ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याबरोबर झालेला जयप्रभा स्टुडिओच्या जागा खरेदीचा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन या जागेचे खरेदीदार पोपटलाल गुंदेशा यांच्यावतीने त्यांचे बंधू विलास यांनी गुरुवारी दिले. सर्वपक्षीय अंदोलकांच्या झालेल्या बैठकीवेळी गुंदेशा यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र पोपटलाल परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी बंधू विलास यांना पाठविले होते.
↧