Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राजगुरुनगरमध्ये उलटा राष्ट्रध्वज

$
0
0

अतुल काळे, राजगुरुनगर

महाराष्ट्र दिनी राजगुरुनगर नगरपरिषदेवर उलटा राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी दोन अज्ञात इसमांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजाणतेपणी हा ध्वज उलटा फडकवला गेला, की ध्वजसंचलन झाल्यानंतर मुद्दामहून कुणीतरी खोडसाळपणाने ध्वज काढून पुन्हा उलटा फडकवला, याविषयी संशय आहे. नगरपरिषदेच्या इमारतीवर उंच ठिकाणी ध्वजाची जागा असल्याने या घटनेबद्दल गूढ निर्माण झाले आहे.

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या इमारतीवर शुक्रवारी सकाळी आठ वाजता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. परंतु, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा ध्वज उलटा फडकत असल्याचे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. लक्षात आल्यानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने ध्वज योग्य रीत्या फडकवला. हे ध्वजारोहण नेमके कुणाच्या हस्ते करण्यात आले, याबद्दल नगरपरिषदेचे कर्मचारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीटंचाई २५ जिल्ह्यांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर होऊ लागली असून, चौदाशे गावे आणि सोळाशे वाड्यांना तब्बल १६८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावू लागला आहे. पाणी व चाराटंचाईचे निवारण करण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे.

राज्यातील ३४ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. विशेषतः मराठवाड्याची पाण्याची स्थिती भीषण आहे. धरणांचा साठा आणि पाण्याचे स्रोत आटल्याने मराठवाड्यात स्थलांतराची वेळ आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल १२५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. औरंगाबादमधील ३१३ गावांना ४२९ टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. तसेच बीडमध्ये २४४, जालन्यात १६१, नांदेडमध्ये १२४, उस्मानाबादमध्ये ७६, तर लातूर जिल्ह्यात ४१ टँकर सुरू आहेत.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर जिल्ह्यात २७४ टँकरने पाणी देण्यात येत आहे. त्यातील एकट्या नगर जिल्ह्यात २३३ टँकरच्या साह्याने नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. पुणे व कोकण विभागात अनुक्रमे ५९ व ५६ टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात नऊ, रायगडमध्ये १७, रत्नागिरीत १२ व पालघर जिल्ह्यात २१ टँकर सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात १० गावे आणि ७३ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. या टंचाईग्रस्त गावांत १४ टँकर सुरू करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात ३०, सांगलीत तीन व सोलापूरमध्ये नऊ टँकरने पाणी देण्यात येत आहे. नागपूर विभागातील पाण्याची स्थिती चांगली आहे. नागपूर जिल्ह्यात फक्त तीन टँकर सुरू आहेत. वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोलीत एकही टँकर सुरू नाही. गेल्या वर्षी या काळात १५१६ टँकर सुरू होते. यंदा त्यापेक्षा थोडी जास्त तीव्रता जाणवत असून, १६८६ टँकर सुरू झाले आहेत. मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीजे’चा दंगा बंद करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी तब्बल दीडशे आक्षेपार्ह वेबसाइट्स बंद केल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी दिली. गणेशोत्सवानंतर डीजेवर पूर्णपणे बंदी घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'गेल्या वर्षी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर शहरात दगडफेक झाल्याने काही दिवस तणाव निर्माण झाला होता; पण पुणेकर नागरिकांनी वेळीच सतर्कता आणि एकजूट दाखवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर आतापर्यंत सोशल मीडियामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. याचे श्रेय सर्व धर्मांतील लोकांना जाते,' असे मुत्याल म्हणाले. पुढील काळात सार्वजनिक उत्सव आणि जयंती साजरी करताना स्पीकरच्या मोठ्या भिंती उभारता येणार नसून, पुणे पोलिस डीजे पूर्णपणे बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येरवडा पोलिस ठाणे आयोजित सार्वजनिक उत्सव पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात मुत्याल बोलत होते. वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, खडकी विभागाचे सहायक आयुक्त श्याम मोहिते, विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे, चंदननगरचे अनिल पात्रुडकर, दिघीचे नवनाथ घोगरे, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक जॉन पॉल, हनीफ शेख, सुलभा क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील अनके मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुत्याल म्हणाले, 'विविध धर्मांतील सण, उत्सव आणि जयंती करताना प्रत्येक जातीचे लोक एकत्र आल्याने गणपती उत्सव, ईद आणि शिवजयंतीमध्ये काहीही अनुचित प्रकार घडलेला नाही. म्हणूनच पुणे पोलिसांनी गणेशोत्सवानंतर 'डीजे' बंद करण्याचे ठरवले आहे. स्पीकरवर गाणे लावले तरी उत्सव साजरा करता येतो. त्यामुळे डीजे पूर्णपणे बंद होईल; मात्र याकरिता जनतेची साथ महत्त्वाची आहे.'

'धानोरी भागातील पंधरा मंडळांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून एक आदर्श घालून दिला आहे,' असे आमदार मुळीक म्हणाले.गेल्या वर्षीच्या विविध उत्सवांत जनजागृती आणि सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळांचा येरवडा पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक देव यांनी केले. प्रास्ताविक सहायक आयुक्त मोहिते यांनी, तर आभारप्रदर्शन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संशयी वृत्तीतून प्रेयसीवर वार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी प्रियकराला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. विजयकुमार दुधाळ (२४, रा. पिंपरी, सोलापूर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. नीलम यदगिरी (२३, रा. जिद्द अपार्टमेंट, दत्तनगर, दिघी) या तरुणीचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी समोद मुन्नालाल जादोन (३१, रा. दिघी) यांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. या केसमध्ये सरकारी वकील हिरा बारी यांनी १३ साक्षीदार तपासले.

नीलमचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले होते. आरोपी तळेगाव दाभाडे येथील डी. वाय पाटील कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेत होता. नीलमचे आणि विजयचे मैत्रीतून प्रेमसंबध जुळले होते. तिला कल्याणीनगर येथील एका कंपनीत काम मिळाले होते. तिची पुण्यात राहण्याची व्यवस्था नव्हती. फिर्यादी समोद आणि विजय ओळखीचे असल्याने समोदने तिला भाड्याने रूम मिळवून दिली होती.

विजय लग्नासाठी तिच्यावर वारंवार दबाव आणत होता. ती शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू असे सांगत असे. नीलमची आई देखील त्याला शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करून देऊ असे सांगत होती. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. त्याने गावाला जाऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याच्या गावाला जाऊन नीलमने व तिच्या आईने त्याला समजावून सांगितले होते. तरीही तो लग्न करण्यासाठी आग्रह धरून राहिला होता.

घटनेच्या पूर्वी तिची रूम पार्टनर बाहेर गेली असताना नीलम समोदच्या कुटुंबीयांसोबत राहिली होती. ही गोष्ट विजयला समजल्याने तो तिला वारंवार फोन करत होता. त्यामुळे तिने समोदला सकाळी लवकर रूमवर सोडण्यास सांगितले होते. समोदने तिला आठ ऑगस्ट २०११ रोजी सकाळी साडेनऊ वाजता सोडले. त्यानंतर विजयकुमार याने रूममध्ये जाऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि तिला जखमी अवस्थेत तिथे टाकून तो पळून गेला. शेजारच्यांच्या घरात थांबलेल्या समोदने नीलमला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी आरोपी विजयचा फोटो पडला होता. विजयला पळून जाताना पाहणाऱ्या शेजाऱ्यांनीही त्याला ओळखले. त्याला अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्या हाताला चाकूमुळे जखम झाली होती. बचावपक्षाने खून समोदनेच केल्याचा बचाव केला होता.

चोराला अटक

पुणे : रात्रीच्या वेळी रेल्वेमध्ये प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या सराईत चोराला रेल्वे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी सचिन भिकाजी मुंडेकर (वय २८ रा. पावनळ, ता. दापोली) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे अधिक तपास केला असता पुणे, लोणावळा रेल्वे स्टेशन येथे येऊन रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन तो बॅगा, पर्स, मोबाइल चोरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. यात ७० हजार २०० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. रेल्वेचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे, पोलिस उपनिरीक्षक नाना मापारी, उमेश बागली, धनंजय दुगाने, अमरदीप साळुंके, महेश कर्डीले, दत्तात्रय मोरे, अजय पारधी, तुषार गेंगजे, जगदीश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असताना कामगाराचा तोल जाऊन मृत्यू झाला. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. द आर्किड स्कूलच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या बाजूच्या दोन नंबर गेटलगत पोलवर सीसीटीव्ही लावत असताना हा प्रकार घडला. १२ सप्टेंबर २०१४ रोजी ही घटना घडली. यात गणेश शंकर भंडारकवठे (२४, रा. पानमळा सिंहगड रोड) याचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही बसविण्याचे काम करत असताना कामगारांना सुरक्षेसाठी योग्य ती साधने न देता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ​निखील दरोडे (३०, रा. बाणेर), संपत आंबरे (३३, रा. फुरसुंगी, हडपसर), राहुल बागरेचा (४०, रा. बिबवेवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जाच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरीः गृहकर्ज देण्याच्या बहाण्याने विविध कारणांसाठी पैसे घेऊन सुमारे तीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. श्रीराम फायनान्स कंपनीच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली असून, कालिंदी मिश्रा (वय ४०, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.

श्रीराम फायनान्सचे साक्षी जैन, राहुल व आकांक्षा (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी, राहुल आणि आकांक्षा या तिघांनी श्रीराम फायनान्सकडून मिश्रा यांना २० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची हमी दिली. त्यासाठी मिश्रा यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन टाटा व्हॅल्यू कंपनीच्या नावे चेकद्वारे पैसे भरण्यास सांगितले. या तीन भामट्यांनी अशाप्रकारे एकूण तीन लाख २५ हजार रुपये स्वीकारले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गृहकर्ज न मिळाल्यामुळे मिश्रा यांनी श्रीराम फायनान्सच्या वरील तिघांकडे पैसे परत मागितले. मात्र, पैसे देण्यास यांनी टाळाटाळ केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्य़ाचे मिश्रा यांच्या लक्षात आले.

