Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चाकणला प्रतीक्षा प्राधिकरणाची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आणि जागतिक स्तरावर 'ऑटो हब' म्हणून उदयास आलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्रपणे 'चाकण औद्योगिक प्राधिकरण' स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

लवकरच 'चाकण औद्योगिक प्राधिकरण' अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्र विकसित झालेल्या महाळुंगे, खालुंब्रे, निघोजे, नाणेकरवाडी, खराबवाडी, कुरुळी, सावरदरी, वासुली, शिंदे, वराळे आणि भांबोली या अकरा गावांमध्ये हे प्राधिकरण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रस्तावित प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर या औद्योगिक क्षेत्राचा अधिक सुनियोजित पद्धतीने विकास होण्यास मदत होईल.

चाकण येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश कड पाटील यांनी संबंधित प्राधिकरण स्थापन होण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. या संदर्भात हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चाकण औद्योगिक प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा अनुकूल प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद २४३-थ मधील तरतुदीस अनुसरून राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी औद्योगिक नगरी स्थापनेबाबतची तरतूद महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम ३४१-च अन्वये आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या माध्यमातून नगरपरिषद हद्दीबाहेर लगतच्या अकरा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील नागरिकरणाचा प्रभाव नगर परिषदेसह संबंधित बाधित अकरा गावांवर पडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामनदीच्या पात्रात राडारोड्याचे भराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध
विधातेवस्तीजवळ असलेल्या रामनदी पात्रवरील नवीन पुलाशेजारी राडारोडा टाकून भराव केले जात आहेत, तर काही ठिकाणी नदी पात्र अरुंद करण्यात आले आहे.

मेडी पाइंट ते बाणेर रस्त्यालगत अनेक ठिकाणी राडारोडा टाकण्यात आला आहे. राडारोडा रामनदी पात्रात, तसेच मुळा नदीच्या कडेला असलेल्या परिसरात टाकण्यात येत असल्याने या परिसातील नैसर्गिक प्रवाहांना अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणाचे नुकसान झाले आहे.

बाणेर स्मशानभूमीजवळ अनेक ठिकाणी मुळा नदीच्या पात्रात भराव टाकण्यात आले असून अनाधिकृत कामे झाली आहेत. या मुळे नदीच्या पात्रालगत असलेला नैसर्गिक उतार व जैव विविधतेला धोका निर्माण झाला आहे. रस्त्या लगत टाकण्यात येणाऱ्या राडारोड्याकडे प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. अनेकदा या परिसरातील ओढे व नाले, तसेच नदी पात्रालगत असलेल्या झाडांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विधातेवस्तीवरील नवीन पुलाजवळील रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या केबलना येरवड्यात आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नगर रोडवरील विमानतळ पोलिस ठाण्याच्या शेजारील मोकळ्या जागेवर पालिकेकडून टाकण्यात आलेल्या केबलना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठी लाग लागली. केबलची संख्या अधिक असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. पोलिसांनी विविध गुन्ह्यात पकडलेल्या चार गाड्या या आगीत जळाल्या, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेवर पालिकेकडून खराब झालेल्या केबल टाकण्यात आल्या होत्या. या केबलच्या बाजूलाच पोलिसांनी विविध गुन्ह्यांत पकडलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने ठेवलेली आहेत. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक केबलनी पेट घेतला. परिसरातील केबलची संख्या अधिक असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यात चार गाड्या खाक झाल्या.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. केबलना आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडचे बस पार्किंग रद्द करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने केवळ पार्किंग करण्यासाठी परवानगी दिलेल्या कोथरूड येथील जागेचा दुरुपयोग ट्रॅव्हल कंपनीकडून केला जात असल्याचा आरोप होत आहे. करारापेक्षा अधिक बस येथे उभ्या केल्या जात असून संबधित कंपनीने बस दुरुस्ती (गॅरेज), तसेच वॉशिंग सेंटर सुरू केल्याने आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार शिवशाही प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली गोरडे यांनी केली. महापालिका आयुक्तांनी तातडीने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी या भागातील नागरिकांना घेऊन गोरडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

