Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोन साखळीचोरांना अटक

$
0
0
पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून पळुन गेलेल्या दोघा चोरट्यांना पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. नवनाथ प्रकाश पवार (वय १८ रा. संत तुकारामनगर ,पिंपरी) आणि संदीप तानाजी जाधव (वय २६ रा. कोकणेचाळ, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

रस्त्यावरच्या लढायांना प्रसारमाध्यमांनी बळ द्यावे

$
0
0
'संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून जनतेचे सगळेच प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरच्या लढाया लढाव्याच लागतील. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी अशा लढ्यांना बळ देण्याची भूमिका घ्यावी', अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.

अनधिकृत बांधकामांवरून राजकारण

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या ठाम भूमिकेवरून राजकीय पक्षांमध्ये वॉर चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. तर, शिवसेना-भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन यांच्या महायुतीने लोकांसमवेत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

पुणे महापालिकेत 'मटा'चे अभिनंदन

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ने ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी ‘मटा’च्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी याबाबतचा ठराव दिला होता. ''‘मटा’ने समाजातील चांगल्या गोष्टींना पाठिंबा देऊन चुकीच्या गोष्टींवर टीका केली आहे.

पतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये घबराट

$
0
0
खडकीतील व्यापा-यांमध्ये आग्रगन्य असलेली श्री आग्रसेन महाराज पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. मात्र, सर्व खात्याचे ऑडीट सुरू असल्याने हा घोटाळा नक्की कितीचा आहे, हे सांगण्यास संस्थेच्या पदाधिका-यांनी असमर्थता दर्शविल्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती पसरली आहे.

आता NCP चा 'कार्यकर्ता अभ्यासवर्ग'

$
0
0
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पक्षाचे मंत्री आणि पदाधिका-यांसोबतच विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

बिबट्याचे १२ वर्षांत १९ बळी

$
0
0
बेल्हे येथील मटाले मळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यांत समृद्धी मटावे ही बालिका जखमी झाली आहे. याच मळ‍्यात बिबट्याच्या हल्ल्यात २००० साली मोहिनी मटाले नावाच्या मुलीला प्राण गमावावे लागले होते. समृद्धीवरील हल्ल्याच्या घटनेने या कटू आठवणीला मटाले मळा परिसरात पुन्हा जाग आल्याचे चित्र आहे.

धरणांत पाणी...घरात खडखडाट !

$
0
0
पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गेले सहा महिने पुणेकरांनी पाणीकपात सहन केली. पण आता धरणांत पाणी आहे; पण घरच्या नळाला पाणी नाही, अशी वेळ पुणेकरांवर ओढवली आहे. यापुढे आता पुणेकर पाणीकपात सहन करणार नाहीत, असा इशारा देत पूर्वीप्रमाणेच दोन वेळा पाणी द्या, अशी मागणी विविध नगरसेवकांनी मंगळवारी केली.

माजी नगरसेवकास लाचप्रकरणी ३ वर्षे तुरुंगवास

$
0
0
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या साफसफाईच्या कामाचे मार्च २००८ मधील बिल देण्यासाठी एका ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक अख्तर हुसेन तालुकदार चौधरी आणि पालिकेच्या एका आरोग्य अधिका-याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. पी. उत्पात यांनी हा निकाल दिला.

पॉलिग्राफ, नार्कोची मागणी कोर्टाने फेटाळली

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) नोकर भरती घोटाळाप्रकरणातील भरती प्रक्रिया मंडळाचे अध्यक्ष कर्नल अनिलकुमार सिंग, कुलबीरसिंग यांच्या सह आठजणांची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून सीबीआयने केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला.

अनाथ मुलांसंदर्भात जनहित याचिका

$
0
0
भारतातील अनाथ मुलांच्या पुनर्वसनाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून घोषित करावा यामागणीसाठी अॅड. राजेंद्र अनभुले यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने भारत सरकार, २८ राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली असून चार आठवड्याच्या आत हजर राहून आपले म्हणणे शपथपत्राद्वारे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

पाण्याला पर्याय : अग्निशमन यंत्रणा विकसित

$
0
0
आग विझवताना पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पाण्याला पर्याय देणारे अग्निशमन तंत्रज्ञान समोर आले आहे. सर्व्हर रूम किंवा कम्प्युटर सिस्टिम्स असलेल्या ठिकाणांसाठी हे तंत्रज्ञान प्रभावी असून, आग विझवण्याबरोबरच कम्प्युटरमधील डेटा वाचवणे यामुळे शक्य होत असल्याचा तंत्रज्ञानाच्या निर्मात्यांचा दावा आहे.

‘हाउसिंग दरबार’ आता शनिवारी

$
0
0
गृहनिर्माण सोसासट्यांमधील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांचे निवारण करण्यासाठी सहकार खात्याच्या वतीने घेतला जाणारा ‘हाउसिंग दरबार’ यापुढील काळात रविवारऐवजी शनिवारी घेण्यात येणार आहे. यामुळे यापुढील ‘हाउसिंग दरबार’ आता सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी होणार आहे.

उपाध्यक्षपदाच्या निवडीला मुहूर्त

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षांनी अखेर वेळ दिल्याने नव्या उपाध्यक्षाच्या निवडीला आता मुहूर्त सापडला असून, येत्या २८ ऑगस्टला या पदाची निवड होणार आहे. बोर्डाच्या सदस्य आरती महाजन यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

डेक्कन बसथांबा : वाहतूक कोंडी वा-यावर

$
0
0
डेक्कन जिमखान्यावरील पीएमपी बसथांब्याजवळील वाहतूक समस्या दिवसेंदिवस कठीण होत असून वाहतूक पोलिस आणि पीएमपी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. पीएमपी बसमुळे याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाने अद्याप तयार केली नसल्याचे पीएमपीच्या वरिष्ठ अधिका-याने स्पष्ट केले.

अनधिकृत शाळांवरील कारवाईला स्थगिती

$
0
0
राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवरील कारवाईला राज्य सरकारने स्थगिती आहे. अनधिकृत शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न या कारवाईमुळे ऐरणीवर आला होता.

अपंगांची फसवणूक : गुन्हे दाखल करा

$
0
0
अपंगासाठी राज्य सरकारने आखलेल्या योजना निश्चितच उपयुक्त आहेत. मात्र, खोटी प्रमाणपत्र मिळवून या योजना पळविणायांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच पुण्यात केली. तसेच अपंगांची नोकर भरतीतील अडसर दूर ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

शिवनेरीचे दरवाजे बुलंद करण्यासाठी केंद्राकडून खजिना

$
0
0
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीचे दरवाजे बुलंद करण्यासाठी तसेच फरसबंद दगडी मार्ग तयार करुन तटबंद्यादेखील बळकट करण्यासाठी केंद्राकडून खजिना उपलब्ध झाला आहे. किल्ले शिवनेरी राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यावरील वास्तूंची पुर्नबांधणी, फेरबदल आणि ‘स्कीन प्रोटेक्शन’ या बाबींसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

सासवडचा ‘डीपी’ वादाच्या भोव-यात

$
0
0
सासवड शहराचा विकास आराखडा २०१२ चे (डीपी) प्रारूप नगरविकास विभागाने नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रसिद्ध केले असून त्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी आवाहन केले आहे. रिंगरोडचा समावेश असणारी ही विकास योजना वादाच्या भोव-यात अडकणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

सोलापुरात तणाव

$
0
0
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यातील पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे सोलापुरातील काही भागांत सायंकाळनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. लक्ष्मी मंडई, पाणीवेस, बाळीवेस या दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images