शहरात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच, ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारी दिवसभर शहरात हवामान ढगाळ होते. रात्री उशिरा काही भागांत हलका पाऊसही झाला. पुढच्या दोन-तीन दिवसांत ढगाळ हवा कायम राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अंदाजही पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
↧