Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. प्रकाश बाबा आमटे सिनेमाचा होणार गौरव

$
0
0
दरवर्षी केवळ एका मराठी सिनेमाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून सलाम पुणे पुरस्काराने गौरव करण्यात येतो पण २०१४ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीने एवढे चांगले चित्रपट दिलेत कि कुणा एकाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड करणे चुकीचे ठरेल म्हणून यंदा डॉ. प्रकाश बाबा आमटे ;रेगे;आणि एलिझाबेथ एकादशी या तीन सिनेमांची सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून निवड करण्यात आली आहे .

ठेकेदारांकडूनच लूट

$
0
0
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील २५ टक्के कामे एकाच ठेकेदाराला...ठेकेदाराने केलेली काही कामे अस्तित्त्वातच नाहीत; पण त्याचे बिल अदा... कराराशिवाय खोटी बिले सादर करून पालिकेची फसवणूक... निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याला अल्पावधीत भेगा...

नव्या महापालिकेसाठी राज्य सरकार ठाम

$
0
0
पूर्व पुण्यातील नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी वेगळी महापालिका स्थापन करण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली आहे.

उषा मंगेशकरांना ‘MIT’ जीवनगौरव

$
0
0
प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना आळंदी येथील एमआयटी विश्वशांती केंद्र आणि राजबाग येथील विश्वशांती संगीत कला अकादमी यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

‘DBTL’साठी ग्राहक उदासीन

$
0
0
आधार कार्डाची सक्ती काढून टाकल्यानंतरही गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेत (डीबीटीएल) बँक खात्यांची जोडणी करण्यात ग्राहकांची उदासीनता दिसून आली आहे.

‘फायर डोअर’ बसविणे बंधनकारक

$
0
0
निवासी सदनिका किंवा व्यावसायिक इमारतींमध्ये आग प्रतिबंधासाठी आता प्रमाणित ‘फायर डोअर’ बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस अॅकॅडमीने यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच काढले आहे.

महिला पोलिस आजारी?

$
0
0
पुणे पोलिस दलात याच महिन्यात नव्याने दाखल झालेल्या ३५ महिला रिक्रुटांना मंगळवारपासून ताप, थंडी, पोटदुखीचा त्रास झाला आहे. यातील सहा जणींना टायफॉइडची लक्षणे दिसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले, तर उर्वरित​ रिक्रुट महिलांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.

पुणे-पिंपरी : ‘BRT’ स्थगित ठेवा

$
0
0
आळंदी आणि नगररोड, रावेत परिसरातील ‘बीआरटी’चा दुसरा टप्पा सुरू करण्यात गेल्या सहा महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला अपयश येत असतानाच केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या स्थायी समितीने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सध्या अस्तित्वात असलेली ‘बीआरटी’देखील स्थगित ठेवण्याची शिफारस केली आहे.

एक कोटीच्या दागिन्यांची लूट

$
0
0
कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक सहामधील ‘पीएमजे’ जेम्स अँड ज्वेलर्स या दुकानाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेली १.४२ कोटी रुपयांची सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने चार चोरट्यांनी पिस्तुलाच्या धाकाने बुधवारी लुटले.

ऑनलाइन तक्रारींबाबत जनजागृती गरजेची

$
0
0
‘ग्राहक हा राजाच असून, सरकारी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे बंधनकारक आहे. सध्या जवळपास प्रत्येक सरकारी कार्यालयाची वेबसाइट आणि हेल्पलाइन असून, ग्राहक आपल्या तक्रारी ऑनलाइनही नोंदवू शकतात.

हक्काच्या वसतिगृहापासून वंचित

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडे तत्त्वावरील इमारतींमध्ये वसतिगृह सुरू करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांची शिक्षणाची आणि निवासाची परवड होत असून, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या हक्काच्या इमारतीत वसतिगृह उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे.

सात पिस्तुल जप्त; तिघांना कोठडी

$
0
0
मध्य प्रदेशातून शहरात विक्रीसाठी आणलेल्या देशी बनावटीच्या स्वयंचलित सात पिस्तुल आणि ३३ जिवंत काडतुसांसह तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश असून, सर्व आरोपींना कोर्टाने सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठवली.

वडमुखवाडीमध्ये बेकायदा मुरूम उत्खननाचा आरोप

$
0
0
वडमुखवाडीमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव तापकीर यांनी केला.

शिवसेनेचे ‘मेरी ख्रिसमस’

$
0
0
ख्रिसमसचे औचित्य साधून खडकीतील ख्रिश्चन बांधवांना शिवसेनेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या, खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मेरी ख्रिसमसचा नारा देत शिवसेनेने सर्वधर्म समभावाचा संदेशही या निमित्त दिला.

चोरी करणाऱ्या महिला, १८ गुन्हे

$
0
0
शहरातील उच्चभ्रू लोकांच्या लग्न समारंभामध्ये लहान मुलांना भारी कपडे घालून समारंभातील लोकांमध्ये पाठवून येथील महिलांच्या पर्सची चोरी करणाऱ्या दोन महिलांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट ३ च्या पथकाने गुरुवारी (ता. २५) अटक केली.

रेडझोन प्रश्न सोडविणार

$
0
0
पिंपरी-चिंचवड व मावळमधील रेडझोनचा प्रश्न सोडवून नागरिकांना न्याय देण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन केली. यावर ‘रेडझोनच्या प्रश्नाबाबत पुण्यामध्ये बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू,’ असे आश्वासन मनोहर पर्रिकर यांनी दिले आहे.

क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यू

$
0
0
सासवड रोड, मंतरवाडी चौकात उभ्या असलेल्या महिलेला भरधाव वेगात आलेल्या क्रेनने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. क्रेनचालकास पोलिसांनी अटक केली असून ही घटना बुधवारी साडेचार वाजता मंतरवाडी चौकात घडली.

बेकायदा जमीन लाटणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश

$
0
0
मुळशी तालुक्यातील उरवडे या गावाजवळ असलेल्या ११ एकर जमिनीचे बेकायदेशीररित्या खरेदीखत करून जमीन बळकावल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.

खूनप्रकरणी बाराजणांवर मोक्का

$
0
0
काळेपडळ येथील सामाजिक कार्यकर्ता सचिन शेलार याच्या खूनातील बारा सराईत आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

तिकीट विक्री केंद्रातून लूट

$
0
0
पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील भुयारी मार्गातील आउट सोर्सिंग केलेल्या तिकीट विक्री केंद्रातून शटल गाड्यांसाठी दोन रुपये व जलद गती गाड्यांसाठी तीन रुपये सर्रास आकारले जात आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images