Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पीएमआरडीएद्वारा करा ‘मेपल शेल्टर’ची चौकशी

$
0
0

डॉ. नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांमध्ये घर देण्याची जाहिरातीद्वारे घोषणा करणाऱ्या 'मेपल शेल्टर' कंपनीची पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. चौकशीअंती ही योजना खरोखरच चांगली असल्याचे आढळल्यास राज्य सरकारने पालकत्व स्वीकारून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून घरे बांधून घ्यावीत, असेही त्या म्हणाल्या.
'या योजनेमध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले असल्याचा संशय ​निर्माण होत आहे. त्यामुळे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी. चौकशीनंतर ही योजना चांगली असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून एक हजार घरे बांधून घेण्यात यावेत,' असेही श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या. 'पाच लाख रुपयांत घरे मिळणार असतील तर, सामान्यांचा फायदाच होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेचे पालकत्व स्वीकारावे,' असे त्या म्हणाल्या.
'विधिमंडळाच्या अधिवेशनात पुण्यासंबंधी अनेक प्रश्नांवर लक्षवेधी मांडून ते मार्गी लावण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, विजेची बिले उशिरा देणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई, पुण्याच्या फॅमिली कोर्टाचे प्रलंबित काम आदींचा समावेश आहे,' असेही गोऱ्हे यांनी नमूद केले.
'या अधिवेशनात हवामान बदलाविषयी सरकारने कृती आराखडा बनविण्याची मागणी केली. उद्योजक महिलांसाठी उद्योग विभागाचे धोरण, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वाती अभय योजना, बस आणि टॅक्सीत महिलांसाठी आरक्षित आसने, भामा आसखेड योजना २०१७पर्यंत पूर्ण करणे, 'पीएमआरडीए'कडून रिंगरोड पूर्ण करणे आदी आश्वासने मिळाली,' असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची भूमिका अखंडित महाराष्ट्राची आहे. या बाबतचा प्रस्तावही सरकारकडे देण्यात आला आहे. तो अद्याप प्रलंबित असल्याचेह त्या म्हणाल्या.
..........
'पंकजांचे वक्तव्य अनाठायी'
राज्य सरकारमधील दोन ते तीन मंत्र्यांच्या वर्तनावरून सरकारविषयी मत मांडणे योग्य नाही अशी भूमिका मांडत असतानाच, गोऱ्हे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'बियर उद्योगांसाठी पाणी आरक्षित असल्याचे वक्तव्य मुंडे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करण्यापूर्वीचे मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी आहे,' असे गोऱ्हे म्हणाल्या. बियरऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नास रिक्षाचालक भागविणार तहान

$
0
0


पुणे : उन्हाचा चटका दररोज वाढत आहे. त्यामुळे कामानिमित्त फिरतीवर असणाऱ्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, ते तहानेने व्याकूळ होतात. अशा तहानलेल्या नागरिकांची तहान रिक्षाचालक भागविणार आहेr. रिक्षा पंचायतीच्या माध्यमातून ५० रिक्षांमध्ये पिण्याच्या थंड पाण्याच्या प्रत्येकी पाच ते सहा लीटरच्या पिशव्या ठेवल्या जाणार आहेत. प्रवाशांसह सामान्य नागरिकही याचा लाभ घेऊ शकणार आहेत.
गेल्या आठवडाभरात शहराच्या तापमानात चढउतार होत आहे. पाऱ्याने चाळीशीही पार केली होती. फिरतीच्या कामावर असलेले नोकरदार, विविध कामांसाठी घराबाहेर पडणारे नागरिक आणि विद्यार्थी यांनाही उन्हाचा प्रचंड त्रास होत असणार यात शंका नाही. शहरातही पाणी टंचाईची परिस्थिती असून पाणी कपात सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायतीने नागरिकांच्या सोयीसाठी 'फिरती पाणपोई' हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या २१ एप्रिलपासून शहरात या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५० रिक्षांमध्ये ही थंड पाण्याची पिशवी ठेवली जाणार आहे. त्यास मिळणारा प्रतिसाद आणि गरज पाहून या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा ‘निवारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुष्काळामुळे पुण्यात स्थलांतर केलेल्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'हक्काचा निवारा' उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त भागातून आलेल्यांसाठी मोफत निवारा आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे काम मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर मनसेने हा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वदूर आणि विशेषतः दुष्काळी भागात पाऊस पडेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. या दुष्काळग्रस्तांसाठी नदीपात्रात मंडप टाकून, त्यांना राहण्यायोग्य व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला परवानगीसाठी पत्रदेखील पाठविले आहे, अशी माहिती पक्षाचे उपप्रदेशाध्यक्ष प्रकाश ढोरे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. शहराध्यक्ष अजय शिंदे, हेमंत संभूस, कामगार सेनेचे सरचिटणीस नरेंद्र तांबोळी उपस्थित होते.
'दुष्काळामुळे अनेक नागरिक नोकरीच्या शोधार्थ पुण्यात दाखल झाले आहे. मात्र, शहरात आल्यावर त्यांना दोन वेळच्या अन्नापासून राहण्याची सोय करेपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होते. त्यामुळे त्यांना राहण्याची व्यवस्था, दोनवेळचे जेवण, सकाळी चहा व नाश्ता दिला जाणार आहे,' असे ढोरे यांनी सांगितले. त्यांना झोपण्यासाठी ब्लँकेट, चटई आदी आवश्यक गोष्टीही दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे, असे धंगेकर म्हणाले. त्यांच्या नोकरीसाठी सिक्युरिटी व विविध कंपन्याशी चर्चा सुरू असल्याचे तांबोळी म्हणाले.
------
नोंदणीची आवश्यकता
संबंधित दुष्काळग्रस्तांनी मनसेच्या नारायण पेठेतील पक्ष कार्यालयात नावनोंदणी करावयाची आहे. त्यांच्याकडे त्यांच्या मूळ पत्त्यावरील ओळखपत्र असणे गरेजेचे आहे. नावनोंदणीनंतर त्यांना मनसेकडून ओळखपत्र दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा हजारांवर प्रकरणे लोकअदालतीत निकाली

