नगररोड परिसरात विश्रांतवाडी ते वाघोली येथील बीआरटीची कामे वेगाने सुरू असून येत्या डिसेंबरअखेर हा मार्ग सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा सोळा किलोमीटर लांबीचा डेडिकेटेड बीआरटीचा मार्ग असेल. दरम्यान, शहरातील अन्य चार मार्गांवरील बीआरटी पुढील वर्षी सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
↧