Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बांधकाम निर्बंधांबाबत आव्हान देणार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) संरक्षक भिंतीपासून तीन किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांमधील बांधकामांच्या उंचीवर निर्बंध आणण्याच्या नोटिफिकेशनला आव्हान देण्यात येणार आहे. तसेच एनडीएपासून वीस किलोमीटर हवाई अंतरातील बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी लष्कराची 'ना हरकत' घेण्यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय हवाई दलाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांना मंगळवारी ही माहिती दिली. लष्करी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिवणे गावाजवळ एनडीएने विमानतळ उभारले आहे. या विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू असून विस्तारीकरणानंतर ही धावपट्टी पाच हजार फूट लांब व शंभर मीटर रूंद होणार आहे. या धावपट्टीवर विमानांचे टेकऑफ व लँडींग होण्यात अडथळे येऊ नयेत यासाठी एनडीएने त्यांच्या संरक्षक भिंतीपासून तीन किलोमीटच्या अंतरातील वारजे, माळवाडी, शिवणे, उत्तमनगर व कोंढवे-धावडे या गावांतील इमारतींच्या उंचीवर निर्बंध आणण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

त्यासंदर्भात काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये वारजे आणि माळवाडी भागात १५ मीटरपेक्षा उंच इमारतीला परवानगी दिली जाणार नाही. तसेच शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे या गावांमध्ये ४५ मीटरपेक्षा उंच इमारत बांधण्यास मनाई येणार आहे. याशिवाय, या गावांमध्ये नव्या बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी एनडीएकडून ना हरकत (एनओसी) घ्यावी लागणार आहे. एनडीएच्या पत्रानुसार पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला (पीएमआरडीए) आता बांधकाम परवानगी देताना एनडीएची एनओसी घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविण्यात आले आहे.

मात्र, एनडीएच्या संरक्षक भिंतीपासून तीन किलोमीटर अंतरातील गावांमध्ये बांधकामांच्या उंचीवर निर्बंध आणण्याच्या नोटिफिकेशनला आव्हान देण्यात येणार आहे. लोहगाव विमानतळाची धावपट्टी वीस हजार फुटांची असताना फक्त ९०० मीटपर्यंत बांधकामांच्या उंचीवर मर्यादा आहेत. त्यामुळे एनडीएने एवढ्या मोठ्या अंतरावर निर्बंध घालण्यात अर्थ नसल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी स्पष्ट केले. लोहगाव विमानतळासाठी भारतीय हवाई दलाचे असलेले धोरण स्वीकारण्याबाबत आपण एनडीएला सूचविले आहे. तसेच एनओसी देण्याबाबत कालमर्यादा ठरवून द्यावी लागेल असे सांगण्यात आले आहे. विमानतळालगत बांधकाम परवानगीवर निर्बंध आणायचे असतील तर वर्क्स ऑफ डिफेन्स अॅक्टनुसार संबंधित जागामालकांना मोबदला द्यावा लागणार आहे. हा विषय फारच गुंतागुंतीचा असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांसमवेत येत्या पंधरा दिवसात बैठक घेणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


हवाई दलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे

एनडीएच्या विमानतळापासून किती उंचीवर बांधकाम परवानगी द्यायची याची माहिती नोटिफिकेशनच्या शेड्यूल दोनमध्ये देण्यात आली आहे. तसेच झाडे लावताना त्याची किती उंची असावी याचाही समावेश यात आहे. विमानतळापासून वीस किलोमीटरच्या हवाई अंतराच्या त्रिज्येत हे निर्बंध लागू आहेत. पुणे शहरासह पीएमआरडीएमधील मोठ्या परिसरात हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण व भारतीय हवाई दलाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूर्णत्वाचे दाखले देण्यास निर्बंध नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या संरक्षक भिंतीपासून तीन किलोमीटर अंतरावरील गावांत इमारतीच्या उंचीवर मर्यादा घालण्याचे नोटिफिकेशन निघाले असले तरी पूर्णत्वाला आलेल्या व बांधकाम आराखडे मंजूर झालेल्या इमारती यातून वगळण्यात येणार आहेत.

'एनडीए'ने निर्बंध लागू केलेल्या गावांमधील वारजे माळवाडी हे गाव महापालिका हद्दीत तर शिवणे, उत्तमनगर व कोंढवे-धावडे ही गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) येतात. संरक्षण खात्याने नोटिफिकेशन काढल्यानंतर त्यानुसार एनडीएकडून 'ना हरकत' घेण्याचे पत्र जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिले आहे.

मात्र, महापालिकेने यापूर्वी बांधकाम नकाशे मंजूर केलेल्या तसेच पूर्णत्वाला आलेल्या इमारतींना यातून वगळण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्यास कसलीही हरकत नसल्याचेही जिल्हाधिकारी राव यांनी स्पष्ट केले आहे. नोटिफिकेशन जारी होण्यापूर्वी या गावांमध्ये बांधकामे झाली आहेत. त्यामुळे या नोटिफिकेशनचा अंमल पूर्वलक्ष्यी प्रभावाने करता येणार नाही. नोटिफिकेशन जारी झाल्याच्या तारखेनंतरच्या बांधकामांचाच यापुढे एनओसीसाठी विचार केला जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

एनडीएच्या विमानतळासाठी लगतच्या शंभर मीटरच्या अंतरापर्यंत बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच यापूर्वी झालेली काही बांधकामे पाडावीही लागणार आहेत. बांधकाम मनाई व बांधकामांच्या उंचीचे निर्बंध यावरील स्पष्टता झालेली नाही. एनडीएला त्यासाठी एअर फोर्सच्या धोरणाचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्बंधांची गरज आहे याचाही विचार करण्याचे सूचविले आहे. यामध्ये स्पष्टता झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खुशाल पक्ष सोडा,कोणी विचारणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्ष सोडण्याविषयी कोणतेही आवाहन केलेले नाही. 'पक्ष सोडून गेले, तरी बाहेर कोणी हिंग लावून विचारणार नाही,' अशी टिप्पणी त्यांनी केल्याचा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी केला आहे.