कोथरूड सर्व्हे नंबर ७९मधील पीएमपीएमएलच्या बस पार्किंगची जागा एका ट्रॅव्हल्स कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. पालिकेबरोबर केलेल्या करारापेक्षा अधिक बस या ठिकाणी उभ्या केलेल्या असतात. गॅरेज, बस धुण्यासाठी वॉशिंग सेंटर या कंपनीने सुरू केल्याने दिवसभर बसचा आवाजाने परिसरातील नागरिकांना त्रास होतो. पौड रोडला बस पार्किंगची जागा उपलब्ध असतानाही आता डीपीरोड शांतीबन गणपती मंदिरासमोर असलेल्या नागरी वस्तीमध्ये बस पार्किंगसाठी जागा देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला. या भागात बसडेपोच्या पार्किंगसाठीची कोणतीही आवश्यकता नाही. या भागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले राहत असल्याने येथील पार्किंग रद्द करून तेथे लहान मुलांसाठी उद्यान, क्रीडांगण तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारावे, अशी मागणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गोरडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंनिसचे ‘चलो दिल्ली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात होत असलेली दिरंगाई, रोहित वेमुला याची आत्महत्या व देशातील वाढते असहिष्णुतेचे वातावरण या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. समितीतर्फे १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जतंर-मंतर येथे निदर्शने करण्यात येणार असून अशा घटना घडून काहीच भूमिका न घेणाऱ्या सरकारला आंदोलनातून हलविण्यात येईल, असा इशारा समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने होत नाही. आतापर्यंतच्या तपासातून ठोस काहीही हाती लागलेले नाही, अशी टीका पाटील यांनी केली. तपासात होत असलेली दिरंगाई, वेमुला याची आत्महत्या व देशातील वाढते असहिष्णुतेचे वातावरण या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी जतंर-मंतर येथे निदर्शने करण्यात येणार असून साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते व पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. तपास गतीने व्हावा यासाठी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यांची भेट घेतली असून राष्ट्रपती व पंतप्रधान यांची भेट घेणार आहोत. गोविंद पानसरे यांचा पहिला स्मृतिदिन २० फेब्रुवारी रोजी असून त्यानिमित्त राज्यभरात सर्व ठिकाणी अभिवादन फेरी व निषेध सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

'उपासनेचा अधिकार प्रत्येकाला'

'घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला उपासनेचा अधिकार आहे. सर्व धर्मातील महिलांना उपासनेचा अधिकार मिळावा, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका असून शनिशिंगणापूर येथील महिलांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून सरकार पळ काढत आहे. मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्याला बगल दिली असून मंदिर विश्वस्तांच्या सोयीची भूमिका सरकारने घेतली आहे,' अशी टीका समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.

सर्व धर्मातील महिलांना उपासनेचा अधिकार मिळावा, मंदिरात प्रवेश करता यावा, यामागणीसाठी समितीने मुंबई हायकोर्टात २०००मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या मुद्द्यावर समिती १५ वर्षांपासून लढत आहे, याकडे लक्ष वेधून पाटील म्हणाले, 'कोर्टाकडून निकालाची अपेक्षा आहे. सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने कोर्टाने याबाबतीत लक्ष घालावे. जनहित याचिकेला पूरक असा अर्ज नुकताच दाखल केला आहे.' शनिशिंगणापूर येथील चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडने केलेल्या आंदोलनाविषयी विचारले असता, आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हक्कांचे सुलभीकरण किंवा स्टंट म्हणून अनिंस याकडे पाहात नाही. उलट सरकारची भूमिका निर्णायक असून सरकारच या प्रश्नापासून पळ काढत आहे. मंदिर समितीला पूरक अशी भूमिका सरकारने घेतली असून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला बगल दिल्याची टीका पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवानांना प्रेरणा दिनी मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले अमर रहे...शहीद अजमेरसिंह अमर रहे... भारत माता की जय अशा जयघोषात आणि घोषपथकाच्या तालावर शहीद अधिकारी, जवानांना मानवंदना देण्यात आली. फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेतर्फे शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कॅप्टन गोडबोले व त्यांचे सहकारी २००३ साली जम्मू येथे ऑपरेशन पराक्रम अंतर्गत कारवाईत शहीद झाले होते.

प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, चारित्र्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता, खडक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक इप्पल, उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, ६३ इंजिनिअर्स रेजिमेंटचे कॅप्टन आकाश पाटील, उदयभानसिंह, चंदुकाका गोडबोले, प्रशालेचे राहुल यादव आदी उपस्थित होते.

सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड, कवायती, स्मारकाचे पूजन आणि शहीदांचे स्मरण करून अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. गोडबोले कुटुंबीयांतर्फे सैनिकी शाळेला ११ हजार रुपयांची कायम ठेव देण्यात आली. लोकसेवा प्रतिष्ठानने सहकार्य केले. अशोक मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल यादव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराने केले ३० तोळ्यांचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
घरातील व्यक्ती बाहेर गेल्याचे कळाल्यावर नोकराने बंगल्यात घुसून ३० तोळे सोन्यासह एक लाख रुपये रोख, असा नऊ लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोलापूर रोडलगत असलेल्या कुमार विंडोज सोसायटीमध्ये सोमवारी हा प्रकार घडला.

हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वामन भगवान भुरे वय (५० रा. कुमार विंडोज, सोलापूर रोड, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत जीवन विष्णू कर्मा, त्याची पत्नी नीरू कर्मा (मूळ रा. भूज, कच्छ, गुजरात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वामन भुरे हे कुमार विंडोज येथे मागील दोन महिन्यांपासून राहत आहेत. भुरे यांच्याकडील वॉचमन काही कामानिमित्त गावी गेला आहे. तत्पूर्वी त्याने कर्मा दांपत्याला भुरे यांच्याकडे कामाला ठेवले होते. विष्णू कर्मा घरातील साफ सफाईचे, वॉचमनचे काम करत असे, त्यामुळे त्याला घरातील सर्व गोष्टी माहिती होत्या. सोमवारी सकाळी घरातील सर्वजण वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचा गैरफायदा घेत कर्मा दांपत्याने बेडरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघविरोधात हवीत आधुनिक माध्यमे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलेल्या आधुनिक माध्यमांचा वापर करूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक लढा देण्याची वेळ आता आली आहे. भारतीय संविधानाची मूल्ये तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी आपल्याला मार्ग बदलावे लागणार आहेत,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी व्यक्त केले.

