पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँगेस नंबर वन राहिला असला तरी कोणतीही नवीन योजना आणायची की नाही, याबाबत निर्णय घेताना गेल्या पाच वर्षांप्रमाणे जोडसाखळीचा खेळ सुरूच राहणार आहे. त्यामुळे स्थायी समितीत कधी राष्ट्रवादी काँगेस-काँगेस आघाडी, कधी राष्ट्रवादी-महायुती हा नवा 'पुणे पॅटर्न', तर कधी राष्ट्रवादी-मनसे आघाडी असे 'अस्थायी पॅटर्न'चे चित्र पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.
↧