‘जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटाला आता अडीच महिने होत असतानाच, पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यांचे हे अपयश लपविण्यासाठीच दिल्ली पोलिसांनी माझ्या भावाला या घटनेत गोवले,’ असा आरोप फिरोजचा सख्खा धाकटा भाऊ फैय्याज सय्यद याने शुक्रवारी केला. तसेच, फिरोजच्या अटकेविरोधात कोर्टात न्याय मागणार असून, दिल्लीतील वकिलाशी मोबाईलवरून चर्चा सुरू असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
↧