सामाजिक कृतज्ञता निधी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण डॉ. आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार अब्दुल कादर मुकादम यांना, राम आपटे प्रबोधन पुरस्कार प्रा. विलास वाघ यांना आणि एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार मनीषा तोकले यांना देण्यात आला. या वेळी प्रा. सुभाष वारे, अन्वर राजन आणि अनिवाश पाटील उपस्थित होते.

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक साम्यवादी आणि समाजवाद्यांना शत्रू मानतात. वैचारिक लढाई करण्यास मात्र ते तयार नाहीत. समाजाला आपले शोषण होते याची जाणीव झाली असून, तरुण मंडळी या विरोधात पुढे येत आहेत. या धर्तीवर संविधानाची मूल्ये तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. मानवमुक्तीच्या चळवळीसाठी डिजिटल संस्कृतीचा वापर करून जिद्दीने पुढे गेले पाहिजे. संघाने निर्माण केलेल्या आव्हानाचा नव्या मार्गाने लढा देण्याची गरज आहे,' असे सांगून आढाव यांनी संघाला सत्तेच्या भ्रमात नका, असा सल्लाही दिला.

हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान विषमतेवर उभे आहे. या तत्त्वज्ञानाने भारतीय मन काळाच्या मागे नेले आहे. शनिशिंगणापूरमधील महिला प्रवेशाचा वाद हे याचे उत्तम उदाहरण आहे. मुळातच आपल्या परंपरा आणि चालीरिती विषमतेवर आधारीत आहेत. जागतिक पातळीवर लोक आपल्याला या वादामुळे हसत असतील. सामाजिक घडी सुरळीत करण्यासाठी प्रबोधनाची गरज असून 'बुद्धिस्ट फिलॉसॉफी' हा उतारा ठरणार आहे, असे वाघ यांनी सांगितले. तोकले यांनी मनोगत व्यक्त केले.

..

धर्मनिरपेक्षतेवर शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये तसेच सामाजिक पातळीवर सातत्याने चर्चा होते, संशोधनेही झाली आहेत. पण आजपर्यंत धर्मनिरपेक्षतेचा अन्वयार्थ आणि थेट व्याख्या करण्यात आपण कमी पडलो आहोत. समाजात माजलेल्या अराजकला संपविण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून धर्मनिरपेक्षतासाठी एकत्र आले पाहिजे.

- अब्दुल कादर मुकादम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्ताधारी करवाढीविरोधात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, अशी चर्चा करून केंद्र आणि राज्य सरकारने पुणेकरांची फसवणूक केली आहे. स्मार्ट सिटीसाठी नागरिकांना वाढीव कराचा बोजा सहन करावा लागणार असल्याने आमचा करवाढीला विरोधच राहणार असल्याचे पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी मंगळवारी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटीमधून अनेक सुविधा मिळणार असल्याची थाप केंद्र आणि राज्य सरकारने मारल्याने आम्ही सभागृहात स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. मात्र, आता नागरिकांमध्ये जनजागृती होत असून टप्प्याटप्प्याने स्मार्ट सिटीची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे या शहराध्यक्षांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी योजनेत सुविधा पाहिजे असतील तर, वाढीव कर भरावाच लागेल, असे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची स्मार्ट सिटीबाबत कोणती भूमिका आहे, या बाबत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना विचारले असता, या दोघांनी नागरिकांवर वाढीव कर लादण्यास कडाडून विरोध केला.

स्मार्ट सिट‌ीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना अनेक सुविधा मिळणार असल्याची भुरळ केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांवर पाडली. त्यामुळे शहर स्मार्ट होणार असेल तर, विरोध कशाला करता अशी भूमिका घेऊन स्वयंसेवी संस्थांनी या योजनेला पाठिंबा दिला. नागरिकांची भूमिका लक्षात घेऊनच काँग्रेस, राष्ट्रवादीने सभागृहात हा प्रस्ताव मान्य केला. मात्र, आता स्मार्ट सिटीबाबत राज्य आणि केंद्र सरकारने केलेला खोटेपणा समोर येत आहे. सोयीसुविधांसाठी वाढीव कर द्यावा लागणार असल्याची भूमिका आता सरकारच्या वतीने घेतली जात असल्याने या करवाढीला दोन्ही पक्षांचा विरोध राहणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटीचा मार्ग खडतर

स्मार्ट सिटीमधील खोटेपणा आता नागरिकांच्या लक्षात येत असून, नागरिकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. पालिकेत सत्ताधारी पक्ष म्हणून कोणतीही करवाढ करण्यास आमचा विरोध असून सभागृहात नागरिकांच्या हिताच्या दृष्टिने पाठिंबा दिला जाईल, असे छाजेड यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराचा देशात दुसरा क्रमांक मिळविला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा मार्ग अवघड असल्याचे संकेत यानिमित्त मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थक्रांतीचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विक्रीकर विभागाकडून पुणे जिल्ह्यातील फक्त एक लाख सात हजार व्यापाऱ्यांकडूनच विक्रीकर गोळा केला जातो. प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची संख्या दहा लाखाहून अधिक आहे. याबाबत विक्रीकर विभागाने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अर्थक्रांती प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेडने विक्रीकर आयुक्तांना दिला आहे.

