Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नगरमध्ये त्रिशंकू, राष्ट्रवादी 'नंबर वन'

$
0
0
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता न आल्याने नगरची जिल्हा परिषद त्रिशंकू झाली आहे. ७५ पैकी ३३ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन झाला असला तरी बहुमतासाठी पाच जागा कमी पडल्या आहेत.

पुणे, पिंपरीत राष्ट्रवादी नंबर वन

$
0
0
एकहाती सत्तेचे आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणेकरांनी यंदाही नंबर वनचे स्थान दिले; पण ते 'हात'चे राखूनच. मतदारांनी मनसेच्या इंजिनही चालविले आणि या इंजिनाच्या धडकेत सर्वच पक्षांच्या दिग्गजांचे बालेकिल्ले भुईसपाट झाले.

कुलगुरू निवडीबाबत यूजीसी मौनातच

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) मौन अद्याप कायम आहे. मात्र आता यूजीसीतर्फे प्रतिज्ञापत्र सादर होण्याची वाट न बघता नागपूर खंडपीठासमोर यापूर्वी यूजीसीने सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा तिढा सोडविला जाणार आहे.

...काळ आला होता; पण वेळ नाही

$
0
0
शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या गर्भवती महिलेला इतर महिलांनी वेळीच मदत करून बाहेर काढल्यामुळे या महिलेचे प्राण वाचले. या घटनेमुळे कँन्टोन्मेंट बोर्डाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला.

स्थायीत दिसणार 'अस्थायी पॅटर्न'

$
0
0
पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँगेस नंबर वन राहिला असला तरी कोणतीही नवीन योजना आणायची की नाही, याबाबत निर्णय घेताना गेल्या पाच वर्षांप्रमाणे जोडसाखळीचा खेळ सुरूच राहणार आहे. त्यामुळे स्थायी समितीत कधी राष्ट्रवादी काँगेस-काँगेस आघाडी, कधी राष्ट्रवादी-महायुती हा नवा 'पुणे पॅटर्न', तर कधी राष्ट्रवादी-मनसे आघाडी असे 'अस्थायी पॅटर्न'चे चित्र पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.

धुमाकूळ घालणा-या दरोडेखोरांना अटक

$
0
0
पुणे जिल्ह्यात शिरूर, नारायणगाव, मंचर परिसरात दरोडे-खुनांसह धुमाकूळ घालणा-या सात दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, त्यात खुनासह चार दरोडे, तीन घरफोड्या आणि एका साखळी चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.

वेगवान मोटार अन् भीतीचा थरार

$
0
0
खडकीतील चौकात सिग्नल तोडून स्कॉर्पिओ पुढे येते... पाठीमागून पोलिस कॉल देतात... परंतु, त्यांना न जुमानता तो चालक सुसाट वेगाने धावू लागतो... पोलिस, नागरिक त्याचा पाठलाग करतात... अखेरीस नेहरूनगरमध्ये त्याला पकडण्यात यश येते आणि सर्व जण सुटकेचा नि:श्वास टाकतात.

सुनील लांघीसह आठ जण अटकेत

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधी उमेदवाराला सहकार्य केल्याच्या कारणावरून मारहाण करून सुतारवाडी परिसरात दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून सुनील लांघीसह आठ जणांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कुलगुरू कार्यालयावर प्राध्यापकांचा मोर्चा

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) सेट-नेट पात्रतेतून सूट मिळालेल्या पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांना पदोन्नतीसह संबंधित वेतन श्रेणीचा त्वरित लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी प्राध्यापक संघटनांतर्फे मंगळवारी दुपारी कुलगुरू कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मुळशी पं.स.चे आरक्षण बदलणार

$
0
0
पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी आवश्यक त्या संवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने मुळशी आणि वेल्हा तालुक्यातील आरक्षण बदलण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.

मतदान यंत्राशी छेडछाड

$
0
0
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक २१ मध्ये मतदानासाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रात गडबड झाल्याचा आरोप या भागातून निवडणूक लढविणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केला आहे.

भुशी धरणात बुडून युवतीचा मृत्यू

$
0
0
लोणावळा येथील भुशी धरणात बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ही युवती अंदाजे २० वषीर्य असून तिची अद्याप ओळख पटलेली नाही.

मराठी शब्दांचा खजिना आता वेबसाइटवर

$
0
0
वाढत्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठीतील अनेक चपखल शब्द मागे पडू नयेत, यासाठी समर्थ मराठी संस्थेने www.marathibhasha.com ही वेबसाइट तयार केली आहे. विविध क्षेत्रात वापरल्या जाणा-या तब्बल दोन लाख ७८ हजार मराठी शब्दांचा संग्रह या वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.

भुयारी मेट्रोला 'हार्ड रॉक'

$
0
0
राष्ट्रवादी पुरस्कृत भुयारी मेट्रो सध्या तरी पुढे सरकण्याची शक्यता नाही. भुयारी मेट्रोच्या योजनेसाठी एलिव्हेटेड मेट्रोच्या तुलनेत तिप्पट खर्च येईल, असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मेट्रो योजनेसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जामिनावरील तिघांना अटकेची परवानगी

$
0
0
शिवाजीनगर कोर्टाजवळ कामगार पुतळा येथे विजय कारके यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी संदीप बांदल खून प्रकरणात सध्या जामिनावर असून, त्यांना अटक करण्याची परवानगी शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा आदेश दिला आहे.

पाणीपुरवठा 'टॉप प्रायोरिटी'

$
0
0
नव्या योजनांपेक्षा पायाभूत सुविधांवर अधिक भर देणारे बजेट पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी स्थायी समितीपुढे सादर केले. समान पाणीपुरवठ्याच्या योजनेला यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता बजेटमधून स्पष्ट झाली आहे.

जेंडर बजेटचा यंदाही विसर?

$
0
0
देशात 'जेंडर बजेट' ही संकल्पना पहिल्यांदा मांडणारी पुणे महापालिकाच गेल्या दोन वर्षांपासून या बजेटला तिलांजली देण्याचे काम करत आहे. गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाला या बजेटचा विसर पडला होता, तर या वर्षी 'जेंडर बजेट' या नावाने स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

शांतता... परिस्थिती नियंत्रणात!

$
0
0
पुणे शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून गेल्या तीन दिवसांपासून शहरात शांतता आहे. पिंपरी, सांगवी, हडपसर, इंदिरानगर आणि कात्रजचा काही भाग संवेदनशील असून, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेखला यांनी सांगितले.

लोकल आव्हानापुढे 'शिवाजीनगर' दुबळे

$
0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळ्याच्या लोकल शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी या 'आव्हाना'साठी शिवाजीनगरचा परिसर सज्जच नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. पार्किंगची पुरेशी व सुरक्षित सुविधा, अपुरा बसस्टँड, अतिक्रमणे अशा परिस्थितीमध्ये लोकलचे टमिर्नल म्हणून कार्यरत होण्यात प्रथमदर्शी तरी खूपच समस्या येणार आहेत.

इव्हीएम : सात दिवसांत चौकशी करा

$
0
0
'महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच प्रभागस्तरावर वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये छेडछाड, तसेच मशिन हॅक करण्यात आल्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मतमोजणीवर झाला असून, या संदर्भात तातडीने चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी सर्वपक्षीय उमेदवारांनी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडे केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images