Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणाला पाच हजारांना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वडगाव बुद्रुक येथील तळजाई मंदिराजवळ एका तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्या जवळील पाच हजार रुपये काढून घेतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष भोकरे (वय २२, रा. हिंगणे खुर्द) याने तक्रार दिली आहे. त्यावरून पप्पू ढमाळ, आकाश काळेरामे, सलीम शेख, राहुल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे भोकरे याच्या तोंडओळखीचे आहेत. मंगळवारी रात्री भोकरे हा कामावरून घरी निघाला होता. वडगाव बुद्रुक येथील तळजाई मंदिराजवळ त्याला अडवून आरोपींनी त्याच्या जवळील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आणखीन पैसे का देत नाही म्हणून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. ए. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

कारला लावलेला जॅमर तोडला

पुणेः सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल येथे 'नो पार्किंग'मध्ये उभी केलेल्या कारला वाहतूक पोलिसांनी लावलेले जॅमर तोडून ती कार नेल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी त्या कार चालकावर जॅमर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दत्तवाडी वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी बाळासाहेब कानवडे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कार नंबर एमएच ११ बीव्ही ३९४९ च्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हॉलसमोरील मॅकडॉनल्डच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा वाहनांवर कानवडे हे कारवाई करीत होते. त्यावेळी एमएच ११ बीव्ही ३९४९ ही कार 'नो पार्किंग'मध्ये उभी केलेली असल्यामुळे तिला जॅमर लावला होता. मात्र, या कारचालकाने जॅमर तोडून जॅमरसह कार घेऊन पळून गेला. याप्रकरणी कारचालकावर जॅमर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार मते हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे खंडपीठासाठी वकिलांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीसंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी पुण्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाला हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून पुन्हा वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार आज, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता वकिलांचे शिष्टमंडळ मुख्य न्यायमूर्तींना भेटणार आहे.

दरम्यान, खंडपीठाच्या मागणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वकिलांच्या आणि पक्षकारांच्या कृती समितीतर्फे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता अलका चौकात निदर्शने करण्यात आली.

या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, असोसिएशनचे पदाधिकारी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. नंदू फडके, अॅड. नंदिनी देशपांडे तसेच मोठ्या संख्येने वकील या वेळी उपस्थित होते.

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे, अशी मागणी पुण्यातील वकिलांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील वकिलांनी १६ दिवस कोर्ट कामकाज बंद आंदोलन केले होते. याची दखल घेऊन मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी पुण्यातील वकिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी यापूर्वी वेळ दिली होती. मात्र खंडपीठ मागणीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुण्यातील लोकांनी कृती समिती स्थापन केली आहे.

या समितीच्या वतीने आज, गुरुवारी (३ सप्टेंबर) रोजी सायंकाळी नळस्टॉप चौकात निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांनी दिली. मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीवरून पुण्यातील वकिलांनी यापूर्वी सोळा दिवस कोर्ट कामकाज बंदचे आंदोलन केले होते. त्याची दखल अद्याप न घेतल्याने वकिलांनी बुधवारी अलका चौकात निदर्शने केली.आणि या वेळी पुन्हा एकदा खंडपीठाची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संप मागे घेण्याच्या तयारीत विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इ‌न्स्टिट्यूट ऑफ इंडियातील (एफटीआयआय) विद्यार्थी आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. चार सदस्यांना वगळणे आणि गजेंद्र चौहान यांना आठ महिन्यांसाठी नियुक्त करणे या मुद्द्यांवर सरकार आणि विद्यार्थी यांचे एकमत झाल्याची चर्चा आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाले तरच विद्यार्थी संप मागे घेतील, असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

'एफटीआयआय' मधील विद्यार्थ्यांचे गजेंद्र चौहान यांच्या निवडीविरोधात ८४ दिवसांपासून आंदोलन सुरू असून, त्यामुळे संस्थेतील कामकाज ठप्प आहे. सरकारने दबावतंत्राचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा एका महिन्याची मुदतवाढ दिली गेली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, सरकारने एक पाऊल मागे घेतले तर आम्हीही माघार घेऊ,' अशी भूमिका आता विद्यार्थी मांडू लागले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व विद्यार्थी यांच्यामध्ये मध्यंतरी चर्चा झाली होती. मात्र, ही गाडी पुढे सरकली नाही. आता विद्यार्थी पुन्हा एक पाऊल मागे घेण्यास तयार आहेत. 'एफटीआयआय'चे रूपांतर विद्यापीठात करण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाल्यास ही संस्था केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या अंतर्गत येईल. त्यानंतर गजेंद्र चौहान यांच्या पदाला महत्त्व उरणार नाही. या प्रक्रियेसाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, तेवढ्यापुरते चौहान अध्यक्षपदावर राहतील. या कालावधीत ते फारतर दोन बैठका घेतील. या बैठका मुंबईत होतील. त्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संबंध येणार नाही; तसेच शैलेश गुप्ता,नरेंद्र पाठक, अनघा घैसास व राहुल सोलापूरकर या चार सदस्यांना वगळणे या तात्विक मुद्द्यांवर विद्यार्थी व सरकारसध्ये एकमत झाल्याची कुजबुज 'एफटीआयआय'मध्ये आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी राहुल गांधींसह अनेक दिग्गजांनी मध्यस्थी केली होती.