शहरातील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक ठाकरे यांनी सोमवारी घेतली. या बैठकीत ठाकरे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी सौम्य भाषेत काही थेट विचार मांडले. तरीही, पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विनंतीवजा आर्जव करण्याची भूमिका त्यांनी आजवर कधीच घेतलेली नाही, याकडे शिदोरे यांनी लक्ष वेधले.

'ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. मात्र, त्यांना बाहेर कुठेही हिंग लावून विचारणार नाहीत. जे गेले, त्यांची काय अवस्था झाली हे पाहा', अशाच भाषेत त्यांनी सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना योग्य संदेश दिल्याचा दावा शिदोरे यांनी केला. तसेच, राजकीय पक्षात काम कसे करावे, याबद्दल त्यांनी केलेल्या मौलिक सूचनांमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्साह संचारला असल्याचे शिदोरे यांनी नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगत देशांपासून भारताने दूर राहावे : शिवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जागतिक तापमानवाढीमुळे ओढावलेल्या संकटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारीकरण सुरू झाले असून प्रगत देश विकसनशील देशांवर त्यांची विचारसरणी आणि औद्योगिक उत्पादने लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. पॅरिसमध्ये झालेल्या परिषदेमध्ये विकसित देशांनी भारताला मदत करण्याची तयारी दाखविण्यामागे छुपा अजेंडा आहे. आपण या प्रलोभनांपासून दूर राहिले पाहिजे,' असे मत पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. वंदना शिवा यांनी व्यक्त केले.

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे डॉ. शिवा यांचे 'द पॅरिस क्लायमेट चेंज अॅग्रीमेंट : व्हॉट शूड इंडिया अँड वर्ल्ड डू' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी एच. एम. देसरडा व राजस परचुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान बदल समितीने गेल्या पंधरा वर्षात घेतलेल्या विविध परिषदा आणि त्यातील निर्णय़ांचा धावता प्रवास शिवा यांनी मांडला. 'प्रगत देशांनी १९९२ मध्ये स्वतःवर काही बंधने लादून घेण्याबरोबरच विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य केले होते. कार्बन उत्सर्जन पाच टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय त्या वेळी निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षात अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पंधरा टक्क्यांनी उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे. या देशांनी गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीचे प्रलोभन दाखवून कार्बन उत्सर्जन वाढविण्याच्या प्रक्रियेत भारतासह इतर देशांना ओढून घेतले आहे. प्रगत तंत्रज्ञान देण्याचे निमित्त करून या देश आपली जीवनशैली, जैवविविधता, पारंपरिक शेती प्रक्रिया उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.

देशातील पीक उत्पादन प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षात वाढलेला रसायनांचा वापर, शेतकऱ्यांवर थोपलेली जनुकसंस्कारित पिकांमुळे घसरेली जमिनीची गुणवत्ता, धान्यातील घटते जीवनसत्त्व अशी उदाहरणे देऊन शिवा यांनी औद्योगिक क्रांतीचा शेती उत्पादनावर झालेल्या परिणामाचे वास्तव उलगडले. जैवविविधता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रासायनिक शेतीच्या माध्यमातून आलेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन तेलातील भेसळ, बीटी कॉटनमुळे औद्योगिक देशांनी आपल्याला परावलंबी केले आहे. एकीकडे विकसित देशात हरित अर्थव्यवस्थेला महत्त्व दिले जात असताना भारताने आपल्या परिसंस्थेकडे, जैवविविधतेकडे, तसेच ज्ञानपद्धतीकडे दुर्लक्ष केले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने वेळीच पावले उचली पाहिजेत, असा सल्ला शिवा यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृह नेत्याचे पिस्तूल चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचे सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे यांनी कारमध्ये ठेवलेले परवानाधारक पिस्तूल चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शंकर केमसे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केमसे यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी चाळीस हजार रुपये किंमतीचे परवाना धारक पिस्तूल आहे. ते त्यांनी त्यांच्या कारच्या चालकाशेजारच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. सात दिवसांनी त्यांनी कारची डिक्की उघडून पाहिली नाही. रविवारी सकाळी त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता त्यामध्ये पिस्तूल नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पिस्तूल चोरीला गेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी डीपी रस्त्यावरून एका उपजिल्हाधिकारी महिलेच्या मोटारीतून परवानाधारक पिस्तुल चोरीला गेले होते. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला काही दिवसांमध्ये अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विमिंग पूलमध्ये बुडूनविद्यार्थिनीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कर्वेनगर येथील मिलेनियम स्कूलमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा महापालिकेच्या मेंगडे स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना पोहण्याचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. या दरम्यान मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रिया नितीन कदम (वय ८ वर्षे, रा. शिवचैतन्य अपार्टमेंट, कोथरूड) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मिलेनियम स्कूलमध्ये शाळेच्या माध्यमातून तिसरीच्या विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीस दिवसांपासून शाळेकडून त्यांच्या विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी मेंगडे स्विमिंग पूलमध्ये नेण्यात येत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पोहण्याचा सराव सुरू असताना रियाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली. शाळेने मेंगडे स्विमिंग पुलाशी करार केला असून या शाळेच्या मुलांसाठी स्विमिंग पूलमध्ये राखीव वेळही ठेवण्यात आली आहे. रियासह काही विद्यार्थी- विद्यार्थिनींना घेऊन शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे दुपारी स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्या वेळी रिया खोल पाण्याच्या दिशेने गेली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडाली. ही घटना लक्षात आल्यावर तिला तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आले. लगेचच कोथरूड परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे ही घटना घडल्याची माहितीही या दरम्यान पुढे आली. तसेच, रियाला मंगळवारी अस्वस्थ वाटत होते. तिला पोहायचे नव्हते; मात्र स्विमिंग पूलावर आग्रह केल्यामुळे ती पाण्यात उतरली आणि काही मिनिटांतच ही घटना घडल्याचा आरोप उपस्थितांनी केला आहे. या विषयी शाळेचे संचालक अन्वित फाटक म्हणाले, 'शाळेमधून गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी केलेल्या करारानुसार या प्रशिक्षणासाठीचे प्रशिक्षक आणि सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी स्विमिंग पुलाकडे आहे. शाळेचे विद्यार्थी शाळेच्या बाहेर जात असल्याने आम्ही त्यांच्यासाठी शाळेचे शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत पाठवतो.' 'स्विमिंग पूलावर किती लाइफगार्ड‍्ची आवश्यकता असते, घटना घडली त्या वेळी किती गार्ड उपस्थित होते, रिया पाण्यात पोहत असताना तिच्याकडे संबंधितांचे लक्ष होते की नाही, ती खोल पाण्याच्या दिशेने कशी गेली आदी बाबींचा तपास करण्यात येणार आहे. तपासाअंती निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल,' असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असर’वर शिक्षकाचे प्रश्नचिन्ह

