उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदांचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठावंतांनी पवार यांच्या नैतिक भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात पदांचे राजीनामे दिले. त्यामध्ये शंकर केमसे, प्रशांत म्हस्के, आनंद अलकुंटे, अप्पा रेणुसे आणि विशाल तांबे या पाच विद्यमान नगरसेवकांसह शिक्षण मंडळाचे सदस्य लक्षीकांत खाबिया यांचा समावेश आहे.
↧