विद्यार्थ्यांची भूमिका बदलली

'आम्हाला गजेंद्र चौहान यांची अडचण नाही. आमचा त्यांच्याशी संबंध येणार नाही,' असे काही विद्यार्थ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. विद्यार्थ्यांच्या भूमिकेत अचानक झालेला हा बदल चक्रावणारा असला तरीही बरेच काही सूचित करणारा आहे. यामुळे 'गजेंद्र चौहान गो बॅक' अशा आरोळ्यांना काय अर्थ उरतो, असा प्रश्न 'एफटीआयआय'मध्ये विचारला जाऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलबुर्गी हत्याप्रकरणी धारवाड पोलिस पुण्यात

$
0
0

पुणेः कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरू मल्लेशाप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासासाठी धारवाड पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाची माहिती घेतली. तसेच, महर्षी शिंदे पुलावर जाऊन घटनास्थळाचीही पाहणी केली.

कलबर्गी, डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येंच्या गुन्ह्यांत साम्य आहे. डॉ दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी पथक पाठवले आहे. आमच्याकडून या दोन्ही गुन्ह्यांची तपशीलवार माहिती घेण्यात येत असून त्यादृष्टीने तपासाची दिशा ठरवण्यात येईल, असे धारवडचे पोलिस आयुक्त पी. एच राणे यांनी 'मटा'ला सांगितले.

धारवाड पोलिसांनी डेक्कन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्याशी संपर्क साधला. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी कुठल्या प्रकारचे पिस्तूल वापरले आहे, पोलिसांनी गोळ्या कुठल्या प्रकारच्या जप्त केल्या आदींची त्यांनी मा​हिती घेतली. धारवाड पोलिसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. धारवाड पोलिसांनी गुन्ह्यांच्या कागदपत्रे देण्याविषयी विनंती केली होती. मात्र, या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू आहे. त्यामुळे या गुन्ह्यांच्या कागदपत्रांविषयी 'सीबीआय'शी संपर्क साधावा, अशी सूचना केली असल्याचे गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनो, बी अलर्ट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सव आणि दहीहंडी या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी सुरक्षाविषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधितांना संभाव्य दहशतवादी कारवाईच्या दृष्टीने अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली आहे.

दहीहंडी आणि गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात नागरिक रस्त्यांवर मोठी गर्दी करतात. त्यामुळे त्यांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे प्रयत्न पोलिसांनी आरंभले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस सदैव दक्ष असणार आहेत. शहरातील सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही गुंडांना तडीपारही करण्यात आले असून, काहींना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहितीही वाकडे यांनी दिली. महिलांची छेडछाड तसेच शाळा-महाविद्यालयांसमोर होणाऱ्या टिंगलटवाळीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस साध्या गणवेशात गस्त घालत आहेत. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी महिला बीट मार्शलही कार्यरत आहेत.शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने पोलिसांना गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गुन्हे घडण्यापूर्वीच उधळून लावणेही शक्य होणार आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत साखळीचोरी, घरफोडी तसेच इतर गुह्यांना रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्तालयात असल्याने पोलिस अधिकारी तेथे बसून देखरेख करणार आहेत. अनोळखी व्यक्ती अथवा बेवारस वस्तू आढळल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सायबर सेलला दक्षतेच्या सूचना

पिंपरी-चिंचवडसह सहा शहरांमध्ये 'ईसिस' या दहशतवादी संघटनेविषयी आकर्षण वाढत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांने दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सायबर सेल आणि मुंबईच्या सायबर सेलला इंटरनेटवरून पाहिल्या जाणाऱ्या साइट आणि इतर आक्षेपार्ह गोष्टींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचा उद्या निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणातील पाण्याचा कमी होणारा साठा लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरात तातडीने पाणीकपात लागू करावी, या साठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. पाणीकपातीबाबत महापौर, पालिकेतील पक्षनेते यांच्याशी चर्चा करून उद्या, शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

पावसाने मारलेल्या दडीमुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. तसेच, पुढील काही दिवस पाऊस न पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याने महापालिका आयुक्तांनी बुधवारी पालकमंत्री बापट यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत पालकमंत्र्यांना सद्यस्थितीची सविस्तर माहिती देऊन धरणातील पाणीसाठा पुढील वर्षीपर्यंत पुरवायचा झाल्यास आतापासूनच पाणीकपात करावी लागेल, याची माहिती देण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे सध्या परदेशात असल्याने त्यांच्याशी तसेच पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवाच्या काळात शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. उत्सवानंतर पावसाची आणि धरणसाठ्याची परिस्थितीपाहून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे कुमार म्हणाले.

दरम्यान, धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बापट यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौर धनकवडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, जलसंपदा विभागाकडून कोणताही निर्णय घेतल्याने पालिका प्रशासनाने आपल्या पातळीवर पाणीकपात करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पाणीकपातीचा निर्णय झाल्यास कोणत्या प्रभागात कोणत्यावेळेस पाणी द्यायचे याचे संपूर्ण वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाने तयार केले आहे. याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.

धरणातील कमी होणारा पाणीसाठा लक्षात घेऊन कालवा समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहिल्याने धरणातील पाणीसाठा अजून कमी झाला आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे.

- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटीतच फुलली भाज्यांची शेती

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणेः महापालिकेने सक्ती केल्यामुळे ओला कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न पुण्यातील बहुतांश सोसायट्यांना पडला असतानाच स्वरगंगा सोसायटीसाठी मात्र ओला कचरा वरदानच ठरला आहे. सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात रिकामी जागा असल्याने या जागेत ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून तयार होणाऱ्या खताद्वारे भाजी पिकविण्याची कल्पना पदाधिकाऱ्यांना सुचली. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक घरात दिवसाआड मोफत भाजी

मिळत आहे.