$
0
0

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : 'असर'च्या सर्वेक्षणासाठी विचारात घेतली जाणारी 'अर्ली ग्रेड रिडिंग असेसमेंट'ची (ईजीआरए) तत्त्वे सर्वेक्षणादरम्यान पाळली जात नसल्याचा दावा रणजितसिंह डिसले या प्राथमिक शिक्षकाने केला आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील शिक्षण व्यवस्थेचे चुकीचे वास्तव 'असर'मधून मांडले जात असल्याचा आरोपही डिसले यांनी केला आहे.

राज्यातीलच नव्हे, तर देशातील शैक्षणिक गुणवत्तेचे वास्तव सांगणारा अहवाल म्हणून 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेचा 'असर' हा शैक्षणिक अहवाल विचारात घेतला जातो. या अहवालासाठी चालणाऱ्या सर्वेक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली 'ईजीआरए'ची तत्त्वे विचारात घेऊन काम चालते. 'असर'मधून उपलब्ध होणारी आकडेवारी आणि या अहवालांच्या परस्परांशी केलेल्या तुलनेमधून ही तत्त्वे तंतोतंत पाळली जात नसल्याचे समोर आल्याचे डिसले यांनी सोमवारी 'मटा'ला सांगितले. डिसले यांनी 'असर'च्या गेल्या दहा वर्षांमधील अहवालांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले. त्यासाठी 'ईजीआरए'च्या निकषांसोबतच शिक्षणशास्त्रातील तत्त्वांचाही विचार करण्यात आला. गेल्या वर्षभर त्यासाठी केलेल्या संशोधनाअंती या निष्कर्षांपर्यंत पोहोचल्याचे डिसले यांनी सांगितले. या विषयी 'प्रथम'शी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संस्थेकडून त्या विषयी कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची बाबही त्यांनी याच निमित्ताने स्पष्ट केली.

..

अभ्यासासाठी या बाबींचा विचार...

राष्ट्रीय पातळीवरील 'यू-डाएस' या शैक्षणिक डेटाबेसमधून उपलब्ध असलेली आकडेवारी, 'असर'चे अहवाल आणि त्या वर्षाशी संबंधित विद्यार्थ्यांची चौथी-सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांमधील कामगिरी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून झालेल्या राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणातील (स्लॅश) विद्यार्थ्यांची कामगिरी, संबंधित विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल आदी बाबींची एकमेकांशी शास्त्रीयदृष्ट्या तुलना केल्यानंतर 'असर'मधून चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनाला आल्याचे डिसले यांनी सांगितले. 'असर'च्याच पद्धतीने होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सूचना देण्याची पद्धत बदलली, तर सर्वेक्षणाचे निष्कर्ष बदलतात हे सोलापूर जिल्ह्यातील प्रायोगिक सर्वेक्षणातून सिद्ध झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

..

डिसले यांचे महत्त्वाचे आक्षेप

-यू-डाएसच्या आकडेवारीनुसार राज्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढते, मात्र दुसरीकडे 'असर'साठीच्या शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी होत आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत 'असर'साठी विचारात घेतलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये ७.४५ टक्के घट. सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेसाठी घातक.

-सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ३० गावांची संख्या पाळली जात नाही. गावांच्या संख्येमध्ये साधारण २.२ टक्के तूट.

-शाळांच्या संख्येमध्ये ११ टक्के तूट. राज्यात एक टक्काही शाळांमधूनही सर्वेक्षण होत नसताना, सर्वेक्षणाचा निकालातून मात्र सर्व राज्याची परिस्थिती चित्रित होत असल्याचा दावा चुकीचा.

-'ईजीआरए'च्या निकषांनुसार सर्वेक्षणासाठी एकूण शाळांमधून जवळपास साडेचार हजार शाळांची निवड आवश्यक. प्रत्यक्षात ८७५ शाळांमधूनच सर्वेक्षण. आदर्श प्रमाणाच्या तुलनेत हे प्रमाण १८.७३ टक्के इतकेच.

-गणिताच्या सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांना गणिते निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. सर्वेक्षक सांगतील त्यापैकीच गणिते सोडविण्याचे बंधन. विशिष्ट मांडणीत गणिते सोडविण्याचा आग्रह चुकीचा.

..

सर्वेक्षणासाठी विचारात घेतली जाणारी संख्या ही संख्याशास्त्राच्या दृष्टीने प्रमाणित अशीच आहे. डिसले यांच्या इतर आक्षेपांबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतरच बोलणे रास्त ठरेल.

