अष्टविनायक तिर्थक्षेत्र असलेल्या लेण्याद्री येथे गिरीजात्मजाच्या दर्शनमार्गावर आता सीसीटीव्ही वॉच ठेवणार आहे. जुन्नर पोलिस ठाण्याच्या सूचनेनुसार लेण्याद्रीच्या दर्शन मार्गावर १६ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, अशी माहिती लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत डोके तसेच सचिव जितेंद्र बिडवई यांनी दिली.
↧