याबाबतही सरकारी स्तरावर अद्याप विचारमंथनच सुरू आहे. शहराचा विकास आराखडा गेल्या अनेक महिन्यांपासून सरकार दरबारी प्रलंबित आहे. तो मान्यतेच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले होते. मात्र, तो अंतिम करण्यातही चालढकल केली जात आहे. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी हा आराखडा जाहीर केल्यास आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी गतीने होऊ शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शहराचे प्रलंबित प्रश्न गतीने सोडवले जातील, अशी भूमिका फडणवीस यांनी सुरुवातीपासून घेतली होती. मात्र, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाशिवाय (पीएमआरडीए) इतर प्रकल्पांना अपेक्षित गती मिळू शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वाधिक खर्च बाकड्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्थानिक स्तरावरील समस्या सोडविण्यास प्राधान्य देत असल्याचा दावा सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केला जात असला, तरी बाकडी बसविण्यालाच प्राधान्य दिले जात असल्याचे 'परिवर्तन' या संस्थेने केलेल्या पाहणीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. पालिकेतील १५२ पैकी जवळपास १४० नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत 'बाकड्यां'वर ११ कोटी रुपये खर्च केले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवून विकासकामांवर सर्वाधिक खर्च केला जात असल्याचा दावा सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केला जातो. परंतु, विकासकामांपेक्षा बाकडी बसविणे, हेच बहुतेक नगरसेवकांचे 'कर्म' राहिले असल्याचे ही आकडेवारी सांगते. नगरसेवकांकडून प्राधान्य मिळालेल्या पाच प्रमुख कामांमध्येही बाकडी बसविण्यालाच सर्वाधिक पसंती मिळाली असून, त्यासाठी १० कोटी ९८ लाख रुपये खर्च केले गेले आहेत. त्यापाठोपाठ, ड्रेनेजलाइनसाठी (८ कोटी), रस्ते काँक्रिटीकरण (६ कोटी) या कामांना प्राधान्य मिळाल्याचे दिसून येते. परिवर्तन संस्थेने चार वर्षांत नगरसेवकांनी विकास कामांसाठी किती खर्च केला, सर्वसाधारण सभेत किती प्रश्न उपस्थित केले, मुख्य सभेची उपस्थिती आणि त्यांच्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे, अशा चार प्रमुख विषयांनुरूप माहिती गोळा केली. गेल्या मार्चपासून हे माहिती संकलनाचे काम सुरू होते, असे संस्थेचे अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी सांगितले. महापालिकेच्या विविध विभागांसह १५ क्षेत्रीय कार्यालयांमधून माहिती अधिकारात माहिती मागवून संस्थेने विविध निष्कर्ष‍ काढले असल्याचे कानिटकर यांनी नमूद केले. संस्थेने तयार केलेल्या प्रगतीपुस्तकाची माहिती प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला देण्यात आली असून, प्रत्येक पक्षासमोर या माहितीचे सादरीकरण करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, सर्व माहिती वेबसाइटवर टाकण्यात आली असून, सर्वांसाठी ती खुली असेल.

गुन्हे दाखल असणाऱ्या नगरसेवकांची संख्या मनसे- १५ काँग्रेस - १४ राष्ट्रवादी - १४ भाजप - १२ शिवसेना - ५ रिपाइं - १ (१५२ पैकी ६१ नगरसेवकांवर गुन्हे दाखल)



खर्चाचा तपशील वॉर्डस्तरीय निधीतून सर्व नगरसेवकांनी केलेला खर्च - ५९ कोटी ९४ लाख १५ हजार प्रत्येक नगरसेवकाने केलेला सरासरी खर्च - सुमारे ४० लाख पथदिव्यांवर झालेला खर्च - ५ कोटी ४७ लाख दिशादर्शक फलक, नामफलकांवरील खर्च - ४ कोटी ३१ लाख

सोशल ऑडिटही हवे कागदावरील माहितीप्रमाणेच संबंधित नगरसेवकांचे सोशल ऑडिट होणे गरजेचे असल्याचे मत संस्थेने व्यक्त केले आहे. प्रभागातील इच्छुक नागरिक, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतल्यास, त्यासाठी कागदपत्रांपासून इतर सर्व मदत 'परिवर्तन'तर्फे केली जाईल, असे कानिटकर यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी महापौरांचाही​ हेल्मेटसक्तीला विरोध

