'आम्ही नवरा-बायको राबराब राबून चार पैसे आणायचो, मग चूल पेटायची, हातावरचे पोट असले तरी सोन्यासारख्या मुलाला पुण्यात शिकवायचे होते. आता सचिन सोडून गेल्याने त्याला शिकवण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले नाही...' मराठवाड्यातील जिंतूर तालुक्यातून मावशीकडे आलेल्या सचिन तारूच्या आईने हुंदके देत आपल्या भावनांना वाट मोकळी दिली.
↧