राज्याच्या विक्रीकर विभागाचा अनागोंदी कारभार 'मटा'ने उघडकीस आणला होता. त्या पार्श्वभूमीवर अर्थक्रांती प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने पुणे क्षेत्राचे अप्पर विक्रीकर आयुक्त ओ. सी. भांगडीया यांची भेट घेतली. त्या वेळी हा इशारा देण्यात आला. अर्थक्रांती जनसंसदचे प्रभाकर कोंढाळकर, ब्रिगेडचे राज्य संघटक अजय भोसले, शहराध्यक्ष सम्राट थोरात, सागर अल्हाट, जोतिबा नरवडे तसेच अर्थक्रांतीचे सुरेखा जुजगर, खलीद सय्यद, महेश वनशीव, समीर इंदलकर, दर्शन गोरे उपस्थित होते.

'पुणे जिल्ह्यात दहा लाखाहून अधिक व्यापारी असताना केवळ एक लाख सात हजार व्यापाऱ्यांकडून विक्रीकर गोळा होत असल्याची वस्तुस्थिती धक्कादायक आहे. विक्रीकर विभागाने याबाबत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल', असे कोंढाळकर आणि भोसले यांनी सांगितले.

'राज्य सरकार दररोज शंभर कोटी रुपये कर्ज घेऊन आपला खर्च भागवते. दुसरीकडे विक्रीकर विभागाच्या दुर्लक्षामुळे करोडोंच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना त्रास होत आहे. अर्थक्रांती प्रतिष्ठान त्यासाठी लढा देत आहे,'असे कोंढाळकर यांनी सांगितले. अन्य देशातील कररचनेची माहिती व्यापक मेळाव्याद्वारे देण्यात यावी, चिटफंड व मल्टि लेव्हल मार्केटिंग कंपन्यांच्या विक्रीकराबाबतचे धोरण स्पष्ट करावे, आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातील वृद्धांच्या काळजीपोटी नोकरीवर गदा

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले पतीपत्नी, आईवडिलांच्या औषधोपचाराची काळजी घेताना आर्थिक तरतुदीसाठी धावपळ करणाऱ्या घरातील नातेवाइकांना (केअरगिव्हर्स) चक्क नोकऱ्या सोडाव्या लागल्या आहेत. शिवाय अनेकांचे व्यवसाय देखील बंद पडल्याने कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जागतिक कॅन्सरविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सरग्रस्तांसाठी प्रतिबंधक उपायांपासून ते नव्या तंत्राबाबत चर्चा होत आहे. कॅन्सरग्रस्तांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या नातेवाइकांना 'केअरगिव्हर्स' म्हटले जाते. त्यांच्या मनाचा कानोसा कोठेच घेतला जात नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली. त्याबाबत कॅन्सरतज्ज्ञ आणि इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अॅन्ड पीडिअॅट्रिक ऑन्कॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे यांनी ''मटा'कडे त्या विषयीची निरीक्षणे नोंदवली.

'कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. सहा महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंत या आजाराचे उपचार सुरू असतात. कॅन्सर उलटला तर, त्याचे उपचार पाच वर्षांपर्यंत सुरू राहतात. कॅन्सरग्रस्त पती-पत्नी अथवा आई वडिलांसाठी घरातील कुटुंबप्रमुख व्यक्तींना औषधोपचाराची काळजी, पेशंटना मानसिक, शारिरीक आधार देताना त्यांच्याजवळ चोवीस तास थांबावे लागते. उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करणाऱ्या या केअरगिव्हर्सना अनेकदा नोकरी आणि पेशंटची काळजी घेणे अवघड जाते. त्यामुळेच पतीला कॅन्सर झाल्यावर पुण्यातील ४० टक्के महिलांनी इतर कोणताही विचार न करता नोकरी सोडली. तर पत्नीच्या आजारामुळे २० टक्के पतींना नोकरी सोडावी लागली आहे. कॅन्सरग्रस्त आई-वडिलांसाठी अमेरिकेसह अन्य देशात नोकरी करणाऱ्या मुलांना नोकरी सोडून घरी यावे लागते. कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी केअरगिव्हर्सपैकी अनेकांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने ते बंद करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आर्थिक आणीबाणीला सामोरे जावे लागते,' अशी माहिती डॉ. रानडे यांनी दिली.

कॅन्सरग्रस्तांची काळजी घेणारे केअरगिव्हर्स देखील मानसिकदृष्ट्या वेगळ्या परिस्थितीत जगत असतात. या पार्श्वभूमीवर कॅन्सर केअरगिव्हर्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले जाते, असे निरीक्षण डॉ. रानडे यांनी नोंदविले.