पोलिसांना शिवीगाळ; तरुण अटकेत

पुणे : बिबवेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून, तसेच कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विनोद बाळू गायकवाड (२५. रा. पद्मावतीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक डी. सपकाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक छळप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पद्मावती येथे एका सात वर्षांच्या मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी एक २५ वर्षांच्या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दादा अंकल ऊर्फ अमोल श्रीमंत सोनवणे (रा. पद्मावती) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोनवणे याने एका सात वर्षांच्या मुलाशी लैंगिक चाळे केल्याची माहिती उघडकीस आली. या मुलाला मारण्याची धमकी देत कोणाला काही न सांगण्यास त्याने बजावले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महिलेची फसवणूक

लग्नाच्या आमिषाने महिलेकडून दीड लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी आणि महिलेची एका मेट्रोमॉनी साइटवरून ओळख झाली. हडपसर येथील महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संजय वर्मा (वय ४१, रा. कल्याण) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली महिला आ​णि आरोपी वर्मा यांची ओळख एका एका मेट्रोमॉनी साइटवरून झाली होती.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर वर्मा याने आई आजारी असल्याचा बहाणा करून महिलेकडून उपचारासाठी दीड लाख रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेशी लग्न करता त्याने दुसऱ्याच एका महिलेशी लग्न केले. तक्रारदार महिलेने त्याच्याकडे पैसे परत मागितले असता, त्याने पैसे परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ऑनलाइन व्यवहारातून फसवणूक ऑनलाइन खरेदीद्वारे सुमारे ४० हजार रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून हॉस्पिटलच्या आवारात बँक ऑफ बडोदा आहे. या बँकेत अतुल नारायणकर यांचे अकाउंट आहे. आरोपींनी त्यांच्या अकाउंटवरून ४० हजार रुपयांची ऑनलाइन व्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’ची ई-बुक्स ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने अर्थातच 'बालभारती'ने ई-बुक्सच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. 'बालभारती'ची सर्व पुस्तके टप्प्याटप्प्याने ऑनलाइन उपलब्ध होणार असून, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 'बालभारती'च्या http://ebalbharati.in/ या नव्या वेबपोर्टलवरून ही पुस्तके विद्यार्थ्यांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'बालभारती'च्या सर्व सुविधा ऑनलाइन करण्याची घोषणा नुकतीच केली होती. शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही या पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी ई-बुक्स उपलब्ध करून देण्याची सूचना आपल्या अहवालातून राज्य सरकारकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'बालभारती'मध्ये त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा 'मटा'ने आढावा घेतला.

यापूर्वीच्या ई-बुक्सचा एकूण आकार अत्यल्प करण्यात येणार असून, त्या योगे ही पुस्तके सहजगत्या डाउनलोड होण्यास मदत होणार आहे. या वेबसाइटवरून सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षण खात्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची नोंदणी यापुढे ऑनलाइन केली जाणार आहे. तसेच, पुस्तक विक्रेत्यांसाठीची पुस्तक खरेदीची सुविधाही ऑनलाइन माध्यमातून केली जाणार आहे. पुस्तकांच्या वितरणासाठीची ट्रॅकिंग सिस्टिम आणि संस्थेच्या 'किशोर' या मासिकाची नोंदणीही या पुढे ऑनलाइनच होणार असल्याचे या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ई-कंटेंट तयार करणे गरजेचे आहे. आम्ही ई- बालभारतीच्या माध्यमातून असे सर्व प्रकारचे ई-साहित्य उपलब्ध करून देऊ. त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर आदी ज्येष्ठ वैज्ञानिकांचे मार्गदर्शन घेतले जाईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ वीची माहितीपुस्तिका २० मेपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमधील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशांसाठीच्या माहिती पुस्तिका येत्या २० मेपासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आपापल्या माध्यमिक शाळांच्या माध्यमातून या माहितीपुस्तिका शंभर रुपये किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजांचे एकूण ५० पसंतीक्रम उपलब्ध होणार असून, त्यापैकी किमान ४० पसंतीक्रम भरणे यंदा अनिवार्य करण्यात आले आहे.

शहरातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी शहरातील प्राचार्य आणि अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक शनिवारी झाली. गरवारे कॉलेजमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी रविवारी 'मटा'ला दिली. या प्रक्रियेसाठीच्या उद्बोधन वर्गांचे नियोजन आणि एकूण प्रवेश प्रक्रियेचे नियोजनही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ४० पसंतीक्रम भरण्याच्या अटीमधून कला इंग्रजी

माध्यमाच्या वर्गांना वगळण्यात आले आहे. कला इंग्रजी माध्यमासाठी ज्युनिअर कॉलेजांची संख्या कमी असल्याने, या कॉलेजांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे सर्व प्राधान्यक्रम भरावे लागणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.

'या बैठकीमध्ये माहिती पुस्तिकांचा आराखडा अंतिम करण्यात आला. ही पुस्तके आता छपाईसाठी 'बालभारती'कडे देण्यात आली आहेत. शाळांना माहितीपुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून ती उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधूनच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत,' असे जाधव यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शहरात नऊ झोन

या प्रक्रियेसाठी शहरात एकूण नऊ झोन तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठीच्या नियुक्त्याही पूर्ण झाल्या आहेत. हे झोन आणि त्याच्याशी संबंधित कॉलेजे पुढीलप्रमाणे- ( झोन (कॉलेज) या क्रमाने )- १. पुणे शहर ( एस. पी. कॉलेज), २. कर्वेनगर, कोथरूड (आबासाहेब गरवारे कॉलेज), ३. पर्वती, धनकवडी (शाहू कॉलेज, पर्वती ), ४. सिंहगड रोड (वसंतराव सणस कॉलेज, वडगाव खुर्द ), ५. कॅम्प, येरवडा (नौरोसजी वाडिया कॉलेज), ६. स्वारगेट, हडपसर (आकुताई कल्याणी साधना कॉलेज, हडपसर), ७. शिवाजीनगर, औंध, पाषाण (फर्ग्युसन कॉलेज ), ८. पिंपरी- भोसरी (जयहिंद कॉलेज, पिंपरी), ९. चिंचवड, निगडी (म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाच्या बँकेचे एटीएम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टपाल खात्याच्या बचत बँकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांसाठी पुण्यातील पहिले ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) सेंटर हे मुख्य टपाल कार्यालयात (जीपीओ) बांधण्यात आले असून, त्याचे उद‍्घाटन पाच मे रोजी करण्यात येणार आहे. लवकरच शिवाजीनगर आणि चिंचवड या टपाल कार्यालयांसह आणखी नऊ ठिकाणी 'एटीएम' सेंटर सुरू केली जाणार आहेत.

