Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंत्र्यांनी कान टोचले :जातपडताळणी वेगात

$
0
0
सामा‌जिक न्यायमंत्री आणि खात्याच्या सचिवांनी राज्यातील जातपडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून रखडलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील जातपडताळणी समित्यांकडे रखडलेली प्रकरणे आता निकाली निघण्याची आशा आहे. पुणे समितीकडील जवळपास दोन हजार प्रकरणे निकाली काढण्याच्या कामाला वेग आला आहे.

सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद

$
0
0
सोलापूर-मुंबई विमानसेवा किंगफिशरने दर्स्ष्षापूर्वी गाजावाजा करून सुरू केली होती. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र सुरुवातीचे काही दिवस वगळता या सेवेला थंडाच प्रतिसाद मिळाल्याने अखेर किंगफिशरने या सेवेचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

दुचाकींसाठी स्वतंत्र लेन?

$
0
0
स. गो. बर्वे चौकामध्ये संचेती हॉस्पिटलकडून येणा-या बसेसना महापालिकेकडे जाण्यासाठी डाव्या बाजूला रस्ता ठेवावा आणि शनिवारवाड्याकडून येणा-या दुचाकीवाहनांना जंगली महाराज रोडकडे जाण्यासाठी स्वतंत्र लेन ठेवण्याची सूचना वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी महापालिकेला केली आहे.

कास पठाराचे 'जीआय' अद्याप फुलेना...

$
0
0
पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कास पठाराला भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये वन विभागानेच खोडा घातला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासूनच्या खटपटींना अद्यापही प्रस्तावाचे स्वरूप प्राप्त झालेले नाही.

विद्यार्थ्यांना मिळणार करिअर संधींचेही धडे

$
0
0
पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील विद्यार्थ्यांना आता नियमित अभ्यासक्रमाबरोबरच करिअर कशात करता येईल, याचेही धडे मिळणार आहे. त्यासाठी कॉलेजांना करिअर अँड कौन्सेलिंग सेलची स्थापना करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने केले आहे.

ज्ञानेश्वर-तुकारामांवर किती दिवस चालणार?

$
0
0
'मराठीचे वाचन नाही, शब्दसंग्रह कमी झाला आहे, संज्ञा-संकल्पना समजून घेत ज्ञानोपासना करायची तयारी नाही. मराठीची अवहेलना सुरू आहे कारण मराठीने पोट भरत नाही, नोकरी मिळत नाही, अशी भावना वाढीस लागली आहे. भाषा पोटावर चालते. ज्ञानेश्वर-तुकारामांवर अजून किती दिवस चालणार', अशा शब्दांत ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांनी बुधवारी भावना व्यक्त केल्या.

बेकायदा बांधकामांना प्रतिदिन ३० रुपये दंड

$
0
0
हवेली तालुक्यातील नऊ गावांमधील एक हजार ५९ बेकायदा बहुमजली बांधकामांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावल्यानंतर ही बांधकामे त्वरीत न काढल्यास प्रतिदिन ३० रुपये दंड केला जाणार आहे. उरूळीकांचन व फुरसुंगी या गावांतील बेकायदा बांधकामांची पाहणी सुरू करण्यात आली आहेत.

पॅराग्लायडर्संची सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश

$
0
0
पॅराग्लायडर्स, हौशी पॅराग्लायडर्स, त्याविषयक साहित्याची विक्री करणारे विक्रेते, व्यावसायिक पॅराग्लायडर्स आणि पॅराग्लायडिंगचे क्लास घेणा-यांची माहिती गोळी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिले आहेत.

प्रकरण गंभीर, पण सध्या फक्त समजच...

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या शारिरीक शिक्षण विभागातील प्रा. संतोष कांबळे यांनी आपल्या सहका-यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, प्रा. पेटकर यांना दिलेल्या धमक्या आणि विद्यार्थिनींना केलेले प्रपोजेस या सर्वच बाबी अत्यंत गंभीर आहेत.

विद्यापीठात विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापकाची दमदाटी, त्याने विद्यार्थिनींना दिलेली अपमानास्पद वागणूक यांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारपासून वर्गांवर बहिष्कार टाकला. संबंधित प्राध्यापकावर कारवाई होईपर्यंत वर्गाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली, तर विद्यापीठाच्या बोटचेपेपणाच्या भूमिकेमुळे नाराज होत तीन प्राध्यापकांनी राजीनामे सादर केले.

