Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ऑनलाइन वीजबिले भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

$
0
0
रांगेत थांबण्याची आणि वेळ घालविण्याची कटकट टाळून ऑनलाइन वीजबिले भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षभरात तब्बल ३४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी राज्यातील दोन कोटी २९ लाख ग्राहकांनी ऑनलाइन व एटीपी मशिनद्वारे वीजबिले भरली आहेत.

‘तालतत्त्व’तून उलगडला तबलावादकांचा प्रवास

$
0
0
भारतीय संगीत परंपरेत लय-तालाची अद्‌भुत अशी संगत करणाऱ्या तबला या वाद्याचा प्रवास उलगडणारी ‘तालतत्त्व’ ही दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. प्रसिद्ध तबलावादकांनी गाजविलेल्या मैफली आणि त्यांची सांगीतिक कारकीर्द या दिनदर्शिकेत छायाचित्रे आणि लेखनातून मांडण्यात आली आहेत.

विठ्ठलवाडी रस्त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार

$
0
0
नदीपात्रातील रस्त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पालिकेच्या विरोधात निकाल दिला, तरी त्यातील कायदेशीर बाबी तपासून घेऊन त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा पर्याय पालिकेपुढे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे संकेतही पालिका प्रशासनाने दिले आहेत.

कॅनॉलवरून रस्ता बांधावा

$
0
0
नदीपात्रातील रस्त्याला राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी‌) स्थगिती दिल्याने या रस्त्याचे भवितव्य धोक्यात आले आहे. सिंहगडरोडला पर्यायी रस्ता म्हणून नदीपात्रातील रस्त्याला होणारा उशीर लक्षात घेता नदीपात्रातून रस्ता करण्याऐवजी कॅनॉलवरून रस्ता बांधावा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी केली.

दुबार पगार घेणाऱ्या शिक्षकांची चौकशी

$
0
0
दुबार पगार लाटणाऱ्या शिक्षकांवर आता शिक्षण खात्याने छडी उगारली आहे. राज्यातील दुबार पगार घेणाऱ्या सर्व शिक्षकांची आणि संबंधित संस्थाचालकांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी दिले.

थकित कर्जांची बाकी शून्य…

$
0
0
शहरातील विविध सहकारी बँकांच्या निवडणुका लढविण्यास अपात्र ठरण्याच्या भीतीमुळे अनेक आजी-माजी संचालक आणि इच्छुक उमेदवारांनी आपापल्या कर्जांची थकबाकी भरण्याचा धडाका लावला आहे.

राजकारण साहित्यातून वेगळे काढता येणार नाही

$
0
0
‘राजकारण हा जगण्याचाच एक भाग आहे. स्वाभाविकपणे त्याचे प्रतिबिंब साहित्यातही दिसणारच. राजकारण आणि साहित्याची परंपरा महाभारतापासून असल्याने राजकारण साहित्यातून वेगळे काढताच येणार नाही,’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मांडले.

हिराबागेतील आगीत १५ घरे जळाली

$
0
0
हिराबागेजवळील झोपडपट्टीला अचानक लागलेल्या आगीत १५ घरे जळून खाक झाली. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाला वेळीच आग विझविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.

‘त्या जागांमध्ये राजकीय तडजोड नाही’

$
0
0
साहित्यिक, कलावंत यांच्या विधान परिषदेतील जागांवर राज्य सरकार कोणतीही राजकीय तडजोड करणार नाही, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘एलिझाबेथ’, ‘किल्ला’चा पिफमध्ये झेंडा

$
0
0
ज्येष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांची शाब्दिक फटकेबाजी, जल्लोष करणारे सिनेप्रेमी आणि उत्साही वातावरणात तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गुरुवारी उत्साहात सांगता झाली.

‘बजाज ऑटो’मध्ये भीषण आग

$
0
0
आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाला गुरुवारी (१५ जानेवारी) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी विभागातील संपूर्ण सामान जळून खाक झाले.

