‘वाढत्या शहरीकरणामुळे येणा-या काळात नवीन आव्हाने निर्माण होणार असून पर्यावरण, कचरा तसेच सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या एकमेव क्षेत्रात दोन लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असलेल्या पुणे शहरात स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर (सेक्स रेशो) मात्र अत्यंत कमी आहे,’ असे निरीक्षण तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांनी नोंदवले.
↧