पिंपरीतील संत तुकाराम नगरमध्ये स्वरगंगा गृहरचना सोसायटी असून, तिथे २२४ फ्लॅटधारक आहेत. इतर सोसायट्यांप्रमाणेच दोन वर्षांपूर्वीपर्यंत सोसायटीमध्ये दररोज तयार होणारा २२ ते २३ ड्रम ओला आणि सुका कचरा महापालिकेकडे देण्यात येत होता. मात्र, दीड वर्षांपासून सोसायटीने ओला कचरा अंतर्गत भागातच जिरवून खत निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेतला. यामुळे सुक्या कचऱ्याचे प्रमाण ८ ते १० ड्रमवर आले आहे.

'भाजीपाला पिकवण्याचा उपक्रम एवढा प्रभावी ठरेल, याची आम्हाला कल्पनाच नव्हती. प्रथम आम्ही मोजक्याच जागांवर निवडक भाज्या लावल्या. गांडूळ खतामुळे भाजांची चांगली वाढ होण्यास मदत झाली. त्यानंतर आम्ही ही भाजी सभासदांना मोफत वाटली. मग टप्प्याटप्याने भाज्यांची लागवड वाढत गेली आणि रिकाम्या जागांवर मोठ्या प्रमाणात शेती सुरू झाली. आज आम्ही प्रत्येक सभासदाला दिवसाआड भाजी पुरविण्यात यशस्वी ठरलो असून, आगामी वर्षभरात दररोज भाजी मिळणा आहे,' अशी माहिती सोसायटीचे खजिनदार विजय वाबळे यांनी दिली.

भाजीच्या नियोजनासाठी आम्ही सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे. ही मंडळी दररोज पहाटे भाज्यांचे वर्गीकरण करतात. दररोज एका इमारतीला भाजी पुरवली जाते. त्यासाठी व्हॉटसअॅप ग्रुपवरून आम्ही भाजीची माहिती देणारा मेसेज पाठवतो. प्रत्येक इमारतीचे स्वतंत्र नोंदणीपुस्तक असून, त्यावर कोणाला किती आणि कोणती भाजी दिली याची नोंद असते. भाजीबरोबर आम्ही नवीन रेसिपी देखील पाठवतो. केवळ सोसायटीतील सभासदच नव्हे, तर कर्मचाऱ्यांनाही भाजीचा वाटा मिळतो, असेही वाबळे म्हणाले. या उपक्रमामध्ये सोसायटीच्या सहकार्याबरोबरच शेखर जोशी, श्रीपाद बरीदे, रवी देशपांडे, अर्जुन गुहा आणि अजय कंकरेज यांचा महत्वाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोला खूपच उशीरः बापट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र-राज्यातील सरकारे बदलली..., कारभारी बदलले..., नगरविकास खात्याचे मंत्री-अधिकारी बदलले... तरीही पुणे मेट्रोचा प्रस्ताव कागदावरच राहिला असून, त्याला खूपच विलंब झाल्याची खंत पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्त केली. प्राथमिक आराखड्यानुसार मेट्रोचे काम वेळेत सुरू झाले असते, तर एव्हाना शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असते, अशी जाहीर कबुलीही त्यांनी एका खासगी कार्यक्रमात दिली.

पुण्याचे माजी कारभारी आणि तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनीही काही महिन्यांपूर्वी पुणे मेट्रोला खूप उशीर झाल्याची कबुली दिली होती. नव्या पालकमंत्र्यांनीही त्यांचीच री ओढत, मेट्रोला उशीर झाल्याचे सांगितले असले, तरी हा प्रकल्प नेमका कधी सुरू होणार याबद्दल मात्र बोलण्यास असमर्थता दर्शवली. 'पुण्यासारख्या शहरात मेट्रो प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे आहे; पण त्याला कोणी विरोध केला की तो अखेरपर्यंत रेटण्याची मानसिकता निर्माण होते. त्यातून, चांगल्या प्रकल्पाबाबत पुणेकरांमध्ये नकारात्मक सूर उमटू लागतो', अशा शब्दांत बापट यांनी मेट्रोला विरोध करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

'शहराच्या विकासासाठी कोणताही प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमातच पूर्ण व्हायला हवा. तर, त्याचा फायदा नागरिकांना होऊ शकतो. मेट्रोच्या पहिल्या वेळापत्रकानुसार काम झाले असते, तर शहरातील दोन्ही मार्गांचा उपयोग पुणेकरांना आजमितीस करता आला असता,' अशी शक्यता त्यांनी वर्तविली. नियोजनानुसार अंमलबजावणी केली गेली, तरच नागरिकांना संबंधित प्रकल्पाचे फायदे मिळू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाहतूक नियमांचे पालन करण्यापासून ते बससाठीच्या स्वतंत्र मार्गिकेचा उपयोग मॉर्निंग वॉकसाठी करणाऱ्या पुणेकरांना स्मार्ट म्हणायचे का, असा सवाल उपस्थित करून त्यांनी पुणेकरांच्या स्वभावावरही कोरडे ओढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंडांना आता विदर्भाची ‘हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी गुन्हेगारांवर 'एमपीडीए'चे अस्त्र उगारण्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या आठ गुंडांना जेलमध्ये बंद करण्यात आले आहे, तर आणखी सहा गुंडांविरुद्ध प्रस्ताव विचाराधीन आहेत. या गुंडांना येरवडा जेलमध्ये न ठेवता पुणे परिक्षेत्राच्या बाहेर पाठवा, अशा सूचना जेल प्रशासनाने पोलिसांना केल्या आहेत. त्यानुसार त्यांना विदर्भातील जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे.

पोलिसांकडून गुंडगिरी मोडून काढण्यासाठी तडीपारी, 'एमपीडीए' (दादा, भाईंविरुद्ध केली जाणारी कारवाई) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) प्रतिबंधक कारवाई केली जाते. या गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली, तरी ते पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातच आश्रय घेतात आणि आपली गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवतात.