या सेंटरमुळे टपाल ग्राहकांना कोअर बँकिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे बचत खाते, रिकरिंग खाते, पीपीएफ आणि मुदत ठेवींच्या बचत योजनांच्या खातेदारांचा त्रास कमी होणार आहे. खासगी बँकांकडून नागरिकांना सुविधा पुरविण्यात येत असल्याने टपाल खात्याकडे असलेले खातेदार खासगी बँकांकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे टपाल खात्याने 'एटीएम' सेंटर उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

देशभरातील एक लाख ५५ हजार टपाल कार्यालये कोअर बँकिंगद्वारे जोडण्याचा टपाल खात्याचा प्रकल्प आहे. त्यानुसार पुणे विभागांतर्गत नऊ मुख्य टपाल कार्यालये आणि २० उपमुख्य टपाल कार्यालयांमध्ये 'एटीएम' सेंटर सुरू करण्याचे नियोजित आहे. त्यापैकी पहिले 'एटीएम' हे मुख्य टपाल कार्यालयात बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पाच मे रोजी केले जाणार असल्याचे टपाल खात्याच्या पुणे विभागाच्या संचालिका सुमिता अयोध्या यांनी सांगितले.

या 'एटीएम' सेंटरमध्ये पहिले सहा महिने मर्यादित सेवा मिळणार आहेत. त्यानंतर अन्य बँकांच्या 'एटीएम' कार्डप्रमाणे टपाल खात्याच्या कार्डवरून व्यवहार करता येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी 'एटीएम' सेंटरवर स्वतंत्र रॅप बनविण्यात आला असल्याचे अयोध्या यांनी स्पष्ट केले. लवकरच शिवाजीनगर आणि चिंचवड या दोन ठिकाणांबरोबरच पुणे विभागांतर्गत असलेल्या सातारा, कराड, सोलापूर, श्रीरामपूर, नगर, पंढरपूर आणि फलटण या सात ठिकाणी 'एटीएम' सेंटर सुरू होणार असल्याचेही अयोध्या यांनी नमूद केले.

नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुविधा

टपाल खात्याच्या पुणे विभागांतर्गत ४९७ टपाल कार्यालये आहेत. या वर्षाअखेरीस ही सर्व कार्यालये कोअर बँकिंगद्वारे जोडली जाणार आहेत; तसेच नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुविधाही दिली जाणार असल्याचे पुणे विभागाच्या संचालिका सुमिता अयोध्या यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्यु. कॉलेज बिनादुचाकीचेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करून दुचाकीवर फिरण्याचा आनंद लुटू इच्छिणाऱ्या कॉलेजवयीन युवक-युवतींच्या स्वप्नाला 'ब्रेक' लागण्याची चिन्हे आहेत. मोटार वाहन कायद्यातील नियमांनुसार १६ ते १८ वयोगटासाठी ५० सीसी क्षमतेच्या वाहनांसाठीच लायसन्स दिले जाते; पण सध्या या क्षमतेच्या दुचाकीच बाजारात उपलब्ध नसल्याने या वयोगटातील लायसन्ससाठी 'ड्रायव्हिंग टेस्ट' घेण्यातच अडचणी येत आहेत.

दुचाकीवर शहरात फेरफटका मारण्यासाठी उत्सुक असणाऱ्या १६ ते १८ वयोगटातील युवक-युवतींना 'नॉन-गिअर'अंतर्गत पक्के लायसन्स दिले जाते. त्यासाठी ५० सीसी क्षमतेचे वाहन चालविण्याचे बंधन होते. तरी, या स्वरूपात लायसन्स प्राप्त करून त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या गाड्या सर्रास चालविल्या जायच्या. काही वर्षांपूर्वीपर्यंत, ५० सीसी क्षमता असणाऱ्या गाड्याही बाजारात उपलब्ध होत्या. अलीकडच्या काळात मात्र, ५० सीसी क्षमतेच्या गाड्यांचे उत्पादनच आघाडीच्या बहुतेक वाहन कंपन्यांनी बंद केले आहे. त्यामुळे, दहावीच्या परीक्षेनंतर कॉलेजमध्ये नव्या गाडीवर जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना त्यासाठी आणखी दोन वर्षांची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

वयाच्या १८ वर्षांपर्यंत नॉन-गिअर गाडी अर्थात ५० सीसी क्षमतेची गाडी चालविण्याचे बंधन असूनही, त्यासाठी संबंधित युवक-युवतींची ड्रायव्हिंग टेस्ट अधिक क्षमता असणाऱ्या दुचाकींवर घेतली जात होती. ही बाब महाराष्ट्र वाहतूक सेनेने आरटीओच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच, परिवहन आयुक्तांना याबाबत सविस्तर निवेदन पाठविण्यात आले. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून अशा स्वरूपात घेतली जाणारी टेस्ट आरटीओने बंद केली आहे. तसेच, नियमानुसार केवळ ५० सीसी गाड्या असलेल्यांची टेस्ट घेण्यात येत आहे.