फरिदा लांबे, प्रथम संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीपाल सबनीसांची दिलगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचे आक्षेपार्ह शब्द मागे घेत असल्याचे जाहीर करून साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी याबाबतच्या वादावर मंगळवारी पडदा टाकला. 'माझ्या वक्तव्याने अनेक जण दुखावले आहेत, याची मला जाणीव आहे. पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख योग्य नाही. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो, फेकून देतो,' असे नमूद करून सबनीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. यामुळे पिंपरी येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरील वादाचे सावट दूर झाल्याचे मानले जात आहे. सबनीस यांनी एका कार्यक्रमात मोदी यांच्या लाहोर भेटीवर टिप्पणी करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. 'मंगेश पाडगावकर यांच्या आधी मोदींना श्रद्धांजली वाहावी लागली असती,' या त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक खासदारांपासून काही कार्यकर्त्यांनी सबनीसांच्या विरोधात निदर्शने केली होती. तसेच, सबनीस यांनी माफी मागावी; अन्यथा त्यांना संमेलनस्थळी फिरकू देणार नाही, अशी धमकीही देण्यात आली होती. सनातन संस्थेच्या वादग्रस्त ट्विटमुळे हा वाद चिघळला होता. हे संमेलन तोंडावर येऊनसुद्धा ती होणार किंवा कसे याबाबत यामुळे उलटसुलट मते मांडली जात होती. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी माफी नव्हे; तर दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. 'झाले गेले विसरून सर्वांनी संमेलनाला यावे, ते यशस्वी करावे,' अशी भावनिक सादही त्यांनी घातली. 'पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रभक्तीचा मी गौरवच केला आहे,' असे सांगून सबनीस यांनी आपण पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सांगितले. ५ जानेवारी रोजी पाठवलेले हे पत्र त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविले. 'मोदींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल अनेकांनी माझ्याजवळ नाराजी व्यक्त केली. एकेरी उल्लेखामुळे अनेकजण दुखावले गेल्याने मी माझे शब्द मागे घेतो. ते झटकून टाकतो,' असे सबनीस म्हणाले. यंदाचे साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरू होत असून, डॉ. पी. डी. पाटील त्याचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी त्यांनी मोठी तयारी केली आहे. सबनीसांच्या विधानामुळे होत असलेला वाद दूर करण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. मंगळवारी दुपारी ते सबनीसांशी बोलले आणि त्यानंतर सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एव्हरग्रीन ही मॅन’चे सहस्रचंद्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मखमली पडदा उघडताच झालेले 'ही मॅन'चे दर्शन... चाहत्यांकडून मिळालेले 'स्टँडिंग ओवेशन'... त्यांची छबी टिपण्यासाठी सरसावलेले मोबाइल... 'एव्हरग्रीन ही मॅन' म्हणून चाहत्यांतून आलेली आरोळी... अन् सदाबहार गाण्यांसह झालेले स्मरणरंजन...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त 'पल पल दिल के पास' हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात र‌‌सिकांनी हा सोहळा मनात साठवला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात धर्मेंद्र यांचा सत्कार करण्यात आला; तसेच त्यांच्या चित्रपटांतील गाणी, कारकिर्दीतील आठवणींनी रसिकांना भावविभोर केले. जितेंद्र भुरुक, प्रशांत नासेरी, धवल चांदवडकर, अली हुसेन, रेशमी मुखर्जी आदींनी गाणी गायली. संदीप पाटील यांनी धर्मेंद्र यांच्याशी संवाद साधला.

'घरी चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. वडील शिक्षक होते. त्यामुळे माझ्या चित्रपटप्रेमाला नेहमीच विरोध व्हायचा. नववीत असताना पहिल्यांदा दिलीपकुमार यांचा शहीद हा चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहण्यासाठी खूप दूर जावे लागायचे. पुढे जाऊन अभिनेता झाल्यावर रसिकांचे खूप प्रेम मिळाले. श्रीमंती डळमळीत असते. मात्र, मला श्रीमंतीपेक्षा खूप काही मिळाले. रसिकांच्या हृदयातच स्थान मिळल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो,' अशी भावना धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.

ती मगर होती....

'झिलमिल सितारों का आँगन होगा' हे गाणे सादर झाल्यानंतर धर्मेंद्र यांनी थरारक किस्सा सांगितला. या गाण्याचे चित्रीकरण वरळी लेक येथे सुरू होते. त्या वेळी लेकमधील एका दगडावर काहीतरी चमकत होते. धर्मेंद्र यांना ते फुल असेल असे वाटले. मात्र, त्या दगडाजवळ गेल्यावर ते फुल नाही, तर मगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बरीच पळापळ झाली होती.
..

पुण्याचे लोक माझे आहेत. येथे येऊन मला आनंद मिळतो. कित्येकदा गाडी चालवत आलो आहे. प्रभात स्टुडिओमध्ये माझ्या आयुष्यातील पहिला ऑटोग्राफ दिला होता.

- धर्मेंद्र, ज्येष्ठ अभिनेते


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयाच्या गच्चीवरून तरुणाची उडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॉलेजमधील तरुणीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याप्रकरणी सायबर सेलने चौकशीसाठी बोलाविलेल्या तरुणाने पोलिस आयुक्तालयाच्या गच्चीच्या पाठीमागील बाजूस मंगळवारी सायंकाळी उडी मारल्याची घटना घडली.

उडी मारल्यानंतर तरुण वायरला अडकून गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर खाली पडला. त्याला तातडीने ससूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सुजीत अजित प्रधान (वय १९, रा. मोरवाडी, पिंपरी) असे उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. सुजीत मोरवाडी येथील एसएनबीपी कॉलेजमध्ये बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. कॉलेजच्या तरुणीने आपल्या नावाचे फेसबुक अकाउंट तयार करून मैत्रिणींना मेसेज जात असल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी संबंधित आयपी अ‍ॅड्रेस शोधून त्याआधारे तपास केल्यावर हे अकाउंट मोरवाडीतील रणजीत प्रधान या सॉफ्टवेअर इंजिनीअरचे असल्याचे समोर आले.