ज्या गुन्हेगारांविरुद्ध 'मोक्का'खाली कारवाई करता येऊ शकत नाही. मात्र, 'एमपीडीए'ची कारवाई करणे शक्य आहे, अशा गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात होते. पुणे पोलिसांनी अशा प्रकारे आठ गुंडांविरुद्ध कारवाई केली आहे. या गुंडांना येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे, तर आणखी सहा गुंडांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीवाटपाचा मोठा पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचे सव्वादोन महिने कोरडे गेल्यामुळे आतापासूनच पाण्यासाठी संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भामा-आसखेड धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) याचिका दाखल करण्यात आली आहे. या पाण्यासाठी दौंडच्या आमदारांनीही आग्रह धरल्याने पाणीवाटपाचा मोठा पेच निर्माण

होणार आहे.

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. विशेषतः भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. कुकडी व खडकवासला प्रकल्पातील पुराचे पाणी उजनी धरणात पोहोचते. ते मिळाल्यानंतर सोलापूर शहरासह खालच्या भागांना पिण्यास व शेतीसाठी पाणी मिळते. यंदा कुकडी व खडकवासला प्रकल्पातील धरणांतच पाणी नसल्याने उजनी धरणाचा पाणीसाठा वाढलेला नाही. उजनीचा उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी भामा-आसखेड धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भात जलसंपत्ती प्राधिकरणाकडे याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, दौंडला भामा-आसखेड धरणातून पाणी सोडण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी आग्रह धरला आहे. भामा-आसखेडमध्ये पुरेसे पाणी असल्याने ते दौंडला सोडण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. भामा-आसखेड धरणात सद्यस्थितीत ६.७७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. या धरणाला कालवे नाहीत; तसेच सिंचन क्षेत्रही नसल्याने हे पाणी दुष्काळी भागांना सोडण्याची मागणी होत आहे. मात्र, भामा-आसखेडचे पाणी सोडण्यास जलसंपदा खात्याचा विरोध आहे. पावसाने यंदा दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. आणखी काही दिवसांनी पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी भामा-आसखेड धरणाचे पाणी राखून ठेवण्याची गरज आहे. या धरणातून टँकर वा अन्य साधनांनी पाणी अन्यत्र नेणे शक्य होणार आहे. हे पाणी शेतीला सोडणे तूर्त योग्य नाही, अशी जलसंपदा खात्याची भूमिका आहे.

केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत भामा-आसखेड, तसेच वडगाव जलशुद्धीकरण केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेला निधी महापालिकेला देण्याचा निर्णय विद्यमान भाजप सरकारने घेतला आहे. केंद्राच्या नगरविकास खात्याने या दोन्ही प्रकल्पांना यापूर्वी मंजूर केल्याप्रमाणे निधी देण्याची तयारी दाखवली आहे. त्याचप्रमाणे पूर्व पुण्यातील पाणीप्रश्नासाठीही या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशा परिस्थितीत या पाण्याचा प्रश्न आता पूर्व पुण्यासाठीही महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

उपाययोजना झाल्या तर पुण्याला पाणी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांत फक्त १४.६४ टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे शहराची वार्षिक गरज साधारणतः १६ टीएमसी आहे. बाष्पीभवनामुळे पुणे शहराला प्रत्यक्षात ११.५० टीएमसीच पाणी उपलब्ध होणार आहे. पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर ऐन वेळी भामा-आसखेड धरणातून पाणी आणता येऊ शकते. भामा-आसखेड धरणातून पुणे शहराला यापूर्वी २.६७ टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. पण ते आणण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत अन्यथा या धरणातून थेट शहराला पाइपलाइनमधून पाणी मिळू शकले असते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा आघात; भरपाईची फुंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारीसाठी आलेल्या त्या शेतकऱ्याला चौघांनी लुटले तेव्हा त्याच्या खिशात अवघे साठ रुपये होते... रिक्षासाठी खिशात शंभर रुपये नसल्यामुळे तो पायी निघाला होता... त्याच्यावर वार करून, तोंडावर अॅसिड फेकून त्या चौघांनी त्याला रेल्वेट्रॅकवर फेकून दिले... उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला... ही करुण कहाणी ऐकून हलाखीची परिस्थिती असलेल्या त्या शेतकऱ्याच्या पत्नीला विधी सेवा प्राधिकरणाकडून नुकतीच दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.

विधी सेवा प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आलेल्या पीडितांना नुकसानभरपाई या योजनेअंतर्गत देण्यात आलेला हा पुण्यातील दुसरा निकाल आहे. या योजनेचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव, अॅड. अतुल गुंजाळ यांनी हा निकाल दिला.

मैनाबाई कुमार डांगे (रा. अप्पसिंगा, तुळजापूर) या महिलेला दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे. मैनाबाई यांचे पती कुमार महालिंग डांगे (५५, रा. तुळजापूर) यांच्यावर २९ जून २०१४ रोजी हडपसर येथे चौघांनी हल्ला केला होता. डांगे वारीसाठी पुण्यात आले होते. त्यांना हडपसर येथे जायचे होते. रात्र असल्यामुळे रिक्षा करण्यासाठी त्यांच्याकडे शंभर रुपये नव्हते. कोणीतरी 'हडपसर जवळच आहे,' असे सांगून त्यांना पायी जायला सांगितले. वाटेत त्यांना एका दुचाकीचालकाने लिफ्ट दिली. त्याने रेल्वे ट्रॅकजवळ सोडल्यानंतर ते परत पायी पुढे निघाले. त्यावे ळी चौघांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडे असलेले पैसे, तसेच मोबाइल काढून देण्यास सांगितला. त्यांनी आपण मोबाइल वापरत नसल्याचे सांगितले. त्यांच्या खिशातील साठ रुपये चोरट्यांनी काढून घेतले व त्यांच्या डोक्यात वार केला; तसेच त्यांच्या तोंडावर अॅसिड फेकले. त्यानंतर त्यांना उचलून रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले. त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. सात जुलै २०१४ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर हल्ला करणारे अजूनही पसार आहेत. या प्रकरणी डांगे यांच्या पत्नीने नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता, अशी माहिती सचिव जाधव यांनी दिली.