सनी, लूना यासारख्या काही मोजक्याच गाड्या ५० सीसी क्षमतेच्या मर्यादेत येतात. 'सुपरबाईक'ची क्रेझ असणाऱ्या नव्या पिढीला १०० सीसी आणि त्याहून अधिक क्षमतेच्या गाड्यांचे आकर्षण आहे. त्यामुळे, भविष्यात तर १६ ते १८ वयोगटात लायसन्स काढणाऱ्यांची संख्या अगदीच कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कारवाई करणार का?

आरटीओने १६ ते १८ वयोगटासाठी ५० सीसीच्या गाड्यांवर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे, लायसन्स घेण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांचे प्रमाण आधीच कमी झाले आहे. तरीही, काही जण घरातील एखादी जुनी गाडी टेस्टसाठी घेऊन येतात. मात्र, त्यानंतर त्यापेक्षा अधिक क्षमतेची गाडी चालवितात. त्यामुळे, अशा उत्साही युवक-युवतींवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिस हाती घेणार का, अशी विचारणा आता केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लँडलाइनवरून मोफत कॉल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लँडलाइन कनेक्शनकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) लँडलाइनवरून रात्री नऊनंतर सकाळी सात वाजेपर्यंत देशभरातील कोणत्याही नेटवर्कच्या लँडलाइन आणि मोबाइलवर मोफत कॉल सेवा सुरू केली आहे. मात्र, या सेवेमुळे लँडलाइनच्या मासिक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.

या सेवेला एक मेपासून सुरुवात झाली. ब्रॉडबँड सेवेमुळे लँडलाइन सेवा तग धरून आहे. ग्राहकांना पुन्हा लँडलाइनकडे वळविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री नऊनंतर सकाळी सात वाजेपर्यंत देशात कोठेही लँडलाइन आणि मोबाइलवर मोफत फोन करता येईल. या सुविधेमुळे निश्चित मासिक शुल्कात (फिक्स्ड मंथली चार्जेस) वाढ करण्यात आली आहे. शहरी भागातील मासिक शुल्क १४० रुपये असणाऱ्या ग्राहकांना १६० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच मासिक शुल्क १९५ रुपये असणाऱ्यांना २२० रुपये आकारण्यात येणार असल्याचे ​अतिरिक्त महाव्यवस्थापक आशिष पाठक यांनी सांगितले.

मासिक शुल्क नवीन शुल्क (रुपयांमध्ये)

१५० १९५

३३० ३५५

४५० ४९५

६५० ६९५

९७५ ९९५

१,४५० १, ४९५

२,४५० २,४९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड ब्रेकरने नागरिक हैराण

$
0
0

पुणेः सहकारनगर भागातील दीड किलोमीटरच्या अंतरावर चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे या भागातून ये जा करणाऱ्या वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. चव्हाणनगर ते सहकारनगर येथील दाते बसस्टॉपच्या दरम्यान असलेल्या रोडवर १७ स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत. हे स्पीड ब्रेकर नियम पाळून बसविण्यात आले आहेत का, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. स्पीड ब्रेकर बसविताना पालिकेचा पथ विभाग कशा पद्धतीने डोळेझाक करते, याचा प्रत्यय यामधून येत आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात येण्यासाठी कमी वर्दळीचा आणि सुरक्षित रोड म्हणून सहकारनगर भागातील रोडचा वापर होतो. धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, बालाजीनगर, आंबेगाव या भागातील वाहनचालक सहकारनगर भागातील रोडचा वापर करतात. वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी येथे स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी डांबराचे स्पीड ब्रेकर लावले होते. मात्र, गेल्या आठवड्यात दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये तब्बल १७ रबरी स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. स्पीड ब्रेकर कसे असावेत, याबाबतचे निकष आहेत. इंडियन रोड काँग्रेसची नियमावली आहे. मुख्य रहदारीच्या रोडवर स्पीड ब्रेकर बसविण्यात येत नाही. वाहतूक विभागाने मुख्य रोडवर अशा पद्धतीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मान्यता कशी दिली, अशी विचारणा सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली.

सुरक्षिततेसाठी तळजाई पठार चौक ते दाते बसस्टॉप दरम्यान स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. वाहतूक शाखेची परवानगी घेऊन हे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत.

- सुभाष जगताप, स्थानिक नगरसेवक

या रस्त्यावर दहा ते वीस मीटरच्या अंतरावर स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत, याची चौकशी व्हावी.

- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्दी, पडसे या किरकोळ आजारांसाठी उपचार घेण्याकरिता गेलेल्या तरुणावर चुकीचे औषधोपचार करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बिबवेवाडी इंदिरानगर येथील आनंदी क्लिनिकच्या डॉ. अविनाश एकनाथ गंगावणे यांना ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

निष्काळजीपणा करून सेवेत त्रुटी ठेवल्याप्रकरणी मृत्यू झालेल्या तरुणाच्या वडिलांना साडेसात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश संबंधित डॉक्टरला देण्यात आला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य क्षितिजा कुलकर्णी व मोहन पाटणकर यांच्या मंचाने हा निकाल दिला आहे.