$
0
0

पुण्यातील सर्वाधिक प्रकरणे; पोस्टाच्या तक्रारी अधिक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोर्टात दाखल असलेली प्रकरणे पक्षकारांनी तडजोडीने आणि सामोपचाराने मिटवाव्यात या साठी राज्यातील चार ​जिल्ह्यांमध्ये स्थायी लोकअदालत सुरू करण्यात आली असून, २०१५मध्ये १३,२७८ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे.
निकाली काढण्यात आलेली सर्वाधिक प्रकरणे पुण्यातील (१६५१) आहेत. पक्षकारांना कोर्टाची पायरी न चढता त्वरित निकाल मिळावा तसेच, सामोपचाराने प्रकरणे निकाली काढण्याची संधी मिळावी म्हणून औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई येथे स्थायी लोकअदालती सुरू करण्यात आल्या. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे सामोपचाराने मिटवायच्या आहेत, त्यांच्यासाठी स्थायी लोकअदालतीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
कोर्टात न जाता दाखलपूर्व प्रकरणेही लोकअदालतीमध्ये निकालात काढण्यात येतात. राज्यात जानेवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत चार जिल्ह्यांमधील स्थायी लोकअदालतीमध्ये १३,२७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यांमध्ये पोस्ट ऑफिस, तार आणि दूरध्वनीबाबतच्या सेवांबाबतची प्रकरणे अधिक संख्येने निकाली काढण्यात आली आहेत. चारही जिल्ह्यांमध्ये पोस्ट ऑफिस, दूरध्वनी यांबाबतची एकूण ११, ८२२ प्रकरणे निकालात काढण्यात आली. पुण्यात शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्थायी लोकअदालतीचा उपक्रम सुरू आहे. पुण्यातील पक्षकार या लोकअदालतीमध्ये आपल्या केसेस निकाली काढण्यासाठी ठेवू शकतात.
............................
कोणत्या तक्रारी करता येतील?
- रस्ते, विमान किंवा जहाजाद्वारे होणाऱ्या सामानाच्या वाहतुकीबाबतच्या तक्रारी
- सरकारी, खासगी मोबाइल कंपन्यांविरोधातील तक्रार
- वीज, पाणीपुरवठा, स्वच्छता, टपालसेवा पुरविणाऱ्यांविषयीच्या तक्रारी
- रुग्णालये, विमा कंपन्या, पेन्शनविषयक सेवा
- बिल्डर आणि बांधकामविषयक सेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम हृदयाची यंत्रणा ‘इस्रो’कडून विकसित

$
0
0

रॉकेट तंत्रज्ञानाचा उपयोग; योग्य दाबाने रक्तपुरवठा शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) रॉकेट, उपग्रह पाठोपाठ आता चक्क कृत्रिम हृदयात उपयुक्त ठरेल असा पंप विकसित केला आहे. रॉकेट तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करण्यात आलेली 'लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस' (एलव्हीएडी) ही यंत्रणा हृदयाचे कार्य सुरळित ठेवण्यासाठी योग्य दाबाने रक्ताचा पुरवठा करते. 'इस्रो'ने विकसित केलेल्या यंत्रणेचे डुकरावरील प्रयोग नुकतेच यशस्वी झाले. या यंत्रणेद्वारे किमान खर्चातील तंत्रज्ञानाचे आणखी एक उदाहरण 'इस्रो'ने घालून दिले आहे.

हृदयविकारात हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीराच्या विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. अशा वेळेस 'एलव्हीएडी' यंत्रणेमार्फत हृदयाच्या एका भागाकडून रक्त ओढून घेऊन त्याचा पुरवठा शरिरातील अवयवांना करण्यात येतो. दुसरीकडे रॉकेटचे इंजिन अपेक्षेप्रमाणे चालवण्यासाठी इंधन आणि इतर द्रवांचा योग्य दाबाने, योग्य प्रमाणात सातत्याने पुरवठा करावा लागतो. 'इस्रो'ने या तंत्रज्ञानाचा उपयोग प्राण्यांच्या हृदयासाठी करण्याचे ठरवले असून, त्यातही यश मिळाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टायटेनियम अलायच्या मदतीने 'इस्रो'ने छोटा पंप बनवला. या पंपाचे वजन फक्त शंभर ग्रॅम आहे. हा पंप एका मिनिटाला तीन ते पाच लिटर रक्ताचे अभिसरण करू शकतो. तिरुअनंतपुरम येथे एका डुकराच्या हृदयामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली. सलग सहा तास 'एलव्हीएडी'ने यशस्वीपणे कार्य केले. लवकरच या यंत्रणेचा उपयोग माणसांसाठीही करता येईल असा विश्वास 'इस्रो'ने व्यक्त केला.
..
सव्वा लाखांत उपलब्ध

'लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस'चा उपयोग कृत्रिम हृदय बसवताना किंवा हृदयाचे प्रत्यारोपण करताना केला जातो. हृदयाला पर्याय म्हणून नाही, तर हृदयाचे कार्य सुरळित ठेवण्यासाठी शरिराच्या आत किंवा बाहेर ही यंत्रणा बसवण्यात येते. सध्या या यंत्रणेचा खर्च पन्नास लाख ते दीड कोटी इतका असून, 'इस्रो'ने विकसित केलेली यंत्रणा केवळ सव्वा लाखांत उपलब्ध होईल. या यंत्रणेमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणाऱ्या सामान्यांन रुग्णांनाही जीवदान मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकाउंटंट तरुणीवर मित्रांकडून बलात्कार

$
0
0

चार तास कारमध्येच डांबले; चौघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत तरुणीला जेवणासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने कारमध्येच सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बावधन परिसरात घडला आहे. त्यानंतर पीडितेला देहुरोड येथे नेण्यात आले. तेथे चार तास कारमध्येच डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी मित्रांना बोलवून आपल्याला जबरदस्तीने बिअर पाजल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी पीडितेच्या दोन मित्रांसह चौघांना अटक केली आहे.


या प्रकरणी तेवीस वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विक्रांत सुधीर हिरवे (वय २७, रा. चौधरी पार्क, दिघीगाव), मनीष गोविंद राठी (वय ३१, रा. गंगात्रीनगर, पिंपळे गुरव), निखिल राजेंद्र जाधव (वय २३, फ्लॅट न. ३०७, गंगात्रीनगर, पिंपळे गुरव) आणि मयूर राजेंद्र कांबळे (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर) यांना अटक केली आहे. पीडिता मूळची अमरावतीची आहे. दीड वर्षापूर्वी ती शिक्षणासाठी पुण्यात आली. सध्या एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. या पूर्वी ती एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. त्या ठिकाणी तिचा एक मित्र होता. या मित्रामुळे तिची आरोपी विक्रांतबरोबर चार महिन्यांपूर्वी ओळख झाली. पीडित तरुणीला विक्रांतने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फोन करून जेवायला बाहेर जाण्याचे विचारले. विक्रांत आणि मनीष तरुणीला वारजे पुलाखालून स्विफ्ट कारने चांदणी चौक मार्गाने वाकडच्या दिशने घेऊन गेले. दरम्यान, कारमध्येच बावधन परिसरात विक्रांत आणि मनीषने तरुणीवर अत्याचार केला.


