Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

इंजिनीअरची सिंहगडावर आत्महत्या

$
0
0
कोथरूड येथून घरातून निघून गेलेल्या ‘आयआयटी’ इंजिनीअरने सिंहगडावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. गडाच्या आजूबाजूला असलेल्या दोनशे ते तीनशे फूट खोल दरीतून पाच तासांच्या अथक प्रयत्नातून हा मृतदेह काढण्यात आला.

महसूल विभागाकडून लाचखोर पाठीशी

$
0
0
राज्यात लाचखोरांना पाठीशी घालण्यात महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग तसेच ग्रामविकास विभाग सर्वाधिक आघाडीवर आहेत. या दोन्ही विभागातील प्रत्येकी ४२ लाचखोरांवर लाच स्वीकारताना कारवाई झाली असतानाही, त्यांचे निलंबन न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे.

‘कॅशलेस’च्या प्रश्नात ‘इर्डा’च घडवणार समेट

$
0
0
खासगी हॉस्पिटलमधील ‘कॅशलेस’ सेवा खंडित करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. उलट या प्रश्नात आम्हीच लक्ष घालून ही समस्या सोडविण्याबाबत विमा कंपन्या आणि हॉस्पिटल यांच्यात समेट घडवून आणू, असे आश्वासन ‘इन्शुरन्स रेग्युलेशन अॅन्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ने (इर्डा) दिले आहेत.

कोथरूडमध्ये शिवसृष्टीच

$
0
0
कोथरूड येथील कचराडेपोत नव्याने कचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बुधवारी‌ सर्वसाधारण सभेत अमान्य करण्यात आला. या कचराडेपोत नवीन प्रकल्प उभारण्याला विरोध करत ही जागा वगळण्यात यावी, असा प्रस्ताव मुख्य सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.

चौकी सबलीकरण ‘गजाआड’!

$
0
0
लहान मुले, महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलिस तुलनेने सवंदेनशील नसल्याची बाब वारंवार उघडकीस येत आहे. पोलिस ठाण्यांबरोबरच पोलिस चौक्यांमधील ‘पोलिसिंग’ सुधारण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘चौकी सबलीकरणा’ची मोहीम हाती घेतली होती.

कारभार सुधारण्यासाठी १५ वर्षांचा आराखडा

$
0
0
कोणत्याही शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीही नफ्यात नसते. त्यामुळे पीएमपीएमएल नफ्यात‌ येणार नाही. मात्र सध्या पीएमपीएमएलला असलेला तोटा कमी करण्यासाठी पुढील काळात आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले जातील.

तक्रारी आण‌ि सूचनांचा पाऊस

$
0
0
बसथांब्यांच्या रचनेपासून ते अधिकाऱ्यांच्या चौकशीपर्यंत आणि स्पेअर पार्ट्समधील घोटाळ्यांपासून ते निधी देण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींवर पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांपुढे तक्रारींचा पाढा वाचताना, त्यातील सुधारणांसाठी सूचनांचा पाऊस पाडला.

‘पीएमपी’चा १५ वर्षांचा आराखडा

$
0
0
बसची दुरवस्था, प्रवाशांचे हाल, अधिकाऱ्यांची मनमानी, अशा दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) परिस्थितीत सुधारणा घडवून कंपनीला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी १५ वर्षांचा विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे.

वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक

$
0
0
आई-वडिलांचा सांभाळ करण्याची आपली संस्कृती असतानाही सध्या वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली असल्याची खंत कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. श्री आदिशक्ती ग्रुपच्यावतीने ‘आऊसाहेब पुरस्कार’ आदर्श मातांना देण्यात आला.

वायू प्रदूषणाकडून प्रकाश प्रदूषणाकडे

$
0
0
पुण्यातील वायू प्रदूषणाचा एक परिणाम म्हणून शहर आणि परिसरातील प्रकाश प्रदूषणही गेल्या पंधरा वर्षांत दुप्पटीने वाढले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

‘ब्रँडेड’ औषधे लवकरच स्वस्त

$
0
0
डायबेटिस, हार्ट, बीपीसारख्या सर्वसामान्य शहरी नागरिकांना सतावणाऱ्या आजाराची ‘ब्रँडेड’ पण जेनेरिक औषधे लवकरच स्वस्त दरात मिळणार आहेत. ‘महाराष्ट्र सेफ केमिस्ट अॅन्ड डिस्ट्रिब्युटर्स अलायन्स लिमिटेड’ (एमएससीडीए) या राज्य औषधविक्रेता संघटनेच्या कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अजित पवारांची फेब्रुवारीत चौकशी

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या दीड हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरकारभारासंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम चौकशी अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.

पोस्टकार्डाचीही ‘तारेवरची’ कसरत

$
0
0
तारेची ‘कडकट्‌ कडकट्‌’ कायमची बंद झाल्यानंतर आता ई-मेल आणि व्हॉटस््‍अपच्या जमान्यात पोस्टकार्डाचीही ‘तारेवरच कसरत’ सुरू असून, ते काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आले आहे.

सिद्धिविनायक मंदिराला धोका

$
0
0
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचे चार गट भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली आहे. यांपैकी एक गट मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्नात असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी कळविले आहे.

शाळेचा श्रीगणेशा तिसऱ्या वर्षी

$
0
0
केवळ प्राथमिकच नव्हे, तर पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवेशासाठीही बालकांचे किमान वय निश्चित करणाऱ्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता येत्या शैक्षणिक वर्षापासून तीन वर्षांपेक्षा अधिक वय असणारी बालकेच प्ले ग्रुप, नर्सरी किंवा बालवाडीच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

वंदना चव्हाण यांना हटवा

$
0
0
विधानसभा आणि कँटोन्मेन्टच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी थेट पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच बुधवारी करण्यात आली.

हजार कोटींचा स्वाहाकार

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पुण्यातील मुख्यालयाच्या इमारतीसह गुलटेकडी व कोल्हापूरमधील भूखंडाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर विकसन करण्याच्या करारात १०५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

‘काम बंद’ मुळे मोजणी ठप्प

$
0
0
प्रलंबित मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे जमीन मोजणीचे काम ठप्प झाले असून त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत.

जिल्ह्यातील कामांच्या गुणवत्ता चौकशीचे आदेश

$
0
0
लोकप्रतिनिधिंनी सूचविलेली कामे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या विविध कामांच्या गुणवत्तेच्या तपासणीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामध्ये राज्य गुणवत्ता नियंत्रक १९७ विविध कामांची तपासणी करणार आहेत.

निधींमुळे मान्यता अडचणीत?

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या इमारतींसाठीचा लाखो रुपयांचा विकासनिधी महापालिकेकडे भरायचा की नाही, या विषयीच्या धोरणात्मक निर्णयामध्ये अडकून पडल्याने नव्या बांधकामांच्या मान्यता रखडत चालल्याचे आता समोर येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images