पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची इमारत पाडून त्या जागेवर ‘ग्रीन बिल्डिंग’ ही संकल्पना असलेली पहिली शासकीय इमारत उभी राहणार आहे. तब्बल दोन लाख चौरस फुटांच्या या इमारतीसाठी १४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
↧