त्यानंतर आरोपींनी पिंपळे गुरव येथून निखिल या मित्रास सोबत घेतले. त्यानंतर ते सर्व देहुरोड येथे गेले. त्या ठिकाणी आरोपींच्या मित्राचा साखरपुडा होता. साखरपुडा संपल्यानंतर आरोपींनी तरुणीला कारमध्ये डांबले. रात्री अकरा वाजता तेथून मयू या मित्राला सोबत घेतले. मयूर आणि निखिल कारच्या मागील सीटवर बसले. आणि तरुणीला मध्ये बसवले. देहुरोडहून परतताना सर्वांनी हॉटेल सहारामध्ये जेवण केले. तेथे तरुणीला जबरदस्तीने बिअर पाजण्यात आली. त्यानंतर मयूर आणि निखिलने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने शंभर क्रमांकाला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता, विक्रांतने तिचा फोन हिसकावून घेतला.
त्यानतंर मनीषने तरुणीचा गळा दाबून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तरुणीला वारजे माळवाडी बस स्थानकाजवळ सोडून दिले. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेपल’ संचालक मंत्र्यांदेखत पळाले

$
0
0

फसवणुकीचा गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पाच लाखांत घर' अशी जाहिरात करून फ्लॅटनोंदणीसाठी पैसे गोळा केल्याप्रकरणी मेपल कंपनीचे भागीदार आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एका वाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांदेखत मेपलचे संचालक पळून गेल्याचा प्रकार घडला.

पाच लाख रुपयांमध्ये घर देण्याची जाहिरात मेपल ग्रुपद्वारे करण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची छायाचित्रेही वापरण्यात आली होती. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी या जाहिरातीला आक्षेप घेत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर चक्रे फिरली आणि या योजनेशी सरकारचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी मेपल कंपनीच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या योजनेत आतापर्यंत वीस हजार जणांनी घरांसाठी नोंदणी केली आहे.

सायंकाळी या प्रकाराला वेगळे वळण लागले. शिवाजीनगर गावठाण परिसरातील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाजवळ हे नाट्य घडले. या विषयावरील चर्चात्मक कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह मेपलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल हेही सहभागी झाले होते. दरम्यान, तोपर्यंत पत्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी येथे जमले. कार्यक्रम संपल्यानंतर बापट खाली आणि त्यांच्या मागून अगरवालही खाली आले आणि कोणाच्या लक्षात येण्यापूर्वीच एका दुचाकीवर बसून निघून गेले. या प्रकारामुळे सरकारचा मेपलच्या संचालकांना आशीर्वाद असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. दरम्यान, 'या चर्चेच्या कार्यक्रमात स्टुडिओमध्ये मी वेगळ्या खोलीत होतो, आगरवाल वेगळ्या खोलीत होते, तेही शोमध्ये सहभागी असल्याची कल्पना नव्हती,' असे बापट यांनी वाहिन्यांवर बोलताना नमूद केले.

प्रकल्पांना स्थगिती

दरम्यान, मेपल कंपनीबाबत उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर कंपनीच्या प्रकल्पांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाशक केवळ पैसे कमावतात

$
0
0

राजन खान यांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लेखकाच्या बुडाखाली प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. पुस्तकाच्या किती आवृत्या प्रकाशित झाल्या, त्याची साधी माहिती तसेच पैशाचा हिशोब प्रकाशकांकडून दिला जात नाही. मराठीतील लेखक आणि प्रकाशकांचे संबंध अत्यंत गलिच्छ आहेत. मराठी साहित्यामध्ये प्रकाशक केवळ पैसे कमाविण्यासाठी आले आहेत,' अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी प्रकाशकांवर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या 'मसाप गप्पा' या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या कट्ट्याचे पहिले पुष्प राजन खान यांच्या मुलाखतीमधून गुंफण्यात आले. नीलिमा बोरवणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
'माझ्या साहित्यिक प्रवासात १७ प्रकाशक झाले, पण ते सगळे नीचपणे वागले. एकाही प्रकाशकाने आर्थिक व्यवहार पूर्ण केला नाही. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, असे म्हणण्याचा या प्रकाशकांना काहीही अधिकार नाही,' अशी टीका खान यांनी केली. 'लेखकांच्या पुस्तकाच्या किती आवृत्या गेल्या, याचा हिशोब दिला जात नाही. मराठी साहित्यामध्ये प्रकाशक केवळ पैसे कमाविण्यासाठी आले आहेत. लेखकांना प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे. मराठी साहित्य उन्नत करायचे असेल तर मराठीमध्ये आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक झाले पाहिजेत. साहित्यिक आणि प्रकाशक या दोन्हींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा,' असे आवाहन त्यांनी केले. 'गप्पांमधून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे रूप कळते,' असे गाडगीळ यांनी सांगितले.
---------------------------------------------------------
'...तोपर्यंत साहित्य संमेलन व्हावीत.'

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वार्षिक बाजार भरतो, त्याला माझा पाठिंबा आहे. या संमेलनामध्ये वाद, राडा होतो तो होऊ द्या. जोपर्यंत कुणाचा खून होत नाही तोपर्यंत संमेलन बंद व्हायला पाहिजे, असे मी म्हणणार नाही, कारण 'साहित्य' या शब्दाने माणसाचे किमान लक्ष्य तरी साहित्याकडे केंद्रित होते,' अशा शब्दांत राजन खान साहित्य संमेलनाचे समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुहूर्त मिळवा एका ‘क्लिक’वर