बालाजी ऊर्फ संदीपान भगवान कदम (२५, रा. सिद्धार्थनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याचा इंजेक्शन विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याचे वडील भगवान भिवा कदम (६०) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यांनी अॅड. एन. के. पाटील यांच्यामार्फत आनंदी क्लिनिकच्या डॉ. अविनाश एकनाथ गंगावणे यांच्याविरुद्ध मंचाकडे दावा दाखल केला होता. तक्रारदारांचा मुलगा बालाजी माथाडी कामगार होता. तो तब्येतीने सुदृढ होता. पोलिस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. तीन ऑगस्ट २००९ रोजी त्याला सर्दी पडशाचा त्रास होऊ लागल्यामुळे तो डॉ. गंगावणे यांच्याकडे गेला. त्या दिवशी चुकीचे औषधोपचार केल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. कमरेवर देण्यात आलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे बालाजीवर दुष्परिणाम झाले. त्याचा चेहरा सुजला. तसेच कमरेचा भाग काळा-निळा झाला होता.

डॉ. गंगावणे यांनी त्याला गोळ्या घेऊन घरी पाठवले. आजार वाढल्याने वडिलांनी त्याला डॉ. वैद्य यांच्याकडे हलवले. त्याला अधिकच त्रास होऊ लागल्याने पुन्हा के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारांदरम्यान आठ ऑगस्ट २००९ रोजी त्याचा मृत्यू झाला. उपचार घेण्यापूर्वी त्याला कोणताही आजार नव्हता. चुकीच्या औषधोपचारांमुळे त्याला विषबाधा होऊन मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनी मंचाकडे दावा दाखल केला.

पोस्ट मॉर्टेम अहवाल महत्त्वाचा

या प्रकरणी डॉ. गंगावणे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल असून, तो खटला कोर्टात प्रलंबित आहे. मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. यात पोस्ट मॉर्टेमचा अहवाल महत्त्वाचा ठरला. बालाजीचा मृत्यू चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे झालेल्या विषबाधेमुळे झाल्याचा निर्वाळा मंचाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाच्या हिशेबाची दिरंगाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घुमान येथील ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महिना होत आला, तरी हिशेब तयार करण्याची प्रक्रिया दिरंगाईनेच केली जात आहे. संमेलनाचा हिशेब पूर्ण करण्यासाठी अजून महिनाभर लागणार असल्याचे साहित्य महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचा मुख्य मंडप व भोजनाची जबाबदारी उचणार असल्याचे पंजाब सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळे खर्चाच्या रकमेची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न महामंडळ व संयोजकांपुढे आहे.

संत नामदेवांच्या कर्मभूमीतील या संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेल्या पंचवीस लाखांच्या अनुदानासह पंजाब सरकारनेही भरीव आर्थिक सहकार्य केले होते. त्यामुळे संमेलनासाठी एकूण किती खर्च झाला, त्यात अनुदानाची रक्कम कशी खर्च झाली, साहित्यिक उपक्रमांवर किती खर्च झाला आदी प्रश्न साहित्यवर्तुळात चर्चेत आहेत. संमेलनाचा हिशेब करण्यासाठी महामंडळाला अजून महिनाभर असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. तर, संमेलनाच्या हिशेबाचे काम चार्टर्ड अकाउंटंट करत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत ती फाइल आम्हाला मिळेल. हिशेबाचे काम आम्ही शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते पूर्ण झाल्यावर आम्ही तो सर्वांपुढे सादर करू. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहील, असे स्वागताध्यक्ष भारत देसडला म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्व संमेलन अडचणीत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मराठी साहित्यिकांनी परदेशात जावे असे मलाही वाटते. मात्र ते सरकारी खर्चाने नको,' अशी स्पष्ट भूमिका मांडत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाला सरकारकडून निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत नुकतेच येथे दिले. परिणामी, जोहान्सबर्ग येथील विश्व मराठी साहित्य संमेलनापुढे निधीअभावी अडचणी उभ्या राहण्याची चिन्हे आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील उद्योजक राजू तेरवाडकर यांच्या साह्याने चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा घाट घातला आहे. या संमेलनासाठी सरकारने मदत करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपये या संमेलनाला मिळण्याबाबतच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर, तावडे यांना विश्व संमेलनाला निधी देणार का, असे विचारण्यात आले होते. 'साहित्यिकांनी परदेशात जावे असे मलाही वाटते. मात्र, हा प्रवास सरकारी निधीतून नको,' अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मात्र, 'विश्व संमेलनासाठी लागणारा निधी मिळवून देण्यासाठी बाहेरून मदत करू,' असेही त्यांनी सांगितले.

विश्व संमेलनाबाबत सरकारकडून अधिकृतरीत्या महामंडळाशी काहीही पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे संमेलनाबाबतचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेतला जाईल. - माधवी वैद्य, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरीब खातेदारांना न्याय कधी मिळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

खडकीतील अग्रसेन महाराज नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्यानंतर संस्थेने सर्व व्यवहार बंद केले असून, ऑडिटच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात येत आहे. मात्र, ज्या गोरगरिबांचे पैसे अडकले आहेत, त्यांना कधी दिलासा मिळणार असा सवाल करण्यात येत आहे.

