देहू येथे पारायणासाठी निघालेल्या वारक-यांचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सात वारक-यांचा मृत्यू झाला असून २६ वारकरी जखमी झाले आहेत. हे सर्व वारकरी हे संगमनेर तालुक्यातील देवगाव येथील होते. पुणे-नाशिक हायवेवर पिंपळवंडी येथे हा अपघात झाला. त्यात तीन जणांचा जागेवरच तर चार जणांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.
↧