Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमा पॉलिसीच्या बोनसमध्ये वाढ करा

$
0
0
विमा प्रतिनिधींना वयाच्या साठ वर्षानंतर मिळणारी ग्रॅच्युटीत वाढ करावी, पेन्शन योजना सुधारित स्वरूपात लागू करावी, तसेच विमाधारकांच्या विमा पॉलिसीच्या बोनसमध्ये वाढ करण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी एलआयसी एजंट्स फेडरेशनतर्फे सरकारविरोधात मंगळवारी ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले.

३८ गांडूळखत प्रकल्प सुरू

$
0
0
क्षेत्रीय कार्यालयातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या कचरा वर्गीकरणाच्या सक्तीला धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्षेत्रीय कार्यालयातील सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये गांडूळखत प्रकल्प बंद असलेल्या ७० ते ७५ सोसायट्यांना तीन आठवड्यापूर्वी नोटीस बजावून त्यांच्यावर खटले भरण्याचा इशारा देताच बंद असलेले ३८ प्रकल्प अवघ्या एका आठवड्यात सुरु झाले आहेत.

विराट हिंदू संमेलन रविवारी

$
0
0
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रविवारी (२५ जानेवारी) विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता हे संमेलन होणार आहे.

रायसोनींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

$
0
0
मुदतठेवीचे २१ लाख ७५ हजार रुपये मुदत संपल्यानंतरही परत न केल्यामुळे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कामगार सहसंचालक गजाआड

$
0
0
बॉयलर (बाष्पके) दुरुस्ती आणि देखभाल करणाऱ्या व्यावसायिकाकडून बाष्पकांचे निरीक्षण प्रमाणपत्र देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कामगार विभागाच्या सहसंचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. या सहसंचालकाच्या घरीच मंगळवारी रात्री कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांत अधिकारी चव्हाण निर्दोष

$
0
0
‘मावळ’चे तत्कालिन प्रांत अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी लाच घेतल्याचा कोणताही पुरावा नसताना त्यांना यात गोवण्यात आल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

हॅरिस ब्रिजला समांतर पूल

$
0
0
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बोपोडी भागात होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या भागात नवीन पूल बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

कुंपणच शेत खाते, तेव्हा…

$
0
0
युवतींची छेडछाड आणि बलात्काराच्या घटनांनी मागील वर्षी पिंपरी- चिंचवड हादरून गेले होते. त्यातच वर्षाच्या अखेरीस एका युवतीला झालेली छेडछाड आणि त्यानंतर असंवेदनशील पोलिसांकडून मिळालेल्या वागणूकीमुळे नववर्षात तिने मृत्यूला कवटाळणे, या गोष्टींनी एकूणच समाजाची मान शरमेने झुकली आहे.

कंपनी बसच्या अपघातात २७ कामगार जखमी

$
0
0
मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये २७ कामगार जखमी झाले. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहे.

हरिहरन यांना आशा भोसले पुरस्कार

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार यंदा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हरिहरन यांना देण्यात येणार आहे. एक लाख ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

नागरिकांनी पाठलाग करून चोरट्यास पकडले

$
0
0
पादचाऱ्याला दम देऊन त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल चोरून पळणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी (२० जानेवारी) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास कासारवाडी उड्डाणपुलाजवळ ही घटना घडला.

योजना जुन्या, बजेट नवे

$
0
0
योजना जुन्या मात्र, स्वरुप नवे असे सुमारे ४३४ कोटी रुपये खर्चाचे आणि एक कोटी ९२ लाख रुपये शिलकीचे २०१५-१६चे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे बजेट बुधवारी (२१ जानेवारी) सादर झाले.

खरेदी-विक्री व्यवहारातून मारहाण

$
0
0
सदनिका खरेदी- विक्रीतील पैशाचा व्यवहार बिनसल्यानंतर राजगुरुनगर येथील एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी दिली आहे.

‘ग्रीन कॉलेज’ साठी विद्यार्थ्यांची जागरुकता

$
0
0
आपल्या कॉलेजमधील पर्यावरणविषयक नेमक्या समस्या कोणत्या... पर्यावरणपूरक मार्गांनी आपल्या कॉलजमधील विविध प्रश्नांवर कशी मात करता येईल. आपले कॉलेज ‘ग्रीन कॉलेज’ म्हणून पुढे यावे यासाठी कोणते प्रकल्प हाती घेता येतील.

पुणे बार असोसिएशनची निवडणूक प्रथमच ‘ईव्हीएम’वर

$
0
0
पुणे बार असोसिएशनतर्फे २०१५- २०१६ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवडणूक ३१ जानेवारीला होणार असून यंदा प्रथमच असोसिएशनच्या इतिहासात निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे.

‘काम बंद’ मुळे मोजणी ठप्प

$
0
0
प्रलंबित मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे जमीन मोजणीचे काम ठप्प झाले असून त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत.

जिल्ह्यातील कामांच्या गुणवत्ता चौकशीचे आदेश

$
0
0
लोकप्रतिनिधिंनी सूचविलेली कामे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या विविध कामांच्या गुणवत्तेच्या तपासणीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामध्ये राज्य गुणवत्ता नियंत्रक १९७ विविध कामांची तपासणी करणार आहेत.

निधींमुळे मान्यता अडचणीत?

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या इमारतींसाठीचा लाखो रुपयांचा विकासनिधी महापालिकेकडे भरायचा की नाही, या विषयीच्या धोरणात्मक निर्णयामध्ये अडकून पडल्याने नव्या बांधकामांच्या मान्यता रखडत चालल्याचे आता समोर येत आहे.

वाहन उद्योगात भारताचे वर्चस्व हवे

$
0
0
‘सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञान असले पाहिजे. वाहन उद्योग क्षेत्रात भारत हा जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला पाहिजे.

‘त्या’ मुलाच्या वडिलांची चौकशी

$
0
0
मॅक्डोनाल्डच्या आउटलेटमधील ‘त्या’ गरीब मुलाची आणि त्याच्या पुण्यातील पालकांची चौकशी डेक्कन पोलिसांकडून करण्यात येत आहे. हा मुलगा आपला असल्याचा दावा उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका कुटुंबाने टीव्हीवरील व्हिडिओ पाहून केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images