पारंपरिक रूपात सजलेली ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, श्री भवानीआई, तळजाई, पद्मावती अन् चतुःशृंगी माता, सोन्याच्या साजात झळाळून उठलेली सारसबाग येथील महालक्ष्मी, कात्रजची आश्वासक सच्चाई माता अशा आदिशक्तीच्या विविध रूपांना डोळ्यांत साठविणा-या भाविकांच्या अलोट गर्दीत शारदीय नवरात्रौत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला. सुख-समृद्धी अन् शांतीसह जगण्यातील संकटांना धीराने सामोरे जाण्याचा जोगवा आबालवृद्धांनी मातेकडे मागितला.
↧