Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खिंडीतील राष्ट्रवादीचा हल्लाबोल?

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने राष्ट्रवादीवर सुरू केलेले कुरघोडीचे राजकारण, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर साधला गेलेला निशाणा, सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर अजित पवार यांनी दिलेला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अशा राज्यातील स्फोटक राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून (शनिवार) बालेवाडीला होत आहे.

शताब्दी, दुरांन्तोची पँट्री महागली

$
0
0
सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅटमुळे रेल्वेमध्ये कंत्राटदारांकडून चालवण्यात येणा-या डायनिंग कारमधून विक्री होणाऱ्या पदार्थांसाठी प्रवाशांना जादा किंमत मोजावी लागणार असली तरी दुसरीकडे रेल्वेच्या खानपान सेवेतर्फे विक्री करण्यात येणा-या चहा, पाणी, जेवणाच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

डीपीतील बदलांनी मेट्रोला खो

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यात मेट्रो प्रकल्पाला खो घालण्याचा प्रयत्न झाला असल्याचे उघडकीस आले आहे. भांबुर्डा येथे मेट्रो स्टेशनसाठी असलेली जागा बदलून संबंधित ठिकाण निवासी करण्यात आले आहे.

जुंदल आणि बेगला एकत्र पाहिले होते

$
0
0
‘एलईटी या संस्थेसाठी काम करीत आहोत, असे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग सांगत असे; मात्र ‘एलईटी’ म्हणजे ‘लष्कर-ए-तयब्बा’ ही कुख्यात दहशतवादी संघटना आहे, असे समजले,’ अशी साक्ष बेगच्या कॅफेमध्ये काम करणाऱ्या एका मित्राने शुक्रवारी कोर्टात दिली.

तारिक यांची कॅबिनेटमध्ये वर्णी?

$
0
0
केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ घातलेल्या प्रस्तावित फेरबदलात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार तारिक अन्वर यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

पुण्याच्या पालकमंत्रीपदी सचिन अहिर

$
0
0
पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची शिफरस करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाणत्या नेत्यांनी अनेकांना धक्का दिला. अहिर हे आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

माझी प्रकृती खणखणीत

$
0
0
‘उपचार करणा-या तरूण डॉक्टरने, ‘साहेब तुमचे सहाच महिने उरले आहेत. काही कागदपत्रे तयार करायची असतील तर करून घ्या,’ असा सल्ला दिला होता. या गोष्टीला देखील आता दहा वर्षे झाली आहेत. झालेल्या आजारने खचून न जाता मनाची ताकद आणि त्याजोडीला घेतलेली मेडिकल ट्रीटमेंट याच्या जोरावर आज मी ‘कॅन्सर’पासून पूर्णपणे मुक्त झालो आहे,’ असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी सांगितले.

शत्रूंसह ‘मित्रां’नाही चोख प्रत्युत्तर देणार

$
0
0
सिंचन घोटाळ्यापासून बांधकाम खात्यातील भ्रष्टाचारापर्यंत मित्रपक्षाबरोबरच विरोधकांकडून केल्या जाणा-या टार्गेटला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी पुण्यात सुरू झालेल्या अधिवेशनात जोरदार कंबर कसली.

‘२८ गावांच्या पायाभूत सुविधेचा आढावा घ्या’

$
0
0
पुणे महापालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या २८ गावांच्या विकासासाठी नेमका किती निधी लागेल याचा आढावा घेऊन माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका आयुक्त महेश पाठक यांना शनिवारी केली. सिंचन घोटाळ्यातील अधिका-यांच्या चौकशीचे आदेश आपण यापूर्वीच दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘बॅकबेंचर्स’ही घेताहेत आता ‘भरारी’!