$
0
0

पूजा अँड साहित्य डॉटकॉम वेबसाइट भाविकांसाठी उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरी पूजा करायची आहे, पण सुट्टी आणि गुरुजी यांची वेळ जुळून येत नाही. पूजेचे साहित्य आणण्यास वेळ नाही...यामुळे पूजेलाच 'मुहूर्त' मि‍ळेनासा झाला आहे...काळजी करू नका आणि पुढील मुहूर्तही शोधत बसू नका...कारण आता 'पूजा अँड साहित्य डॉटकॉम' या वेबसाइटला भेट दिल्यास एका क्लिकवर 'मुहूर्त' मिळणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वच गोष्टींची आणि वेळेची सांगड घालणे अवघड काम झाले आहे. अशा वेळी पूजा किंवा धार्मिक विधी करण्यासाठी वेळ आणि गुरुजी यांची सांगड घालणे अवघड होऊन बसले आहे. याच गोष्टीचा विचार करून 'शुभंभवतु सोल्युशन्स'ने चक्क वेबसाइटच सुरू केली आहे. 'या माध्यमातून पूजेचे साहित्य, गुरुजी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत,' अशी माहिती शुभंभवतु सोल्युशन्सचे संचालक परीक्षित ठोसर यांनी दिली.
शुभंभवतु सोल्युशन्सने तयार केलेल्या पूजा अँड साहित्य डॉटकॉम या वेबसाइटचे अनावरण चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी वेदमूर्ती संजय केशव पाटोदकर, तन्मय तोडमल, महेश लिमये, चिद्विलास क्षीरसागर, अन्वय बेंद्रे, शुभंभवतु सोल्युशन्सचे संचालक परीक्षित ठोसर व मेघराज रेड्डी उपस्थित होते.
'भारताला हजारो वर्षांची संस्कृती लाभलेली आहे. या संस्कृतीमध्ये अनेक परंपरा टिकवून ठेवण्यात आल्या आहेत. परंपरा टिकवून ठेवल्यानेच आज आपला देश बांधला गेला आहे. आजच्या धकाधकीच्या काळात ही परंपरांनी आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. याच परंपरांना जपताना आधुनिकतेची कास धरल्यास समाजाला नक्कीच फायदा होईल,' असे मत चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. पाटोदकर म्हणाले, 'आजची तरुणाई ही नवीन गोष्टीच्या मागे सतत धावत असते असे नेहमीच म्हटले जाते, परंतु आजच्या तरुणाईने जुन्या परंपरा टिकून राहण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळनिवारणासाठी संघाचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. राज्यातील अकरा जिल्ह्यांत समितीच्या वतीने दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च झाले असून आणखी सहा कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यामुळे समितीतर्फे शहरातील ५० चौकांत २४ एप्रिल रोजी निधी संकलन करण्यात येणार आहे. तसेच, १ मेपर्यंत जलजागृती मोहीम राबविली जाणार आहे.

जनकल्याण समितीच्या वतीने निधी संकलन आणि जलजागृती मोहिमेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश बागदरे, कार्यवाह शैलेंद्र बोरकर, पुणे महानगर अध्यक्ष विश्वास जोशी, संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे आदी या वेळी उपस्थित होते. बोरकर म्हणाले, 'समितीतर्फे बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी चार, तर लातूर, नगर, सोलापूर जिल्ह्यांत प्रत्येकी दोन आणि पुणे जिल्ह्यात एक असे एकूण १५ चारा डेपो सुरू आहेत. तसेच, ११ जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन अशा २२ गावांमध्ये नागरिकांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या जिल्ह्यांतील दोनशे गावांमध्ये पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या वितरीत केल्या आहेत. लातूरजवळील मांजरा नदीच्या १८ किलोमीटर लांबीच्या पात्रात 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या मदतीने खोलीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे १८ दशलक्ष घनमीटर पाणी साठण्यास मदत होणार आहे. नागरिकांना दुष्काळ निवारणाच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची मदत करायची झाल्यास समितीच्या सदाशिव पेठेतील कार्यालयात संपर्क करावा, असे वंजारवाडकर यांनी सांगेतले.

५० चौकांत निधी संकलन

समिती आणि संघाचे स्वयंमसेवक शहरातील कोथरुड, कर्वेनगर, वारजे, बावधन, कोंढवा, पद्मावती, बाणेर, पाषाण, खडकी, औंध, हडपसर, वानवडी, येरवडा, सिंहगड रस्ता आदी भागातील ५० चौकांमध्ये निधी संकलन करणार आहेत. शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी निधी संकलनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. जलजागृती मोहिमेंतर्गत १ मेपर्यंत घरोघरी जाऊन नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटविण्यासाठी मार्गदर्शन आणि पत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे वंजारवाडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवा महाभारतातील प्रसंग !

$
0
0

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्ये 'दृकश्राव्य संग्रहालय'
म. टा. प्रतिनिधी, पुणे
एखाद्या संस्थेतील पुरातन शास्त्राची, इतिहासाची माहिती देणारे ग्रंथ, कागदपत्र किंवा वस्तू बोलू लागल्या तर...? ही फक्त कल्पना नव्हे. प्राच्यविद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये हे प्रत्यक्षात घडणार आहे. संस्थेकडे असणारा ज्ञानाचा अमूल्य ठेवा दृकश्राव्य माध्यमात जिवंत केला जाणार आहे. यामुळे अगदी महाभारतातील एखादा प्रसंगही आपल्या समोर उभा राहील.
भांडारकर संस्थेतील ग्रंथांची संख्या एक लाख ३५ हजार इतकी झाली आहे. संस्थेचे ग्रंथालय ज्ञानाने समृद्ध आहे. ही संस्था अभ्यासक व संशोधकांसाठी कायमच आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे. येथील ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचणे येथील ग्रंथांच्या जडवादामुळे अवघड होऊन बसले आहे. लोकांना सोप्या भाषेत हे ज्ञान तेही आजच्या काळातील दृकश्राव्य माध्यमात उपलब्ध करून दिले तर ज्ञानाचा प्रसार अधिक गतीने होईल, या विचाराने भांडारकर संस्था 'दृकश्राव्य संग्रहालय' प्रकल्प लवकरच हाती घेणार आहे.
'दृकश्राव्य संग्रहालयासाठी केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठविण्यात येणार असून तो प्रस्ताव तयार करण्यात आला आहे,' अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली. 'संस्थेच्या १२ एकर जागेत हे संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दीर्घकालीन काम असून टप्प्याटप्प्याने पुढे जावे लागेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या ग्रंथालयामध्ये १ लाख ३५ हजार इतकी ग्रंथसंपदा तसेच विविध पुरातन वस्तू आहेत. महाभारताचे संशोधन हा संस्थेचा मुख्य प्रकल्प आहे. त्यावर खूप काम आत्तापर्यंत झाले आहे. सामान्यांना या सर्व ज्ञानाशी जोडून घेण्यासाठी दृकश्राव्य संग्रहालय होणार आहे. या संग्रहालयात लिखित माहिती सचित्र तसेच दृकश्राव्य पद्धतीने अनुभवता येईल. आत्तापर्यंत झालेले संशोधन देखाव्यातून पाहता येईल. देखावे, दृकश्राव्य, श्राव्य अशा विविध माध्यमातून हे ज्ञान अनुभवता येईल.
-----------------------------
वास्तूचे नूतनीकरण
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत मूळ इमारतीला धक्का न लावता नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. वास्तूच्या नूतनीकरणासंबंधी २००८मध्ये केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार २००९ मध्ये विविध प्रकल्पांसाठी संस्थेला तत्कालीन शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. संस्थेमध्ये मुख्य इमारतीच्या बाजूला असणारी जुन्या मुद्रणालयाची वास्तू अनेक वर्षांपासून पडून होती. या जागेवर ११० आसनक्षमतेचे सुसज्ज सभागृह बांधण्यात येणार आहे. मुद्रणालयातील प्रिंटर संग्रहालयात ठेवण्यात येणार असून पूर्वी कशा प्रकारे छपाई होत, असे याचा अनुभव घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदाई करून कोंडी नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतरचा निवडणुकीचा काळ लक्षात घेता प्रशासनाने रस्ते खोदाईला परवानगी देऊन आमची कोंडी करू नये,' अशी सूचना करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वगळता अन्य शासकीय संस्थांना सवलतीच्या दरात रस्ते खोदाईला परवानगी न देण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (२० एप्रिल) मंजूर करण्यात आला.