सोमवारी रणजीत आणि त्याचा भाऊ सुजीत याला चौकशीसाठी सायबर सेलमध्ये बोलाविण्यात आल्याची माहिती सायबर शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. त्यानुसार मंगळवारी रणजीत, सुजीत आणि त्यांचा एक मित्र सायबर सेलकडे आले होते. तसेच, यावेळी तक्रारदार तरुणीही तेथे आली होती. चर्चेनंतर त्याच्या भावाने हे अकाउंट आपणच बनविले असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस रणजीतशी बोलत असताना बाहेर थांबलेल्या सुजीतने आयुक्तालयाच्या टेरेसवरून उडी मारली. पहिल्यांदा तो कार्यालयालगत असलेल्या केबल वायरला अडकून नंतर जमिनीवर पडला. घटनेनंतर पोलिस आयुक्त के. के. पाठक आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेफाम कारचालकाने दिली तीन दुचाकींना धडक

$
0
0

म. टा. प्रतिनधी, पुणे

फग्युर्सन रोड, जंगली महाराज रोडवरील नो एंट्रीतून भरधाव कार चालवत निघालेल्या युवकाने तीन ते चार दुचाकींना ठोकरले. यामध्ये दुचाकीवरून जाणारी युवती जखमी झाली आहे. नागरिकांनी पाठलाग करून या कारचालकास डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले. चालकाने मद्यपान केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेनिल बेन्नी निर्बान (वय १९, रा. पाषाण, मूळ रा. गुजरात) असे चालकाचे नाव आहे. या प्रकरणी समीर सदाशिव बेणे (वय ३४, रा. पौड रोड, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. निर्बान पाषाण येथील कॉलेजमध्ये विधिशाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे. मंगळवारी दुपारी मित्र-मैत्रिणींसमवेत बीएमसीसी रस्त्याने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आला. एकेरी वाहतूक असतानाही रानडे इन्स्टिट्यूटसमोरून गोपाळ कृष्ण गोखले चौकाकडे (गुडलक चौक) उलट दिशेने निघाला. या चौकात त्याने बेणे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे ते निर्बानच्या कारवर उडून पडले. परंतु, त्यांना फारसे लागले नाही. त्यानंतर त्याने जंगली महाराज रस्त्याकडे वेगात कार नेली. तेथेही नो एंट्रीतून तो बालगंधर्व रंगमंदिराच्या दिशेने भरधाव निघाला आणि आणखी एका दुचाकीस धडक दिली. त्यानंतर पथिक हॉटेलजवळून आपटे रस्त्याकडे वळला. त्याचा वेग पाहूनच रस्त्यातील लोकांना धडकी भरली होती.

आपटे रस्त्यावर ऑर्बिट हॉटेलजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या आणखी एकाला त्याने जोराची धडक दिली. त्यावर मागे बसलेली युवती गंभीर जखमी झाली. दरम्यान, अनेक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून आपटे रस्त्यावर त्याला पकडले. दरम्यान त्याच्या मित्रांनी पलायन केले. कारचालकाने मद्यपान केल्याचा आरोप नागरिकांनी केला.
..

जंगली महाराज रोडने तरुण उलटी कार चालवत आला. या कारमध्ये दोन मुली आणि तीन मुले असे पाचजण होते. त्याने दोन महिलांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्या थोडक्यात बचावल्या. हॉटेल पथिक जवळून तो आपटे रोडला गेला, तेव्हा ऑरबीट हॉटेलजवळ त्याला नागरिकांनी पकडले. चालकाने मद्यपान केले होते.

पंकज कुमार, प्रत्यक्षदर्शी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यात आणखी कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती, पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि पंधरा जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज पाहता शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात करण्याची गरज भासणार आहे. ही जादा पाणीकपात टाळण्यासाठी मुळशी धरणातून एक अब्ज घनफूट (एक टीएमसी) पाणी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिली.

शहराला पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. मान्सूनचे आगमन लांबले तर, पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांचा सद्यस्थितीतील पाणीसाठा, उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन, ग्रामीण भागातील ३१ ग्रामपंचायतींना पिण्यासाठी द्यावे लागणारे पाणी तसेच इंडस्ट्रीसाठी दिलेली पाण्याची हमी पाहता पुणे शहराला सध्या पुरविण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आणखी कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

धरणांत अपुरा पाणीसाठा असल्यामुले शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शेतीसाठी पाणी बंद करण्यात आले आहे. तथापि, शहराच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घ्यायची वेळ आली तर महापालिकेला विश्वासात घेतले जाणार आहे. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींशी एकत्र चर्चा करूनच त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले. शहराच्या पाणीकपातीची तीव्रता कमी करण्यासाठी मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी घेण्याचाही विचार करण्यात येत आहे. त्यासंदर्भात टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांनी पाणी देण्यास तयारी दाखविली आहे. मात्र, हे पाणी घेतल्यामुळे टाटा कंपनीच्या वीजनिर्मितीवर परिणाम होणार आहे. त्याची भरपाई टाटा कंपनीला द्यावी लागणार आहे. मुळशी धरणातून कृष्णा खोरे महामंडळाला पाणी देण्याचा करार झाला आहे. या कराराची तपासणी करून भरपाई द्यावी लागेल की नाही याची खातरजमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी कपातीसंदर्भातील या दोन्ही पर्यायावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैटक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही राव यांनी सांगितले.

..

