पोस्टाच्या पुणे विभागाच्या कामगिरीत सुधारणा झाली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा महसुलात ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे ३५.२३ कोटी रुपयांची आहे. पोस्टाच्या सेवांबरोबरच सेव्हिंग अकाउंट्स आणि पोस्टल विमा योजनाधारकांच्या संख्येत वाढ झाल्याने महसूल वाढला आहे.
↧