Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अभिनव शाळेने मारली बाजी!

0
0
नवीन पिढीला निसर्ग, पंचतत्त्व, वनसंधारण आणि त्याला अनुसरून असणाऱ्या पर्यावरणाचे महत्त्व कळावे, या हेतूने ‘ट्री पब्लिक फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या फेस्टिव्हलमध्ये अभिनव शाळेने पहिला क्रमांक मिळवला. तसेच, आहिल्यादेवी, भारती विद्यापीठाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. ‘एन्व्हार्यमेंट आर्ट अँड थिएटर फेस्टिव्हल’ नावाने झालेल्या या महोत्सवाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर होता.

आबांची स्वबळाची हाळी

0
0
‘हातात हात घातलेले पायात पाय घालत आड येतातच. आता नांदेड महापालिका निवडणुकीतून स्वबळाची सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेपासूनच वेगळी चूल मांडेल,’ असे सांगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत शनिवारी पुण्यात दिले.

आगामी निवडणुका काँग्रेस सोबतच

0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबतच राहणार असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी दिला. मात्र, काँग्रेसची निवडणुकीबाबतची भूमिका वेगळी असेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातही ६४ मजली इमारती

0
0
मुंबईच्या धर्तीवर पुण्यात २०० मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी देण्याचे जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यात सुचविण्यात आले असल्याने, पुण्यामध्ये आता तब्बल ६४ मजल्यांपर्यंच्या गगनचुंबी इमारती पहायला मिळणार आहेत. सध्या पुण्यात १०० मीटर म्हणजेच २७ मजल्यांपर्यंत इमारती बांधण्यास परवानगी दिली जाते.

मी पूर्णत: कॅन्सरमुक्त!

0
0
'साहेब तुमचे सहाच महिने उरले आहेत. काही कागदपत्रे तयार करायची असतील तर करून घ्या,' असा सल्ला डॉक्टरने दिला होता. त्यालाही आता दहा वर्षे झाली आहेत. झालेल्या आजाराने खचून न जाता मनाची ताकद आणि मेडिकल ट्रीटमेंट यांच्या जोरावर मी 'कॅन्सर'पासून पूर्णपणे मुक्त झालो आहे,' असे शरद पवार यांनी सांगितले.

अवसामान्यांना समजून घेणे आवश्यक

0
0
मागील बाकांवर बसून दंगामस्ती करणे यातच अनेकदा या विद्यार्थ्यांना रस असतो. पण अशा ‘अवसामान्यां’ना समजून घेणे आवश्यक असते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

आरोपांचा खेळ थांबवाः अजितदादा

0
0
हल्ली काहींना चार वाजल्यावर पत्रकार परिषद घेतल्याशिवाय चैन पडत नाही. चार कागदं दाखवायची, कुणावर तरी आरोप करायचे, ते सिद्ध करायची गरज नसल्यानं त्यांचं काहीच जात नाही. पण, क्षणिक प्रसिद्धीसाठी देशाची पत घालवण्याचा हा खेळ थांबायला हवा, अशी टिप्पणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.

मालमोटारीने दोघींना चिरडले

0
0
देवीच्या दर्शनासाठी पहाटे पायी निघालेल्या एका शेतकरी कुटुंबावर रविवारी पहाटे मोठी दुर्घटना ओढवली. पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालमोटारीने जोराची धडक मारून दोन महिला चिरडल्या गेल्या तर तीन जण गंभीर जखमी झाले.

चित्रपट संकलक अविनाश ठाकूर यांचे निधन

0
0
चित्रपट संकलक आणि दिग्दर्शक अविनाश राजा ठाकूर (५८) यांचे रविवारी मध्यरात्री कोल्हापुरात निधन झाले. मराठी चित्रसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक राजा ठाकूर यांचे ते चिरंजीव होत.

भंडारद-यातलं पाणी जायकवाडीत

0
0
मराठवाडयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे नमते घेत राज्य सरकारने अखेर नगर जिल्हयातील भंडारदरा धरणातून रविवारी अडीच टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ केला. हे पाणी प्रवरा नदी पात्रातून २१० किलोमीटर अंतर कापत जाणार आहे.