शहराच्या हद्दीतील रस्त्यांमधून भूमिगत सेवा वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेकडे विविध शासकीय, निमशासकीय; तसेच खासगी संस्थेकडून रस्ता खोदाई परवानगीची प्रकरणे प्रशासनाकडे वेळोवेळी सादर होतात. या रस्ते दुरुस्तीसाठी येणारा खर्च संबंधित कंपनीकडून आगाऊ घेतला जातो. त्यानंतर परवानगी दिली जाते. सद्यस्थितीत प्रतिमीटर साडेसहा हजार रुपये खर्च आणि महापालिका अधिभार तीन हजार रुपये असे मिळून मीटरला साडेनऊ हजार रुपये घेतले जातात. परंतु, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने रस्ते खोदाई करण्यास विनाशुल्क परवानगी देण्याची मागणी केली होती. आयुक्त राजीव जाधव यांनी प्रतिमीटर दोन हजार ३०० रुपये सवलतीचा दर सुचविला होता. केवळ याच कंपनीला शहरातील उर्वरित २० टक्के कामांसाठी सवलतीच्या दरात परवानगी देण्याचा निर्णय सभेने घेतला. तर, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, भारत संचार निगम लिमिटेड यांनी सवलतीच्या दरात रस्ते खोदाई करण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

खोदाई शुल्कातून मिळणारी रक्कम त्याच भागातील विकासकामांकरिता खर्च करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली. तर, 'डक्ट'बाबतचे धोरण तयार करण्याचे आश्वासन आयुक्त जाधव यांनी सभागृहात दिले. पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, 'रस्ते खोदाईच्या मुद्यावरून सभागृहात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सत्तारूढ पक्षाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे या आरोपांच्या अनुषंगाने सर्वपक्षीय समिती नियुक्त करावी. त्यांनी चौकशी करावी. त्यानंतरच अन्य शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांसाठी सवलतीच्या धोरणाबाबत निर्णय घेतला जाईल. जूनपासून पावसाळा सुरू होणार आहे. पुढील वर्षी निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे रस्ते खोदाई करून नागरिकांचा रोष घेऊ नये. अन्यथा, आमच्यावर भजन करण्याची वेळ येईल. विद्युत वितरण कंपनी वगळता पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील रस्ते खोदाईची सर्व कामे तातडीने थांबवावीत.'

अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी

पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारण्याचा प्रस्ताव सभेने मंजूर केला. मात्र, पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकडे उपलब्ध करून देण्याचा खर्च पालिका देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. गॅसदाहिनी, विद्युतदाहिनी आणि दफनभूमी यांमधील अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी पालिका घेणार आहे. तसेच, बेवारस मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातील, अशी उपसूचना मंजूर करण्यात आली.

पिंपरीत दिवसाआड पाणीपुरवठा?

पवना धरणातील जलसाठ्यात घट होत असल्यामुळे येत्या एक मे पासून पिंपरी-चिंचवडला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटप्रमुखांच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी सभेत स्पष्ट केले. ते म्हणाले, 'पालिकेकडून शहरात सध्या १४ टक्के पाणीकपात लागू आहे. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे आणखी पाणीकपात गरजेची आहे. येत्या एक मे पासून रोज ४२० दशलक्ष लिटर ऐवजी ३२० दशलक्ष लिटर पाणी रावेत बंधाऱ्यातून उचलण्यात येईल. यावर सर्वपक्षीय गटप्रमुखांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीत बालचमूंचे ‘व्हर्च्युअल ड्रायव्हिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चारचाकी वाहने चालवण्याची वेगळीच क्रेझ असते. ही क्रेझ अनुभवायला प्रत्येकालाच आवडते. पण, नेहमीच असे वाहन चालवायला मिळेल, असे नाही. चारचाकीचे तंत्र समजून घेण्यासाठी ड्रायव्हिंग करायला मिळाले तर... या विचाराने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'सायन्स पार्क'मध्ये थ्री-डी आणि आभासी अनुभव देणारे 'व्हर्च्युअल ड्रायव्हिंग' अर्थात 'आभासी संचलन' हे नवे वाहन दाखल झाले आहे. सध्या सुट्टीचा कालावधी असल्याने या आभासी संचलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी चिंचवड 'सायन्स पार्क'मध्ये 'महिंद्रा मोटर्स'च्या सौजन्याने ऑटोमोबाइल सिम्युलेटर हे वाहन चालविण्याचा आभासी अनुभव देणारे यंत्र जीपमध्ये बसविण्यात आले आहे. या सुविधेचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. या नव्या सुविधेचा अधिकाधिक आनंद सध्या नागरिक घेत आहेत. लहान मुलांकडून तर या उपक्रमाला विशेष पसंती दिली जात आहे. ऑटोमोबाइल सिम्युलेटर हे वाहन चालवण्याचा आभासी अनुभव देणारे एक यंत्र आहे. यात स्टिअरिंग, व्हील, गिअर, क्लच, एक्सलेटर, ब्रेक आदी नियंत्रक आहेत. वाहन चालवताना समोर प्रत्यक्ष दृश्याऐवजी मोठ्या पडद्यावर या दृष्यांचे व्हिडिओ दाखवले जातात. यामुळे वाहन चालवण्याचा प्रत्यक्ष अनुभव चालकाला मिळतो. वाहन चालवताना मार्गावरील परिस्थितीच्या संदर्भात येणाऱ्या दृश्यांबरोबरच वाहनाचा वेग, दिशा, रस्त्याची स्थिती आदींची माहिती यातील कम्प्युटर देतो. तसेच, आजूबाजूला दिसणाऱ्या वृक्ष, नद्या, घरे यांचे चित्रणही करतो. हे दृश्य थ्री-डी स्वरूपातील असल्यामुळे चालकाला वाहन चालवण्याचा आभास निर्माण होण्यास मदत होते. वास्तविक, सिम्युलेटरचा वापर खर्चिक व जोखमीच्या ड्रायव्हिंगवेळी केला जातो. वैमानिकांना प्रत्यक्ष विमान उडवताना देण्यापूर्वी सिम्युलेटर पद्धती वापरली जाते. या सिम्युलेटरच्या साह्याने प्रशिक्षण दिले जाते. ही पध्दती या ठिकाणी वापरण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या 'सायन्स पार्क'मधील सिम्युलेटरचा अनुभव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घेत आहेत. या आभासी संचलनासाठी ५० रुपये इतके शुल्क आहे. या तंत्राची माहिती देण्यासाठी एक मदतनीस ठेवण्यात आला आहे. आभासी संचलनामुळे प्रत्यक्ष ड्रायव्हिंग करताना येणारे अडथळे आणि त्यावर मात कशी करता येते, याचा अंदाज यामुळे नक्की येतो. सायन्स पार्कमध्ये येणाऱ्या लहानांसाठी ही मेजवानी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवास्तर सुधारणा आराखड्याला मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या अमृत मोहिमेंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या अनुषंगाने तयार केलेल्या सेवास्तर सुधारणा आराखड्याला (एसएलआयपी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (२० एप्रिल) मंजुरी देण्यात आली. सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या या आराखड्यानुसार महापालिकेचा हिस्सा उभा करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव सभेत कोणतीही चर्चा न होता मंजूर करण्यात आला.

