‘नाट्यसंमेलनाध्यक्षपदाच्या माध्यमातून नाट्यचळवळीसाठी काय करता येईल हे माहीत करून घेण्यावर माझा भर राहील. नेमके काय करणार याच्या वल्गना करण्यापेक्षा वास्तवात काय करता येणे शक्य आहे आणि लोकांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे’, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि जेष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी त्यांची भूमिका मांडली.
↧