सहा महिन्यांत अर्ज हवा

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना या योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळते. मात्र, त्यासाठी घटना घडल्यानंतर सहा महिन्याच्या आत विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. यासाठी वकिलाची गरज नाही. संबंधित साध्या कागदावर अर्ज करू शकतात. त्यासाठी एफआयआरची प्रत आणि ओळखपत्र जोडावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाची झोळी पुन्हा रिकामी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत असतानाच, आता ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनाच 'एलबीटी' आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी बोर्डाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे एवढी उलाढाल असलेल्या बोर्डाच्या हद्दीत अवघ्या सहा कंपन्या असल्याने बोर्डाची तिजोरी पुन्हा रिकामी होणार आहे.

बोर्डाच्या हद्दीत चार जूनपासून 'एलबीटी' लागू झाला आहे. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांमध्ये साडेतीन हजार व्यापाऱ्यांपैकी अवघ्या ११५ व्यापाऱ्यांनी 'एलबीटी' भरला. त्याद्वारे बोर्डाच्या तिजोरीत सुमारे नऊ कोटी ६६ लाख ९६ हजार रुपये जमा झाले आहेत. देशभरातील कँटोन्मेंट बोर्डांपैकी फक्त पुणे कँटोन्मेंट बोर्डामध्येच 'एलबीटी' लागू झाला आहे. राज्य सरकारने ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडूनच 'एलबीटी' वसूल करण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी बोर्डाला करावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने बोर्डाच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. सात सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार असून, त्यामध्ये अंतिम निर्णय होणार आहे.

बोर्डाच्या हद्दीत सहा मोठ्या कंपन्या आहेत. त्याच कंपन्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या कंपन्यांकडून ​जमा होणाऱ्या 'एलबीटी'वरच बोर्डाला अवलंबून राहावे लागणार आहे.

दरम्यान, बोर्डाच्या हद्दीतून 'एलबीटी' वसूल करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. अनेक व्यापाऱ्यांची दुकाने ही पुणे महापालिका आणि बोर्ड या दोन्ही ठिकाणी आहेत. त्यांना दोन वेळा 'एलबीटी' भरावा लागत आहे. त्यामुळे 'एलबीटी'ला विरोध सुरू आहे. त्यामुळे बोर्डाची आर्थिक स्थिती पूर्वीप्रमाणेच कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी निदर्शने सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्यासमोर म्हणणे मांडले. दरम्यान, खंडपीठाच्या मागणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीतर्फे गुरुवारी सायंकाळी अभिनव (नळस्टॉप) चौकात निदर्शने करण्यात आली.

पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीतर्फे शहरात सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. नळस्टॉप चौकात करण्यात आलेल्या निदर्शनाला कृती समितीचे मिहीर थत्ते, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, श्याम देशपांडे, आरपीआयचे दिलीप कुसाळे, अॅड. मिलिंद पवार, अॅड. एल. एस. घाडगे, अॅड. श्रीकांत अगस्ते, अॅड. फय्याज शेख, अॅड. विनायक कुलकर्णी, अॅड. प्रसाद ढाकेफळकर, असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, अॅड. सुहास फराडे, सचिव अॅड. राहुल झेंडे आदी उपस्थित होते.

खंडपीठाच्या मागणीसाठी शुक्रवारी लष्कर भागातील महावीर चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत.

दरम्यान गुरुवारी सायंकाळी वकिलांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांची भेट घेऊन खंडपीठ मागणीसंदर्भात म्हणणे मांडले. या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. नंदू फडके, अॅड. डी. डी. शिंदे, अॅड. सतीश पैलवान, अॅड. हेरंब गानू आदी उपस्थित होते.

पुण्याला खंडपीठ मिळावे अशी मागणी पुण्यातील वकिलांकडून वेळोवेळी करण्यात येते आहे. या संदर्भात मुख्य न्यायमूर्तींपुढे पुन्हा म्हणणे मांडण्यात आले. तसेच संबंधित बैठक सकारात्मक झाली, असे अॅड. शेडगे यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणाऱ्या डॉक्टरला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रजेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी १८०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा येथील मध्य रेल्वे रुग्णालयातील विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी हा निकाल दिला.

डॉ. प्रवीण पिराजी जिरनाल (३३, मध्य रेल्वे हेल्थ युनिट, लोणावळा) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉ. जिरनाल हा सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी आहे.

या प्रकरणी मध्य रेल्वेतील कर्मचारी खंडू पांडुरंग टाकळकर यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. खंडू टाकळकर मध्य रेल्वेचे कर्मचारी असून, एक मे २०१२ रोजी त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे ते मध्ये रेल्वेच्या लोणावळा येथील रुग्णालयात दाखल झाले होते. त्याच्या हाताला प्लास्टरही करण्यात आले होते. ते प्लास्टर पाच जून रोजी काढण्यात आले. प्लास्टर काढल्यानंतरही त्यांचा हात दुखत होता. त्यांना हाताची हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे टाकळकर डॉ. जिरनाल याच्याकडे १५ दिवसांची अतिरिक्त रजा मिळावी म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली होती.