कॅन्सरग्रस्तांची काळजी घेण्यासाठी केअरगिव्हर्स'ना नोकऱ्या सोडाव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांपुढे आर्थिक संकट उभे राहते. परंतु, पेशंटबरोबर स्वतःची काळजी, आजार असल्यास वेळोवेळी औषधे घेण्याचा सल्ला केअरगिव्हर्स'ना दिला जातो.

प्रीती आठवले, समन्वयक, कॅन्सर केअरगिव्हर्स क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढवा जॅकवेलचा वापर क्षमतेच्या २५ टक्केच?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीच बेबी कॅनॉलमध्ये सोडले जात असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना पालिकेने शुद्ध केलेले पाणी पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याने त्याबाबत तातडीने खुलासा केला जावा, अशी मागणी होत आहे.

नदीतील अशुद्ध आणि अस्वच्छ पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतकऱ्यांना पिकांसाठी उपलब्ध करून देण्याकरिता मुंढवा जॅकवेल प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. परंतु, गेल्या वर्षीपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. सुरुवातीला बेबी कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने पालिकेने प्रकल्प वेळेत पूर्ण करूनही त्याचा वापर होत नव्हता. तर, आता मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची क्षमता ६५० एमएलडी असताना, दररोज केवळ १५० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जात असल्याची टीका सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या प्रकल्पाद्वारे दौंडपर्यंतच्या सुमारे ८० किमीपर्यंतच्या शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु, प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याने शेतकऱ्यांनाही पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाकडूनच कमी प्रमाणात पाणी सोडा, असे सांगितले गेले असल्यास, त्याबद्दलची वस्तुस्थिती जाहीर केली जावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यमवर्गीय राहणार विकासापासून वंचित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) वापराबाबत नागरिकांकडून हरकती-सूचना मागवून विपरित निर्णय घेण्याचा धक्कादायक प्रकार राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना विकासापासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सहा मीटरच्या रस्त्यावर टीडीआरच्या वापरावर बंधने लादल्याने अनेक पुनर्विकासासाठी उत्सुक असणाऱ्या अनेक छोट्या प्लॉटधारकांना फटका सहन करावा लागणार आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, येत्या रविवारी (७ फेब्रुवारी) त्याबाबत जनजागृती करण्यासाठी चर्चासत्र घेतले जाणार आहे. टीडीआरच्या वापराबाबतचे नवे धोरण सरकारने २८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले. त्याची अधिसूचना गेल्या वर्षी एप्रिलमध्येच प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती-सूचना मागवूनही त्याचा विचार न करता, मनमानी पद्धतीने निर्णय घेण्यात आल्याचे टीकास्त्र शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे यांनी सोडले आहे. नवीन टीडीआर धोरणाचा सर्वाधिक फटका पुणे महापालिकेला सहन करावा लागणार असून, त्यातून पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याची भीती देशपांडे यांनी व्यक्त केली.

पुणेकरांनी भाजपला भरभरून मतदान केले असले, तरी पुण्यातील बहुसंख्य नागरिकांची, मध्यमवर्गीयांची, झोपडपट्टीधारकांची नव्या नियमामुळे गैरसोय होणार आहे. तरी, तातडीने नवे आदेश रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्‍यांकडे करण्यात आली आहे. तसेच, या संदर्भात जनजागृती करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'आदेशाला स्थगिती द्या'

टीडीआरच्या वापरावर रस्ता रुंदी आणि मिळकतीच्या क्षेत्राच्या प्रमाणात अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती नागरी हक्क संस्थेच्या सुधीर (काका) कुलकर्णी यांनी व्यक्त केली. नव्या धोरणामुळे वाढीव टीडीआर निर्माण झाला, तरी तो वापरलाच न जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी कुलकर्णी यांनीही मुख्यमंत्र्‍यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देणगीच्या निर्णयाला स्थगितीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कर (एलबीटी) तसेच विविध माध्यमातून महापा​लिकेल मिळणारे उत्पन्न घटल्याने आगामी आर्थिक वर्षा‍त (२०१६-१७) सार्वजनिक संस्थांना देणगी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे सार्वजनिक संस्थांना देणगी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. आज, बुधवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना दर वर्षी महापालिकेच्या वतीने देणगी दिली जाते. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ८८ (आय) नुसार देणगी देण्यात येते. कोणत्याही संस्थेला तीन लाख रुपयांपर्यंत देणगी देण्याचा अधिकार नगर विकास विभागाने महापालिकेला दिला आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून द्यायची झाल्यास राज्य सरकारची मान्यता घ्यावी लागते. राज्य सरकारने २०१५-१६ या वर्षासाठी एलबीटी रद्द केल्यान पालिकेचे उत्पन्न घटले आहे. एलबीटीमधून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असल्याने तसेच, गेल्या दोन ते तीन महिन्यांत विविध माध्यमातून पालिकेला अत्यल्प उत्पन्न प्राप्त झाले आहे. पालिकेला मिळत असलेले उत्पन्न लक्षात घेता आगामी आर्थिक वर्षात कोणत्याही सार्वजनिक संस्थेला देणगी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये बंधनकारक असलेली देणगी वगळता अन्य कोणत्याही प्रकारची देणगी देण्यास पुढील आदेश होइपर्यंत स्थगिती द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅमिली कोर्टाला मुहूर्त कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्टासाठी उभारण्यात आलेली इमारत उद् घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून गेली सहा वर्षे या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अजूनही फॅमिली कोर्टाचे स्थलांतर करण्याचा मुद्दा प्रशासकीय कारणे सांगून फारसा गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

