बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे राज्यात आज (रविवारी) होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांनी शनिवारी दिली.
↧