खडकीतील अग्रसेन महाराज पतसंस्थेमध्ये २०१२मध्ये आठ ते दहा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या पतसंस्थेमध्ये हातगाडीचालक, विधवा, महिला, पेन्शनर आणि पथारीवाल्यांनी कष्ट करून जमवलेली पुंजी अडकली आहे. हा घोटाळा उघड होण्याच्या काही दिवस आधीच पतसंस्थेचे संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्या ठेवी काढून घेण्याचा प्रकार केला होता. या सर्व प्रकाराबाबत खातेदारांनी अनेकवेळा मोर्चा काढला होता. संचालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, खातेदारांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. संस्थेचे ऑडिट करण्यासाठी सहकार खात्यातर्फे ऑडिटरचीही नेमणूक करण्यात आली आहे.या पतसंस्थेतील घोटाळ्याबाबत आमदार विजय काळे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये आवाजही उठवला होता. संस्थेच्या ऑडिटरची चौकशी व्हावी, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, संचालकांच्या मालमत्तेची २००५ ते २०१५ या कालावधीतील माहिती मागवावी, अशी मागणी सभासद करीत आहेत. तसेच, पतसंस्थेच्या संचालकांनी त्यांच्या मित्रांना आणि नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिली आहेत. त्या कर्जांची अद्याप वसुली झालेली नाही. ही रक्कम दोन ते तीन कोटी रुपयांच्या घरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टायर पंक्चर? सावधान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुम्ही जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरून हॅरिस ब्रीज ते खडकी पोस्ट ऑफिस परिसरातून दुचाकीवरून जात असाल, तर सावधान... या भागात रस्त्यात खिळे टाकून दुचाकींचे टायर पंक्चर करणारी मंडळी कार्यरत झाली आहेत. तसेच, गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून पंक्चर काढण्यासाठी घेऊन जाऊन एकाच वेळी पाच-दहा पंक्चर असल्याचा बनाव करून नागरिकांची लुबाडणूक केली जात आहे.

परिसरातील रहिवाशांनी या प्रकाराबाबत 'मटा' ला माहिती दिली. हॅरिस ब्रीज ते खडकी पोस्ट ऑफिस मार्गावर अनेक ठिकाणी खिळे, धारदार वस्तू टाकरण्यात येतात. हे खिळे टायरमध्ये घुसून गाडीचे टायर पंक्चर होते. त्याचबरोबर या परिसरात अनेक मुले, युवक फिरून दुचाकीधारकांना टायरमध्ये हवा कमी असल्याचे सांगतात. यामध्ये स्थानिक नागरिकांना टाळून प्रामुख्याने युवती, महिला, नोकरदार पुरूष, ज्येष्ठ नागरिक यांना टार्गेट केले जाते.

त्यानंतर टायरमध्ये हवा भरण्यासाठी किंवा पंक्चर आहे का ते तपासण्यासाठी हे युवकच त्यांना पंक्चरच्या दुकानापर्यंत घेऊन जातात. त्या ठिकाणी गढूळ पाण्यात टायर बुडवून किंवा लक्ष विचलित करून टायरला एकाऐवजी पाच ते सात पंक्चर असल्याचे सांगितले जाते. त्यातून पाचशे ते हजार रुपये आकारण्यात येतात.

या शिवाय व्हॉल्व खराब झाल्याचे सांगून नवीन ट्यूब बसविण्यास भाग पाडले जाते. काहींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना चक्क टायरच बदलायला भाग पाडले जाते. त्यामुळे नागरिकांना विनाकारण भुर्दंड बसतो.या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलिस स्टेशन, पोलिस आयुक्तालय, आमदार यांच्यासह पालकमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. परंतु, अजूनही या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’वरच कृपा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महापालिका सेवेत असलेले त्यांचे नातेवाइक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कामांचे ठेके घेऊन कंत्राटी तत्त्वावरील कामगारांचे शोषण तसेच, करदात्या नागरिकांची लूट करत असल्याचे आरोप नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे आणि शारदा बाबर यांनी केले आहेत. त्यांनी या प्रकरणी महापालिकेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १३४ प्राथमिक शाळा, १८ माध्यमिक शाळा आणि मुलांचे क्रीडा प्रबोधिनी असे एक वसतीगृह आहे. या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम खासगी ठेकेदारांना देण्यात आले आहे. पूर्वीच्या 'अ' आणि 'ब' प्रभागातील शाळांच्या स्वच्छतेचे काम मेसर्स बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेड, 'क' प्रभागासाठी मेसर्स डीएम एंटरप्रायझेस आणि 'ड' प्रभागातील शाळांच्या स्वच्छतेचे काम मेसर्स युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांना देण्यात आले आहे. त्यासाठी या संस्थांना वार्षिक मोठ्या प्रमाणावर रक्कम दिली जाते.

या तिन्ही संस्थांच्या कामांची मुदत ३० नोव्हेंबर २०१४ रोजी संपली आहे. त्याला पाच महिने उलटून गेल्यानंतर महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी याच संस्थांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंगळवारी (पाच मे) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. या तिन्ही ठेकेदार संस्था महापालिकेतील 'राष्ट्रवादी'च्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ठेकेदार संस्थांकडून शाळांच्या स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे कायद्याने बंधनकारक असतानाही ते देण्यात येत नाही. त्यांचे तुटपुंजे वेतन थेट बँक खात्यात जमा केले जाते. मात्र, ठेकेदार संस्थांचे प्रतिनिधी पैसे जमा केल्यानंतर काही मिनिटांतच कामगारांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतात, असाही आरोप करण्यात आला आहे. या बाबत आयुक्तांकडे अनेकदा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचेही या नगरसेविकांनी म्हटले आहे. आयुक्तांनी शाळांच्या स्वच्छतेसाठी त्याच ठेकेदार संस्थांना पुन्हा एक वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि कामाची निविदा मागवावी; अन्यथा महापालिकेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सावळे, शेंडगे आणि बाबर यांनी दिला आहे.