स्मार्ट सिटी योजनेच्या यादीतून ऐनवेळी वगळल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा, जलनिःस्सारण, उद्यान, पावसाळी गटर योजना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्याचा सुमारे तीन हजार १९८ कोटी रुपये खर्चाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. त्यापैकी एक हजार ६६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून, ५३३ कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. तर, उर्वरित एक हजार ५९९ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला उभारावी लागणार आहे. या प्रकल्पांची आणि सुधारणांची अंमलबजावणी करण्यास तसेच आवश्यक तरतूद (महापालिका हिस्सा उभा करणे) करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात यावेत, अशी शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे केली होती. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या.

या योजनेंतर्गत सुधारणा (रिफॉर्म्स) टप्पे आणि कालावधी (टाइमलाइन) याबाबतही स्पष्टता करण्यात आली आहे. त्यामध्ये ई-गव्हर्नन्स, महापालिका संवर्गाबाबत घटना व व्यावसायिकता, द्विनोंद लेखा पद्धतीचा अवलंब करणे, नागरी नियोजन आणि शहर पातळीवर योजना, शासकीय निधी व सेवांविषयी वर्गीकरण करणे, इमारत बांधकाम उपविधी आढावा, राज्यस्तरावर आर्थिक मध्यस्थ संस्थेची व्यवस्था करणे, महापालिका कर आणि शुल्क सुधारणा, वापरानुसार शुल्क आकारणी करणे व वसुली करणेकामी सुधारणा करणे, पतदर्शक मूल्यांकन, ऊर्जा आणि पाण्याचे लेखापरीक्षण, स्वच्छ भारत अभियान यांचा समावेश असून कामे पूर्ततेचा कालावधी निश्चित केला आहे.



सेवास्तर सुधारणा आराखडा (आकडे कोटी रुपये)

प्रकल्पाचे नाव / केंद्र सरकारचा हिस्सा / राज्य सरकारचा हिस्सा / मनपा हिस्सा / एकूण

पाणीपुरवठा वितरण / ३३३.३० / १६६.७० / ५००.०० / १०००.००

जलनिःस्सारण प्रकल्प / ९३.८० / ४६.९२ / १४०.७२ / २८१.४४

बागा-उद्याने प्रकल्प / ३७.०१ / १८.५१ / ५५.५३ / १११.०५

पावसाळी गटर योजना / ४४२.९६ / २२१.५४ / ६६४.५० / १३२९.००

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था / १५९.१० / ७९.५८ / २३८.६८ / ४७७.३६