टाकळकर यांना हे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. जिरनाल याने त्यांच्याकडे १८०० रुपयांची लाच देण्याची मागणी केली. मात्र, त्यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे टाकळकर यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक शीतल शेंडगे, आलोक सिन्हा, स्वाती देसाई, सुजाता तानवडे यांच्या पथकाने सापळा रचून डॉ. जिरनाल याला १६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. २४ जुलै २०१२ रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक आलोक सिन्हा यांनी गुन्ह्याचा तपास केला, तर पोलिस निरीक्षक अंजीर जाधव यांनी आरोपपत्र दाखल केले. सीबीआयचे सरकारी वकील मनोज चलाडन यांनी कामकाज पाहिले. त्यांनी कोर्टात ११ साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाडूच्या नव्हे; बनावट मूर्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने चौका-चौकात गणेशमूर्तींचे स्टॉल लागण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवातील प्रदूषण रोखण्यासाठी 'इको-फ्रेंडली शाडूच्या गणेश मूर्ती' अशा जाहिरातबाजीसह गणरायाच्या आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत; पण थांबा! कारण शाडूच्या मूर्तींऎवजी पीओपीच्याच मूर्ती विकण्याचे प्रमाण वाढले असून यातील नफेखोरी उघडी पडत आहे.

गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे नागरिकांचा शाडूची मूर्ती घेण्याकडे कल वाढतो आहे. याचे कारण जसे पर्यावरणाचे आहे, तसेच ते धार्मिकदेखील आहे. शाडूची मूर्ती पर्यावरणपूरक तर आहेच, पण ती पाण्यात पूर्ण विरघळतेे. त्याउलट पीओपीची म्हणजे 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'ची मूर्ती विरघळत नाही. या कारणांमुळे शाडूची मूर्ती घेण्याकडे कल वाढतो आहे. मात्र, नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकारही वाढले आहेत. बाजारात शाडूच्या म्हणून पीओपीच्या मूर्ती खपवल्या जात आहेत. घरी बादलीत विसर्जन करणाऱ्या काही नागरिकांना असे अनुभव यापूर्वी आले आहेत. प्रदूषण नको म्हणून घरी बादलीतच गणपती विसर्जन केल्यानंतर मूर्ती एक इंच पण कमी झाली नाही, असा अनुभव आल्याचे अरुण पाटील यांनी 'मटा'ला सांगितले.

ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सांगितले, की शाडूच्या नावाने पीओपीच्या मूर्ती विकण्याचे प्रमाण वाढले असून ग्राहकांच्या ते लक्षात येत नाही. या दोन्ही मूर्तींमधील फरक ओळखणे सोपे आहे. मूर्ती पारखूनच खरेदी करा.




असा ओळखा फरक

शाडूची मूर्ती वजनाला जड असते, तर पीओपीची हलकी असते.

आतील पोकळ भागातील शाडूच्या मूर्तीचा रंग मातीचाच असतो तर पीओपीच्या मूर्तीच्या आतील भागातील रंग पांढरा असतो.

शाडूच्या मूर्तीचे रंग पोस्टर किंवा वॉटर असतात, ते डोळ्याला फिके भासतात. त्याउलट पोओपीच्या मूर्तींचे रंग रासायनिक असल्याने उग्र भासतात.

शाडूच्या मूर्ती हाताने तयार केल्यामुळे त्या सुबक असतात, तर पीओपीच्या मूर्ती साच्यात तयार केल्याने त्यावर तडे, ओघाळलेले रंग दिसून येतात.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंडळांसाठी ‘सोशल’ व्यासपीठ

$
0
0

Amol.Agavekar @timesgroup.com

घराघरातला गणेशोत्सव सार्वजनिक करून स्वातंत्र्यलढ्याला हातभार लावणारा पुण्याचा गणेशोत्सव ग्लोबल झाला आहे. याच मालिकेत पुण्यातील तरुणांनी पुढचे पाऊल टाकत सार्वजनिक गणेश मंडळांना सोशल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नवी वेबसाइट सुरू केली आहे. गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अभिमानाची बाब असलेल्या आपल्या मंडळाचे फोटो, व्हिडिओ, माहिती आता www.mandalmajha.com या वेबसाइटच्या माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती या साइटचा प्रवर्तक कुणाल श्रीगोंदेकर याने 'मटा'ला दिली.

कुणाल श्रीगोंदेकर, ययाती चरवड, प्रणव रायसोनी व ओंकार राऊत या आयटी, प्रसारमाध्यमांत काम करणाऱ्या चार तरुणांनी सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ही साइट सुरू केली असून, मंडळांना साइटवर आपली मोफत नोंदणी करावी लागणार आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर या सोशल साइट्सवर ज्याप्रमाणे खाते उघडता येते, तसेच खाते नोंदणीनंतर या साइटवर उघडले जाईल. मग गणपती मंडळांचे कार्यकर्ते त्यावर आपली माहिती अपलोड करू शकतील.

संकल्पनेबाबत ययाती म्हणाला, 'आम्ही सगळेच लहानपणापासून पुण्याच्या पेठांतील गणेश मंडळांचे कार्यकर्ते आहोत. मी गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक मंडळांना ग्लोबल व्यासपीठ मिळवून देण्याचा विचार करत होतो त्यातूनच ही कल्पना मला सुचली. आम्ही चौघांनी त्यावर चर्चा केली आणि या वर्षी ती सर्वांसाठी खुली करत आहोत.'