तिन्ही नगरसेविकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, राष्ट्रवादी काँग्रेसला नाहक बदनाम करणारे आहेत. उल्लेख केलेल्या ठेकेदार संस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही. शहरात अनेक स्थानिक मंडळी आहेत. त्यांचे नातेसंबंध दूरवर आहेत. त्यांच्या कुणीही नातेवाइकाने मेहनत, अक्कलहुशारी आणि स्पर्धेत उतरून काम मिळविले असेल तर त्याची काही चूक आहे का? शिवाय ई-टेंडरिंग पद्धतीने निविदा काढल्या जातात. समजा, स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही काही चूक आढळून आल्यास आयुक्तांना ठेका रद्द करण्याचा अधिकार आहे. त्याचा वापर ते करू शकतात. नगरसेविकांनी केवळ द्वेषापायी आरोप करू नयेत.

- योगेश बहल, शहराध्यक्ष पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमधील टोलच्या वसुलीचा होणार तपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

दौंड-पाटस मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल व दौंड-काष्टी मार्गावरील (राज्य महामार्ग क्रमांक ६७) भीमा नदी पुलाच्या बेकायदा टोल वसुली संदर्भात तपास करण्याचे आदेश दौंड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.

दौंड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख व व्यापारी सचिन कोरे यांनी दौंड टोल नाक्याचे वसुली ठेकेदार कुणाल शहा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शिंदे, एस. पी. आवटे, उपअभियंता शशिकला पवार यांच्या विरोधात दौंड येथील न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला होता. वसुली ठेकेदाराने ठेका मिळाल्यापासून पुलावरील पथदिवे, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्याचप्रमाणे वाहनाकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्तीचा टोल जुलमी पद्धतीने वसूल केला जात असून, वाहनधारकांची लूट केल्याचे पुराव्यानिशी नमूद केले आहे. एका बाजूचा टोल वसूल करावयाचा असताना परतीच्या प्रवासाचाही टोल घेण्याचा प्रकार सर्रास घडला.

या संदर्भात वेळोवेळी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. दौंड टोल नाक्यावर होणाऱ्या टोळधाडीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले. हे सगळे अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमताने घडले असल्याचे नमूद करत तक्रारदारांनी संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी केली होती. तक्रारदारांच्या म्हणण्यात प्रथमदर्शनी तथ्य वाटल्याने दौंड कोर्टाने संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दौंड पोलिस ठाण्याला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईच्या हातातून मुलाला पळवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

डिंगोरे (ता. जुन्नर) येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ओट्यावर बसलेल्या मंडलिक कुटुंबीयांवर दुर्देवी घाला घातला गेला. आईच्या कुशीत बसलेल्या साडेतीन वर्षांच्या साई मंडलिक या बालकावर झडप घालून बिबट्याने पळवून नेले. अवघ्या पंधरा दिवसांत पुन्हा दुसऱ्या बालकाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

ओतूर भागात पंधरवड्यापूर्वी अशीच घटना घडली होती. त्यातही एका बालकाला बिबट्याने लक्ष्य केले होते. या घटनेने डिंगोरे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून, या वनविभागाच्या निषेधार्थ डिंगोरे ग्रामस्थांनी नगर-मुंबई महामार्गावर सोमवारी सकाळी अर्धा तास रास्ता रोको केला.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडे दहा वाजता मंडलिक कुटुंबीय घराबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी बाजूच्या शेतातून बिबट्या आला आणि त्याने साईला लक्ष्य केले. ही घटना समजताच जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे; तसेच अन्य पथकाने घटनास्थळी भेट दिली. परंतु, त्यावेळी लोकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. पंधरा दिवसांत दोन बालकांना या परिसरातून बिबट्याने लक्ष्य केले असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष होता.

वनविभागाचे चार पिंजरे

या परिसरात चार पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. मृत साईच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आठ लाख रुपयांचा धनादेश देण्यात येईल, असे वनविभागाच्या धोकटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा व्हॉल्व्ह चेंबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मॉडेल कॉलनी परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनच्या चेंबरमध्येच पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह आल्याने या भागातील पिण्याचे पाणी दुषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या चेंबरच्या शेजारीच हा व्हॉल्व्ह असल्याची तक्रार वारंवार घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार मॉडेल कॉलनी भागातील नाग‌रिकांनी केली आहे.

शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी भागातील चित्तरंजन वाटिका ते एलआयसी बिल्डिंग दरम्यान असलेल्या अर्धा किलोमीटरच्या रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाइपलाइन टाकली जात आहे. या कामाचे टेंडर काढून ठेकेदारामार्फत हे काम सुरू आहे. ही पावसाळी पाइपलाइन ज्या चेंबरमध्ये एकमेकांना जोडली जाते तेथे पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइचा व्हॉल्व्ह आहे. त्यामुळे या व्हॉल्व्हच्या वरून किंवा खालून पावसाळी पाइपलाइन घेऊन पुढे त्याचे चेंबर करणे गरजेचे होते. पावसाळी पाइपलाइनचे चेंबर आणि पाण्याच्या व्हॉल्व्ह एकाच ठिकाणी झाल्यास चेंबरचे पाणी पिण्याच्या लाइनमध्ये घुसून या भागातील नागरिकांना केला जाणारा पाणीपुरवठा दुषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये बदल करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या परिसरातील रहिवाशी आणि पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नंदकुमार मंडोरा यांनी केला.

तर पुन्हा खर्चाचा बोजा...

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जागेवर येऊ प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या समोर ही माहिती ठेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे काम करणाऱ्या ठेकेदाराने घाईघाईने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे चेंबरचे काम पूर्ण झाल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी पालिकेला पुन्हा हे काम करण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे मंडोरा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>