$
0
0

रावतेंचे मंत्रिपद काढून घेण्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही' या नव्या हेल्मेटसक्तीला पुण्यातील दहा माजी महापौरांनी विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे निर्बुद्धपणाचा आहे. जनसामान्यांच्या भावनांचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्याच्या लोकसंख्येत युवक व युवतींची संख्या सुमारे चार कोटी आहे. त्या सर्वांचा रावते यांनी लादलेल्या हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध आहे. रावते भविष्यात ड्रायव्हरकडे लायसन्स नाही, म्हणून मोटारीला पेट्रोल नाही. म्हणजे अपघात कमी होतील, अशी घोषणा देखील करतील, अशी उपरोधिक टीका या महापौरांनी केली. रावते यांचा हा निर्णय शिवसेनेलाच महागात पडेल, असे या महापौरांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शांतिलाल सुरतवाला, विठ्ठल लडकत, अंकुश काकडे, दत्ता एकबोटे, सुरेश शेवाळे, उल्हास ढोले पाटील, दत्ता गायकवाड, बाळासाहेब शिरोळे, मोहनसिंग राजपाल आणि दत्तात्रय धनकवडे या माजी महापौरांनी पत्र प्रसिद्ध केले आहे. भविष्यात पेट्रोलपंपाजवळ हेल्मेट भाड्याने देण्याचा धंडा सुरू होईल. पेट्रोल भरेपर्यंत हेल्मेट भाड्याने घ्यायचे. कदाचित पेट्रोल पंपचालक हा जोडव्यवसाय म्हणून सुरू करतील, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळाल्याने रावते यांना काहीतरी निर्णय घेऊन चमकोगिरी करायची आहे. पण, याचा थेट परिणाम शिवसेनेवर होणार आहे. एकीकडे ठाकरे शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर, दुसरीकडे रावते असे निर्णय घेऊन त्यांचे प्रयत्न धुळीस मिळवित आहेत, असा आरोप या माजी महापौरांनी केला.
---------
'कृती समिती विरोध करेल'
पाच महिन्यांपूर्वी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर अशाच प्रकारे तीव्र स्वरुपाची दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. तेव्हाही पुणेकरांनी हेल्मेटसक्तीला विरोध केला होता. तसेच, पुण्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती स्थापन केली होती. आता देखील ही समिती नवीन प्रकारच्या सक्तीचा तीव्र विरोध करेल, अशी माहिती कृती समितीच्या संदीप खर्डेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलेचा साधक गुरुकुलात घडतो’

$
0
0

'आवर्तन गुरुकुल'चे पं. तळवलकरांच्या हस्ते उद्‍घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'अभिजात संगीत कलेचा अभ्यास करण्यासाठी सखोल मार्गदर्शनाची गरज असते, त्या मार्गदर्शनातूनच उत्तम कलाकार घडतो. त्यासाठी गुरूची आवश्यकता असते, कलेचा साधक गुरुकुलात घडतो', असे मत तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.
भारतीय अभिजात कलांचे प्रशिक्षण देऊन उत्तम कलाकार घडवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या 'आवर्तन गुरुकल'चे उद्‌घाटन तळवलकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर, शमा भाटे, पं. उल्हास कशाळकर, तबलावादक पं. रामदास पळसुले, गुरुकुलच्या विश्‍वस्त मंडळाचे सदस्य अरुंधती पटवर्धन, शिरीष कौलगुड, अनिता संजीव, श्रीकांत शिरोळकर आदी या वेळी उपस्थित होते.
पं. तळवलकर म्हणाले, 'पूर्वीच्या कलाकारांनी अत्यंत खडतर परिस्थितीत गुरुकुलात संगीत शिक्षण घेतले. गुरुकुलाचे स्वरूप कसेही असले तरी केवळ कलाकार नव्हे, तर कलेचा साधक घडविण्याचे काम तेथे होते. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला हे अभिजात संगीत शिकण्याचे टप्पे आहेत. शास्त्र समजाविले जाते, तंत्र शिकविले जाते, विद्या दिली जाते आणि कला संस्कारीत होते. गुरु हा कलेच्या सौंदर्याचा अनुभव शिष्याला पदोपदी देत असतो आणि असे अनेक अनुभव घेऊन जे गवसते, त्याला अनुभूती म्हणतात. ज्ञानाशिवाय ही अनुभूती येत नाही आणि अनुभूती संस्काराशिवाय येत नाही. तर संस्कार हे गुरुशिवाय मिळत नाहीत', असे सांगून पं. तळवलकर यांनी अभिजात संगीतातील 'आर्वतना'ची ओळख रसिकांना करून दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. तळवलकर यांनी संगीत, वादन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ साधून 'तालयात्रा'चे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युनिअर कॉलेजांना लगाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरावीला ऑफलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. अकरावीचे ऑनलाइन प्रवेश थेट बारावीच्या परीक्षेशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने यापुढे ही प्रक्रिया अधिक काटेकोर होणार आहे. त्यामुळे अकरावीला ऑनलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच अधिकृतपणे बारावीची परीक्षा देता येईल. अकरावी प्रवेशाच्या टप्प्यावर ज्युनिअर कॉलेजांमध्ये चालणारे धंदे थांबविण्यासाठी राज्य सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी सातत्याने आक्षेप घेण्यात येत होते. 'सिस्टिम करेक्टिंग मूव्हमेंट'च्या वैशाली बाफना यांनी या प्रक्रियेतील त्रुटींविरोधात एका जनहित याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात आवाज उठविला होता. त्याच संदर्भाने यंदा सरकारने ऑनलाइन प्रक्रियेसंदर्भात सुधारित सरकारी नियम काढत ऑनलाइन प्रक्रियेमध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतरही अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून यंदा हजारो विद्यार्थी बाहेर राहिले होते. अनेक विद्यार्थ्यांनी चांगली टक्केवारी असतानाही चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश न मिळाल्याबाबत आक्षेप नोंदविले होते. त्याचा विचार करत अशा आक्षेपांबाबत, तसेच अद्याप प्रवेश न मिळालेल्या आणि ऑनलाइन प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, या विषयी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने सरकारकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार सरकारने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया थेट बारावीच्या परीक्षेशी जोडल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. या विषयी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती यापुढे बोर्डाकडे पाठविली जाणार आहे. याच माहितीच्या आधारे बारावीच्या परीक्षा अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल; तसेच ज्युनिअर कॉलेजची संचमान्यताही केवळ ऑनलाइन प्रवेशांवरच अवलंबून असेल. ऑफलाइन प्रवेश बेकायदा असून, तसे प्रवेश आढळल्यास तो उच्च न्यायालयाचाही अवमान ठरेल. अशा प्रवेशांची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, पालक आणि संबंधित ज्युनिअर कॉलेजची असेल. ऑफलाइन प्रवेश समोर आल्यास ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडला अलौकिक व्यक्तित्त्वाचा प्रवास

