वैद्यकीय, परावैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबरोबरच वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्टचीही राज्यात वानवा आहे. ३५९ तालुक्यांपैकी २४० तालुक्यांमध्ये ‘एमडी’ पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित ‘पॅथॉलॉजिस्ट’चा शोध घेतला जात असून महत्त्वाच्या निदान चाचण्या करण्यासाठी पेशंटना दुसऱ्या तालुक्यात नव्हे, तर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत आहे.
↧