Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन

$
0
0
राष्ट्रीय फेरीवाला धोरण २०१० ला मान्यता मिळाली असताना महापालिकेच्या फेरीवाला धोरणासाठी स्थानिक पक्ष नेत्यांनी अडवून धरल्यास आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी पथारी व्यासायिक पंचायत संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या पथारी व्यावसायिक मेळाव्यात दिला.

पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत चुरस

$
0
0
पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकीय रणधुमाळी पाहण्यास मिळत आहे. प्रभाग क्रमांक ४५ काळेपडळ - महम्मदवाडी येथील पोटनिवडणुकीत एकूण पाच उमेदवार उभे आहेत.

फळबागेचे नुकसान : ५ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0
कापूरहोळ येथील यशवंत बाळकृष्ण खुटवड यांच्या फळबाग बागेतील झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी पाच जणांवर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार खुटवड यांनी दिली होती.

आकाशच्या मृत्यूचे गूढ कायम

$
0
0
खेड तालुक्यात कोरेगाव (खु) येथे दोन अज्ञात इसमांनी रॉकेल टाकून जाळून मारलेल्या आकाश संदीप महाळूनकर या तेरा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यावर सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या आकाशचा रविवारी रात्री दुर्दैवी अंत झाला.

बायोगॅस प्रकल्प सुरू होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालये प्रयत्नशील

$
0
0
उरुळी आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा प्रश्नी आंदोलन सुरू केल्यामुळे कचरा समस्या गंभीर बनत आहे. शहरात निर्माण होणारा कचरा शहरातच जिरविण्यात यावा, नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

ससाणेनगरमध्ये जलवाहिनी फुटली

$
0
0
ससाणेनगर - काळेपडळ रोडवरील नाल्यावरील आठ इंच पिण्याची पाण्याची पाइप लाइन फुटल्याने हजोरो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पिण्याच्या पाणीची पाइपलाइन कुठे उघड्यावर आहे, कुठे पाणी गळती होते का?

जलवाहिनीचा मार्ग अखेर मोकळा

$
0
0
भामाआसखेड धरणातून पुणे शहराला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वनखात्याच्या जमिनीचा येणारा अडथळा दूर झाला आहे. खेड तालुक्यातील चिंबळीमधील सुमारे ६१ हजार चौरस फूट जमीन जलवाहिनीसाठी राखीव वनांतून वगळण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

संशोधनाचा समाजाला फायदा व्हायला हवा

$
0
0
‘शोध कोणी लावला, यापेक्षा त्या शोधामुळे कोणते नवीन ज्ञान समाजाला मिळाले, समाजाला त्याचा काय फायदा झाला, हे अधिक महत्त्वाचे. पैसा, प्रतिष्ठा, पुरस्कार याचा विचार न करता संशोधन करत राहा. तुम्ही जगातील उपलब्ध ज्ञानात कोणती भर घालू शकता हे पाहा.

धनकवडी येथे घरफोडी

$
0
0
धनकवडी येथील पवार हॉस्पिटलवरील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या घरात गेल्या महिन्यांत घरफोडी झाली असून, रोख रक्कम आणि ऐवज असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्तिकर अधिकाऱ्याला ३ वर्षांची कैद

$
0
0
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी प्राप्तिकर अधिकाऱ्याला तीन वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

महास्वच्छता अभियानात ८ लाख नागरिक सहभागी

$
0
0
जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या महास्वच्छता अभियानात आठ लाख नागरिकांनी सहभाग घेतल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

कचऱ्यात प्लास्टिकच अधिक

$
0
0
शहरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करताना त्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. कचऱ्यात सापडणारे प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

कचरा प्रश्नावरून राजकीय ‘कचराफेक’

$
0
0
शहरातील कचराप्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी कचऱ्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरू झाले आहे. कचऱ्याचे आकडे फुगवून ठेकेदारांचे खिसे भरले जात असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेले वक्तव्यावर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी टीकेची तोफ डागली आहे.

वसुंधरा चित्रपट महोत्सवात शून्य कचऱ्याविषयी जागृती

$
0
0
यंदाचा नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात होणार असून, त्यात तीन देशांतील १४० चित्रपट यामध्ये दाखविले जाणार आहेत.

‘आयुष’ डॉक्टर हटाव

$
0
0
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) केंद्रीय कार्यालयाने ‘आयुष’च्या सदस्य डॉक्टरांना हॉस्पिटलमधून बाहेरचा रस्ता दाखविण्याचा आदेश काढला आहे.

मुंढव्यातील महिला राज्यगृह वापराविना

$
0
0
अनाथ, निराधार आणि पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली मुंढव्यातील महिला राज्यगृहाची इमारत केवळ तांत्रिक कारणामुळे वापराअभावी पडून आहे.

फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक

$
0
0
गृहकर्ज काढून देतो, असे सांगून विश्वास संपादन करीत २४,९०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. रविंद्र शिवराम बावणे (वय २९, रा. वानखेड. जि. बुलडाणा) असे त्याचे नाव आहे, तर अमित भागवत या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

वीजदरांचा सध्याचा प्रस्ताव ग्राहकांना दिलासा देणाराच

$
0
0
सर्वसामान्य ग्राहकांवर बोजा पडू नये, या उद्देशानेच महावितरणने नफ्याचा भाग वगळून ग्राहकांना दिलासा देणारा वीजदरांचा प्रस्ताव सादर केला, असे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, शेतीपंपांच्या वीजगळतीबाबत महावितरणने जाहीर केलेली माहिती बरोबर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

हरित न्यायाधिकरणात वकिलांची संघटना

$
0
0
पश्चिम विभागातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोसिएशन’ या नावाने वकिलांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदी अॅड. असीम सरोदे यांची निवड झाली आहे.

शेतीमालाची विक्री बाजारसमित्यांनी करावी

$
0
0
पणन संचालकांनी आडत शेतकऱ्यांकडून वसूल करू नये असे आदेश दिले असले, तरी ज्यांना आडत द्यायची नाही अशा शेतकऱ्यांचा शेतीमाल विकण्याची बाजार समित्यांनी स्वतंत्र व्यवस्था करावी, असा ठराव व्यापारी परिषदेत करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images