Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पेन्शन योजना वृद्धापकाळात महत्त्वाची’

$
0
0
‘माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. वृद्धापकाळामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी पेन्शन योजना हा महत्त्वाचा भाग आहे. एनपीएससारखी योजना सर्व स्तरातील नागरिकांसाठी चांगला पर्याय असून ती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असे पीएफआरडीएचे चेअरमन हेमंत कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वाजवी दरानुसार पैसे वाटप

$
0
0
शेतकरी संघटनांचे आंदोलन आणि राज्य सरकारने आणलेल्या दबावानंतर राज्यातील विविध साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना वाजवी दरानुसार (एफआरपी) पैसे देण्यास सुरुवात केली आहे.

जनसुनावणीमध्ये आरोग्य सेवेचे वाभाडे

$
0
0
आरोग्य जनसुनावणी कार्यक्रमांत भोर तालुक्यातील सरकारी आरोग्य सेवेचे वाभाडे निघाले असून अधिकाऱ्यांची जनरोषांना उत्तरे देताना पाचावर धारण बसली होती. जनतेचा रोष आणि संतप्त भावना पाहून येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेश मोरे यांना लेखी खुलासा देण्याची ताकीद देण्यात आली

‘जेईई-मेन’ची विद्यार्थिसंख्या घटली

$
0
0
जेईई-मेनला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा ५० हजारांनी कमी झाली आहे. यंदाच्या जेईई-मेनला सुमारे १३.०३ लाख विद्यार्थी बसतील. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या १३.५६ लाख होती.

पुणे शहराला विळखा… वायूप्रदूषणाचा

$
0
0
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती, वेगाने विकसित होणारे शहर अशी ओळख असलेल्या पुण्याने आता प्रदूषणामध्येही राज्याच्या नकाशावर नाव कोरले आहे. अनियंत्रित शहरीकरण, औद्योगिकीकरण, बांधकामाचा वाढता पसारा यामुळे हवेच्या प्रदूषणात वेगाने वाढ होत असून अनेक शहरांनी प्रदूषणाच्या धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या आहेत.

आरोग्य धोक्यात

$
0
0
पेन्शनरांचे शहर, सायकलींचे शहर, शांत पुणे अशी बिरुदावली मिरविलेल्या पुण्याचे गेल्या पंचवीस वर्षात शहरीकरण, औद्योगिकरण, नागरीकरण झाल्याने त्या तुलनेतही प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच प्रदूषणांच्या विळख्यात पुणेकर सापडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हळूहळू लागते आहे कचरा वर्गीकरणाची शिस्त

$
0
0
गांडूळखत प्रकल्प बंद असलेल्या सोसायट्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले, रस्त्यांवर अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात उघडण्यात आलेली मोहीम यामुळे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांमध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे.

ससूनला हवे आणखी ‘एमआरआय’

$
0
0
अपघातातील पेशंटच्या शरीरातील हाडांना झालेली इजा, रक्तस्त्राव झाल्याचे तत्काळ निदान करण्यासाठी जादा क्षमतेचे ‘थ्री टेस्ट’ श्रेणीतील ‘एमआरआय’ मशीन ससून हॉस्पिटलमध्ये अद्याप उपलब्ध नाही.

दुचाकीच्या अपघातांमध्ये घट

$
0
0
पुणे शहरातील वाहतूक ही दररोज टीकेचे लक्ष्य ठरत असतानाच गेल्या चार वर्षांपासून अपघातांमध्ये मात्र सातत्याने घट होत आहे. अपघातांबरोबरच प्राणांतिक अपघात तसेच मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही घट होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अनधिकृतपणे रेल्वेची साइट वापरणाऱ्यास अटक

$
0
0
रेल्वे प्रशासनाची वेबसाइट अनधिकृतपणे वापरणाऱ्या एका एजंटला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील सहा कम्प्युटर, चार मोबाइल, विविध बँकांची क्रेडिट कार्डस् असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची नेत्यांकडून झाडाझडती

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त आणि आणि दोन उमेदवारांना प्रत्येकी अवघी अकरा मते मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आली आहे.

‘पीएफ’ कर्मचारी अजून ‘आधार’विनाच

$
0
0
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये आधार क्रमांकाची नोंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) देशभरातील बहुतांश कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे आधार कार्डच नसल्याचे उघडकीस आले आहे.

दोषी पोलिसांवर कारवाई होणार

$
0
0
रोडरोमिओंनी छेडछाड केल्यानंतर पोलिसांनी योग्य तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मोशीतील युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. ३१ डिसेंबरला युवतीची छेडछाड काढण्याचा प्रकार मोशी येथे घडला होता.

दुभाजकाला धडकून कारमधील दोघे ठार

$
0
0
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेली तवेरा कार टोल नाक्याच्या सिमेंटच्या दुभाजकावर जोरात आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

करवसुलीसाठी आता तगादा

$
0
0
मिळकतर वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तगादा लावला असून, सरसकट सर्वांनाच नोटिसा बजावण्याची कार्यवाही चालू केली आहे. येत्या अडीच महिन्यांत सुमारे अडीचशे कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

खडकी उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, त्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकाने प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्याकडे नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचे दाखवण्यासाठी अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत.

सुरक्षेसाठी ‘वायसीएम’मधील सीसीटीव्हींची संख्या वाढणार

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात ‘वॉच’ ठेणवण्यासठी आणखी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे आता रुग्णालयातील कॅमेऱ्यांची संख्या ३४ होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार, पोर्च आणि जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

‘आडत’ तोडग्याचे गाडे पुन्हा अडले

$
0
0
आडतला राज्यात आणखी पर्याय शोधता यावा, यासाठी पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी बोलाविलेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. अखेर विविध घटकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २१ जानेवारीला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

१०४ जणांना ‘कारणे दाखवा’

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कारभारात सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामावरही देखरेख केली जात असून, अचानक तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या चार डेपोतील १०४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

क्रीडा शिक्षणाचे धोरण व्यापक करणार

$
0
0
राज्यातील क्रीडा क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी क्रीडा क्षेत्र आणि क्रीडा शिक्षणाविषयीचे तात्पुरते दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याचे संकेत राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images