उजनीसाठी १५ जानेवारीला धरणे उघडणार

पुण्यातील भामा-आसखेड व चासकमान या धरणातून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. या निर्णयाची येत्या १५ जानेवारीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. १५ ते २२ जानेवारी या काळात दोन्ही धरणांचे दरवाजे उघडले जाणार आहेत. पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या मोटारी बंद करण्याबरोबर वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्तात हे पाणी सोडले जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करूनच निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

येत्या शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरू होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या दिलगिरी व्यक्त करण्याच्या भूमिकेचे खासदार अमर साबळे यांनी स्वागत केले आहे. मात्र, त्यांच्याविषयीच्या आंदोलनाबाबतची आमची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेऊ, असे साबळे यांनी स्पष्ट केले.

सबनीस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून वाद निर्माण झाला आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आंदोलनाच्या भूमिकेवर साबळे ठाम आहेत. त्यासंदर्भात मंगळवारी (१२ जानेवारी) दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अध्यक्षाविना साहित्य संमेलन व्हावे. परंतु, सबनीसांनी माफीच मागितली पाहिजे, याचा पुनरुच्चार केला. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, माउली थोरात, अमर मूलचंदानी, बाबू नायर उपस्थित होते. 'साहित्य संमेलनाला भाजपचा अजिबात विरोध नाही. मात्र, सबनीसांना व्यासपीठावर पाय ठेवू देणार नाही. त्यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्राही बुधवारी (१३ जानेवारी) काढणार आहोत. सबनीस माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील,'असे साबळे यांनी स्पष्ट केले.

सबनीस यांच्या बेताल वक्तव्यामुळे देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही कोणताही वाद वाढवत नाही; पण सबनीस यांनी माफी मागितली तर वाद समाप्त होईल. साहित्य संमेलन झालेच पाहिजे. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावे किंवा नाही, याबाबतचा निर्णय घ्यावा. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असेही साबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएसआयवर हल्ला करून प्रत्युत्तर द्यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अतिरेक्यांनी पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारताने पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेच्या कॅम्पवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले पाहिजे,' असे मत अखिल भारतीय अतिरेकी विरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केले. देश राजनैतिक गुलामगिरीत अडकला असून अतिरेकी बोटमधून, तर नेते व्होटमधून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी यांच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारवाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बिट्टा बोलत होते. कार्यक्रमाला इस्लामचे गाढे अभ्यासक मौलाना सय्यद कल्बे रिझवी, कम्प्युटर तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष राहुल कराड, शेखर बोराडे, नीलेश बोराटे, संग्राम कोते पाटील आणि गणेश घोष उपस्थित होते.

'अतिरेक्यांनी पठाणकोट येथे हल्ला केल्यानंतर आपणही आयएसआयच्या कॅम्पवर हल्ले केले पाहिजेत. मी हे काम करू शकलो असतो; पण मला मर्या​दा आहेत. माझी ओळख नसती, तर मी हे काम केले असते.' असे बिट्टा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन चांगुलपणा दाखविला. मात्र, पाकिस्तानने गैरफायदा घेतला' असेही ते म्हणाले.

भाषणामध्ये बिट्टा यांनी राजकीय नेत्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, 'स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र दिले; पण आता आपण राजनैतिक गुलामगिरीत अडकलो आहोत' नेत्यांनी आतापर्यंत काय केले असा सवाल करून ते म्हणाले, की 'लष्करी अधिकाऱ्याची मुले लष्करात जातात. मात्र, नेत्याची मुले लष्करात जात नाहीत. ती राजकारणातच जातात.' महाराष्ट्राला देदीप्यमान सांस्कृतिक परंपरा आहे. ती परंपरा टिकवून ठेवण्याचे आवाहन बिट्टा यांनी केले. 'आपली संस्कृती ही शांततेला प्राधान्य देणारी आहे. तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे पालन करून मनात देशभक्तीची अस्मिता जागवली पाहिजे.' असे डॉ. भटकर म्हणाले.

..

स्वामी विवेकानंद यांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला. प्रत्येक तरुणांमध्ये देशाविषयी अस्मिता जागृत होणे गरजेचे आहे.

मौलाना सय्यद कल्बे रिझवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्या, फळे नियमनातून वगळल्यास बाजार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा यांसारखा शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून वगळण्यासंदर्भात राज्य सरकारने तयारी आरंभली आहे. त्यासंदर्भात निर्णय रद्द न केल्यास राज्यातील बाजार येत्या काही दिवसांत बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज, बुधवारी बैठक होणार आहे. त्यानंतरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.

राज्यातील बाजार समित्यांच्या आवारात सध्या भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा आदी शेतीमाल विकण्यास परवानगी आहे. या शेतीमालावर नियमन असल्याने त्या बदल्यात बाजार समिती व्यापाऱ्यांकडून शेतीमाल वसूल करते. त्यामुळे शेतकऱ्यांना दराची हमी मिळणे तसेच, एकाच ठिकाणी व्यापार करणे शक्य झाले आहे. परंतु, भाजीपाला, फळे, कांदा आणि बटाटा हा शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात काही दिवसांपूर्वी पुण्यातील आडते असोसिएशनने मार्केट यार्डात बैठक घेतली होती. त्यानंतर मंगळवारी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांची मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, कामगार नेते नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीच्या निमित्ताने मुंबईतील बाजार बंद ठेवण्यात आला होता. कांदा, बटाटा, फळे, भाजीपाला नियमनातून वगळल्यास बाजाराच्या आवारात आडत्यांना घाऊक विक्री करता येणार नाही. त्याशिवाय बाजार समितीला शेतीमालावर सेसही आकारता येणार नाही. बाजार आवारात विक्री करण्याचे आडत्यांना बंधन राहणार नाही. त्यामुळे आडत्यांचे नुकसान होऊ शकते या साठी भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा हा शेतीमाल बाजार समितीच्या नियमनातून वगळण्यात येऊ नये अशी मागणी राज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी केली. या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतीमाल बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व बाजार बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे ​विद्यापीठाची ‘आविष्कार’वर मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आविष्कार २०१५' च्या सर्वसाधारण विजेतेपदावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंगळवारी आपली मोहोर उमटवली. या विजेतेपदासह विद्यापीठाने 'आविष्कार'च्या दहा स्पर्धांच्या इतिहासामध्ये आठव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दाखविण्याची करामत केली आहे.