'या साइटवर मंडळ, विक्रेते आणि कार्यकर्ता असे तीन प्रकारचे प्रोफाइल आहेत. त्यामध्ये मोफत नोंदणी केल्यावर तुम्हाला एक लॉग-इन आयडी मिळेल. मग आपले मंडळ, कार्यकर्त्यांचे, देखाव्याचे, उपक्रमांचे आणि या वर्षीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ त्यामध्ये अपलोड करता येतील,' असे कुणालने सांगितले. साइटची तांत्रिक जबाबदारी सांभाळणारा प्रणव म्हणाला, 'आतापर्यंत पाच मंडळांनी आमच्याकडे नोंदणी केली असून, नोंदणी केलेल्या प्रत्येकाला अनलिमिटेड स्पेस आम्ही एक वर्षासाठी देणार आहोत. मंडळांनी अपलोड केलेल्या माहितीवर आम्ही लक्ष ठेवून आक्षेपार्ह माहिती अपलोड होणार नाही याची काळजीही आम्ही घेणार आहोत.'

कुणाल म्हणाला, पोलिसांकडून पुण्यातील मंडळांची यादी आम्ही घेतली आहे. नोंदणीपूर्वी या यादीत आम्ही मंडळाचे नाव तपासून घेतो. मानाचे पाच गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळाशीही आम्ही संपर्क केला आहे. आयटी क्षेत्रातील मंडळी, आजी-आजोबा आणि विविध कारणांमुळे प्रत्यक्ष गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक न पाहू शकणाऱ्या सर्वांनाच या साइटवर फोटो व्हिडिओ पाहून गणेशोत्सव अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवात विविध सेवा सुविधा पुरवणारे मंडप, लाइट, साउंड सिस्टीम, डेकोरेशन करणारे व्यावसायिक, ढोल-ताशा मंडळे या सर्वांनाच या वेबसाइटवरून वेगळे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.'

मंडळांची मोफत नोंदणी

फोटो, व्हिडिओ अपलोड करता येणार

अनलिमिटेड स्पेस

वर्षभराची व्हॅलिडिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याच्या गणपतीचे दर्शन घेण्याची संधी

$
0
0

पुणे- भारतातील सर्वांत मोठ्या शुद्ध सोन्याच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्याची पुणेकरांना मिळणार आहे. बंडगार्डन येथील रांका ज्वेलर्सच्या दालनामध्ये १७ सप्टेंबरपर्यंत या मूर्तीचे दर्शन घेता येईल. पाच फूट उंच व चार फूट रुंद आकाराची ही मूर्ती २४ कॅरेटची आहे. प्राणदा ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या थायलंडमधील कारखान्यात ही मूर्ती घडवून पुण्यात आणण्यात आली, अशी माहिती कंपनीचे संचालक विनोद तेजवानी व सचिन मलबारी यांनी दिली. पुणेकरांनाही या मूर्तीचे दर्शन घेता यावे, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असे अनिल रांका यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपीमुळे संगीतातील मानदंड कमी होत आहेत- खाँअमजद अली खाँ

$
0
0

chintamani.patki @timesgroup.com

'नवीन पिढी खूप प्रतिभावान आहे. या पिढीची समज चांगली आहे, पण या पिढीला संगीत, साहित्य, नाट्यकलेतील अभिजातता आयती मिळाली आहे. कलेतील जे मानदंड आहेत, ते त्यांच्यासमोर आहेत, यामुळे नवीन पिढी 'कॉपी' करण्यातच धन्यता मानते. या कारणामुळेच प्रतिभा असूनही निर्मिती ठप्प झाली असून, संगीतातील मानदंड कमी होत आहेत,' अशा शब्दांत विख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी अभिजात संगीताच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.

२४ बीट्स एन्टरटेंमेंटतर्फे आज (शुक्रवार) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ५.३० वाजता उस्ताद अमजद अली खाँ व प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खाँ यांची 'स्वरताज' ही मैफल रंगणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. या कार्यक्रमानिमित्त खाँ यांनी 'मटा'शी संवाद साधला. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी राज्यातील दुष्काळग्रस्त व नेपाळमधील भूकंपग्रस्तांना देण्यात येणार आहे. संगीताच्या माध्यमातून साधल्या जाणाऱ्या या कामाविषयी व असे काम करणाऱ्या तरुणाईच्या प्रगल्भ जाणिवेविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.

संगीताच्या बदलत्या प्रवाहाविषयी व ठप्प झालेल्या निर्मितीविषयी काय वाटते?

- अकबराच्या दरबारातील तानसेनला आपण ऎकू शकलो का? तसेच पुढील पिढ्या सध्याचे चांगले संगीत ऎकू शकतील की नाही, हा प्रश्नच आहे. कारण चिरकाल टिकेल असे संगीत निर्माणच होत नाही. नौशाद, मदनमोहन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र , ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी व लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा दिग्गज संगीतकारांचेच संगीत आज जगात ऎकले जात आहे. त्यावरून त्यांच्या अफाट प्रतिभेची कल्पना यावी. याचा अर्थ नव्या संगीतकारांचा मी विरोधक आहे, असे अजिबातच नाही. त्यांच्याकडे निश्चितच प्रतिभा आहे, पण त्यांनी नक्कल करण्याचे टाळून निर्मितीवर लक्ष द्यावे.

संगीताची व्याख्या कशी करता येईल?

- संगीत दोन प्रकारचे असते. स्वर हा पहिला प्रकार. शब्द नसलेला ध्वनी तो स्वर असतो. कोणतेही वाद्य असो किंवा आलाप त्यातून निघणारा स्वर समजण्यासाठी नसतोच. त्याचा आपण फक्त अनुभव घेऊ शकतो. दुसरे संगीत शब्दांत गुंफलेले असते. त्यांना आपण गाणी म्हणतो. शब्दांमध्ये सरमिसळ होऊ शकते, पण स्वराच्या बाबतीत कसलाच हस्तक्षेप करता येत नाही. ते अस्सल असतात.

जगाला संगीताने जोडता येईल का?