होर्डिंग परवान्यांचे नूतनीकरण नाही

$
0
0
होर्डिंग व्यावसायिकांकडून शुल्क भरून घेऊन त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण सध्या तरी करता येणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यांच्याकडून शुल्क भरून घेतल्यास महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे त्यांनी सांगितले.

१३० साक्षीदारांची यादी सादर

$
0
0
स्वारगेट येथे बेदरकारपणे एसटी बस चालवून आठ जणांचा बळी आणि ३२ जणांना जखमी करणा-या संतोष माने प्रकरणात सरकार पक्षातर्फे १३० साक्षीदारांची यादी बुधवारी कोर्टात सादर करण्यात आली. तसेच पंचनामे आणि पुरावे सादर करण्यात आले. साक्षीदारांच्या यादीत २४ जखमींचा समावेश असून तीन सप्टेंबर रोजी होणा-या सुनावणीत त्यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे.

बिघाडामुळे शहरात तातडीचे लोडशेडिंग

$
0
0
महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांमधील देखभाल दुरूस्तीच्या कामांसह खापरखेडा वीजकेंद्रातील दोन संचात बिघाड झाल्याने राज्याच्या विविध भागांमध्ये बुधवारी तातडीचे लोडशेडिंग करावे लागले. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही दोन तासांचे लोडशेडिंग करण्यात आले. दरम्यान, उद्या (गुरूवार) सकाळपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल, असे वीज कंपन्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बेदरकार वाहतुकीचा कात्रज चौकात बळी

$
0
0
चोवीस तास वाहतुकीच्या कोडींत सापडत असलेल्या कात्रज चौकात बेदरकार वाहन चालविल्याने आणखी एकाचा मंगळवारी सकाळी बळी गेला. ट्रक चालकाने वर्दळीच्या अशा कात्रज चौकातून अपघातानंतर पळ काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांचे ‘सि(इ)लेक्शन’

$
0
0
मतदार नोंदणीपासून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामांत राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य घेण्यासाठी या संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वीजचोरी : एकाला शिक्षा आणि दंड

$
0
0
वीजमीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी केल्याप्रकरणी एका वयोवृद्ध व्यक्तीला कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत उभे राहण्याची आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. कु-हेकर यांनी हा निकाल दिला.

प्रवासी बस थांब्यांमुळे सुरक्षा धोक्यात

$
0
0
शहरातील काही पेट्रोल पंपावर अनधिकृत प्रवासी बस उभ्या राहत असल्याचे समोर आल्यामुळे या पंपांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंप नियमावली व वाहतूक पोलिसांच्या नियमांनुसार पंपांवर अशा प्रकारचा बस थांबा करणे कायदेशीर नाही. तरीही, शहरातील या थांब्यांकडे डोळेझाक केली जात आहे.

शहरात अधिकृतांइतकेच अ‌नधिकृत पथारीवाले

$
0
0
शहरात जेवढे अधिकृत पथारी व्यावसायिक आहेत तेवढेच अनधिकृत पथारी व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. या सर्व व्यावसायिकांवर कारवाईसोबतच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी निश्चित धोरण आखण्याची सूचना या वेळी करण्यात आली.

मंगळसूत्र चोराला पाठलाग करून पकडले

$
0
0
आईचे सौभाग्याचे लेणे हिसकावून पळणा-या दोन इराणी आरोपींपैकी एकाला मुलाने पाठलाग करत पकडले. चाकूचा धाक दाखवून मुळा नदीच्या काठाने पळणा-या चोरट्यांपैकी एकाला गजाआड करण्यात आल्याने आईचे मंगळसूत्र चोर मुलाने गजाआड केले. या प्रकरणी शालिनी जगन्नाथ पांचाळ (वय ५३, रा. पिंपळे निलख) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

M.R. प्रतिनिधींचा आज देशव्यापी संप

$
0
0
विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी औषध विक्री प्रतिनिधींच्या अखिल भारतीय संघटनेने उद्या, २३ ऑगस्टला देशव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. जीवनावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी कायद्यात तरतूद करावी, औषध विक्री प्रतिनिधींना (एमआर) कायद्याने दिलेला अधिकार मान्य करावा यासारख्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images