‘रुपी’साठी बेमुदत उपोषण सुरू

$
0
0
अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करावे, यासह अन्य मागण्यांसाठी ठेवीदार-खातेदार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

‘कॅशलेस’ पेशंट वेठीस

$
0
0
विमा कंपन्यांकडून सेवा बंद केल्याचे कारण दाखवित ‘कॅशलेस’ असलेल्या पेशंटला आता ‘थेट पैसे भरा’ असे सांगत हॉस्पिटलकडून त्यांना वेठीस धरले जात आहे. विमा कंपन्यांना पैसे भरूनही ‘कॅशलेस’ सेवा देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले जात असल्याने हॉस्पिटल प्रशासन आणि विमाधारक पेशंटमध्ये वादावादी होत आहे.

पुणे मेट्रो चर्चेच्या यार्डातच

$
0
0
नव्या वर्षाचा पंधरवडा उलटला, तरी पुणे मेट्रोची स्थिती अद्याप ‘जैसे थे’च असल्याने पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटमध्ये त्यासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.

अर्थसंकल्पासाठी थेट सूचना

$
0
0
करकपातीची मर्यादा वाढविण्यात यावी, विशिष्ट वस्तूंवर अधिक कर लावण्यात यावा, तर जीवनावश्यक औषधे स्वस्त व्हावीत…… केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भातील आपल्या अपेक्षा नागरिकांना आता थेट अर्थमंत्र्यांना कळविता येणार आहेत.

साहित्योत्सवासाठी सज्ज मटा मैफल

$
0
0
आजचे तरुण काय वाचतात आणि काय लिहितात, साहित्याचा उत्सव करावा काय, आजच्या मराठी साहित्यावर ख्यातनाम समीक्षकांना काय वाटते, हे साहित्य ‘खपाऊ’ नाही काय, बालसाहित्याकडे कसे पाहिले जाते… मराठी साहित्याबाबत महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नांवर चर्चा होणार आहे, ती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मैफलीत!

प्रदूषणाने कोंडतोय श्वास

$
0
0
‘स्मार्ट सिटी’ होण्याचा दावा करणाऱ्या पुणेकरांना वास्तवात मात्र वायूप्रदूषणाशी मुकाबला करावा लागत आहे. अनिर्बंध शहरीकरण, अनियोजित औद्योगिकीकरण, बांधकामाचा वाढता पसारा, वाहतुकीची कोंडी अशा अनेकविध कारणांमुळे हवेच्या प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

पुण्यात जमीन घोटाळा

$
0
0
पुनर्वसनाचे बोगस दाखले तयार करून पुणे जिल्ह्यातील दौंड व शिरूर परिसरामधील सुमारे नऊशे एकर जमीन धरणग्रस्त नसलेल्या व्यक्तींना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

साहस आजमावायला ‘एन्ड्युरो’ आली

$
0
0
ट्रेकिंग, सायकलिंग, कयाकिंग, रायफल शूटिंग अशा साहसी प्रकारांचं आव्हान आणि रेकॉर्ड ब्रेक टशन असं यंदाच्या ‘एन्ड्युरो-३’ या स्पर्धेचं आव्हान आहे. नवनवे रेकॉर्ड रचण्यासाठी साहसप्रेमींनी यात सहभागी व्हावं, असं आवाहन ‘नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन’नं केलं आहे.

पक्षिमित्र घेणार पक्ष्यांचा सर्वांगीण वेध

$
0
0
अधिवासांमधील मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेल्या पक्ष्यांची जाती, दुर्मिळ पक्ष्यांवर झालेले संशोधन, पक्ष्यांच्या जीवनसाखळीत झालेले बदल इथपासून ते त्यांच्या संवर्धनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या संवर्धन प्रकल्पांविषयी विचारमंथन करणारे ‘महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन’ येत्या शनिवारी आणि रविवारी पुण्यात भरणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images