Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ऐन हिवाळ्यातही राज्यात २१४ टँकर

0
0
पुरेशा पावसाअभावी राज्यातील पाण्याची स्थिती यंदा काहीशी बिकट राहणार असल्याची चिन्हे दिसत असून ऐन हिवाळ्यात राज्यात २१४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

जागेच्या आमिषाने फसविले

0
0
जागेचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाही संबंधित जागा विकसित करण्याचे आमिष दाखवून त्यासाठी २५ लाख रुपये अनामत रक्कम घेऊन बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उमेदवारांची नावे येणार इंग्रजी वर्णमालेनुसार

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांनुसार होणार असल्या, तरी ​इलेक्टॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) उमेदवारांचा क्रम राजकीय पक्षांनुसार नव्हे; तर वर्णानुक्रमे ठरणार आहे.

शिवसेनेने केला प्रचाराचा श्रीगणेशा

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने संपर्कनेते अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रचाराला आरंभ केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून २६ डिसेंबर रोजी खासदार आणि आमदारांसह सर्व वॉर्डांत प्रचारफेरी काढून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.

गावठाण हरकतींवर होणार सुनावणी

0
0
गावठाणांच्या निवासी क्षेत्रात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ९१ गावांमधून हरकती व सूचना आल्या असून, नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.

पुण्याचा गुलाब ठरला बेस्ट ग्लॅडिएटर ऑफ शो

0
0
हैदराबाद येथे नुकत्याच भरविण्यात आलेल्या वर्ल्ड रिजनल कन्व्हेंशनमध्ये पुण्याच्या पुंडलिक निम्हण यांच्याकडील गुलाबाला ‘दि बेस्ट ग्लॅडिएटर ऑफ द शो’ हा पुरस्कार मिळाला. जगभरातून सहभागी झालेल्या गुलबाप्रेमींच्या या कन्व्हेंशनमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक बक्षिसे मिळवून बाजी मारली.

जिल्ह्यात ‘मनरेगा’ची १८ हजार कामे

0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १८ हजार २०२ कामे राबविण्यात येणार असून, त्यासाठी ५३ कोटी ४३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने याचा कृती आराखडा तयार केला आहे.

कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती भक्कम

0
0
कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, गेल्या दोन वर्षांत बँकेची प्रगती झाली आहे, असे बँकेतील सत्ताधारी सहकार पॅनेलच्या वतीने गुरूवारी स्पष्ट करण्यात आले.

‘रुपी’च्या विलिनीकरणास कॉसमॉस बँकेची असमर्थता

0
0
रुपी बँकेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगतानाच बँकेचे विलिनीकरण करून घेण्यास कॉसमॉस बँकेने गुरूवारी असमर्थता दर्शविली आहे. रुपी बँकेचे पुनरूज्जीवन होणे, ही काळाची गरज आहे.

मानवी साखळीद्वारे मानवाधिकार जनजागृती

0
0
आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकार दिन पाळला जात असताना अधिकाराबाबत प्रत्येक व्यक्तीला जाणीव तसेच त्याबाबतची माहिती व्हावी, यासाठी तथापि संस्थेच्या वतीने शहरातील विविध कॉलेजमध्ये मानवी साखळी करून जनजागृती करण्यात आली.

औषध विक्रेत्यांची अचानक तपासणी

0
0
बनावट, चुकीची औषधे देणाऱ्या शहरातील घाऊक तसेच किरकोळ औषध विक्रेत्यांच्या दुकानांची आता केव्हाही कोणत्याही अधिकाऱ्यांमार्फत अचानकपणे (सरप्राईज व्हिजीट) तपासणी करण्यात येणार आहे.

पुणे ते सोलापूर नॉनस्टॉप स्केटिंग

0
0
पुणे ते सोलापूर हे अंतर नॉनस्टॉप स्केटिंग करत सतरा तास ३९ मिनिटामध्ये पूर्ण करण्याची मोहीम सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या अपर्णा तानाजी हजारे हिने हाती घेतली आहे.

MIT रॅगिंगप्रकरणी मागवला खुलासा

0
0
एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमधील रॅगिंगच्या प्रकाराबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॉलेजकडून खुलासा मागविला आहे. कॉलेजने यापूर्वी पाठविलेला अहवालाचा विचार करून, त्यामध्ये समाविष्ट नसलेल्या मुद्द्यांबाबतही स्पष्टता करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.

मागण्यांसाठी बेमुदत शाळा बंद आंदोलन करू

0
0
शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये कोणताही ठोस निर्णय न झाल्याने, अखेर राज्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

‘JSPM’ अतिरिक्त फीवाढ चुकीची

0
0
स्टेशनरी फीच्या नावाखाली ‘जेएसपीएम’च्या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांकडून केली जाणारी अतिरिक्त शुल्कवसुली पूर्णपणे चुकीचीच असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

विद्यानिकेतन शाळांवर टांगती तलवार?

0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या विद्यानिकेतन शाळा पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा घाट शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घालण्यात येत असून, यामुळे सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

‘आव्वाजा’वर कारवाई कराच

0
0
धार्मिक उत्सवांबरोबरच काही ठराविक समारंभांना रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकांच्या वापराला राज्य सरकारकडून परवानगी मिळत असली, तरी ३१ डिसेंबरचा यात समावेश नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ‘आव्वाज’ करणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करा, अशा सूचना हरित न्यायाधिकरणाने वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.

धरणांसाठी होणार खासगी जमिनींची खरेदी

0
0
धरण आणि अन्य प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने आता थेट खासगी जमीन खरेदी करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.

भारती विद्यापीठ परिसरातील कचऱ्याची समस्या दूर

0
0
उरळी आणि फुरसुंगीतील कचरा डेपो बंद होण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही पालिकेकडून अद्याप त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसताना, प्रभागातील कचरा प्रभागाचत जिरविण्यासाठी काही नगरसेवकांनी मात्र प्रयत्न सुरू केले आहेत.

छोट्या छोट्या उद्दिष्टांतून PMP सुधारण्याचे ध्येय

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बंद बसचे प्रमाण कमी करून जानेवारीपर्यंत ८० टक्के बस मार्गावर आणण्यासाठी प्राधान्य देतानाच, प्रशासकीय सुधारणा आणि तंत्रज्ञानाची कास धरत ‘पीएमपी’च्या सेवेचा चेहरा-मोहरा बदलण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images