एकूण / १०६६.१७ / ५३३.२५ / १५९९.४३ / ३१९८.८५

महत्त्वाचे निकष आणि सुधारणा

- भौगोलिक सूचना प्रणालीद्वारे मास्टर प्लॅन

- शहरी विकास प्राधिकरणाची स्थापना

- पाच वर्षात १५ टक्के हरित क्षेत्र वाढविणे

- बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना

- किमान ९० टक्के करवसुली करणे

- शंभर टक्के कचरा गोळा करून वाहतूक

- ग्रीन इमारतींसाठी प्रोत्साहन देणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभयारण्यांवर ड्रोनचे ‘वॉच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वृक्षतोड, अवैध शिकार, मानवी अतिक्रमण आणि वणव्यांमुळे संकटात सापडलेल्या अभयारण्यांना वाचविण्यासाठी वन विभाग आता ड्रोनची (अनमॅन्ड एरियल व्हेइकल) मदत घेणार आहे. मध्य प्रदेशमधील पन्ना वन्यजीव अभयारण्यात यशस्वी झालेल्या प्रयोगानंतर महाराष्ट्रातील प्रकल्पांमध्येही ड्रोनच्या साह्याने वृक्षाच्छादन आणि वन्यजीवांवर 'वॉच' ठेवण्यात येणार आहे.
प्रगत देशांमध्ये आत्तापर्यंत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात फोटोग्राफीसाठी केला जात होता. मात्र, त्यांनीही आता वनक्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन वापरायला सुरुवात केली आहे. रशिया, अमेरिका, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेमधील जंगलांमध्ये ड्रोनचा सर्रास वापर होत असून तेथील वनाधिकाऱ्यांना गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास यशही आले आहे. भारतामध्ये सध्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप वापरले जात आहेत. वनाधिकाऱ्यांचा याचा फायदा झाला आहे. जंगलातील घडामोडींचे पुरावेही मिळाले आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता ड्रोनच्या साह्याने जंगलांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या आशियायी व्याघ्र संवर्धन मोहिमेदरम्यान केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली या वेळी महाराष्ट्रात राष्ट्रीय पातळीवरील स्वतंत्र व्याघ्र संशोधन संस्था स्थापन करण्याची मागणी केली. याशिवाय, अभयारण्यांवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यास परवानागी द्यावी, असा प्रस्तावही दिला आहे. पुढील आठवड्यात जावडेकर यांच्याबरोबर मुंबईत मुनगंटीवार यांची बैठक होणार असून त्यावेळी ड्रोनसंदर्भात चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रातील काही छोट्या जंगलांमध्ये आम्ही सुरुवातीला ड्रोनचा वापरणार आहोत. त्यातून मिळणारे निष्कर्ष पाहिल्यानंतरच कोणत्या प्रकारच्या जंगलांमध्ये याचा उपयोग करायचा, हे निश्चित होईल. प्रत्येक जंगलाचा प्रकार, तेथील वृक्षांचे प्रकार, घनता वेगवेगळी असल्याने ड्रोनचा वापर करताना सगळ्यांनाच एकच नियम लागू होणार नाही, असे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांनी सांगितले. ड्रोनच्या वापरामुळे वृक्षतोडीला आळा बसणार असून जंगलातील आच्छादनाची माहिती पुराव्यांसह उपलब्ध होणार आहे. जंगलामध्ये दर वर्षी मोठ्या प्रमाणात वणवे लागत असून बहुतांश ठिकाणी माणसांनीच हेतूपुरस्सर आग लावलेली असते. या वेळी दुर्मिळ वनसंपदेबरोबरच अनेक लहान मोठे वन्यजीवही मृत्युमुखी पडतात. या ड्रोनमुळे वणव्यांनाही लगाम लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या प्रकरणी पोलिसांनी, रोहित उर्फ चक्रधामी दलबहादूर भंडारी (३५, रा. कल्याणीनगर), रमेश मानबहाद्दूर ठकुल्ला (३०, रा. विमाननगर), भरत श्रीपती कोल्हापुरे (२६, रा. विमाननगर, मूळ उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध एका १६ वर्षीय मुलीने विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी मुलीला आरोपी भंडारीने खाकरमिटा सिलीगुडी येथून ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याचे आणि चांगला पगार देण्याचे अामिष दाखवून पळवून आणले. तिला विमाननगर येथे संजय पार्क येथे डांबून ठेवले. त्यादरम्यान आरोपींनी तिच्याशी जबरी संभोग केला. तसेच तिला गुंगीचे औषध देऊन अनेक व्यक्तींशी जबरदस्तीने संभोग करण्यास भाग पाडले. या दरम्यान पिडीत मुलगी गरोदर असताना तिचा गर्भपात घडवून आणला. पिडीत मुलगी दिल्लीला निघून गेली असता परत येण्यासाठी मोबाइलवरून धमकी दिली. या प्रकरणी १०५ आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपींची नावे निष्पन्न करुन तपास करायचा आहे, यासाठी आरोपींची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी कोर्टात केली.

ऑनलाइन फसवणूक

ऑनलाइन फसवणुकीसाठी आरोपींकडून वेगवेगळे बनाव करत असताना आता 'महावितरण'च्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पाषाण येथील निवृत्त न्यायाधीश असलेल्या ६५ वर्षांच्या व्यक्तीची १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुरलीधर पातळे (वय ६५, रा. पाषाण) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पाषाण लिंक रोडवरील क्रिस्टल गार्डन येथे असताना पातळे यांना आरोपींनी फोन केला होता. मुंबईतून 'महावितरण'च्या मुख्य कार्यालयातून बोलस असल्याचा बनाव आरोपींनी केला होता.

चार लाखांची फसवणूक

शिवाजीनगर येथील मोबाइलची विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून चार लाख ६० हजार रुपयांचे 'अॅपल' कंपनीचे मोबाइल खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चेतन ओसवाल (वय ३१, रा. शिवाजीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मेहुल जयंतीलाल ठक्कर (रा. सॅलिसबरी पार्क), जयंतीराम चेलाराम ठक्कर आणि आश्विन चेलाराम ठक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन ओसवाल यांचा मोबाइल विक्री तसेच रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. आरोपींनी गेल्या दोन महिन्यांच्या काळात ओसवाल यांच्याकडून चार लाख ६० हजार रुपयांचे अॅपल कंपनीचे मोबाइल खरेदी केले होते. या पैशांची परतफेड झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यात ‘डीपी’ सरकारकडे सादर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
आरक्षणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल करून त्यात समतोल साधणारा महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नगर विकास विभागाने या आराखड्याच्या छाननीचे काम पूर्ण केले आहे.
हा आराखडा राज्य सरकारला सादर झाल्यानंतर राज्याच्या विकास समितीकडून त्याची पडताळणी होणार आहे. या पडताळणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून त्यावर अंतिमतः शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यासाठी किमान तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर जुन्या हद्दीचा विकास आराखड्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे.
या जुन्या हद्दीच्या विकास आराखडयाला महापालिकेने निर्धारित मुदतीमध्ये मंजुरी न दिल्याने तो राज्य सरकारने ताब्यात घेतला. त्यानंतर या आराखड्याचे काम विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या समितीकडे सोपविण्यात आले. या समितीने विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आलेल्या ९३७ आरक्षणांची फेरतपासणी केली. या फेरतपासणीमध्ये अनावश्यक वाटलेली ३९० आरक्षणे वगळण्याचा निर्णय या समितीने घेतला आणि काही नवी आरक्षणांचा समावेश करून ५७९ आरक्षणे कायम केली. चोक्किलंगम यांच्या समितीने आरक्षणांची संख्या कमी केल्यामुळे मात्र शहरात मोठा वाद झाला. ही आरक्षणे वगळल्यास शहराच्या विकासाला बाधा येईल, अशी टीका करण्यात आली.
नगर विकास विभागाने अंतिम केलेला हा आराखडा राज्य सरकारला सादर झाल्यानंतर नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील विकास समितीमार्फत त्याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्यावर आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान तीन ते सहा महिन्यांचा कालवधी लागेल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाकुमार रविवारी पुण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येऊन दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन अखेर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्रसंघाचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार येत्या रविवारी (दि. २४) पुण्यात येणार आहे. पर्वतीच्या साने गुरुजी स्मारकात दुपारी दोन वाजता रोहित अॅक्ट व संविधान परिषद होणार आहे.
परिषदेत कन्हैयाकुमार येणार असल्याने त्याच्यासह अन्य सहकाऱ्यांना पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी पुरोगामी युवक विद्यार्थी संघर्ष समितीने केली आहे. त्याच्या एक दिवस अगोदरच पोलिसांनी त्या परिसरात बंदोबस्त ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
'आमची समिती भारतीय संविधानाशी बांधिलकी असलेल्या संघटनांची समिती आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रचार करणे आमचे ध्येय आहे. या कार्याचा भाग म्हणून रोहित अॅक्ट व संविधान नावाने परिषद आयोजित करण्यात आली,' अशी माहिती ऑल इंडिया युथ फेडरेशनचे गिरीश फोंडे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, संदीप बर्वे यांनी पत्रकारांना दिली.

