Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बाजार बंदचा इशारा

$
0
0
शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी ‘आडत’ व्यापाऱ्यांनी खरेदीदारांकडून घ्यावी या पणन संचालकांच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती द्यावी, अशी एकमुखी मागणी व्यापाऱ्यांच्या परिषदेत करण्यात आली.

मजुराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

$
0
0
बांधकाम साइटवर काम करत असताना नवव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाला होता. ही घटना नुकतीच बावधन येथील वाहनतळाच्या पार्किंगमध्ये घडली होती. त्यामुळे हिंजवडी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माजी उपमहापौरांच्या पतीला अटक

$
0
0
माजी उपमहापौर व नगरसेविका छाया साबळे यांचे पती जगन्नाथ साबळे यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. सोमवारी (ता. ५) दुपारी एक वाजता साबळे यांना वायसीएम रुग्णालातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेऊन अटक केली.

स्वच्छता मोहिमेत सातत्य असणे गरजेचे

$
0
0
‘स्वच्छता मोहीम केवळ एक दिवस राबवून चालणार नाही. तर या स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज आहे,’ असे मत महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले.

सापांसाठी ब्लँकेट; वाघासाठी हीटर

$
0
0
थंडींच्या कडाक्यापासून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी राजीव गांधी प्राणीसंग्रहालमध्ये सध्या जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाघ, बिबट्यासाठी पिंजऱ्यामध्ये हीटर बसविले आहेत. सापांसाठी ब्लँकेट ठेवली आहेत, तर हरिण, गवा यांसारख्या गवताळ प्रदेशातील प्राण्यांसाठी गवताची गंजी रचण्यात आली आहे.

नाराज समिती सदस्यांचा रूसवा ‘ताई’ करणार दूर

$
0
0
महानगरपालिकेच्या महिला आणि युवक महोत्सवाच्या नियोजनामध्ये महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांना सहभागी करून न घेतल्याने नाराज झालेल्या समितीच्या सदस्यांची खासदार सुप्रिया सुळे समजूत काढणार आहेत‌.

जमीन अधिग्रहण अध्यादेश रद्द करा

$
0
0
अन्नसुरक्षेचा विचार करा, अध्यादेश मागे घ्या, शेतकरी वाचवा, अध्यादेश हटवा, अशा घोषणा देत, आम आदमी पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जमीन अधिग्रहण कायद्यासंदर्भात सरकारने काढलेला अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली.

‘आप’च्या राज्य संयोजकपदी प्रा. वारे

$
0
0
आम आदमी पक्षाच्या राज्य संयोजकपदी पुण्यातील समाजवादी कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना करताना प्रा. वारे यांची संयोजकपदीच तर पुण्याच्याच आभा मुळे यांची राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

प्रमाण वर्णमाला विस्मरणात

$
0
0
मराठी भाषेच्या पुढील पंचवीस वर्षांचे धोरण निश्चितीची चर्चा सुरू असताना प्रमाण मराठी वर्णमाला आणि अंकमालेच्या अंमलबजावणीचा राज्य सरकारला विसर पडला आहे. सरकारच्या उदासीन कारभारामुळे २००९मध्ये मान्यता देण्यात आलेल्या प्रमाण मराठी वर्णमाला आणि अंकमालेचा अद्याप वापर सुरू झालेला नाही.

‘नेमेचि येते मग पाणीकपात’

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच पुणेकरांपुढे ‘नेमेचि येते मग कपात’अशी परिस्थिती उभी राहिली आहे.

भामाआसखेडेचे पाणी रोखणार?

$
0
0
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन, पुनर्वसित गावांना तातडीने सुविधा, पाणी न मिळणाऱ्या लाभक्षेत्रातील गावांचे आणि कालवा रद्द झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के काढले तरच भामाआसखेड धरणातील पाणी पुणे शहराला देण्याच्या योजनेचे काम सुरू करू दिले जाईल, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

वारजे-शिवणे रस्त्याचा निर्णय संरक्षणमंत्र्यांकडे

$
0
0
वारजे गणपती माथा ते शिवण्यातील शिंदे पुलापर्यंतच्या रस्त्याला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) आडकाठी केल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक नागरिकांतर्फे थेट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडण्यात येणार आहे.

कोरेगाव पार्कमध्ये अतिक्रमणे ‘साफ’

$
0
0
पुणे महापालिकेच्या बांधकाम नियं‌त्रण विभाग, अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करत दहा हजार चौरसफूट बांधकाम रिकामे करण्यात आले. झोन ४ आणि झोन ६ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

हडपसर परिसरात गुरुवारी पाणी बंद

$
0
0
हडपसर परिसरातील रामटेकडी येथील पाण्याच्या टाकीचे देखभाल-दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (८ जानेवारी) करण्यात येणार असल्याने हडपसर, मगरपट्टा, मुंढवा व आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे महानगरासाठी अखेर ‘मेट्रो अॅक्ट’ लागू

$
0
0
शहरातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प अद्याप केंद्रीय मान्यतेसाठी प्रलंबित असला; तरी पुणे महानगर क्षेत्रासाठी ‘मेट्रो अॅक्ट’ लागू झाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे.

नव्या गावांसाठी द्या नवी पालिका

$
0
0
शहरालगतची गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्याचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच, या गावांवर खर्च करणे पालिकेला शक्य नसल्याने नव्या गावांसाठी नवी महापालिकाच करा, अशी मागणी आता पालिकेतील पदाधिकाऱ्यांनीच केली आहे.

दांडीबहाद्दर परदेशी विद्यार्थ्यांवर छडी!

$
0
0
उच्चशिक्षणासाठी भारताकडून शिष्यवृत्ती घेतलेले ‘मित्र देशांमधील’ बहुतांश विद्यार्थी हे मौजमजा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांच्या तपासणीत उघड झाला आहे.

व्यवसायवृद्धीसाठी बँकांना हवे ‘स्वातंत्र्य’

$
0
0
बँक सरकारी असली, पैसा सर्वसामान्यांचा असला, तरी आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ. त्याची चौकशी कोणीही अगदी सरकारनेही करू नये. बँकांचा व्यवसाय वाढविण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने ‘व्यावहारिक’ निर्णय घेणे आवश्यक आहे.

पात्र लाभार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणारच

$
0
0
स्कॉलरशिप मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध असलेल्या एकाही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत त्यापासून मुकावे लागणार नाही.

‘मिशिगन’चेही ‘मिशन विश्व संमेलन’

$
0
0
अमेरिकेतील मराठमोळे उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांनी मिशिगन येथे पुन्हा एकदा विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. २००९मध्ये सॅन होजेमध्ये झालेल्या विश्व संमेलनाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images