फॅमिली कोर्टाचे लवकर स्थलांतर करावे अशी मागणी पक्षकार आणि वकिलांकडून वेळोवेळी होत आहे. सध्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, केवळ फर्निचरअभावी स्थलांतर रखडले आहे. भारती विद्यापीठ भवनातील सातव्या आणि नवव्या मजल्यावर सध्या फॅमिली कोर्टाचे कामकाज सुरू आहे. येथील जागा अपुरी पडू लागली असून, पक्षकारांना बसण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नाही.

स्वच्छतागृहाची दुरवस्था, वकिलांना व्यवस्थित चेंबर नाही, लहान मुलांच्या समुपदेशनासाठी पुरेशी जागा नाही आदी अडचणी येत असूनही कोर्टाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे वकिलांकडून फॅमिली कोर्टाचे लवकर स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

'फॅमिली कोर्टासाठी नवीन इमारत बांधून तयार आहे. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे स्थलांतर करण्यास उशीर होत असल्याची कारणे संबंधितांकडून सांगण्यात येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेने त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. फॅमिली कोर्टातील कामकाज इतर कोर्टांपेक्षा वेगळे असते. कौटुंबिक स्वरूपाचे वाद असल्यामुळे ते अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणे आवश्यक असते. सध्याच्या फॅमिली कोर्टातील जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक प्रश्न जाणवत आहेत. नवीन जागेत स्थलांतर झाल्यास काही चांगल्या उपाययोजनाही राबविणे शक्य होतील,' असे अॅड. अभय आपटे यांनी सांगितले. शिवाजीनगर आणि फॅमिली कोर्टात एकाच वेळी तारखा असल्यास व​कील आणि पक्षकारांची धावपळ होते. मिली कोर्टातील न्यायाधीश वकील हजर होण्याची वाट पाहत नाहीत. त्याचा परिणाम केसच्या निकालावर होतो. फॅमिली कोर्टाच्या फर्निचरसाठी निधी उपलब्ध नसल्याची कारणे सांगण्यात येतात. जे फर्निचर उपलब्ध आहे त्यातही नव्या इमारतीत कामकाज सुरू करता येईल. नवीन इमारतीत फॅमिली कोर्टाचे स्थलांतर झाल्यास ज्युनियर वकिलांना कामाची चांगली संधी उपलब्ध होईल, असे मत अॅड. सुप्रिया कोठारी यांनी व्यक्त केले.

...

फॅमिली कोर्ट प्रकरणांची सद्यस्थिती

वर्ष ओपनिंग केसेस नवीन निकाली प्रलंबित

२०१० ५,००२ ५,१२४ ४,७५१ ५,३७५

२०११ ५,३७५ ४,१७१ ४,९४० ४,६०६

२०१२ ४,६०६ ६,२४९ ६,३२८ ४,४७३

२०१३ ४,४७३ ४,२७२ ४,२८३ ४,४६२

२०१४ ४,४६२ ४,२३४ ४,३४९ ४,३४७

फॅमिली कोर्टाचा घटनाक्रम

३ डिसेंबर २००८ : फॅमिली कोर्टासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी नऊ कोटी ४९ लाखाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर.

२८ मे २००९ : सरकारकडून प्रस्ताव मंजूर, दहा कोटी १३ लाखाचा निधी मंजूर.

फेब्रुवारी २०१३ : पुणे महापालिकेकडून फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीत चौथा आणि पाचवा मजला वाढविण्यास परवानगी.

२२ ऑगस्ट २०१३ : आणखी दोन मजले वाढविण्यासाठी १४ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर.

२१ जानेवारी २०१५ : १६ कोटी ६७ लाख रुपयांचे पुनर्प्रस्ताव सादर.

२ जुलै २०१५ : सरकारकडून परत प्रस्ताव पाठविण्यात आला.

२३ जुलै २०१५ : फॅमिली कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रमुखांची सही असलेला प्रस्ताव परत हायकोर्टाकडे पाठविण्यात आला.

२७ ऑगस्ट २०१५ : हायकोर्टाकडून संबंधित प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला.