$
0
0
शिक्षकांची ‘परीक्षा’ पाहणा-या ‘बॅकबेंचर्स’मधील ‘गुणां’ना वाव देत व्यक्तिमत्त्व विकासाच्या वर्गात त्यांना अव्वल बनविण्याच्या प्रयोगाला यश आले आहे. दंगेखोरी कमी होण्याबरोबर त्यांचे हस्ताक्षर-बुद्धिमत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पुण्यासह नवी मुंबई, पनवेल, कळंबोली, सासवड आणि बारामतीमधील ‘बॅकबेंचर्स’साठी राबविण्यात आलेल्या या प्रयोगाचा लाभ पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे.

आगामी निवडणुका काँग्रेससोबतच!

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबतच राहणार असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिला. मात्र, निवडणुकीबाबतची काँग्रेसची भूमिका वेगळी असेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिलिंडरबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ

$
0
0
केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरला सबसिडी देण्याबाबतचा निर्णय घेतला. काँग्रेसप्रणित राज्यात जादा तीन सिलिंडर देण्याची घोषणा केली. परंतु, महाराष्ट्रात अद्यापही जादा सिलिंडरचा ठोस निर्णय झालेला नाही, ते देण्यासाठी राज्यसरकार जाणीपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

९० हजारांच्या गुटखा जप्तीची कारवाई

$
0
0
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दोन व्यापा-यांकडे छापा घालून त्यांच्याकडील ९० हजार रुपयांचा गुटखा जप्तीची कारवाई शनिवारी करण्यात आली. पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिका-यांनी ही कारवाई केली.

केंद्रीय मंत्रिमंडळासाठी तारिक अन्वर यांचे नाव

$
0
0
केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या एका रिक्त जागेवर पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार तारिक अन्वर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, खासदार सुप्रिया सुळे यांचा नाही, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी (२० ऑक्टोबर) स्पष्ट केले.

पनवेलचे मावळे पुणेकरांना भावले

$
0
0
‘आयुष्याविषयी आपण फार वाईट बोलतो; पण जेव्हा मृत्यू आपल्या समोर उभा राहतो, त्यावेळी आपल्याला आयुष्याचं महत्व समजतं. मृत्युच्या दाढेत सापडलेल्या ‘प्रतीक’ला प्रबळ गडावरच्या कलावंतीणीच्या सुळक्यावरून खाली आणल्यानंतर मला ते समजलं. घरी गेल्यावर आई-वडिलांजवळ खूप रडलो...’ पनवेलचा अक्षय गुजर सांगत होता.

नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
सातारा येथे आरोग्य विभागात नोकरी लावून देतो असे सांगून १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच एकाच्या डोक्याला पिस्तुल लावून को-या कागदावर सही घेतल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

MSEB च्या अधिका-याला लाच घेताना अटक

$
0
0
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इलेक्ट्रशियन कॉन्ट्रॅक्टरकडून दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एका कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सापळा रचून अटक केली.

बेगशी भेट झाली होती

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मिर्झा हिमायत बेगशी १३ फेब्रुवारी २०१० रोजी औरंगाबाद मधील रोशनगेट येथील एका रिसेप्शनमध्ये रात्री साडेआठ वाजता भेट झाली होती, अशी माहिती एका साक्षीदाराने शनिवारी कोर्टात दिली.

बेकायदा बांधकामविरोधी कारवाई थंडावली

$
0
0
शहरातील बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांकडून २८ ऑक्टोबरपर्यंत बंदोबस्त पुरवण्यास पुणे पोलिसांनी असमर्थता दर्शवल्याने महापालिकेच्या कारवाईचा जोर कमी झाला आहे. नवरात्रौत्सव, दसरा आणि बकरी ईद असल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आर्थिक धोरणांची धरसोड परवडणार नाही

$
0
0
पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी (इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट) जगभरातील खासगी भांडवलाला मोठ्या प्रमाणावर सहभागी करुन घेण्याचे धोरण भारताला अवलंबावे लागणार आहे. याबाबत घेतलेले निर्णय फिरविणे यापुढे देशाला परवडणार नाही, असे मत बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच ‘एचडीएफसी’चे चेअरमन दीपक पारेख यांनी शनिवारी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images