यंदा प्रथमच विद्यापीठाच्या आवारात स्पर्धेच्या राज्यस्तरीय टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाला. विद्यापीठाच्या आवारातील चंद्रशेखर सभागृहामध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. विजेतेपद मिळविले असल्याने, विद्यापीठाच्या संघाने मोठ्या जल्लोषात विजेतेपदाचा स्वीकार केला. पुणे विद्यापीठापाठोपाठ मुंबई विद्यापीठाने स्पर्धेमध्ये दुसरे स्थान पटकावले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक डॉ. अनिल दातार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिकांनी गौरव करण्यात आला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

'स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या नवसंशोधकांनी केवळ पदवी वा पदव्युत्तर पातळीवर थांबण्याचा विचार न करता, स्वतः संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या विकासामध्ये झोकून द्यावे,' असे आवाहन डॉ. दातार यांनी केले. राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांमधून नवसंशोधकांना खूप मोठ्या संधी उपलब्ध असून, या संधींकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. प्रफुल्ल पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या उपक्रमाचे समन्वयक आणि विद्यापीठाच्या महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्र जायभाये यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समान पुरवठ्यासाठी पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सर्वत्र समान पाणीपुरवठ्याची योजना (२४ गुणिले ७) राबविण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात केवळ पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांतर्फे स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. यापूर्वी, आयुक्तांनी मिळकतकरातही वाढ सुचविली होती. परंतु, पाणीपट्टी आणि मिळकतकर या दोन्हीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता असल्याने आता केवळ पाणीपट्टीत वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

स्थायी समितीच्या आज, बुधवारी होणाऱ्या बैठकीत पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव आयत्यावेळी दाखल होण्याची शक्यता आहे. कुणाल कुमार २५ जानेवारीला २०१६-१७ या वर्षाचे बजेट सादर करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पाणीपट्टी वाढीला मान्यता मिळण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे.

गेल्या महिन्यात आयुक्तांनी मिळकतकरात १० टक्के वाढ करण्यासह पाणीपट्टी दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर चर्चा होण्यापूर्वीच आयुक्तांनी दुरुस्तीसाठी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले होते. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शहरात निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती आणि त्यातही विविध भागांत होणारे असमान पाणीवाटप, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समान पाणीपुरवठ्याचा आग्रह धरला जात आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा खर्च सुमारे दोन हजार कोटींच्या घरात असल्याने पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात नव्या आर्थिक वर्षात करता यावी, यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.

.................

'स्थायी'च्या भूमिकेकडे लक्ष

शहराच्या वेगवेगळ्या भागांत अपुरा आणि असमान पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सदस्यांकडूनच वेळोवेळी केल्या जातात. भविष्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. २०१६-१७ चे बजेट हे निवडणूकपूर्व बजेट असल्याने नागरिकांवर कोणतीही करवाढ लादण्यात येऊ नये, अशीच सर्व पक्षांची भूमिका आहे. त्यामुळेच, आयुक्तांच्या पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावावर काय भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इस्लामिक स्टेट’चा ‘एटीएस’ला लेटरबॉम्ब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे आणि मुंबई येथील कार्यालयाला 'इस्लामिक स्टेट'च्या (आयएस) स्थानिक पाठीराख्यांकडून धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. पुण्यातील 'एटीएस'चे प्रमुख भानुप्रताप बर्गे यांनाही धमकी देण्यात आली असून, 'एटीएस'च्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

पुण्यात अकरावीत शिकणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीला 'इस्लामिक स्टेट' (आयएस) या दहशतवादी संघटनेत जाण्यापासून रोखण्यात 'एटीएस' यश आले होते. त्यानंतर 'एटीएस'ने युवकांमध्ये जागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली. या पार्श्वभूमीवर 'आयएस'च्या समर्थकांकडून 'एटीएस'ला धमकावण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी बर्गे यांच्याशी संपर्क साधला असता, धमकीच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

मुंबईतील धारावी येथे धमकीचे पत्र पोस्टात टाकण्यात आले. लिफाफ्यामध्ये कोऱ्या कागदावर मजकूर टाइप करून ते पत्र मुंबई पोलिसांना पाठ‍वण्यात आले. त्यानंतर ते पत्र मुंबई पोलिस आणि 'एटीएस'कडून ४ जानेवारी रोजी पुणे पोलिसांना पाठवण्यात आले. पत्रामध्ये पुणे एटीएसच्या कार्यालयाविषयी उल्लेख करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने या पत्राची दखल घेऊन 'एटीएस' कार्यालयाची पाहणी केली. या पत्रामध्ये सहायक आयुक्तांना धमकावण्यात आले आहे.

राज्य 'एटीएस'चे कार्यालय पूर्वीपासून दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. 'एटीएस'चे तत्कालीन प्रमुख आणि सध्याचे पोलिस महासंचालक राकेश मारिया यांना लक्ष्य करण्यासाठी कराचीमध्ये बैठकाही घेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 'एटीएस'ने या पत्राची गंभीर दखल घेतली असून, पत्र पाठविणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आले आहे. तसेच 'एटीएस' कार्यालयामध्ये एके-४७ रायफलधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

............

एटीएसला आलेले धमकीचे पत्र पुणे पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने विशेष शाखेने खबरदारी घेतली असून, एटीएसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य काळजी घेण्यात येत आहे.