२२ डिसेंबर २०१५ : फॅमिली कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांकडून फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे तीन मजली बांधकाम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रुपी’ संचालकांकडून १४९० कोटी वसूल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुपी सहकारी बँकेची सहकार खात्याकडून २००२पासून सुरू असलेली चौकशीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून, डॉ. किशोर तो​ष्णीवाल यांच्या अहवालात ६९ जणांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामध्ये १५ तत्कालीन संचालक आणि ५४ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्याकडून १४९० कोटी ४४ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी धरण्यात आलेल्या संचालकांपैकी ​चौघांचे आणि पाच अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसांकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

दोषी धरण्यात आलेल्या संचालकांमध्ये गायत्रीदेवी पटवर्धन, शशिकुमार भिडे, खुशालचंद छाजेड, ग. हे. देव, महादेव नातू, माजी आमदार विश्वास गांगुर्डे, काशिनाथ पेमगिरीकर, रेखा कुलकर्णी, सुभाष जेऊर, महादेव भंडारे, ईश्वरदास चोरडिया, संजय अहेर, कमलाकर भदे, श्रीराम यादव आणि अनंतराव कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यापैकी छाजेड, नातू, पेमगिरीकर आणि अनंतराव कुलकर्णी या संचालकांचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसांकडून रक्कम वसूल करण्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.

दोषी अधिकाऱ्यांपैकी तत्कालीन सरव्यवस्थापक प्रकाश कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक शशिकांत पत्की, अशोक अधावडे, नितीन पंडित आणि मधुकर तिखे या अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. या बँकेतील वाहन कर्ज घोटाळ्यामध्ये असलेले तत्कालीन महाव्यवस्थापक महेंद्र दोशी आणि उपमहाव्यवस्थापक प्रशांत गोरे हेदेखील दोषी ठरले आहेत. वाहन कर्ज घोटाळाप्रकरणी हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या चौकशीमध्ये ८७ जणांविरुद्ध दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी १८ जणांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये तीन संचालक असून, त्यांचे निधन झाले आहे. उर्वरित १५ अधिकारी दोषमुक्त झाले आहेत.

या बँकेवर २००२ मध्ये रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध आणले. त्यानंतर फेब्रुवारी २००२ मध्ये सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. नोव्हेंबर २००२ मध्ये कलम ८८ नुसार आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशीला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून चौकशीचे फेरे सुरू होते. 'चौकशीची प्रक्रिया २० जुलै २०१५ रोजी पूर्ण होऊन अहवाल तयार करण्यात आला. अहवाल जाहीर करण्यापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. २० जानेवारी २०१६ रोजी कोर्टाने अहवाल जाहीर करण्यास परवानगी दिली. त्यानुसार अहवाल जाहीर करण्यात आला आहे,' असे डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसांनी दाखवली वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरातून रागावून आलेली... वाट चुकलेल्या, हरवलेल्या ५७ मुलामुलींचा 'ऑपरेशन स्माइल' अंतर्गत रेल्वे पोलिसांनी शोध घेतला आहे. त्यापैकी ३६ मुलांची पालकांसोबत भेट घडविण्याची किमयाही रेल्वे पोलिसांनी घडवून आणली आहे. त्यातील २१ बालकांना निरीक्षक गृहात ठेवण्यात आले आहे.

अठरा वर्षांखालील हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी राज्यात जानेवारी महिन्यात 'ऑपरेशन स्माइल टू'चे आयोजन करण्यात आले. त्यानुसार बालकांचा शोध विविध पोलिस दलांकडून घेण्यात आला. पुणे रेल्वे पोलिसांनी ही मोहीम यशस्वीपणे राबवून हरवलेल्यांनी घराची वाट दाखवली. ही मुले रेल्वे फ्लॅटफॉर्मवर फिरत होती, साहित्याची विक्री करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पुण्यातील पंधरा वर्षांची मुलगी घरातील जाचाला कंटाळून रेल्वेने उत्तर प्रदेशात निघाली होती. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांच्या पथकाने तिचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले. त्याबरोबरच रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डवर हरविल्याची नोंद असणाऱ्या दोन लहान मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. मोरे म्हणाले, की ' रेल्वे पोलिसांनी ५७ लहान बालकांचा शोध घेतला. त्यापैकी ३१ मुले आणि पाच मुलींना कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आले आहे. २१ बालके निरीक्षक गृहात ठेवण्यात आली असून, त्यामध्ये १९ मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे.'

शहर पोलिसांचीही कौतुकास्पद कामगिरी

शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडूनही 'ऑपरेशन स्माइल टू' अंतर्गत दोन मुलांचा शोध घेऊन त्यांना स्वगृही पाठविण्यात आले. शिवाजीनगर येथील निरीक्षण गृहात दाखल करण्यात आलेल्या बालकांच्या पालकांचाही शोध घेतला जात आहे. वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक निरीक्षक नीता मिसाळ, उपनिरीक्षक दीपक सप्रे, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, प्रमोद म्हेत्रे यांच्या पथकाने शिवाजीनगरातील निरीक्षण गृहात १३ आणि २३ जानेवारी रोजी दाखल झालेल्या दीपुकुमार जगलालसिंग यादव (१६, रा. संझोली, ता. आंचल, जि. रोहतास, बिहार) आणि मंगेश उर्फ मंगलदास श्रावण ढाकरे (१२, रा. पेडीपोकरी, ता. महागाव, जि. यवतमाळ) यांच्या पालकांचा शोध घेतला. पालकांना पुण्यात बोलावून बालकांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा राजीनामा; उपमहापौर ‘गुल’

$
0
0

पुणेः पक्षाने निश्चित केलेला कार्यकाळ संपल्याने पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला. महापौरांसह उपमहापौरही बदलण्यात येणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले असले, पदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका उपमहापौर आबा बागूल यांनी घेतल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार धनकवडे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील दोन ते तीन आठवड्यात शहराला नवीन महापौर मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत धनकवडे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. मंगळवारी संध्याकाळी महापौर धनकवडे यांनी नगरसचिव कार्यालयाकडे राजीनामा दिला. हा कार्यालय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला जाणार असून आयुक्तांमार्फत पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शहराला नवीन महापौर मिळतील, असे चव्हाण यांनी सांगितले.

