मावळ तालुक्यातील पवनमाळ परिसरात कडधे, लोखंडवाडी, आर्डव, येळसे, काले आणि पवनानगर गावात डेंगीच्या साथीची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. डेंगीचे तेरा रुग्ण या परिसरात आढळून आले असून, सुमारे वीस ते पंचवीस संशयित रुग्ण आढळले आहेत. आर्डवमध्ये साठविलेल्या पाण्यात इडिस इजिप्ती डासाच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
↧