के. के. पाठक, आयुक्त, पुणे पोलिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनीच सुरू केले रेस्तराँ

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com

पुणे : उद्योजकता विकास ही संकल्पना केवळ अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्षात आणून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना स्वतःच रेस्तराँ चालविण्याचा विडा विद्यार्थ्यांनी उचलला आहे. स्वतःच पैशाची जमवाजमव करून बिझनेस प्लॅनपासून ते कस्टमर सर्व्हिसपर्यंत सर्व आव्हाने या विद्यार्थ्यांनी पेलली आहेत. 'अतिथी देवो भवः' या भावनेतून आता हे विद्यार्थी अस्सल खवय्या असणाऱ्या पुणेकरांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी'च्या (एमएसआयएचएमसीटी) विद्यार्थ्यांनी हा अभिनव प्रकल्प राबविला आहे. या विद्यार्थ्यांनी 'राशी ट्रीट' या थीमवर आधारित तात्पुरत्या काळासाठी सुरू केलेल्या या रेस्तराँचे उद् घाटन रविवारी झाले. ताज विवांता हॉटेलचे एक्झिक्युटिव्ह शेफ सचिन जोशी, एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे या वेळी उपस्थित होते. पुढील रविवारपर्यंत (१७ जानेवारी) मॉडेल कॉलनीतील इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये रोज फक्त सायंकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत हे रेस्तराँ सुरू राहणार आहे.

इन्स्टिट्यूटच्या पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे पैसे गुंतवून हा घाट घातला आहे. पैशाची गुंतवणूक, संस्थेच्या जागेच्या वापरासाठीचे भाडे, बिझनेस प्लॅन, रेस्तराँची थीम, डेकोरेशन, मेन्यू प्लॅन, खरेदी, प्रत्यक्ष पदार्थ तयार करणे, सर्व्हिस करणे या सर्व गोष्टींचे आव्हान या विद्यार्थ्यांनी पेलले आहे. या रेस्तराँमध्ये खास इंडियन कुझिनच्या व्हेज नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

मैथिली ओगले, अक्षय नाईक, अभिनंदन टाक, नीलम काशीद, प्रतीक दळवी, मलय इंगळे आदी विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी पेलली आहे. त्यांना अपर्णा देशपांडे आणि अन्नू पिल्लाई या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. 'ज्या क्षेत्रात आपण काम करणार आहोत. त्या क्षेत्रातील उद्योजकतेचा अनुभव आपण स्वतःच घ्यावा, यासाठी आम्ही या रेस्तराँची निर्मिती केली आहे. सातही दिवसांचा मेन्यू, सर्व्हिस प्लॅन आमच्याकडे तयार आहे. इथली सेवा, चव आणि एकूण अनुभव उच्च दर्जाच्या रेस्तराँसारखाच असेल,', असे या विद्यार्थ्यांनी 'मटा' ला सांगितले.

..

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हींचा समावेश आहे. परंतु, प्रत्यक्ष हॉटेल चालवून पाहिल्यास विद्यार्थ्यांना त्यातील बारकावे प्रत्यक्ष समजून घेता येतील, हा या मागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी संपूर्ण तयारी आणि नियोजनही त्यांचेच आहे. जागेच्या वापरासाठीचे भाडे विद्यार्थी संस्थेला देणार आहेत. खवय्या व रसिक अशी ओळख असलेल्या पुणेकरांनी या रेस्तराँला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे.

डॉ. कालिंदी भट, प्राचार्य, एमएसआयएचएमसीटी

..

राशी ट्रीट संकल्पनेची मांडणी

'एमएसआयएचएमसीटी'च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या रेस्तराँची संकल्पना राशी ट्रीट आहे. भारतीय संस्कृतीतील बारा राशींच्या अनुषंगाने ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या रेस्तराँमध्ये सर्व्ह होणारे पदार्थही याच अनुषंगाने तयार केले जातील, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात वर्षभरात अपघातात १२ हजार बळी

$
0
0

Rohit.Athavale @timesgroup.com

पिंपरी : गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या ५८ हजार अपघातांमध्ये तब्बल बारा हजार जणांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाल्यानंतरची ही आकडेवारी आहे. यामध्ये पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ३३९ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात महिन्याला सरासरी ५२८१ अपघात झाले. त्यामध्ये दरमहा १०८८ जणांचे बळी गेले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील अपघातांचे प्रमाणही कमी झाले असून, महिन्याला सरासरी २६ अपघातांमध्ये दहा जणांचे बळी गेले आहेत. राज्यात सर्वाधिक अपघात हे मुंबई आणि त्या खालोखाल पुणे शहरात झाले आहेत. प्राणांतिक अपघातांमध्ये मात्र मुंबईचा क्रमांक मागे असून, सर्वाधिक मृत्यू हे पुणे, नाशिक, नगर, नागपूर जिल्ह्यात झाले आहेत; तर सर्वाधिक कमी अपघात हे सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, अकोला येथील आहेत. गेल्या पाच वर्षांमधील अपघातांची संख्या पाहता अपघातांचे प्रमाण तुलनेने घटले आहे. वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने झालेले बदल हेही त्याचे कारण ठरले आहे; तर रस्त्यांवरील बहुतांश काम मार्गी लागल्याने, उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाल्यानेही काही अंशी अपघात कमी झाल्याचे सांगितले जाते. पण, रस्त्यांचे अर्धवट काम, राडारोडा, डिव्हायडर पंक्चर, अवैध प्रवासी वाहतूक ही झालेल्या अपघातांची प्रमुख कारणे सांगण्यात येत आहेत. अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले तरी अपघातांमध्ये जखमी होण्याची संख्या वयोमानानुसार वाढली आहे. युवकांचे जखमी होण्याचे प्रमाण राज्यात अधिक आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अपघांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी राज्य महामार्गांचे रुंदीकरण हा देखील कळीचा मुद्दा आहे. वारंवारिता पाहता अपघात मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी झाले असले तरी ते अपघातांची संख्या अर्ध्या लाखांवर येऊन पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images