डी.टी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा होण्याची सध्या कोणतीही शक्यता नसल्याची स्पष्टोक्ती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी पुण्यात केली. पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून रुजू करून घेण्यासाठी शासनाकडे जागाच नसल्याने नव्या उमेदवारांना संधी द्यायची तरी कशी, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
↧