उद्योगनगरीत आता ‘किड्स सिटी’

0
0
शाळा-शाळा किंवा डॉक्टर- डॉक्टर खेळणे हा लहानग्यांचा आवडता खेळ ! आपले आई-वडील ज्या प्रकराचे काम करतात, तोच अनुभव चिमुकल्यांना या वयात घ्यावासा वाटत असतो. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये लवकरच किड्स सिटी साकारली जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच मुलांच्या जिज्ञासूवृत्तीला यातून वाव मिळण्यास मदत होणार आहे.

मागणीमुळे फुलांचे भाव वधारले

0
0
नवरात्रोत्सव सुरू होताच फुलांना उठाव आला असून पहिल्या दिवसापासूनच शेवंतीसह पिवळा झेंडूचे भाव वधारले आहेत. नगर, नाशिक, शिर्डी परिसरातून फुलांची आवक होत असून पुढील आठवड्यापासून स्थानिक पातळीवरून फुलांची आवक सुरू होणार आहे.

शहरात रंगताहेत गरबा नाइट्स

0
0
नवरंगात रंगलेल्या तरुणाईच्या रास-दांडिया आणि गरबाने पिंपरी-चिंचवडमधील नवरात्रौत्सवाला आगळा साज चढत आहे. उत्सवाचे आणखी तीन दिवस बाकी असताना सर्वत्र वैविध्यपूर्ण दांडिया स्पर्धांचे वातावरण शहरात आहेत.

‘अग्रसेन’च्या संचालकांविरोधात तक्रार दाखल

0
0
खडकीतील अग्रसेन महाराज पतसंस्थेच्या संचालकांच्या विरोधात फसवणूक आणि भेदभाव करत असल्याची तक्रार कोरेगावपार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्याअधारे पतसंस्थेच्या संचालकांकडे गेली दोन दिवस चौकशी करण्यात येत आहे. मात्र, अशा तक्रारी खडकी पोलिस घेत नसल्याची माहिती पतसंस्थेच्या ठेवीदार आणि खातेदारींनी दिली.

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठीची नियमावली तयार

0
0
गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने नवीन नियमावली केली आहे. शिक्षेच्या घटत्या प्रमाणाची राज्य शासनाने दखल घेत ही नियमावली केली असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली.

दलित पँथर्सतर्फे आंदोलनाचा इशारा

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरित द्यावी, सर्व अनुदानित संस्थांमधील मागासवर्गीयांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात; तसेच मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी दलित पॅँथर्स रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

पटसंस्थेच्या चाचपणीसाठी विशेष मोहीम

0
0
देशभरामध्ये उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या पटसंस्थेची (जीईआर) चाचपणी करण्यासाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विशेष मोहीम उघडली आहे. देशभरातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित कॉलेजांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत.

१० हजार रिक्षांना CNG अनुदानाचा लाभ

0
0
प्रदूषणमुक्त शहरासाठी पुणे महापालिकेतर्फे सीएनजी किट बसविणा-या रिक्षांना देण्यात येणा-या अनुदानाचा लाभ यंदा तब्बल १० हजार रिक्षांना मिळणार आहे. या अनुदानाचे पहिल्या टप्प्यातील वाटप येत्या मंगळवारी (२३ ऑक्टोबर) महापौरांच्या हस्ते होणार आहे.

लष्करात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे

0
0
लष्करात भरती होण्यासाठी बनावट क्षेत्रिय भरती कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी लष्कराने दिलेल्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलाला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रताळ्यांची विक्रमी आवक

0
0
नवरात्रोत्सवातील उपवास सुरू असल्याने भाज्यांच्या मागणीत घट होत आहे. पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. घेवडा, गवार, कारली, पावटा, कोबी आणि फ्लॉवर स्वस्त झाली आहे. गेल्या आठवडाभरात रताळ्यांची सुमारे २० हजार ट्रकची आवक झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images