महापौरांचा राजीनामा; उपमहापौर 'गुल'

महापौर बदलाबरोबरच काँग्रेसकडे असलेले उपमहापौरपद बदलण्यात येइल, असे काँग्रेसच्या वतीने जाहीर केले होते. मात्र, या पत्रकार परिषदेला बागूल यांनी दांडी मारली. महापौरांनी राजीनामा दिला असला तरी आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका बागूल यांनी घेतल्याची चर्चा पालिकेत सुरू होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना विचारले असता, बागूल यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरुड दुर्घटनेतील मृतांवर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुरुड येथील एकदरा समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात बुडालेल्या पुण्यातील चौदाही विद्यार्थ्यांवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोंढवा आणि आबेदा इनामदार कॉलेजच्या परिसरात व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. कॉलेजच्या आवारात खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता. कोंढवा-हडपसर परिसरातील तब्बल दहा विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने या परिसरातील नागरिक सुन्न झाले होते.
दरम्यान, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या मदकी सैफ अहमद विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी मिळाला. एका स्थानिक कोळ्याने मदकीचा मृतदेह गाळात रुतल्याचे पाहिले होते. स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पोस्टमार्टेमनंतर दुपारी दोनच्या सुमारास तो पालकाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांना पुण्यात आणण्यासाठी तीन बसची सोय करण्यात आली. या सर्व पहाटे चारपर्यंत पुण्यात आल्या. रायगड आणि पुणे पोलिस दलाचे दोन जवान या बसमध्ये होते. पोलिसांच्या उपस्थितीत तब्बल १०२ विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले; तर मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यासाठी अॅम्बुलन्स पाठवण्यात आल्या होत्या. सकाळच्या सुमारास अॅम्बुलन्स पुण्यात पोहोचल्या. त्यानंतर या सर्व पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मदकी अहमदचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी उशिरा पुण्यात पोचले.

घटनास्थळ धोकादायकच खाडी आणि समुद्र जेथे मिळतात, अशा ठिकाणी हे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना पाण्यात जाऊ नका, असे बजावले होते. भरतीच्या वेळी या ठिकाणी भोवरा तयार होतो आणि हा भोवरा अधिक धोकादायक असतो. पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही हा भोवरा पार करणे अवघड बनते. या वेळी एक विद्यार्थी पाण्यात बुडाल्याचा आरडाओरडा ऐकला आणि आम्ही त्यांच्या मदतीला धावलो. तोपर्यंत इतर विद्यार्थीही पाण्यात अडकले. होड्या घेऊन तेथे पोहोचून काही विद्यार्थ्यांना वाचवू शकलो, अशी माहिती स्थानिक रहिवासी रवींद्र साखरकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत बांदल यांचा बंडाचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांसह सर्व विषय समितीच्या सभापतींना राजीनामा देण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली असली तरी काही पदाधिकारी राजीनामा देण्यास अनुत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातून हकालपट्टी केलेले बांधकाम सभापती मंगलदास बांदल हे राजीनाम्याबाबत काय भूमिका घेतात याविषयीही उत्सुकता आहे.

पुणे महापालिकेच्या महापौराबरोबरच जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याची सूचना पक्षनेत्यांनी केली आहे. त्यानुसार महापौर दत्ता धनकवडे यांनी पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्यासह अन्य सभापतींनी राजीनामा द्यावा, असा संदेश जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष कामठे यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बांधकाम सभापती बांदल यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे बांदल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. जिल्हाध्यक्ष कामठे यांनी तसे जाहीरही केले. मात्र, त्यानंतरही बांदल हे सभापतिपदावर कायम राहिले. जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीत बांदल यांनी, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत किंवा कसे याचा जिल्हाध्यक्षांनी प्रथम खुलासा करावा, असे सांगितले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून बांदल यांच्यावर कारवाई झाल्याचे या वेळी जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले. परंतु, तशी वस्तुस्थिती नसल्याचा दावा बांदल यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा आहे. आता निवडणुकीला जेमतेम काही महिने उरले असताना राजीनामे कशासाठी घेता अशी कुजबूज सुरू झाली आहे. बांदल यांच्यासह काही पदाधिकारी राजीनामा देण्यास अनुत्सुक आहे. तसेच प्रथम अध्यक्षांचा राजीनामा घेऊन तो मंजर करावा, मगच अन्य सभापतींचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images