गायकवाड यांचा सभेला पाठिंबा

पुण्यात कन्हैयाकुमारच्या होणाऱ्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाकडून पाठिंबा देण्यात येणार असल्याचे आमदार जयदेव गायकवाड यांनी जाहीर केले. 'पुण्यात भाजपचे खासदार आणि आठ आमदार असतानाही पुण्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून, पुण्यावर राज्य सरकारने अन्याय केला आहे.' असा आरोपही त्यांनी केला.
'भाजपला अडचणीत आणणारी घटना घडल्यावर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नवीन प्रकरणांचा जाणीवपूर्वक गाजावाजा केला जातो. रोहित येमुलाचे प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) प्रकरण पुढे करण्यात आले. या प्रकरणातील कन्हैयाकुमारची पुण्यात सभा होणार आहे. त्या सभेला पाठिंबा दिला जाणार आहे. प्रत्येकाला विचारस्वातंत्र आहे.' असे आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे शहराबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करून गायकवाड म्हणाले, 'पुणे मेट्रो प्रकल्प मागे पडला आहे. कचरा, नदी सुधार योजना, वाहतुकीचा प्रश्न याबाबत विधिमंडळात सरकारने टोलवाटोलवीचे उत्तरे दिली. विकास आराखड्याच्या प्रश्नाकडे सरकार गंभीर्याने पहात नाही. गेल्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही.' भाजप सरकारचा कोणताच गृहपाठ नाही, अशी टीका करून ते म्हणाले, 'या सरकारमधील एकाही मंत्र्याचा अभ्यास नाही. दुष्काळाच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठीच श्रीधर अणे यांच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढे करण्यात आला.जनतेचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. एक रूपयातील अवघे ११ पैसे विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे.'


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयपीएल’द्वारे एक कोटीचा महसूल

$
0
0

पुणे ः गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० च्या तीन सामन्यांपोटी १ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. हा महसूल जिल्हा करमणूक कर कार्यालयामध्ये जमा करण्यात आला आहे.
इंडियन प्रीमियर लीगचे सात सामने गहुंजे येथील स्टेडियममध्ये घेण्यात येणार होते. या सामन्यांसाठी काही लाख लिटर पाणी लागणार होते. राज्यातील धरणांमध्ये असलेला अपुरा पाणीसाठा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा, अशी याचिका हाय कोर्टात दाखल झाली. त्यावर महाराष्ट्रात ३० एप्रिलनंतर होणारे सामने रद्द करून ते इतर राज्यात घ्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले. गहुंजे येथील स्टेडियममध्ये २२ एप्रिल रोजी पुणे सुपर जायन्टस विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २४ एप्रिल रोजी पुणे सुपर जायन्टस विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आणि २९ एप्रिलला पुणे सुपर जायन्टस विरुद्ध गुजरात लायन्स असे तीन सामने होणार आहेत. त्यानंतरच्या सामन्यांवर हायकोर्टाच्या आदेशांचे बंधन राहणार आहे. 'आयपीएल' तीनच सामने तूर्त या स्टेडियममध्ये होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदेंनी उलगडली फाशीची ‘दुसरी गोष्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अफझल गुरू व कसाब या दोन दहशतवाद्यांना फाशी देण्याचा अधिकार मला सुप्रीम कोर्ट व संसदेमुळे मिळाला. कर्तव्य म्हणून मी फाशीच्या आदेशावर सही केली. दुसरी गोष्ट या चित्रपटामध्ये विक्रम गोखलेंनी तीच सही करताना जे काही हावभाव केले ते बरेच काही सांगून गेले. देशावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना दयामाया दाखवता कामा नये, असा संदेश त्यांनी हावभावातून दिला. खऱ्या गृहमंत्र्याला जे जमले नाही, ते पडद्यावरील गृहमंत्र्याने करून दाखवले,' असे सांगून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 'त्या' फाशीमागील 'दुसरी गोष्ट' बुधवारी उलगडली.

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सातव्या राजा परांजपे महोत्सवाची सांगता बुधवारी झाली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना शिंदे यांच्या हस्ते 'राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. उद्योजक भारत देसडला, प्रतिष्ठानचे प्रमुख अर्चना राणे व अजय राणे या वेळी उपस्थित होते.

'माझ्या जीवनावर असणाऱ्या दुसरी गोष्ट या चित्रपटात गोखले यांची चाल देशाच्या गृहमंत्री पदाला शोभेल अशीच होती. प्रत्यक्षात मी तसा कधी चालू शकलो नाही,' असे वक्तव्य शिंदे यांनी केले. 'मी मोठा गुंड झालो असतो. तेव्हाही प्रसिद्धी मिळाली असती; पण चित्रपटाने माझे आयुष्य बदलून टाकले,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.
'राजाभाऊ म्हणजे समृद्ध जाणिवा असणारे दिग्दर्शक होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मोठा सन्मान आहे. मी तो कायम जपून ठेवणार आहे,' अशी भावना गोखले यांनी व्यक्त केली. 'राजाभाऊंनी ज्या काळात चित्रपट काढले, तेव्हा तंत्रज्ञान नव्हते; पण आजच्या तरुण कलाकारांनी त्यामागील हेतू समजून घ्यायला हवा. आपण हिचकॉकचे चित्रपट पाहतो, तसे राजाभाऊंचे चित्रपट पाहणे हे कर्तव्य व अभ्यास आहे,' अशी सूचना त्यांनी केली.

'ढेकणांकडे दुर्लक्ष'

फेसबुक; तसेच लग्नाशी संबंधित वेबसाइटवरून कोणाशीही संपर्क करताना पुरेशी खबरदारी घ्या. केवळ व्हर्च्युअल मैत्रीतून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारच्या ओळखीतील मित्रांनी काहीही कारण सांगून पैशांची मागणी केली तरी पैसे देऊ नका. शक्यतो अनेकदा म​हिला आपली फसवणूक झाल् याचे घरात, पालकांना सांगत नाहीत. आपल्या पालकांना आपल्या मित्रांची माहिती द्या. जेणेकरून फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>