ठाणे ग्रामीण व पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे खंडणीसाठी अपहरण केलेल्या आठ वर्षांच्या मुलाची मंगळवारी सुटका झाली. हिमांशू बनवारीलाल मिश्रा (वय ८ तिरूपती दर्शन बिल्डिंग भाईंदर पश्चिम) असे सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी देवेंद्र भगवानसिंग ठाकुर (वय २४ रा. सडखिरा, जि. सागर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
↧