- संगीताला कोणताही धर्म नसतो. संगीतानेच जगाला जोडले असून हवा, पाणी, अग्नी याप्रमाणेच संगीताला कशामध्येही बांधता येत नाही. शास्त्रीय संगीतावरच संगीताचे सर्व प्रकार आधारलेले आहेत. जगात आज प्रचंड हिंसा आहे. जगाला शांतीची गरज असून, संगीत हे काम नक्की करू शकते, तसे काम होतही आहे. सर्व जग शिक्षित झाले आहे, पण त्या शिक्षणातून आपल्याला करुणा, दया, प्रेम मिळाले नाही. शिक्षण आपल्याला प्रेमळ बनवू शकले नाही.

शास्त्रीय संगीताची नव्या पिढीमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून हा विषय अनिवार्य करता येईल का?

- संगीताला बांधून ठेवता येत नाही. विद्यार्थ्यांना आपण आधीच बांधून ठेवले आहे. त्यात आणखी एका विषयाची सक्ती नको. मुळात विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे संगीत ऎकायला आवडते, हे त्यांनाच विचारायला हवे. त्यांच्याकडून ५० गाणी गाऊन घेतल्याने काही होणार नाही. 'सारेगमपधनीसा' असा एवढाच सराव करून घेतला तरी पुरे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व मन चांगले राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांना आधी 'सारेगमपधनीसा' एवढे तरी शिकू द्या.

रसिकांमध्ये अभिजात संगीताविषयी रूची वाढत आहे का?

- शास्त्रीय संगीत खूप मोठ्या प्रमाणावर ऎकले जात आहे. पुण्याने संगीत टिकवले आहे. सर्व प्रकारच्या कलांचा अनुभव पुण्यात घेता येतो. येथील संगीत, साहित्य, सिनेमा, संस्था सारेच काही अद्भुत आहे.

पुण्याशी काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत का?

- तीन वर्षांनंतर पुण्यात कार्यक्रम होत आहे. सवाई गंधर्व महोत्सवामुळे अनेक आठवणी आहेत. पुण्यात आलो की पं. भीमसेन जोशींची खूप आठवण येते. ते मला 'गुरूभाई' म्हणत, कारण त्यांनी माझ्या वडिलांकडे तालीम घेतली होती. आम्ही कार्यक्रमासाठी आलो की ते जेवायला घरी घेऊन जात.

रागांविषयी काय सांगाल?

- कलाकाराला आता पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणत्याही वेळेला कोणताही राग गाता येऊ शकतो.

सरोद गंभीर वाद्य आहे असे म्हटले जाते, आपण काही प्रयोग केले त्या विषयी?

- सरोद खूप लोकप्रिय झाली आहे. जगात २०० प्रतिभावान वादक आहेत. माझी मुले अमन आणि अयान प्रयोग करत आहेत. आम्ही सरोदवर पहिल्यांदा वंदे मातरम वाजवले. भूमातेला त्यातून वंदन केले. वैष्णवजन, रामधून वाजवून काही प्रयोग करून पाहिले. प्रयोग सुरूच राहतील.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगामी संमेलनासाठी अध्यक्षपदाचे ७ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी सात अर्ज आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी गुरुवारी दिली. संमेलनाध्यक्षपदासाठी सात अर्ज आल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, डॉ. श्रीपाल सबनीस, रवींद्र शोभणे, शरणकुमार लिंबाळे आणि प्रकाशक अरुण जाखडे यांच्या नंतर बुधवारी श्रीनिवास वारुंजीकर यांनी अर्ज दाखल केला. आडकर म्हणाले, 'महामंडळ पुण्यात आल्यापासून मी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहात आहे. गेल्या तीन वर्षांत यंदा प्रथमच सात अर्ज आले आहेत. पहिल्या दोन वर्षी प्रत्येकी चार अर्ज होते.' दरम्यान, वारुंजीकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून अरुण गोडबोले यांची स्वाक्षरी आहे. तर, अनुमोदक म्हणून श्रीकृष्ण जोशी, दिलीपकुमार डोंगरे, किसन पवार, डॉ. राजेंद्र माने आणि मधुसूदन पत्की यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ९ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत, गद्य एकांकिका स्पर्धेचे राज्यभर आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'संगीतनाटक' या आव्हानात्मक नाट्यप्रकाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 'व्होडाफोन रंगसंगीत' या संगीत आणि गद्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'व्होडाफोन'चे महाराष्ट्र, गोवा परिमंडळाचे व्यवसायप्रमुख आशिष चंद्रा आणि थिएटर अॅकॅडमीचे प्रमुख प्रसाद पुरंदरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुण्यासह सहा शहरांत या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून, स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष आहे.

पुण्यात ३० नोव्हेंबर, १ डिसेंबर रोजी प्राथमिक फेरी होणार आहे. तत्पूर्वी औरंगाबाद येथे २०, २१ नोव्हेंबरला, नाशिक येथे २२, २३ नोव्हेंबरला, गोव्यात २४ नोव्हेंबर रोजी, कणकवलीत २५, २६ नोव्हेंबर रोजी आणि रत्नागिरीत २८ नोव्हेंबर रोजी प्राथमिक फेरी होणार आहे. महाअंतिम फेरी डिसेंबर महिन्यात बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. संगीतनाटक विभागातील विजेत्या संघाला एक लाख रुपये, तर गद्य एकांकिका विभागातील विजेत्या संघाला दहा हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महाविद्यालये, नाट्यसंस्था यांच्याकडून १० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. गेल्या वर्षी स्पर्धेत १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, अशी माहिती पुरंदरे यांनी दिली. स्पर्धेची सर्व माहिती www.tapune.com या वेबसाइटवर उपलब्ध असेल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images