उत्साही, चुणचुणीत आणि गुणी शुभ कॉलनीतील सर्वांचाच लाडका होता. रविवारी रात्री गणपतीची आरती केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटणाऱ्या शुभचा त्यानंतरच काही वेळाने दुर्देवी अंत व्हावा, याचा डीआरडीओच्या रामनगर कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना चांगलाच धक्का बसला. सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या रावल कुटुंबीयांबाबत ही घटना घडल्याने रामनगर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
↧