अन्न व औषध प्रशासन विभागाने हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच पोलिसांचीही कारवाईला सुरुवात झाली आहे. गुन्हे शाखेने 'एमजी रोड'वरील दोन हुक्का पार्लरवर कारवाई करत हुक्का ओढणा-या सात तरुणांना शुक्रवारी ताब्यात घेतले. तसेच हुक्का ओढण्यासाठी लागणारी पावडर, कोळसा अशा वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
↧