Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मेक इन महाराष्ट्र’प्रभावी राबवा

$
0
0
‘देशाचा आर्थिक विकास अधिक वेगाने होण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाची गती त्यापेक्षा अधिक असायला हवी. देशाच्या आर्थिक विकासाचे आठ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याचा आर्थिक विकास दहा टक्के दराने होणे आवश्यक आहे.

‘सर्कस व्यवसाय आला धोक्यात’

$
0
0
भारतात एकेकाळी तीनशेच्या घरात सर्कशी होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्कसमध्ये प्राण्यांचा वापर करण्यावर बंधने आल्याने अनेक सर्कशींना उतरती कळा लागली. आता केवळ वीस ते बावीस सर्कशी कार्यरत आहेत.

विषारी वायूमुळे तरुणाचा मृत्यू

$
0
0
जलवाहिनी तपासण्यासाठी आठ फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या तरुणाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटल येथे मंगळवारी घडली. गुंडप्पा चंदीगुरप्पा मंदिरके (वय अंदाजे ३० ते ३५, रा. हडपसर) असे तरुणाचे नाव आहे.

सिंहगडाचे सेफ्टी ऑडिटच नाही

$
0
0
ऐतिहासिक ठिकाणाबरोबरच ‘वन डे पिकनिक स्पॉट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंहगडावर सुट्टीच्यादिवशी बारा ते पंधरा हजार पर्यटकांची भटकंती असताना आजपर्यंत या किल्ल्याचे सुरक्षा ऑडिट झालेले नाही.

‘कॅशलेस’ अजूनही ‘हेल्पलेस’

$
0
0
स्थानिक खासदारांपासून ते अगदी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांपर्यंत, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापासून ते विमा नियामक प्राधिकरणाच्या (इर्डा) अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या पातळीवर ‘कॅशलेस’च्या तिढ्यावर केवळ चर्चाच खूप झाली.

अनकॉमन मॅन!

$
0
0
दररोजच्या जगण्याचाच भाग असलेल्या अडचणींशी पुन्हा सामान्यांचीच पुनर्भेट घालून देणारी...सोशिकांना आपल्याच त्रासावर हसवणारी...बेनाम गावातील समस्या थेट दूर दिल्लीच्या राज्यशकटापर्यंत पोहोचवणारी... नळावरील कुजबुजीला-लोकलमधील चर्चेला-नवराबायकोच्या दिवाणखान्यातील संवादाला देशाचे जनमत घडवण्याची शक्ती असणारी भावरेषा सोमवारी हरपली.

‘कॉमन मॅन’ची श्रद्धांजली

$
0
0
दररोज सकाळी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरील मुख्य बातमीइतकेच वाचकमूल्य व अढळ स्थान असलेले लक्ष्मण यांचे कार्टून हे नेहमीच सामान्यांचा आवाज ठरले. लक्ष्मण यांच्या निधनाच्या वृत्ताने कला, सामाजिक तसेच राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त झालीच, शिवाय संपूर्ण देशभरातील सामान्यांचा हुंदका सोशल मीडियातून क्षणोक्षणी समोर येत होता.

चित्ररूपी आशीर्वाद

$
0
0
निवृत्तीनंतर सुमारे १५ वर्षांपूर्वी आर. के. लक्ष्मण हे औंधला स्थायिक झाले आणि पत्रकार या नात्याने त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. लक्ष्मण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम येणार होते. त्यामुळे आम्ही लक्ष्मण यांच्या घरी जमलो होतो. त्यावेळी अतिशय आपुलकीने त्यांनी आम्हाला आतमध्ये येण्यास सांगून विचारपूस केली होती.

प्रमुख चौकांत झेब्रा क्रॉसिंग पट्टे, स्टॉपलाइन

$
0
0
वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख ४५ चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगसाठीचे पट्टे, स्टॉपलाइन आखण्याचा उपक्रम राबवला. पादचाऱ्यांची चौक ओलांडताना होणारी गैरसोय लक्षात घेता, हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

घटस्फोटानंतरही नवऱ्याचे आडनाव वापरण्याचा अधिकार

$
0
0
घटस्फोट झालेल्या स्त्रीला तिच्या लग्नाच्या आधीचे किंवा नवऱ्याचे आडनाव वापरण्याचा अधिकार आहे. घटस्फोट झाल्यावरही ती नवऱ्याचे आडनाव वापरू शकते, असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या ए. एस. ओक आणि ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने दिला आहे.

शिवाजीनगर कोर्टात हवे आरोग्य केंद्र

$
0
0
‘शिवाजीनगर कोर्टात येणाऱ्या पक्षकार आणि वकिलांसाठी तातडीची सेवा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे,’ अशी मागणी पुणे बार असोसिएशनतर्फे पुणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

आरटीओ एजंटांचे पिंपरीत आंदोलन

$
0
0
विविध मागण्यांसाठी आरटी एजंटांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बुधवारी (२८ जानेवारी) आंदोलन केले. प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

१० वर्षांच्या मुलीवर पिंपरीत बलात्कार

$
0
0
दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी (२४ जानेवारी) पिंपरी-चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. घरमालकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे.

आढावा मतदारनोंदणीचा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने शहरात सुमारे तीन लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शहरात बुधवारी (२८ जानेवारी) आढावा बैठका घेण्यात आल्या.

ले. ज. ए. टी. पारनाईक ‘सीएमई’चे प्रमुख

$
0
0
लेफ्टनंट जनरल ए. टी. पारनाईक यांची पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) प्रमुखपदी निवड झाली आहे. तत्पूर्वी ते बॉर्डर रोड विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.

अकरावी प्रवेशाचे फेरनियोजन?

$
0
0
शहरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे फेरनियोजन होण्याची शक्यता आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर करत, या प्रक्रियेचे ऑडिट करण्याचा निर्णयही राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

खोल दरी पाहण्याचे ‘थ्रिल’ आले अंगलट

$
0
0
सिंहगडावर फोटोग्राफीच्या प्रयत्नात तीन दिवसांपूर्वीच एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी ‘अतिसाहस’ दाखविणारे दोन तरुण धोकादायक कड्यावरून खाली घसरले. वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी तासभर केलेल्या प्रयत्नानंतर दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले.

पेटवून दिलेल्या ड्रायव्हरचा मृत्यू

$
0
0
घेतलेली उचल परत न केल्याने संतप्त होऊन मालकाने ड्रायव्हरला पेटवून दिल्याची घटना हडपसरला घडली असून, संबंधित ड्रायव्हचा मंगळवारी पहाटे ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अनिल सिद्धू क्षीरसागर (वय २६, रा. महंमदवाडी) असे मृताचे नाव आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना ‘सूर्योदय मानवता’ पुरस्कार

$
0
0
समाजकार्य या शब्दाला अर्थरूपी व्याख्या देण्याचे काम आमटे परिवाराने केले आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात आलेला आजचा हा पुरस्कार म्हणजे मानवतोसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीरूपी संस्थेचा हा सन्मान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात काढले.

‘आर्थिक निकषांमुळे भुयारी मेट्रो परिपूर्ण नाही’

$
0
0
‘पुण्यात भुयारी मेट्रो केल्यास ती आर्थिक निकषावर परिपूर्ण ठरणार नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. दरम्यान, आघाडी सरकारच्या काळातच मेट्रोच्या प्रकल्पातील त्रुटींची पूर्तता न झाल्याने त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>