$
0
0

ढेरेंच्या साहित्यकृतींच्या आस्वादाने पुणेकर मंत्रमुग्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संतसाहित्य आणि लोकसाहित्याचा अद्वितीय संगम साधणारे, भागवत धर्माच्या प्रभावाचा आजोळी साहित्यसंस्कार घडलेले, लज्जागौरी आणि इतर देवतांच्या संशोधनातून दैवत्व या संकल्पनेचे अनेकविध पैलू प्रकाशात आणणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासकार डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे उर्फ रा. चिं. ढेरे यांच्या अलौकिक व्यक्तित्वाचे पैलू साहित्यप्रेमींना स्तिमित करणारे ठरले.
निमित्त होते अरभाट निर्मित आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत 'लौकिक-अलौकिक' या मैफलीचे. टिळक रोडवरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात रंगलेल्या या अभिवाचनाच्या मैफलीला साहित्यप्रेमींनी गर्दी केली होती. ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, ओम भूतकर आणि हर्षद राजपाठक यांनी ढेरे यांच्या मुलाखती, संशोधन तसेच कथांचे अभिवाचन केले. उस्मानाबाद येथील तेर येथील उत्खननात सापडलेल्या लज्जागौरी मूर्तीबाबत श्लोकस्वरूपातील सादरीकरणाने या मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमिला ढेरे या रा. चिं. ढेरे यांच्या भगिनीने लहानपणीच्या आठवणींना दिलेला उजाळा 'आमचं बालपण' या लेखाच्या अभिवाचनातून ज्योती सुभाष यांनी सादर केला. अनंत अडचणींतून शिक्षण पूर्ण करण्याचा या भावंडांचा अट्टाहास त्यातून समोर आला.
पुरंदरे आणि हर्षद यांनी 'संस्कृतीची शोधयात्रा' या ढेरे यांच्या मुलाखतीचे सविस्तर अभिवाचन केले. त्यातून सविता वाड्मय मंडळात मित्रांसह ढेरे यांनी केलेले काम, १९५१ नंतर संशोधनाकडे वळणे, 'नाथसंप्रदायाचा इतिहास' या पहिल्या संशोधन पुस्तकामागची भूमिका, त्यासाठी भोरच्या पंतसचिवांतर्फे वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीचा संदर्भ, संत आणि लोकसाहित्यातली प्रेरणा, देवतांचे संशोधन, लज्जागौरी, आनंदनायकी पुस्तकांमागचा विचार, शोधयात्रा, इतिहासाचार्य राजवाडे, दत्तो वामन पोतदार तसेच चांदोरकर आणि देव या त्यांच्या आदर्शांबाबतचे विचार, समीक्षकांच्या टीकेकडे पाहण्याचा आणि वेगळी वाट निवडल्यावर मिळालेल्या प्रतिक्रिया अशा अनेक गोष्टींचा उलगडला आणि त्यामागची ढेरे यांची भूमिका उलगडली.
..
उपस्थितांना वैचारिक मेजवानी
'मूलदेव आणि मुरूग', 'पौरूषाचे प्रतीक', 'मिथक आणि नाटक', 'शक्तिपीठांचा शोध', 'विठ्ठल वैदिकीकरण' या अभिवाचनातून उपस्थितांना वैचारिक मेजवानी मिळाली. संयोजन उमेश कुलकर्णी, संकलन चिन्मय दामले तर दृष्य संरचना सुनीत वडके यांची होती. कल्याणी देशपांडे यांनी अभिवाचनात सतारवर साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images